Submitted by चिंगी on 6 June, 2011 - 03:14
वयस्कर लोकांचे वजन कमी करण्यासाठी वा वजन आटोक्यात राहण्यासाठी काही उपाय माहीत असतील तर कृपया इथे लिहा. वेगळा धागा उघडला आहे कारण बर्याचदा वयामुळे त्यांच्या आहार- विहारांवर मर्यादा असतात पण वाढत्या वजनाचा त्रासही होत असतो. एखाद्या छोट्या-मोठ्या ऑपरेशनमुळे घेतलेली बेडरेस्ट वजन वाढवायला कारणीभुत ठरते आणि मग नंतर त्यातुन दुसरेच त्रास सुरु होतात. त्या वयात झेपतील असे व्यायामप्रकारांबद्दल लिहीलंत तर दुधात साखर.. नाहीतर नको साखरेऐवजी शुगरफ्री बरे, तेवढ्याच कमी कॅलरीज!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे, मला वाटलं उपाय सांगितलेत
अरे, मला वाटलं उपाय सांगितलेत म्हणून लॉगिन झालो
चिंगी, चांगला धागा.
चिंगी, चांगला धागा.
चिंगी.. चांगला धागा, पण टायटल
चिंगी.. चांगला धागा, पण टायटल मध्ये आपल्या घरातील वयस्कर लोकांचे असे कर... नाहीतर या धाग्यावर कोणीच येणार नाही.. माबोवरच्या कुठल्या वयस्कर आयडीला स्वताला वयस्कर म्हणुन घ्यायला आवडेल?????????
चिंगे, चांगला धागा आहे. फक्त
चिंगे, चांगला धागा आहे. फक्त प्रत्येक वृध्द व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार, तसेच तब्येतीच्या तक्रारी, दिनचर्या यांप्रमाणे व्यायाम अथवा वजन कमी करण्याचे उपायही बदलणार! कोणाला योगासनांचा फायदा होईल, कोणाला चालण्याचा, कोणाला जॉगिंगचा.... किंवा आणखी कशाचा. कारण ह्या वयात व्यायाम हे डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत. आपल्या तब्येतीला झेपतील असेच करावेत. डाएट देखील डॉक्टरी सल्ल्यानेच ठरवावे.
चांगला धागा. माझ्या घरची केस.
चांगला धागा.

माझ्या घरची केस. वय वर्ष ७०+, वजनामुळे हालचाली मंदावल्या आणी हलचाली मंदावल्यामुळे वजन वाढले.. सायकलच हे... सलग ५ मिनीटे चालणे पण अशक्य झाले होते
मग उरळीकांचनच्या आश्रमात राहुन थोडे कमी केले. पण तिथे गेल्यावर आजींना काय चांगले काय वाईट हे कळाले. तिन आठवडे तिथे राहुन आल्यावर स्वतः सांगितले की मी आता बीगरमीठाचेच खाणार. असे ६ महिने मस्त पाळल्यावर त्यांना २०-३० मिनीटे चालता यायला लागले. त्या बरोबर आश्रमात शिकलेले व्यायाम. वजन १४ किलोने कमी झाल्यामुळे उत्साहही वाढला. हे सगळे १२ वर्षापुर्वीचे... ८ वर्षापुर्वी हळु हळु व्यायामाचा कंटाळ्यामुळे व्यायाम बंद आणी कमी झालेल्या वजनापैकी ५ किलो परत वाढले. पण आता या वयात आश्रमातही अवघड आहे
चिंगे, रामाचं बरोबर आहे.
चिंगे, रामाचं बरोबर आहे. धाग्याचं शीर्षक 'वयस्कर लोकांसाठी वजन कमी करण्याचे उपाय' असं बदल.
शिर्षक बदलले आहे.. अकु, तु
शिर्षक बदलले आहे..
अकु, तु म्हणतेस तसं डॉक्टरी सल्ला महत्वाचा तर आहेच. एखाद्या घरी केलेला छोटासा उपाय पण कोणाला उपयोगी पडु शकेलही, अर्थात इथे त्या सल्ल्याचा अवलंब करताना तारतम्य बाळगायलाच हवं.
माझ्या घरी माझ्या आईला रोज बर्यापैकी चालणे, प्राणायाम करुनही फायदा होत होता, पण गेले ३-४ महिने खांद्याचे ऑपरेशन झाल्याने विश्रांती झाली आणि सोबत वजनही वाढले. आता डॉक्टरने पुर्वीसारखे रुटिन सुरु करायला सांगितलयं पण वजन परत कमी होउ शकेल ना (१०+ किलो) अशी भिती पण सोबत आली आहे.
मेथी भाजुन तिची पुड गरम पाण्यातुन घ्यावी असं ऐकंलय.. कोणाला माहीत आहे का?
<< माबोवरच्या कुठल्या वयस्कर
<< माबोवरच्या कुठल्या वयस्कर आयडीला स्वताला वयस्कर म्हणुन घ्यायला आवडेल????????? >> प्रश्न आवडण्याचा नसून स्विकारण्याचा आहे. माझ्यासारखे हे स्विकारणारे माबोवर आहेतही. असो.
माझी स्वतःची माझ्यासाठीची एक कलमी उपाययोजना - जमेल तसं, जमेल तितकं, जमेल तिथं व जमेल तेंव्हा चालणं !
वयस्कर लोकाना व्यायामाचा
वयस्कर लोकाना व्यायामाचा फायदा होतोच पण सर्वात महत्वाचे म्हणजे आहार.. वयामुळे पचनशक्ती कमी झालेली असते, बीपी, डायबेटीस अश्या कॉमन व्याधी जडलेल्या असतात.. बर्याच जणाना सांधेदुखीचा सुद्धा त्रास असतो.. त्यामुळे व्यायाम करणे हे अवघड जाते.. त्यामुळे वजन वाढत असेल तर आहारावर कंट्रोल हा खुप परिणामकारक ठरतो.. दुसरे महत्वाचे म्हणजे डेली रुटीन, स्वताचे काम बंद झालेले असते पण घरातील इतर माणसे कामाला जात असतात , घरकामाला मोलकरीण असते.. त्यामुळे दिवसभर काय करायचे हा प्रष्ण असतो.. दुपारी उन्हामध्ये कुठे बाहेर जाणे पण शक्य नसते.. त्यामुळे बहुतेक लोक दुपारी वामकुक्षी च्या नावाखाली मस्त झोप काढतात... किंवा एका जागी बसुन टिव्ही पहात असतात.. ज्यामुळे वजन परत वाढते... यापेक्षा आपली दिनचर्या जर सर्व गोष्टींचा म्हणजे घरातील इतरांचे रुटीन बाहेर असलेले ऑप्शन जसे, क्लब, मित्रमंडळ वगैरे याला अनुसरुन ठेवली तर वजन कमी व्हायला नक्की मदत होइल..
मला कोणीतरी हा उपाय वयस्कर
मला कोणीतरी हा उपाय वयस्कर नसूनही सांगितलेला ग चिंगे.
१००ग्रॅ मेथी दाणे परतायचे, मग मिक्सरला बारीक करायचे.. नि थोडेसे घरगुती तुपाचे बोट लावून त्याच्या ३० समान गोळ्या करायच्या. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. १०+ किलो काही कमी झाले नाही नि मी ते १ महिन्यानंतर केलेही नाही नियमीत.
खूप सगळे साखर कमी करणारे उपाय करू नकोस.. नाही तर मग साखर खूप कमी होते.. नि त्वचा कोरडी होऊन आणखीनच काही भलते उद्योग होतील.
माझ्या परिचयातील/ नात्यातील
माझ्या परिचयातील/ नात्यातील अनेक ६५ + वयाच्या व्यक्तींनी वजन आटोक्यात ठेवण्यासाठी केलेला उपाय, म्हणजे एकभुक्त राहायचे. रात्रीचे जेवण बाद. जे काय जेवायचे ते दुपारीच पोटाला पचेल असे जेवायचे ( फुलके, भाजी, डाळ, भात). सकाळी नाश्त्याला दलिया/ फुलका - चहा / उपमा/ उकड/ तांदळाची मूगडाळ घालून केलेली खिमटी / सांजा / पोहे ह्यांपैकी काहीही मर्यादित प्रमाणात. दुपारी १ च्या आत जेवण. सायं चहा सोबत मारी बिस्किट / फोडणीच्या लाह्या / चुरमुरे इत्यादी हलका खाऊ. रात्री ग्लासभर हळद घातलेले गरम दूध. दिवसातून इतर वेळी भूक लागल्यास एखादे फळ (मौसमानुसार, वेळेनुसार व भुकेनुसार)
एक-दोघांनी टीव्ही वरील जाहिरातींत दाखवतात त्या प्रमाणे शरीराला आडवे झोपूनही व्यायाम व्हावा / करता यावा म्हणून एक मशीन मिळते ते विकत घेतले आहे. त्यात पाय घालायचे व आडवे झोपायचे. मशीनमुळे पायांची हालचाल होते व शरीराला थोडाफार व्यायाम होतो. हे अशा स्टाईलचे : http://www.chimachinestory.org/sun-ancon-chi-machine
त्याचा फायदा कितपत होतो ते माहित नाही, किंवा ते आणल्यापासून रोज त्यावर नियमित व्यायाम करतात का तेही माहित नाही
पण बाकीचे बरेच जण रोज नियमित योगासने करणे, फिरायला जाणे, बागकाम करणे, नातवंडांना खेळविणे हे करत असतात, घरातही अॅक्टिव्ह असतात. त्यात थोडाफार व्यायाम होतोच. दुपारची वामकुक्षी तासाभरापलीकडे नसते. सायंकाळी मुद्दामहून घराबाहेर किमान सोसायटीत तरी फिरून येणे, देवळात / लायब्ररीत/ पार्क मध्ये जाणे इत्यादी निमित्तांनी जनसंपर्क राहतो व मोकळी हवा मिळते. थोडाफार व्यायामही होतो.
वृद्धत्वात शरीरातील स्नायूंचे
वृद्धत्वात शरीरातील स्नायूंचे प्रमाण घटलेले असते त्यामुळे मेटॅबॉलिझ्म ही कमी होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नुसते खाणे कमी केले तर स्नायूंचीच झीज व्हायची शक्यता अधिक असते. वृद्धत्वात डाएटिंगमुळे हाडेही ठिसूळ होतात.
फिटनेससाठी tai chi आणि pilates हे व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात.
आपल्याकडे नव्याने आहारतज्ञ
आपल्याकडे नव्याने आहारतज्ञ सभासद झालेले आहेत, त्यांना विनंती करावी.
छान माहीती. .
छान माहीती.
.
संपूर्ण शाकाहार हा कोणत्याही
संपूर्ण शाकाहार हा कोणत्याही वयात वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.