Submitted by षड्जपंचम on 30 June, 2011 - 13:30
चुकीच्या ठिकाणी धागा उघडला असल्यास माफी असावी..
मला काही जुन्या cassettes चे cd मध्ये रूपांतरण करायचे आहे... मी सरळ सरळ laptop समोर ठेवून रेकॉर्ड केले .. पण इतके व्यवस्थित आले नाही.. audacity मधून थोड्या सुधारणा करू शकलो.. पण मला विचारायचे आहे की कुणी व्यावसायिक स्वरूपात हे करू शकतात का? पुण्यात कुठे हे करून मिळेल?
शिवाय ध्वनीमुद्रणाचा दर्जा एडिट करणे शक्य असते का?
ह्या सर्वांसाठी साधारणपणे किती फी आकारतात?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या कॅसेट प्लेअरला
तुमच्या कॅसेट प्लेअरला हेडफोनकरता (किंवा audio out) सोय आहे का? तशी असल्यास एक ऑडिओ केबल घेऊन ती कॅसेट प्लेअरचे audio out ते लॅपटॉपचे mic socket अशी जोडा. आणि मग रेकॉर्ड करा रेकॉर्डींग सॉफ्टवेअर वापरून.
रेकॉर्डींगचा दर्जा सुधारायचा म्हणजे काय करायचे आहे? फक्त आवाजाची पातळी वाढवायची असेल तर खूप सोपे आहे पण नॉइस काढणे फार कठीण आहे. नॉइस साधारण २ प्रकारचा असतो : १. hiss - ह्याची वारंवारीता कमी असते.आणि २. hum - ह्याची वारंवारीता मध्यम अथवा उच्च असते. रेडिओवर हे दोन्ही नॉइस व्यावस्थीत ऐकू येतात
साधारण गल्लीतले रेकॉर्डीस्ट दर्जा सुधारण्याच्या नावाखाली त्या वारंवारीता पूर्णपणे काढून टाकतात. पण त्यामुळे मूळ संगीताचा भाग जो त्या वारंवारीतेत मोडतो तो पण उडवला जातो. उदा. hiss च्या वारंवारीता उडवल्या तर तालवाद्यांचा आवाज (ज्याची वारंवारीता कमी असते) पण उडतो.
प्रत्येक वाद्याचा वेगळा ट्रॅक उपलब्ध असल्यास नॉईस काढणे सोपे जाते. आणि मग ते ट्रॅक मिसळून चांगल्या आवाज-प्रतीचे संगित बनवता येते. पण हे सहसा व्यावसायीक पातळीवरच शक्य होते कारण बरेच खर्चिक असते.
Jet Audio या सॉफ्टवेअर मधे
Jet Audio या सॉफ्टवेअर मधे ही सुविधा आहे, ज्यात तुम्ही कॅसेट प्लेयरचे आउटपुट पिसीच्या Line In ला जोडुन रेकॉर्डींग करु शकता.
Jet Audio या सॉफ्टवेअर मधे ही
Jet Audio या सॉफ्टवेअर मधे ही सुविधा आहे, ज्यात तुम्ही कॅसेट प्लेयरचे आउटपुट पिसीच्या Line In ला जोडुन रेकॉर्डींग करु शकता.>>>>भ्रमाला, अनुमोदन
षड्जपंचम, या धाग्यासाठी अनेक
षड्जपंचम, या धाग्यासाठी अनेक धन्यवाद. मलाही हे काम कित्येक दिवसापासून करायचे आहे.
audacity मधून थोड्या सुधारणा
audacity मधून थोड्या सुधारणा करू शकलो.. <<< लॅपटॉपसमोर ठेवून केलेल्या ध्वनीमुद्रणामध्ये सुधारणा केल्यात की Audacity मधून ध्वनीमुद्रण केलेत?
Audacity मधूनही (वॉकमनचे आऊटपूट थेट संगणकाला देऊन) ध्वनीमुद्रण करता येते. याचा दर्जा लॅपटॉपसमोर ध्वनीफित वाजवून केलेल्या ध्वनीमुद्रणापेक्षा फार फार चांगला असेल. Audacity मध्ये ध्वनीमुद्रण करताना एक ध्यानात ठेवायचे - आवाजाची पातळी अशी ठेवायची की ध्वनीतरंगांचा जो आलेख दिसतो (स्पेक्ट्रम) त्यात उठणारे ध्वनीतरंग त्या चौकटीच्या वरच्या आणि खालच्या कडेला फार थटता कामा नयेत.
MP3 डीव्हीडीचे CD मध्ये
MP3 डीव्हीडीचे CD मध्ये रुपांतर करायला कनव्हर्टर सॉफ्ट्वेअर कुठलं चांगलं.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ... प्रयत्न करतो तुम्ही सांगितलेल्या सूचनांवर ...
श्री, MP3 पण CD वर घेता
श्री, MP3 पण CD वर घेता येतात. आजकाल सगळेच सीडी प्लेअर MP3 प्ले करतात. MP3 चे wav करताना जागा जास्त लागेल आणि दर्जात काही सुधारणा होणार नाही. तरीदेखील करायचे असल्यास निरो वापरू शकता त्यात audio CD हा पर्याय निवडा.
mp3 dvd मधील गाणी hard disk
mp3 dvd मधील गाणी hard disk मधे कॉपी करा, मग cd मधे मावतील तशी write करा, फक्त data cd म्हणुन write करा
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमचा कॅसेट प्लेयर फार उत्तम प्रतीचा हवा... त्यातून येणारा आऊटपुट जर नीट नसेल तर कुठलेही सॉफ्टवेअर वापरून फार चांगले रेकॉर्डिंग होणारच नाही... हा स्वानुभव आहे.. आणि वर जसे लिहिले आहे तसे तुमच्या कॅस्ट प्लेयर चा हेडफोन आऊटपुट कॉम्पुटरच्या माईक इन ला जोडा.. हे रेकॉर्डींग बहुतेक वेळेस मोनो मध्ये होते.. त्याचे स्टीरिओ केले की सुद्धा चांगला परिणाम मिळतो.. बेस्ट ऑफ लक..
सात पूर्ण, बरोबर आहे.. मी आज
सात पूर्ण,
बरोबर आहे.. मी आज करून पाहिले... जरा चांगल्या प्लेयर वर प्रयत्न करतो...
मलाही हेच करायचे आहे. दर्जात
मलाही हेच करायचे आहे.
दर्जात फार सुधारणा होणार नाही ते चालेल, पण पुण्यात व्यावसायिक तत्वावर कोणी हे करतं का?
धन्यवाद माधव , भ्रमर , तुम्ही
धन्यवाद माधव , भ्रमर , तुम्ही सांगितलं तसं करुन बघतो.
अलूरकर म्युझिकवाले(प्लीज
अलूरकर म्युझिकवाले(प्लीज नोट.. दुकान प्रचंड पुणेरी आहे.. उलट उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे..) पूर्वी करुन देत असत.. पण बहुतेक काका एक्स्पायर झाल्यापासून करत नसावेत.. विचारुन बघायला हरकत नाही...
भरत नाट्य मंदिरासमोर एक
भरत नाट्य मंदिरासमोर एक शिवरंजनी नावाचा म्युझिक स्टुडिओ आहे, ते करून देतील पण खुप महाग असण्याची शक्यता आहे. मागे अनेक वर्षांपुर्वी मी विचारले होते.
तसेच दहा एक वर्षांपुर्वी मी स्वतः इंटरनेटवर खुप शोधाशोध करून काही सॉफ्टवेअर्स गोळा करून एका कॅसेटचे यशस्वी रूपांतर केले होते. आता अनेक नविन सॉफ्टवेअर्स उपलब्ध असतील, पण पुन्हा नव्याने शोध घ्यावा लागेल.
हे काम स्वतः करता येते अगदी
हे काम स्वतः करता येते अगदी सहजपणे. दोन्ही टोकाला स्टिरिओ पिन असलेली केबल, ऑडॅसिटि हे फुकट सॉफ्ट्वेअर आणि संगणक असले कि पुरते. पण बर्याच कॅसेट्स करायच्या असतील तर वेळखाउ काम होउ शकते. कॅसेट्स वरचे मुद्रण 'दुर्मिळ् / वैयक्तिक' नसेल तर विकत घेणे/डाउनलोड करणे(च) बरे.