माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / नावडणार्‍या सवयी

Submitted by durandar on 15 July, 2008 - 03:02

प्रत्येकाच्या काही सवयी असतात तुम्हालाही असतिल अश्याच काही मित्रांच्या सवयींचे भंडार उघडूयात का.

या आधिचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आमच्या रुममेट ने नविन प्रकार सुरु केला आहे.

एकत्र जेवायला बसायचे avoid करणे. म्हणजे मी जेवायला बोलावले तरी तो व ती म्हनणार की नंतर जेवतो, व माझे जेवन झाले की लगेच नंतर जेवायला बसनार, नाहीतर मी जेवायला बसन्यापुर्वी उरकुन घ्यायचे.

गेले १०-१५ दिवस असे झाल्याने मी आज मी त्यांना जेवताना पकडले, मी म्हणालो पोळ्या गरम करुन येतोच, तर एक मिनीट न थांबता त्यांनी पटापटा जेवन संपवले. व आपल्या रुम मधे पळाले. This is stupidness.

उद्यापासुन आमच्या lease ची नविन term सुरु होतेय. I think I am going to search for another apartment and transfer my lease to someone else.

माझ्या current roommates च्या न आवडनर्‍या सवयी.

१. घरात कार्पेट असताना बाहेरच्या चपला घरभर घालुन फिरने.
२. डिशवाशर न वापरता, hot water tap continues चालु ठेवुन भांडी धुने.
३. धुतलेली भांडी न निथळता, तशीच ओट्यावर ठेवणे.
४. न निथळयामुळे जमिनीवर पाणी सांडते, त्यातुन तशाच चपला घालुन घरभर हिंडने. (संपुर्ण हॉल काळा झालाय त्यामुळे) मी कुणाला घरी पण नाही बोलवत.
५. trash bin असताना, ती माझी आहे म्हणुन का माहीत नाही, पण प्लास्टीक च्या पिशवीत कचरा टाकुन ती तशीच जमिनीवर ठेवने.
६. they already broke couple of chairs

wow! how am i leaving with these guys, I have to step out.

माणसा, अरे यातून तरी काहीतरी हिंट घे.. रूममेट्सही तुला टाळू लागलेत बघ.. लग्न कर आणि संसाराला लाग, पुरे झालं रूममेट्स बरोबर रहाणं Proud
----------------------
Invention requires an excited mind;
Execution, a calm one.

मीही हेच म्हणणार होतो. माणसा, आता सोलमेट शोधायची सोडून रूममेट रुममेट काय करतोयस ? Proud रुममेट वेगळे आणि बरोबर जेवणासाठी वाट पाहणारी व्यक्ती वेगळी Happy

    ***
    Twinkle twinkle little star
    I don't wonder what you are
    Studying your spectrum, ignorance I've none
    You're not a diamond, you're just hydrogen.

    खर सांगू का? अश्या माणसांना सुधरण्यात वेळ घालवण्यापे़क्शा दुसरी जागा शोधा, लग्नापेक्शा जास्त सोप्पा उपाय आहे!!! नवा गडी नवा राज continues! Happy

    आणि हो त्यांना तुमच्या चांगल्या सवयींची allergy आहे! त्यामुळे तुम्ही किंवा ते बिघडण्या किंवा सुधारण्याच्या आत estate agent शोधा!

    माणसा, अरे यातून तरी काहीतरी हिंट घे.>>>>
    हे काय पुनम, मला वाटले अत्तापर्यंत तु एखादी मुलगी shortlist केली असशील. Happy
    .
    .
    काय माहीत आजकाल मुली अमेरीकेत यायचे नाहीच म्हणतात, आणि ईथल्या मुली मराठी माणूस नको म्हणतात. Happy
    .
    anyway lets see how to handle this roommate situation, I have traning due next month on how to handle conflicts and difficult situations in team.

    wow! how am i leaving with these guys >>>> yes, you really need to stop "living" with them Wink
    .
    ईथल्या मुली मराठी माणूस नको म्हणतात >>> कोण नॅन्सी का ? Lol

    ओ ओ, धन्यवाद, झोपेत लिहीत होतो, त्यामुळे ध चा मा झाला Wink
    .
    >>>>>>>>> कोण नॅन्सी का ?
    .
    एकाच चेहर्‍याला मी आठवू कशाला
    जखमी करून गेले, बिचवे तर्‍हेतर्‍हेचे
    .
    सुरेश भट (Thanks to Ajay)

    माणसा, थोडं दुर्लक्ष पण करायला हवे, स्वच्छतेचं जास्त वेड असण्याने कधी-कधी त्रास हा आपल्यालाच होतो (स्वानुभव). मी या परिस्थितीतुन गेलो आहे. त्यातील काही किस्से.

    1. आमच्या फ़्लॅट मधे आम्ही ५-६ मित्र रहायचो, एक जण जरी जेवायला बसला की त्याला सोबत देण्यासाठी ईतर सर्व मंडळी पटापट ताट घेऊन हजर (कारण आपल्याला जेवण कमी नको पडायला...).
    2. चहा होत असताना दारावर थाप पडली, की आमचे चेहरे पडायचे (कोण कलमडले आहे या वेळी). दुधाचा/ साखरेचा साठा हा मोजकाच असायचा, मग घाल पाणि आणि वाढव चहा. क्वचित चार कपाचे चे आठ पण करावे लागायचे. कुणिही आगंतुक न येता चहा कपात पडला की खुप आनंद व्हायचा...(आता येऊ दे किती लोकं येतात ते).
    3. आता हीच गोष्ट थोडी उलट, जर आपण चहाच्या अगदी 'वेळे'वर घरी पोहोचलो तर होणारा आनंद.
    4. एक सोबती काही म्हणजे काहीच काम करत नसायचा. फ़क्त टV च्या समोर बसायचा, गाणे ऐकायचा. सोन्याचा चमचा घेऊन जन्मले होते, पाण्याचा नळ तर कधीही बंद नाही करायचा, दाढी-ब्रश करतांना सम्पुर्ण वेळ पाणि सुरु. दिवे/ पंखे हे बंद करण्यासाठी नसतात हा समज... आता झोपतांना ते पाण्याचे टप-टप संगीत कोणाला आवड्णार? म्हणजे उठुन बंद करणे आले. चांगलाच मनस्ताप झाला होता. घरात कुठलेही कामे करायचा नाही. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मी कुठली खाण्याची गोष्ट तयार करणार असेल तर तो आधीच जाहीर करायचा 'उदय बनवणार असेल तर मी खाणार नाही...'. मी खुप तिखट बनवायचो, आणि त्याला १-२ वेळा घाम फ़ुटला होता... मी जन्माने विदर्भातला, खांदेशात वाढलेलो त्यामुळे तिखट मला तर खुप गोड लागायचे. आठवड्यातून किमान तीन दिवस तरी लाल-तिखट, तेल आणि पोळी हा माझा नास्ता असायचा.
    5. माझे ईतर सोबती खुपच चांगले होते. मला रात्री झोपायला बर्‍याचवेळा २-२:३० व्हायचे; कित्येक दिवस सकाळी चहा तयार झाल्यावरच माझा जवळ्चा मित्र उठवायचा, तेव्हढीच १५ मि. जास्त झोप मिळावी हा हेतु.

    मी साधे बोललो तरी तक्रार करतो आहे, किंवा मला काही तरी स्पष्टीकरण हवे आहे असे सर्व लोकांना वाटते. त्यामुळे मी काही बोललो तरी, 'किती तक्रारी करतोस' किंवा 'त्याचे असे आहे की...' असे माझे मित्र मला सांगतात.
    एकदा मला विचारले तू काय काम करतोस, तेंव्हा मी म्हंटले की AT&T च्या मॅनेजमेंटला पडलेले गहन प्रश्न मी सोडवतो, कारण मला १५ वर्षाचा बिलिंग आणि इतर प्रोसेसेस चा अनुभव आहे. त्याबरोबर माझ्या दोन मित्रांनी मला टेलेफोन कसा असतो, त्याचे बिलींग खरे तर कसे सोपे असते हे शिकवायला सुरुवात केली.
    आता जोपर्यंत माझा टोन सुधारत नाही तोपर्यंत मला हे सहन करावे लागणार! म्हणजे मरेपर्यंत असेच!
    हटकेश्वर, हटकेश्वर.

    माणूस तुमची पोस्ट वाचून वाईट वाटले मी तुमच्या जागी असते तर मला रडायलाच आलं असतं. Sad
    -

    अरे माणसा, तुझे रुममेट्स अचानक असे वागायला लागले का? की हळु हळु त्यांच्या वागण्यात बदल झाला? त्यांच्याशी संवाद साधुन
    बर्‍याच गोष्टी तुला क्लिअर करता येतील. त्यांना विचार तुझे कुठले वागणे त्यांना आवडत नाही, तु पण तुला त्यांच्या न आवडलेल्या गोष्टी
    सांगुन यातुन मार्ग काढु शकाल. दर वेळी हे शक्य होईलच असे नाही. प्रयत्न करायला हरकत नाही. Happy अगदी शक्य नसेल तर शेवटी जागा बदलुन दुसरीकडे
    रहायला जाणे हा पर्याय आहेच.
    काही जण घर सोडुन पहिल्यांदाच बाहेर रहात असतात त्यांना या बाबतीत जरा कमी लक्षात येते,
    आपले वागणे घरचे सहन करतात तसेच बाहेर पण केले जाईल असे बर्‍याच जनांना वाटते.
    काही जनांना स्वतःचे वागणे आक्षेपार्ह आहे हेच माहित नसते. अश्या वेळी It is always good to be straight and clear.
    माझी एक रुमी नेहमी मी दुकानातुन ईस्री करुन आणलेले कपडे मला न सांगताच घालायची आणि वापरुन परत घडी करुन कपाटात ठेवुन द्यायची
    तिला हे कधीच चुकीचे वाटले नाही. शेवटी तिला हजार वेळा सांगितल्यावर मग ती विचारायला लागली आणि मी नाही म्हणायला :).

    कपड्यांवरून आलं लक्षात...
    --- आम्ही काही मित्र एकत्र रहायचो, एक मित्र खुप व्यावस्थित होता, दुसर्‍या दिवशी घालायचे इस्त्री केलेले कपडे रोज रात्री बाहेर काढायचा. मग एके दिवस सकाळी अचानक लक्षात आले की शर्टाच्या सर्व गुंड्या गायब आहेत (रात्री कुणितरी फजिती व्हावी म्हणुन कापल्या होत्या...).
    --- एकाचे (तो मित्र बुटका होता) कपडे त्याच्या नकळत उंच पंख्यावर लटकवले जायचे. काडी/ उंच स्टुल असे आमच्या कडे काही नव्हते, मग तो जाम वैतागायचा बाकीचे माझ्या सकट असुरी आनंद घ्यायचे.
    --- होस्टेल वर शेजारचे मित्र नास्ता (उपमा, शिरा) करायचे, आम्हाला फक्त खमंग वास यायचा (खायला बोलावत नसत). उपम्यामधे पाणि टाकणार आणि नेमकी त्याचवेळी विज जाणार. आमच्यातील एक बाहेर असणारा मेन-स्वित्च बंद करायचा... हे कित्येक दिवस चालले.

    आम्ही हे सगळे हासत-खेळत केले/झेलले, स्वतःची फजिती पण सकारात्मक घेतली, दुसर्‍याची पण कली, पण एका मर्यादेमधे.

    उदय बुटक्या मित्राचे वाचून वाईट वाटले. Sad

    *************************************
    माझ्या पोस्टनंतर वरची काही पोस्ट्स संपादित झाल्याचे दिसत आहे. कुणा एकावर रोख आहे असे वाटू नये म्हणून हे मुद्दाम येथे नमूद करत आहे. मात्र माझ्या पोस्टमधले मुद्दे अजूनही अस्थानी नाहीत, म्हणून माझी पोस्ट मी तशीच ठेवत आहे.
    **************************************
    सध्या आपण ज्यांच्यासोबत राहत आहोत/आधी राहिलो आहोत; त्या लोकांबद्दलच्या तक्रारी लोक इथे इतक्या सविस्तर का लिहितायत? एक बोट दुसर्‍याकडे रोखले तरी उरलेली चारी बोटे आपल्याकडेच वळलेली असतात, हे ठाऊक नाही का विस्मरण झालंय?
    दुसर्‍याच्या स्वभावात चार दोष असतील, आपल्याही स्वभावात चार दोष असतील, पण आपण मायबोलीकर आहोत आणि आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाच आहे तर करा यथेच्छ निंदा दुसर्‍याची, असाच प्रकार एकंदरीत जाणवतो.
    मध्ये बदल म्हणून या बीबीवर मित्रांबद्दल चांगल्या गोष्टीदेखील लिहाव्यात अशी सूचना झाली होती. पण ते लौकरच मागे पडलं आणि पुन्हा आवडता प्रकार सुरू झाला.
    आणि दुसर्‍याच्या 'तथाकथित' घाणेरड्या सवयी इथे विस्तारपूर्वक लिहिण्यात कसले समाधान मिळते, नकळे! जर तुम्हाला अडचणी असतील तर थेट त्या व्यक्तीशी बोला आणि हे छोटे छोटे प्रश्न सोडवा (हा मुद्दा मी आधीही मांडला होता)! इथे हे सगळं लिहून काहीही उपयोग होणार नाहीये. या विषयाबद्दल बोलायचं झालं तर जुने काय किंवा नवे काय 'सगळेच / सगळ्याच' रूमी तुमचा छळ करत असतील तर एकटे / एकट्या रहा. उठसूट जे काय असेल ते मायबोलीवर कशाला?
    अर्थात, 'तुम्हाला पटत नसेल तर ह्या बीबीकडे फिरकता कशाला?' हा प्रश्न विचारण्यात येईलच. जमेल तेवढे दुर्लक्ष करायचा प्रयत्न तर करतेच. पण सारख्या असल्या (काही पोस्ट्स वाचून तर उगीच फुगवून तक्रारी सांगत असल्याचाही संशय येतो!) तक्रारींचा निचरा मायबोलीवर बघून राहावत नाही.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    'माता' रिटर्न्स.

    -- आधीचे संपादीत झाल्यावर आता काय बोलणार !! असो, मी पण माझे मत तसेच ठेवते. --
    अनुमोदन श्रद्धा ! मी कुठल्याही गृप मधे नाही व भांडणे, काड्या असा कुठलाही हेतू नाही... इथे आपण टीपी साठी जमतो हे मान्य, परंतू उगाच बारीक सारीक गोष्टी सातत्याने इथे लिहीलेल्या बघून 'एवढे पण हँडल करता येत नाही का ?' असा प्रश्ण मलाही पडतो. मोठे प्रश्ण असतील तर सगळेच मदतीला तयार असतात, पण रोजच्या जीवनातल्या बारीक गोष्टी माणसाला स्वतः सोडवाव्या लागतात. ( आता कृपया "तुम्ही कधी हॉस्टेल्/रुमीज बरोबर राहील्या आहात का" वगैरे म्हणू नये, जेथे कुठे दोन किंवा अधिक माणसे एकत्र येतात तेथे भांड्याला भांडे लागून आवाज येतोच, प्रकार वेगवेगळे, व सोडविण्याचे मार्ग वेगळे बस्स ! )..
    इतरांच्या आपल्याला आवडणार्‍या सवयींबद्दल पण सर्वांनी लिहावे असे मला वाटते.

    तर मला रडायलाच आलं असतं. >>> दक्षीणा, अगं खंबीर हो जरा.. आयुष्यात असे होतंच राहते, त्याचा मुकाबला करावा लागतो, प्रत्यक्ष बोलून, ठोस मार्ग काढून. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून सांगते आहे, चांगल्या अर्थाने घे... रडणे, वाईट वाटणे, यातून काहीच साध्य होत नाही, मला नाही बुवा असे बोलायला जमत, असे धोरण ठेवले तर सहन करण्याशिवाय पर्याय नाही, मग काहीतरी एक ठरवून त्यात आनंदी रहावे. यात तुला दोष देण्याचा हेतू अजिबात नाही हे जर तुला पटले तर त्यातच सर्व काही आले.

    वरील काही पोस्ट ह्या माझ्या मित्र/ मैत्रीणिंच्या मायबोलीवरील न आवडणार्‍या सवयी मधे याव्यात. मला सरळ समोरच्या व्यक्तिला त्याच्या पासुन नकळत, अनावधानाने (असे आपण समजावे) होत असलेला त्रास सांगण्याचा प्रकार आवडतो, पण प्रत्येक वेळी तो समोरच्याला समजतोच असेही नासते.

    अगदी योग्य उदय. नकळत बोला किंवा त्याच्या न आवडणार्‍या क्रुत्यामागे स्वतःचे चांगले क्रुत्य करत रहा.
    आणि आपण काय लहान आहोत काय असे चुगली करायला? याने असे केले आणि त्याने तसे केले..
    जर मित्र चप्पल घालून कार्पेटवरून फिरत असेल तर तुम्ही मागे क्लिनर घेऊन फिरा. ३,४ वेळा असे केलेत की आपोआप लाजेने वठणीवर येईल.
    तो जर पाणी निथळत असताना तसाच निघुन जातो तर तिथे एक कपडा ठेवा आणि अगदी प्रेमाने बोलायचे की "मेरे भाई, वहां कपडा इसी लिये रखा है|"
    दोन तिन वेळा स्वतःच करा असे की तो पुढच्या वेळेस बरोबर करेल.
    नाहिच फरक पडला तर त्याला ही कामे आवडत नसतील तर सरळ कामांची वाटणी करा.
    मला जेवण बनवणे कंटाळवाणे वाटते म्हणून मी घर स्वच्छ ठेवणे आणि कार ड्रायव्हींगचे, बिल्स ई. काम व्यवस्थित पार पाडतो. तो असताना किचनमधे काडिचा ईंटरेस्ट घेत नाही आणि तो कार ड्रायव्हींगमधे किंवा ईतर बाबतीत. माझ्याही कित्येक चुका होत्तात ज्या त्याने किंवा माझ्या आधिच्या रूममेट्स्नी दुरुस्त केल्या आहेत किंवा बदलल्या आहेत. आणि अगदी खरे सांगायचे झाले तर एका वयानंतर माणसाच्या सवयी बदलतही नाहीत आणि आपल्याला ते बघणे जमतही नाही. तेव्हा स्वतंत्र राहणे बरे किंवा संसार थाटलेला बरा.

    संसार थाट्ण्यापेक्शा आपल्या सवयी थोड्या modify करता आल्यातर? एका वयानंतर सवयी बदलणे अवघड होते मान्य, पण modify नक्किच करता येतील थोडस adjust केल तर,कारण दर वेळेस आपल्या सवयींनुसार नाही चालत! मग सगळ्यांचच जगणं सुखकर करायला कय हरकत आहे? थोडा विचार करुन पाह्यला हरकत नाही! नाही तर लग्नानंतर पण तेच problems solve करायला इथेच भेटावं लागेल. (just joking!!):)

    cribbing shows/builds negative attitude, so no replies from my side to whoever gave suggestion/asked questions.

    माझी पोस्ट मी आधीच संपादीत करण्याचा विचार केला होता, कुणाला खरं वाटो ना वाटो, मला हा बी.बी. नविन मायबोलीवर पुन्हा सापडला नाही, त्यामूळे सापडला तेव्हा त्यावर तुमच्या पोस्ट्स असूनही मी ती संपादीत केली, कारण मला करायची होती. मला हे ठावूक आहे की मी खूप बारीक गोष्टी लिहील्या होत्या.... हा एक ओपन फोरम आहे इथे आपापल्या लिखाणाला मर्यादा ह्या आपणच घातल्या पाहीजेत हे ही मला मान्य आहे. मला वाद नको होता, मागे पण एका बी बी वर असे घडले तेव्हापासून मी हे ठरवलं.

    तरिही एक सांगू इच्छिते, की मी ही चुकतेच, त्यात दुमत नाही. एकटे रहा, बोलून पहा, हे सगळे उपाय एका वेळे नंतर काम करिनासे होतात. शेवटी जो त्यातून जातो त्यालच ते ठावूक असतं. यात दुसरी बाजू म्हणजे, एकटं राहणं सगळ्यांनाच जमतं असं ही नाही, आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा...

    || हरि ओम ||
    बर्याच गोश्तिन्चा उहापोह वाचला. मित्रहो सवयि बदलने खुप सोपे असते जर अस विचार केल कि मी जन्मला आले तेव्हा अशी होते का? म्हनजे वानगिदाखल एक उदाहरन घेवु.मी वजनाने खुप जाद झाले. सगले तिन्गल करायचे. मी जाम दुखि वगैरे व्हायचे.पन आमच्या सद्गुगुरु आनिरुध बापु नी मला मार्ग दाखवला. एका प्रवचनात त्यानि सान्गितले कि जन्माला येताना तुम्हि ८० किलो असता का? नाहि ना? म्हनजेच इतक्या वर्शात जे काहि सवयिने तुम्हि केलेय तेच सवय बदलुन नीत देखिल करता येते. म्हनुन मग मी हि तसेच केले आनि लवकरच मी देखिल सुदौल झाले. असो सन्गन्यच मुद्दा ह कि अम्रुता दक्शिना आनि सर्वच जनहो स्वतहाच्या आनि दुसरयान्च्या सवयि बदलने खुप सोपे असते. " केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे."

  1. भुमीका - मला तुमचा मुद्दा नाही पटला. आता मला पचक-पचक माणिकचंद खाऊन अस्वाद घेणार्‍या (आणि कधीतरी तुम्हालाही रंगवणार्‍या) लोकांचा त्रास होतो, काय बदलु? वर रुसुन बसलेल्या माणसाला (तसेच मला देखील) आसपासच्या अस्वच्छतेचा त्रास होतो, काय बदलणार?
  2. मुल जन्माला येते त्यावेळी खुप निरागस असते. त्यात निसर्गाचे एक प्रामाणिक असे रूप असते, मला हा नैसर्गीक पणा खुप आवडतो. मग तुम्ही काहीही न करता (आपो-आप) वयाने मोठे होत जाता. कालांतराने तुम्हाला अक्कल येत आहे असे वाटत रहाते, हे वाटणे आपल्या हातात नाही आहे, आणि कुठेतरी नकळत तुम्ही नाटकी पणा, खोटेपणा शिकायला सुरवात होते. काहींना कमी अक्कल आहे असे वाटते तर काहींना जास्त अक्कल आहे असे वाटते. आता हे कमी-जास्त व्यक्ती सापे़क्ष आहे. काही लोक तीच अक्कल सर्व शक्तीनिशी समाजोपयोगी कार्या साठी वापरतात, मला त्यांच्या बद्दल आदर आणि कौतुक आहे. पण मग काही लोकं तीच अक्कल ही समाजाला फसवण्यासाठी देखील वापरतात. समाजातील एका मोठ्या वर्गाला मानसिक अधु, पंगु बनवतात. मला स्वत:ला असल्या फसवणार्‍या दांभीक लोकांचा राग आणि चिड येते. आता ही चिडायची सवय मी कशी बदलु? मी आधी काय केले पाहीजे याचे कुणि मार्गदर्शन करेल कां?
  3. उदय, "बोल्ड" वाक्यातील प्रत्येक शब्दाला एक मोदक Happy "तिकडे" पण होतात का तुम्ही?
    बाकी पूर्ण पोस्टशी १०० % सहमत.
    .
    आपण दुसर्‍या कोणाच्याही सवयी बदलु शकत नाही; आहे तसे सहन करत राहावे. (हॉस्टेलला अनेक वर्ष राहुन बनवलेले माझे मत.) आता एकाही मैत्रिणीच्या वाईट सवयी आठवत नाहीत... फक्त छान छान आठवणी .... "दुर्लक्ष करत राहावे" हा एक उपाय करुन स्वतःला होणारा त्रास कमी करता येतो Happy
    एकदा मित्र मैत्रिणींसोबत राहायचे दिवस संपलेत की पुन्हा ते सोनेरी दिवस येत नाहीत.
    .
    -प्रिन्सेस...

    उदय, तुम्हाला मोदक!! Happy कारण जर दुर्लक्ष नाही केल तर आपल्यालाच त्रास होतो! बाकीचे मस्त जगतात!! स्वतामुळे लोकांना त्रास होतो हे त्यांच्या गावी पण नसते!

    मी वाचलेले काही सुंदर विचार...

    १.जेव्हा आपल्याला दुसर्‍याच्या वागण्याने दु:ख होते तेव्हा तसे वागायचे नाही हे ठरवावे आणि जेव्हा आपल्याला दुसर्‍याच्या वागण्याने आनंद होतो तेव्हा तसे वागायचे हे ठरवावे म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते.
    २. आपण दुसर्‍याला असेच वागा , किंवा तसे वागु नका असे सांगण्यापेक्षा आपणच व्यवस्थित वागावे..क्रियेचा बोध आचरणानेच झाला पाहिजे.

    धन्यवाद.

    मनस्मी, दोन्ही वाक्यं छान आहेत, अगदी प्रिंट करून वर्क स्टेशनच्या सॉफ्ट बोर्डला पिन करून ठेवावीत अशी. पण प्रत्येकच वेळी इतकं सोशिक आणि सात्विक, दुसर्‍याच्या बाजूने विचार करणं नाही जमत. Sad
    एक ताजी गोष्ट, एक आठवड्यापुर्वी पर्यंत पावसाचा काही पत्ता नव्हता, आणि पडेल की नाही अशीही शंकाच वाटत होती. आमच्याकडे पाणी कपात त्याच्या अगोदर पासूनच सुरू झालेली आहे . संध्याकाळी पाण्याची ठणठण असते म्हणून माझी रूममेट सकाळी पाणी येतं तेव्हा बादल्या भरायला लावून खुशाल इतर कामं करायला निघून जाते, त्या वाहून जातात, पाणी वाहून जातं. बरं आपल्याला लक्षं द्यायल नसेल जमत तर निदान दुसर्‍या कुणाला तरी सांगून जावं, ते ही नाही. आणि समजावून सांगितलं की, 'एव्हढंसं पाणी वाया गेलं तर काही बिघडत नाही." हे उत्तर.... तिचा तोंड धुण्याचा ही एक प्रकार पाणी सुरू ठेवून तोंडाला साबण लावत बसायचं. म्हणजे १ तांब्या पाण्यात जे काम होइल त्याला एक बादली पाणी खर्ची घालवायचं.
    पाणी वाया जाऊ नये असं मला मनापासून वाटतं. गोड बोलून, रागाने सांगून काही फरक पडला नाही. कदाचित माझा सांगण्याचा मार्ग ही चुकला असेल. Sad मला माहीती नाही. पण आपल्या सारख्या नागरिकांनीच जर असं आचरण ठेवलं तर काय होईल? आणि ही सवय आपल्याला रोज डोळ्यासमोर पहावी लागणं किती त्रासदायक आहे? Sad

    Pages