नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.
************
ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....
ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ? काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)
तर काय सांगत हुतो.....
तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...
तकडं म्हंजी कुटं...?
तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!
तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.
नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंबई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :
पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)
मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४
http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज् रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स : मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.
सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.
वविसंयोजक.
जिप्स्या, फोटु पाठव ना रे मेल
जिप्स्या,
फोटु पाठव ना रे मेल आयडीवर
जिप्स्या, फोटु पाठव ना रे मेल
जिप्स्या,
फोटु पाठव ना रे मेल आयडीवर
निंबे, एक-दोन दिवसात नक्की
निंबे, एक-दोन दिवसात नक्की पाठवतो. फोटो रीसाईज करायचे आहेत.
वोक्के
वोक्के
साजिरा, झक्क वर्णन!
साजिरा, झक्क वर्णन!
चित्राच्या बाबतीत पंचाचा
चित्राच्या बाबतीत पंचाचा निर्णय अंतिम निर्णय होता. संयोजकांना तिथे काही बोलण्याचा अधिकार नव्हता.
साजिरा... मस्त वर्णन!
रच्याकने, लंगडी, केळ खाऊ नि ग्रुप पेंटींग ह्या स्पर्धा मी सुचवल्या होत्या. दिग्गजांच्या पडझडीबद्दल मला माबोकर मोठ्या मनाने माफ करतीलच. पण त्याची शिक्षा म्हणुन की काय हबाने आता आर्या लंगडी खेळणार हे अनाउंस केलं मग मी ते 'अण्णां'चा मान ठेउन साळसुदपणे टाळलं. कारण त्या आधीच मी बंधार्यावर हबाला शेवाळावरुन घसरल्याने शि.सा. घातला होता व प्रायश्चित्त घेतलं होतं.
हबा., हात नि गुडघा फुटलाय रे! मला वाटलं सांत्वन तरी करशील...:(
चला बालगोपाळांना पुस्तकं
चला बालगोपाळांना पुस्तकं आवडली ना! मग आता पालक मंडळी कामाला लागा. गणेशोत्सवात बच्चेकंपनीच्या बडबडगीतांच्या स्पर्धा होतातच दरवर्षी तेव्हा ह्यातल्या कविताच घ्या अॅक्शन सकट पाठ करुन
तू पण पडलीस नयना? एकूणातच
तू पण पडलीस नयना? एकूणातच पडझड खूप झालीय काल.
ते चित्रांचं भंकसमध्ये म्हटलं गं. कुठेही मी पंचांचा निर्णय मानतेच मानते
अके.. तुमचे चित्र छान होते पण
अके.. तुमचे चित्र छान होते पण त्यातली झोपडी कुठली आणी डोंगर कुठला या बाबतीत पंचांचे कन्फ्युजन झाले नाहीतर..
आणी खाण्याच्या स्पर्धेत __/\__ जादुगारा सारखे ८ सेकंदात एक केळ गायब करुन दाखवलेस तु..:)
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि ट्रेक कधी जवळपास येतील.. काल तो फील आला
अरे मी होते ना समोर्...बघता
अरे मी होते ना समोर्...बघता बघता तिच्या तोंडात केळं गायब झालं! नंतर गिळायला फक्त तिला वेळ लागला.
तुम्ही दोघी अजुन थोडे लांब बसले असते तर अजुन मजा आली असती. केळ्याचा प्याक चांगला असतो म्हणतात स्कीनला!
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि ट्रेक कधी जवळपास येतील.. काल तो फील आला >>>>>>:फिदी:
चित्राच्या बाबतीत पंचाचा
चित्राच्या बाबतीत पंचाचा निर्णय अंतिम निर्णय होता. >>> जल्ला तो 'पंचा' नक्कीच क्रिकेटच्या बाफ वरचा असणार. :p
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि
मला वाटलं नव्हत कधी की ववि नि ट्रेक कधी जवळपास येतील.. काल तो फील आला >> हो रिव्हर राफ्टींगचा चांगलाच अनुभव आला. परत ट्रायल करायचे काय
रिव्हर राफ्टींगचा >>>>>व्हाईट
रिव्हर राफ्टींगचा >>>>>व्हाईट रिव्हर राफ्टींग ती पण फक्त ६०० रूपयात.
निलिमाने पहिलं गालालाच लावलं
निलिमाने पहिलं गालालाच लावलं केळं. नंतर क्षणार्धात ढँणकन् फूडप्रोसेसरमध्ये नळकांड्यातून गाजरं किसायला कोंबतात तसं कोंबलंन.
निलिमाने पहिलं गालालाच लावलं
निलिमाने पहिलं गालालाच लावलं केळं.
>>
आणि तु ते तसंच खाल्लंस??
ववि सालाबादाप्रमाणेच छान
ववि सालाबादाप्रमाणेच छान झाला.. तरीपण पुणेकरांची तुरळक उपस्थती अस्वस्थ करणारी होती... !! दरवर्षी भेटणारे यंदा अनुपस्थित राहील्याने वविच्या निमित्ताने होणारी भेट राहून गेली.. मिसलो रे तुम्हाला.. !
आणि तु ते तसंच खाल्लंस?? >>>
आणि तु ते तसंच खाल्लंस??
>>> माझ्याच लावलेलं. गाल स्वच्छ होते.
एका स्नेह्यांनी केलेल्या
एका स्नेह्यांनी केलेल्या सूचनेवर अक्कल गहाण ठेवून विश्वास ठेवून आम्ही निवडलेला रीसॉर्टचा रूट (कल्याणहून शीळफाटा मार्गे पनवेल मग चौक फाटा आनि मग वडव,कशेळा, सुगावा, वारे इ. अगम्य नावांच्या गावांमधून वाकडा-तिकडा, चिंचोळ्या मार्गाने केलेला प्रवास ), अखेर कुठल्यातरी भलत्याच रीसॉर्ट ला आपण पोचणार बहुतेक अशा भितीने ग्रासलेले मी आणि मोदक, १२ वाजता रीसॉर्ट मध्ये पोचल्यावर भिजून जुने झालेलं पब्लिक आणि आपन मिसलं म्हणून खट्टू झालेलो आम्ही, सगळा नाष्टा संपून फक्त उरलेली गार मिसळ व कडक होत आलेले पाव, सगळे ओढ्यावर गेलेत हे कळून तिथे पोचतो तोवर गिरी ने केलेल्या प्रतापांची ताजी ताजी आलेली बातमी व अजूनही बंधार्यावर न पोचलेल्यांना परतीचा मिळालेला इशारा, आमच्या पिल्लूची रीसॉर्ट मधल्या पाण्यात केलेली मस्ती, जिप्सी आणि आशुतोष यांनी केलेली चित्रणबाजी, साजिरा सोडून बाकी सगळ्यांच्या मोबाईल्सनी झटकून टाकलेली रेंज, सांस च्या खेळांमध्ये झालेली हुल्लडबाजी, तर्हे-तर्हेच्या लंगड्या, दुरात्मा गांधी, साजिर्याची दे माय धरणी ठाय लोळण, घारु अण्णांची गरुड झेप, कौतुक चा साजरा झालेला वादि, शेवटचे साजिर्याचे भाषण ही काही लक्षात राहिलेली क्षणचित्रे!
पण सगळ्यात भारी डायलॉग
पण सगळ्यात भारी डायलॉग विसरलात पब्लिक.. "दुसरं केळ दे !".... तिकडे दुसरी टिम जिंकली, मंजुडीच्या डोळ्यांवरची पट्टी काढलीय आणि तिही जोर जोरात हसतीय तरी पल्ली "चल, तिसरं केळ दे...!"
ते ऐकताना, आमची हसुन हसुन पुर्ती वाट लागलेली/
वविला योरॉक्स आणि मंडळींनी
वविला योरॉक्स आणि मंडळींनी 'नाच रे मोरा' गाण्यावर केलेल्या नृत्याचं मी ध्वनीचित्रमुद्रण केलंय...ते इथे कसं चढवायचं?
कुणी मार्गदर्शन करेल काय?
ते इथे चढवता येणार नसल्यास कृपया खालील दुव्यावर आपण पाहू शकता.
http://www.divshare.com/download/15382044-3f7
मल्लीनाथ, पान क्र. तीनवर त्या
मल्लीनाथ, पान क्र. तीनवर त्या प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घे
अजूनही तो प्रसंग आठवला की मी फिसकतेय...
मी वाचतोय अन फिसकतोय! >>>>
मी वाचतोय अन फिसकतोय!
>>>> मोबाईल्सनी झटकून टाकलेली रेंज, <<<< माझ्या मोबाईलला होती रेन्ज, कारण बीएसेनेलचे कार्ड होत
अजूनही तो प्रसंग आठवला की मी
अजूनही तो प्रसंग आठवला की मी फिसकतेय...
मंजुडी, ते वाचले, आणि तेव्हा पासुन अजुनच फिस फिस्तोय मी.. पण पब्लिक इथे विसरले म्हणुन पोस्ट टाकली.
(No subject)
इंद्रा, तू काढलेले फोटु पाठव
इंद्रा, तू काढलेले फोटु पाठव की रे
साजिरा पकडींग कौतुक...
साजिरा पकडींग कौतुक...
(No subject)
साजिरा मस्त वृत्तांत. असेच
साजिरा मस्त वृत्तांत. असेच वृत्तांत येऊदेत. खास शैलीतले. जबरदस्त धम्माल आणि कल्ला केलेला दिसतोय लोकांनो.
ह.बा. , यो-रॉक्स , भुंगा तुमच्या शैलीतले सुद्धा खास वृत्तांत येऊद्यात.
:वाटपाहणारादूरदेशीबाहुला:
Pages