Submitted by ह.बा. on 10 June, 2011 - 05:33
गडगडगडगड गडाट रे
पाऊस आला भरात रे
काऊ, खारू, भू भू, म्याऊ
सारी सेना घरात रे
सळसळसळसळ उठली रे
पाने खेळत सुटली रे
झाड नी वारा झिम्मड जोडी
पाऊस येता तुटली रे
टपटपटपटप टपोर रे
आभाळाची गलोर रे
नाकावरती थेंब मारते
जाता त्याच्या समोर रे
कडकडकडकड कडाक रे
वीज लखलखे लखाक रे
कुशीत घे ना आई लवकर
काळीज धडधड धडाक रे
क्षणात भरभर झरा भरे
खळखळखळखळ नाद करे
बांध तोडूनी अवखळ पाणी
हवी तशी मग वाट धरे
नाजूक नाजूक पाने रे
गवतावरती गाणे रे
धरणीआईसाठी पावसा
असेच व्हावे येणे रे!
गुलमोहर:
शेअर करा
आवडली! लेकीला मस्त मोठ्याने
आवडली! लेकीला मस्त मोठ्याने म्हणुन दाखवते!
सर्वांचा आभारी आहे! माझ्या
सर्वांचा आभारी आहे!
माझ्या पोराला म्हणून दाखवली तर त्याने गोंधळून मम्मीकडे धाव घेतली. पिकतं तिथ विकत नाही हेच खरं.
त्याला परत परत म्हणून दाखव
त्याला परत परत म्हणून दाखव म्हणजे त्याला आवडू लागेल.
Pages