भाग १) http://www.maayboli.com/node/26346
मागच्या भागात आपण सेंटरचा दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी पाहीली आता आपण वळुया येथिल कुंभारकामाकडे.
मी ह्याच्या आत शिरले आणि वेड्यासारखे फोटो काढायला लागले. कुढला काढू आणि कुढला नको अस मला झाल. त्यादिवशी सुट्टी असल्याने मला कुंभारकामाच प्रात्यक्षिक पाहायला मिळाल नाही.
२) कुंभारकामासाठी कर्नाटकातुन माती आणली जाते. ती भिजवुन मुरवावी लागते.
३) कुंभाराचे आधुनिक चाक (इलेक्ट्रिक)
४) रॅकमध्ये ह्या मातीच्या वस्तु रचल्या होत्या.
१२) हे आहेत जादुचे दिवे. ह्या दिव्यामध्ये खाली तेल भरुन उलटा करतात व वात लाउन पेटवातात पण परत सरळ ठेवल्यावर तेल गळत नाही.
१३) गांधीजी, पिगिबँक, घंटी व फुलदाणी
१४) फुलदाणीची सुंदर कलाकुसर. रंग दिल्यावर किती छान दिसेल !
१५) इथे थोडा रंग दिसला. छत्री, घर, मातीची परडी ? पहिलांदाच पाहीली, फुलदाणी
१६) मला ही छोटुशी मडकुली जास्त आवडली.
क्रमश.. पुढील भागात सुतारकाम, साबण कारखाना
छान आहेत हे प्रकार. यापैकी
छान आहेत हे प्रकार. यापैकी काही बघितल्याचे आठवतेय. या वस्तूंना उपयुक्ततेची जोड देऊन, मार्केटींग झाले पाहिजे.
दिनेशदा इथे मला ह्या
दिनेशदा इथे मला ह्या कलाकृतिंवर पेंटीग झालेले दिसले नाही म्हणजे इथुन कच्च्या स्वरुपातच विक्रि होत असेल ह्या वस्तुंची.
खुप मस्त आहे ग. मला माहिती
खुप मस्त आहे ग. मला माहिती नव्हतीच आता कधी मुंबईला तर नक्की भेट देणार.