वांग्याची भजी

Submitted by अबोल on 5 July, 2011 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भरताच काळ वांग, तिखट मसाला, हळद , मीठ, तांदुळाच पिठ, रवा, तेल

क्रमवार पाककृती: 

भरताच काळ वांग घेवुन त्याच्या गोल चक्त्या पाडायच्या ... जास्त जाड पण नाही पातळ पण नाही ... ते धुवुन ... त्याला तिखट मसाला, हळद , मीठ लावुन थोड्यावेळ ५ -६ मिंनिट ठेवा

नंतर तांदुळाच पिठ, रवा मिक्स करुन थोड तिखट मसाला मिक्स करुन ते त्या चकत्यां ना लावावे..

नंतर ते चकत्या तव्यावर थोड थोड तेल टाकुन .. मंद अग्निवर झाकण थेवुन फ्राय करावी ...एक दोन वेळा अधुन मधुन हळुवार परतावी.. (जसे मासे तळतो तसे)

आणी गरम गरम खावी

अधिक टिपा: 

ही भजी बर्रोबर असताना भाजी ची गरज नाही....

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही याला वांग्याचे काप म्हणतो. तांदुळाचे पीठ्/रव्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कधी वाटलेली लसुण घालुन बघ मस्त चव येते Happy

खूपच सुंदर पण वांग्याच्या बिया कडू असल्या तर तेवढाच कंटाळा येतो खायला. कारण एकदा आमच्याकडे पण अशीच केलेली पण त्या बिया कडू होत्या.

दीपा आम्ही वडे / थालीपिठाची भाजणी वापरुन करतो हे. बेसनाने पण मऊ नाही पडत. काप जाड असला तर मऊ पडतो. पातळ असेल तर नाही.

नाही .... रावी .. झाकण ठेवल्याने काप थोडेसे शिजायला मदत होईल... मग नंतर काधुन टाकावे..