मिरचीवरील किड

Submitted by पन्ना on 11 June, 2011 - 09:56

माझ्या मिरचीच्या रोपावर अचानक किड पडली आहे. पांढर्‍या रंगाची अंडी असावीत कसलीतरी असे वाटतेय. पानाच्या वर आणि खाली, आणि शेंड्यावर जेथे झाड वाढते, तेथे सगळीकडे ही किड दिसतेय. किड घालवण्यासाठी काय करता येईल?

rsz_img_3115a.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लिस्टरिन १ भाग + पाणि पाच भाग असा स्प्रे करते अशा किड्यांवर.
कुंडित असेल तर ती कुंडी इतर झाडांपासून वेगळी कर. आधी भरपूर पाणी देऊन घे, अन मग हे मिश्रण स्प्रे कर
नसेल तर आजू बाजूची झाडं एका प्लास्टिक शीट ने कव्हर कर. हे किडे इतर झाडांवर नको जायला.

तंबाखू पाण्यात ४-५ तास भिजवून. नंतर गाळून ते पाणी स्प्रे करता येईल. तंबाखू इंडियन स्टोअर्स मध्ये मिळेल.

asaa ek dhaagaa aadhich aahe. tithe lokaMnI upay paN suchawale aahet.

kaDuliMbaachaa paalaa ukaLun tyaache paaNI spre kelyaane kiDe lagech jaataat.

पन्ना, मी just अक्षता यांच्या "a curly tale... "या धाग्यावर उपाय सुचवले आहेत.ते वाचा. मला फायदा झालेला आहे. करून पहा तुम्ही.