यात दिलेली माहिती केवळ माझ्या वाचनाच्या आधारावर आहे. यातील कोणतीही माहिती मी स्वतः प्रयोगशाळेत तपासलेली नाही. परंतु स्वानुभवाने ही सर्व पद्धती मला तरी विश्वासार्ह वाटली आहे हे मुद्दाहून नमूद करावे वाटते.
कोणी शोधून काढली ही "पुष्पौषधी " ?
डॉ. एडवर्ड बाख ( १८८६-१९३६)
लंडनमधील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. बाख यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टीस चालू केली. कालांतराने आवड म्हणून त्यांनी बॅक्टेरिऑलॉजिकल लॅब मध्ये संशोधनाचे कामही चालू केले.
डॉ. हनिमन यांच्या होमिओपॅथीचाही त्यांनी अभ्यास केला.
याच सुमारास त्यांनी फुलांवरही संशोधन केले.
या सर्वातून त्यांनी आपले फुलांच्या संदर्भातले पहिले संशोधन प्रसिध्द केले, "Heal Thyself"
आपल्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तींचे काही गट अधोरेखीत केले. मानवी स्वभावांच्या निरिक्षणातून त्यांचे पडणारे विविध गट, प्रत्येक रोगामागची खरी कारणपरंपरा आणि निसर्गातील फुलांचे अर्क यांचा एकत्रित उपयोग करून त्यांनी एक नवीन "स्वतःलाच स्वतः बरे करण्याची " उपाययोजना शोधून काढली. हीच ती "फ्लॉवर रेमिडि" किंवा "पुष्पौषधी "!
काय आहे ही पद्धती ?
एकूण ३८ पुष्पौषधी डॉ. बाख यांनी शोधून काढल्या आहेत.
होमिओपॅथीच्या सारख्याच पांढर्या साखरेच्या गोळ्यांवर पुष्पौषधींचे थेंब टाकून ही औषधे बनवली जातात. दिवसातून ४-४ गोळ्यांचे ३/४ डोस अशी काहीशी औषधयोजना असते.
प्रत्येक व्यक्ती नुसार, तिच्या त्या त्या वेळच्या गरजेनुसार औषध योजना बदलते. एखाद्या हट्टी अन तापट मुलाच्या हट्टीपणासाठी आणि तापटपणासाठीची उपाययोजना कालांतराने फक्त त्याच्या हट्टीपणापुरती राहू शकते, किंवा कालांतराने यापैकी कोणतेच औषध लागत नाही.
एखाद्या व्यक्टीच्या डिप्रेशनसाठीफक्त २-३ आठवडेच औषध द्यावे लागेल, तर एखाद्या अतिशय हुकूमशाही प्रवृत्तीच्या व्यक्टीला बराच काळ काही औषधांचे काँबिनेशन द्यावे लागे.
प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती अन प्रत्येक घडामोडीनुरूप ही योजना बदलावी लागते. अन त्या साठीच ज्या व्यक्तीला औषध द्यायचे तिची नीट माहिती, तिच्या स्वभावातले बदल, तिच्या आयुष्यातील बदल या सर्वांचा नीट विचार करावा लागतो.
कोण देऊ शकतो ही औषधे?
या ३८ औषधांच्या विविध काँबिनेशन्स ने तुम्ही आपले औषध तयार करू शकता. हो, हो, तुम्ही स्वतःच स्वतः चे डॉक्टर बनू शकता. किंवा अगदी जवळची व्यक्ती, जी तुम्हाला नीट ओळखते ती व्यक्तीही औषधोपचार करू शकते. अर्थात त्यासाठी थोडे कष्ट घेऊन या सर्व थेरपीचा अभ्यास अन काही मार्गदर्शन घावे लागेल हे खरे !
खरच उपयुक्त पडते का ही पद्धती ?
सुरुवातीच्या काळात अर्थातच त्यांच्या या संशोधनाची टर उडवली गेली, तिच्या शास्त्रीयते बद्दल आजही शंका उपस्थित होतात, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांचा मात्र या औषधांवर विश्वास बसतोच.
मुळात ही औषधे/ दुरुस्ती पद्धत/ हिलिंग सिस्टिम ही काही शारीरीक बिघाडासाठी नाही. तर ही पद्धती मनाला उभारी देणारी, स्वभावाला बदलायला उपयुक्त ठरणारी, मनाचा,-बुद्धीचा तोल साधण्यासाठी उपयुक्त ठरते. एका अर्थाने मनःशक्तीचा गेलेला तोल सावरण्यासाठी या औषधांचा खुप उपयोग होतो.
मनःशक्तीला जास्तीत जास्त सकारात्मक बनवण्यासाठी एक सपोर्टींग सिस्टिम म्हणून मला ही थेरपी फार उपयुक्त वाटली.
काही उपयुक्त पुस्तके वा साईटस कोणत्या ?
साईटस :
http://www.bachcentre.com/centre/remedies.htm
http://www.bachflower.com/
http://www.healingherbs.co.uk/
पुस्तके :
Healing Thyself : Edward Bach
पुष्पौषधी भाग १,२,३ : डॉ. माधवी वैद्य
डॉ. बाख यांच्या पुष्पौषधी : सौ. कला चितळे
कोठे मिळू शकतात ही औषधे ?
साधारणतः जिथे होमिओपॅथीची औषधे मिळतात त्या दुकानात ही औषधे उपलब्ध असतात.
पुण्यात कर्वे रोडला नळ स्टॉपच्या चौकात लॉ कॉलेजरोडच्या डाव्या कोपर्यात होमिओपॅथीच्या दुकानात ही औषधे मिळतात.
मला alopathy चांगली कि
मला alopathy चांगली कि hoemopathy हा वाद घालायचा नाहीये. कारण मी कोणी डॉक्टर नाहीये. पण मला आलेल्या आनुभव वरून मी इतकेच सांगू शकेन कि homeopathy चे उपचार नक्कीच गुणकारी असतात. मी गेले ३-४ महिने hip joint necrosis या आजाराने त्रस्त आहे. Alopathy उपचार १ महिनाभर घेतल्यानंतर मला दोन्ही पायांच्या operation शिवाय कोणताही पर्याय नसल्याचे डॉक्टर ने सांगितले (खर्च ४५-५०,००० + हॉस्पिटल बिल).
तेव्हा मला नातेवाईक व मित्र मंडळी कडून homepathy ची माहिती मिळाली. २ नातेवैकानी तर operation करून सुद्धा काही फरक नसल्यामुळे (हाडामध्ये rods आणि artificial joints बसवून पण वेदना होत च होत्या. आणि त्यांना नित चालता पण येत नवते ) homepathy कडे वळल्याचे सांगितले.
सहजच मी हा विषय माझ्या operation पूर्वी alopathic डॉक्टर कडे काढला कि operation नंतर मी नित फिरू पळू शकेन का? मला या प्रश्नाचे खूप चमत्कारिक आणि हादरवून टाकणारे उत्तर मिळाले " हि garanti मी देऊ शकत नाही आपण या विषयावर नंतर बोलू. operation नंतर तुला २०-२५ दिवस पूर्ण पाने झोपून राहावे लागेल आणि त्यानंतर १-१.५ महिने कुबड्या वापराव्या लागतील. "
जेव्हा मी homepathy आणि माझ्या नातेवैकांच्या आनुभव बद्दल सांगितले तेव्हा त्या डॉक्टर चे पित्त आसे काही खवळले कि काही विचारू नका. त्याच्या बोलण्यावरून homeopathy बद्दल चा अविश्वास पूर्ण पाने दिसत होता. शेवटी तेथून जाताना तो खूप त्रासिक पने म्हणाला कि पुढच्या वेळी येताना admit व्हायच्या तयारीनेच या. नाहीतर येऊ नका. ( जो डॉक्टर काही दिवसापूर्वी खूप चांगला वाटत होता त्याच्या बोलण्यात आज कमालीचा फरक आणि य्वासायिक पणा दिसत होता. कदाचित तो मला आता पेशंट नव्हे तर एक ६०-७०,००० चे गिराहिक समजत होता)
त्यानंतर परत मी कोणत्याही alopathy डॉक्टर चे तोंड पण नाही पहिले व homepathy treatment चालू केली. गेले २ महिने मी औषधे घेत आहे. आणि मला जवळपास ६०-७० % फरक आहे. मी आता दररोज ३-४ किमी चालू शकतो तसेच जिना कोणत्याही वेदने शिवाय चढू उतरू शकतो. ( ५ महिन्यापूर्वी मी १०० मीटर पण नित चालत नवतो. पाहणार्याला मी लंगडा आहे कि काय असेच वाटायचे. जिना चढणे तर दूरच ... उतरणे पण जमत न्हवते ) homepathic उपचार हे माझ्यासाठी आयुष्टले turning point ठरले.
आता सगळ्यांनाच माझे म्हणणे आणि आलेला अनुभव पटेल आसे नाही. मी कोणाला काही सल्ला देत नाहीये. किंवा homepathy चांगली आणि alopathy खराब असे पण म्हणत नाहीये. पण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो मी इथे सांगितला .
मी २०१४ पासुन पुष्पौषधी (
मी २०१४ पासुन पुष्पौषधी ( फ्लॉवर रेमिडी ) वापरत आहे आणि ईतराना मदत करत आहे. मी Bach Foundation, UK Certified आहे.
मी खालिल प्रमाने मदत करु शकतो:
1. Consultation (Marathi/Hindi/English)
2. Training
3. Original Bach Flower Remedies (I import from Bach Foundation, UK)
Facebook Link : https://www.facebook.com/RoyaleSilk.BachFlowerTherapy/
Website: https://www.royalesilk.in/
Pages