'खग्रास चंद्र ग्रहण' १५-१६/०६/२०११

Submitted by चातक on 16 June, 2011 - 03:58

--------------------------------------------------------------------------------
'खग्रास चंद्र ग्रहण'
=================

दिनांक: १५-१६/0६/२०११ बुधवार/गुरुवार
स्पर्ष : रात्री १०.४६. बुधवार
मोक्ष : ०२.२०.00AM 16/06/2011 गुरुवार.
एकुण ग्रहण काळ : ०३.३४.00 तास
चित्रिकरणाची वेळ : ११.0८
चित्रफित वेळ : ००.१३.२० मिनिटे.
स्थळ : सबका रोड, दुबई, अरब अमिरातिस.
U. A. E.
-------------------------------------------------------------------------------
पाहण्यासाठी कृपया खलील 'युट्युब' लिंक वर टिचकी द्या.

http://www.youtube.com/watch?v=ZBCjUtq0sk8

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त रे...पाहिले ग्रहण............. कुंभ राशीला शुभ होते म्हणुन...

कुंभ राशीला शुभ होते म्हणुन>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> चला मग या वर्षी लग्न करायला हरकत नाही........ Happy

दिनेशदा, मुकु, मंद्या, सांजसंध्या, भुषणराव्,उदयवन...,,सर्वांचे आभार! Happy
उघडत नाही लिंक >> सांजसंध्या कृपया पुन्हा प्रयत्न करुन पहा.

लोकहों.., मी माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात पहील्यांदाच ग्रहण पाहीले तेही 'खग्रास'; आवकाशातिल गंमत. रात्री आकाशात दुधासारखा दुधाळ दिसणार्‍या एकट्याच पुर्ण चंद्र गोलाला जेव्हा काळ्याकुट्ट सावलिने झाकण्यास सुरुवात केली ; त्या विचित्र प्रकाराला पाहुन एका क्षणासाठी र्‍हदयात एक अनपेक्षित भिती धावुन गेली...काही तरी वेगळाच अनुभव आला.

पुर्ण झाकलेला चंद्रगोल ३०-४० मिनीटे लाल गोळ्या सारखा भासु लागला, अकाशात मंगळ ग्रहच पाहत आहोत असं वाटुन गेले. काही वेळाने सावली अधीक गडद झाली ती ही बहुतेक तितकाच वेळ राहीली असावी, ३०-४० मिनिटे.

ग्रहण सुटताना मात्र सांगायचेच झाले तर अगदी 'गोडगोड' चुळ्बुळ झाली मनात, ढीगभर काळ्याकुट्ट जाडसर कोळश्यामधुन 'मटार' एवढा शुध्द 'ए ग्रेड' पांढरा शुभ्र गोंड्स 'हिरा' बळजबरीने त्या घनघोर सावलीतुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे असा अवर्णिय भास झाला... Happy

मी चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला (तेही टॅरेस वरुन अनपेक्षितपणे चंद्रावर नजर गेली म्हणुन दिसला; Proud नाही तर काही ठरवलं नव्हतं ) वातावरण अगदी स्वच्छ होते, पण कॅमेरा.. अरेरे..

टिप: या नंतरचे 'खग्रास चंद्रग्रहण' पुढील ४०-४५ वर्षां नंतर दिसेल., असा तज्ञांचा अंदाज आहे.