घुसमट!

Submitted by prithvirajkadam on 2 July, 2011 - 09:11

ती मुलगी ,ती तरुणी ,ती आजी ,ती मावशी ,ती काकी, ती ताई
ती बाई,ती खेळाडू ,ती डॉक्टर ,ती पोलीस ,ती अधिकारी ,ती शिक्षिका
ती मोलकरीण ,ती मजबुरी म्हणून वैश्या व्यवसाय करणारी ,ती शेतकरीण
या सर्वच महिला आहेत ........त्यांना आपण सर्वानीच त्यांचा हक्काचा सन्मान दिला पाहिजेच
एका दिवसा साठी नाही तर निरंतर चा .....तिला समानतेचे वागणूक हवी आहे ,सहानुभूती नको
पुढारलेल्या समाजाची मानसिकता अजून बदलायला हवी .....
मग नाही गरज पडणार एखादा दिवस महिलां साठी उसना मागून आणण्याची ,ना गरज पडेल गर्भ लिंगनिदान
प्रतिबंध कायद्याची,ना गरज पडेल तिच्या शोषणा बद्दल कायदा करण्याची ना गरज पडेल ३३% किवा ५०% आरक्षण उधार मागण्याची ,
ना मागावी लागेल तिला प्राप्तिकरात सूट......
तिचे महिला दिन घालून दिवस घालण्या पेक्षा , तिला मुक्त श्वास घेऊन जगू द्या,तेवढ पुरेसे आहे ........

पृथ्वीराज कदम

गुलमोहर: