Submitted by बेफ़िकीर on 4 July, 2011 - 07:23
खुले ओले खर्या सोन्याप्रमाणे लख्ख चमचमते
मला शोधायचे पुर्वी तुझे ते केस घमघमते
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
मुनव्वर वाचल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते
गुलमोहर:
शेअर करा
रमते, दमते, शमते, नमते खास
रमते, दमते, शमते, नमते
खास आवडलेत.
सर्व प्रतिसादकांचे आभार निवडक
सर्व प्रतिसादकांचे आभार
निवडक दहात घेणार्या सदस्याचे विशेष आभार
-'बेफिकीर'!
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते mast
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते mast
सगळेच शेर
सगळेच शेर एक-चढ-एक......!
तुमचे इतके ताकदीचे शेर वाचले की मती गुंग होते...
मग स्वतःचेच शेर स्वतःलाच पटेनासे होतात सरजी...:-(
-सुप्रिया.
सुप्रियाशी सहमत आहे.. काय शेर
सुप्रियाशी सहमत आहे..
काय शेर का काय!!
मती खरंच गुंग झालीये.
वा. गझल छन झाली. स्वतःला एकटा
वा. गझल छन झाली.
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
बेफिकिर जी .... तुम्हाला खरच
बेफिकिर जी ....
तुम्हाला खरच मानाचा मुजरा!
तुमच्या साहित्याचा एक प्रामाणिक चाहता.....
नानुभाऊ
जस्ट अप्रतिम. अख्खी गझल
जस्ट अप्रतिम.
अख्खी गझल जबरदस्त.
कुणाला यातले जमते कुणाला
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
Pages