६-८ छोटी वांगी-हिरवी किंवा जांभळी
२ मध्यम आकाराचे कांदे
१ टोमॅटो (नसला तरी चालेल)
भरपूर कोथंबीर
मीठ
गरम मसाला
हळद
तीखट
अर्धा चमचा चिंचेचा घट्ट कोळ
एक छोटा खडा गुळाचा
१ वाटी मुगवड्या
२ पळ्या तेल (भाजीला शक्यतो तेलाच्या वाफेत शिजवावं म्हणून)
* वांगी, टोमॅटो आणि कांदा हे सगळं धूउन पातळ आणि उभं चिरून घ्यावं. (वांग्याला पाण्यात टाकून ठेवलं तर त्यातली चांगली सत्व निघून जातात, तेव्हा पाण्यात टाकु नये). या सगळ्या भाज्या कापून एकत्र ठेवल्या तरी चालतील.
* फोडणीत, तेल गरम करून मोहरी-हिंग घालून मुगवड्या घालाव्या. २-३ मिनिटं परतावं.
* त्यावर थोड्या चिरलेल्या भाज्या घालून हळद, तीखट, मीठ, मसाला आणि चिंच घालून नीट परतावं. ऊरलेल्या भाज्या घालून परत सगळा मसाला नीट सगळ्या फोडींना लागेल इतकं ढवळून मंद आचेवर १० मिनिटं ठेवावं. त्यात वांग्याचा उग्र वास जाईल.
* परत एकदा भाजी घाटून, पाण्याचा हलका शिपका देऊन झाकळ घट्ट लावून भाजी शिजवावी.
मुगवड्या शिजल्या की ३-४ मिनिटं जास्त आचेवर भाजी फ्राय करावी. याच वेळी थोडा गुळ घालावा आणि बारिक चीरलेली कोथिंबीर पेरावी.
*** यात कांदा व्यवस्थीत गळतो. चांगला ब्राऊन पण होतो. तेव्हा फोडणीत त्याला वेगळं परतुन घ्यावा लागत नाही.
*** काही मुगवड्या शिजायला खूप वेळ लागतो. त्यांना फोडणीत घालण्याआधी १० मिनिटं पाण्यात भिजवून निथळून घ्याव.
मुगवद्द्या म्हनजे मुगाचे
मुगवद्द्या म्हनजे मुगाचे वालवलेले वदे का?
मृ, एकदम नागपूरची आठवण आली
मृ, एकदम नागपूरची आठवण आली बघ.
मीराताई, ड लिहायचा असेल तर कॅपिटल डी वापरा.
या बया! ही जुलैत लिहिलेली
या बया! ही जुलैत लिहिलेली कृती आत्ता वर आली!!
मीरा, हो हो. त्याच ह्या वड्या.
भाग्या, ह्या भाजीमधे उन्हाळ्यात कैरी घालतात नं नागपुरात?
मुगवड्या नसल्या तर इथे पंजाबी
मुगवड्या नसल्या तर इथे पंजाबी वडी मिळते, त्याची अशीच भाजी पन मस्त लागते. छान रेसिपी
वाळवलेले वडे म्हणजेच मुगाचे
वाळवलेले वडे म्हणजेच मुगाचे सांडगे का??
मुगवडे पण घरी करता येतात का
मुगवडे पण घरी करता येतात का मृ?
हो! सुनिधी हरभर्याच्या
हो! सुनिधी हरभर्याच्या डाळिचे वडे करतात ना ऊन्हाळ्यात सेम तसेच..
(म्रु तुझ्यावतिने आधिच उत्तर् दिले चालेल ना!)
म्रु च्या या रेसिपिने मी खुपदा भाजी केलिय्..एकदम झकास होते.
धन्यवाद दोन्ही गोष्टीसाठी.
धन्यवाद दोन्ही गोष्टीसाठी. मुगवड्या आणि मोठा डी ड साठी .
थँक्स प्राजक्ता.. कृती मस्तय.
थँक्स प्राजक्ता.. कृती मस्तय.
मॄ, फारच छान रेसिपी. सांडगे
मॄ, फारच छान रेसिपी. सांडगे पटकन शिजत नाहीत असा माझा अनुभव. कुणी काही सांगू शकेल का ? ह्या भाजीला तसं झालं तर वांगी फारच शिजून जातील म्हणून विचारलं.
हो मृ, कैरीचा कीस पण टाकतात.
हो मृ, कैरीचा कीस पण टाकतात. (लाळ गाळणारी बाहुली)
मुगवड्यांची कृती पण टाकलीय
मुगवड्यांची कृती पण टाकलीय कुठेतरी. शोधून लिंक देईन.
अगो! मुगवड्या असतिल तर पटकन
अगो! मुगवड्या असतिल तर पटकन शिजतात अपेक्षेपेक्षा..शंका वाटत असेल तर 'म्रु' ने लिहलय तस कोमट पाण्यात टाकुन निथळुन घ्यायच्या.
मृ, केली ग आज तुझ्या
मृ, केली ग आज तुझ्या पध्द्तीने भाजी. मी नेहेमी कांदा परतून घेते. पण तुझ्या रेसिपीनेपण कांदा छान शिजतो आणि मग पटकनपण होते. आवडली रेसिपी.
मृ. सेम पिंच. ही आमच्याकडे
मृ. सेम पिंच. ही आमच्याकडे ब-याचदा असते.
अगो, मुगवड्या पटकन
अगो, मुगवड्या पटकन शिजतात.
आमच्याकडे सांडगे थोड्या तेलावर परतुन, पाण्याचा शिपका मारुन मग शिजवतात. तेलावर परतल्याने लवकर शिजतात आणि मोडत नाहीत.
मीहि दिपांत ने
मीहि दिपांत ने लिहिल्याप्रमाणे अगदि थोड्या तेलात परतून घेते, लालसर रंग येईपर्यंत. त्याने पटकन शिजतात मुगवड्या, पण भरपूर फुलतात.
सगळ्यांना धन्यवाद या
सगळ्यांना धन्यवाद या ग्रोसरीला मूगवड्या आणणार आहे.
आज केली ही भाजी. यम्मी !!!
आज केली ही भाजी. यम्मी !!! माझ्याकडे आईकडून आणलेल्या हरभरा डाळीचे वडे असतात. मी ते घालून केली. मस्तच.
काल सम्राट मधे जेवायला
काल सम्राट मधे जेवायला गेलेले, तिथे हि भाजी खाल्ली. बैंगन बडी .... मस्त होती !!
काल केली ही भाजी . देशी
काल केली ही भाजी . देशी स्टोअरमधल्या मूगवड्या होत्या. त्या फोडणीत चांगल्या फुलल्या, ब्राउनिश झाल्या पण तरी भाजीत जराशा कच्चट लागत होत्या. शिवाय त्या वड्यांना फारशी चव पण नव्हती . भाजी मस्तच लागली तरी पण. वड्या वगळून सुद्धा वांग्याची भाजी अशा स्टाइलने करता येईल.
फोटो पाय्जेलच काय बी करा बुवा
फोटो पाय्जेलच काय बी करा बुवा