कौसानी — रानीखेतपासुन साधारण ७५ किमी अंतरावर असलेले आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले हे एक नितांत सुंदर ठिकाण. दिल्लीपासुन याचे अंतर साधारण ४१० किमी आहे. नैनिताल, रानीखेत या हिलस्टेशनच्या मानाने छोटेसे असलेले हि ठिकाण १८९०मी. उंचीवर वसलेले. कौसानीचा अर्धा भाग बागेश्वर जिल्ह्यात तर अर्धा भाग अल्मोडा जिल्ह्यात येतो. येथुन नंदादेवी, त्रिशूल, नन्दाघूंटी, पंचशूल यांची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. कौसानीत, गांधीजींचा अनासक्ती आश्रम, चहाचे मळे, बागेश्वर येथील बैजनाथ मंदिर हि ठिकाणे आवर्जुन बघण्यासारखी आहेत.
===============================================
===============================================
रानीखेतचा दौरा आटपून आम्ही कौसानीकडे निघालो. रानीखेत ते कौसानी रस्ता चांगला असल्याने साधारण तासाभरातच आम्ही कौसानीला पोहचलो. आम्ही ड्रायव्हरलाच एखादे चांगले हॉटेल सुचवण्याबद्दल सांगितले. त्याने आम्हाला "दीपराज" (रानीखेतला आम्ही "राजदीप" मध्ये तर कौसानीला "दीपराज" हॉटेल मध्ये :-)) हॉटेल सुचवले. खरोखर या हॉटेलातील आमचे वास्तव्य एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. रुममधील भल्या मोठ्या खिडकीचा पडदा दूर केला असता समोरच हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा दिसत होत्या. नैनितालला (snow view point वरून) खराब वातावरणामुळे न दिसलेला, रानीखेतला ओझरते दर्शन देणारा हिमालय कौसानीत मात्र अगदी नजरेसमोर उभा ठाकलेला दिसत होता. आमच्या उत्तराखंड भटकंतीतील हा सर्वोच्च क्षण होता!!!! मी कितीतरी वेळा खिडकीत बसुन त्याला अगदी डोळेभरून पाहत होतो.
संध्याकाळी हॉटेलच्या टेरेसवर थोडा वेळ एकटाच हिमालयाला निरखत बसलो. सूर्य अस्ताला जात होता पण आपल्या अस्तित्वाच्या सोनेरी खुणा तो त्या बर्फाच्छादित शिखरावर ठेवून चालला होता. सर्व काहि विसरायला लावणारा तो क्षण होता. क्षणभर मीही स्वतःला विसरलो, फोटो काढायचेही भान राहिले नाही. नकळत मी मोबाईलवरील प्लेलिस्टमधुन "सिमटी हुई ये घडिया, फिरसे न बिखर जाये" हे गाणे चालु केले. (निसर्गाच्या सान्निध्यात असताना मी फक्त निसर्गाचेच गूज ऐकत असतो, त्याच्या सान्निध्यात मोबाईलवर गाणी वगैरे ऐकणे मला पटत नाही. :-), पण इथे मात्र का कुणास ठावूक त्या क्षणी मला हेच गाणे ऐकावेसे वाटले. :-)) डोळ्यांना सुखावणार समोर निसर्गाचा स्वर्गीय नजारा आणि कानात रुंजी घालणारे लता & रफीचे स्वर्गीय आवाज!!!! कधी कधी वाटते कि "बस्स आता, याक्षणानंतर काहीच नको" अशीच काहिशी मनस्थिती माझीही होती. त्यावेळी असंच वाटत होत कि ये "सिमटी हुई ये घडिया" कधीच "बिखरू" नये. माझ्या आयुष्यातील ती एक अविस्मरणीय संध्याकाळ होती.
सकाळी साधारण ५ वाजता सूर्योदय होतो आणि पहिल्यांदा सुर्याचे किरण "त्रिशूल" शिखरावर पडते अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली. आम्हाला सुर्योदय पाहण्यासाठी कुठे लांब जायची गरज नव्हती. मोबाईलच्या गजरावर आमचा विश्वास नव्हता त्यामुळे आम्ही रूमबॉयला सांगितले आम्हाला उठवायला. मात्र सुर्योदयाचा स्वर्गीय नजारा पाहण्यासाठी तो येण्याआधीच आम्ही सर्व आवरून ठिक साडेचारला तयार झालो होतो. मे महिन्यातही वातावरणात कमालीचा गारवा होता. सुर्यदेवाच्या आगमनाला काहिसा वेळ होता आम्ही सगळे टेरेसवर पोहचलो आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेऊ लागलो. काहिवेळाने सुर्यदेवाचे आगमनाने चारही दिशा उजळायला सुरुवात झाली. सुर्याची किरणे एकेक करून"त्रिशूल"च्या तिन्ही शिखरावर विराजमान झाली. वातावरण अर्थात ढगाळ असल्याने पाहिजे तेव्हढा स्पष्ट नजारा दिसला नाही, पण जे काहि दिसले/पाहिले ते शब्दातीत होते.
या सुर्योदयाचे वर्णन एका हिंदी कवितेद्वारे
कैसे - कैसे
करिश्माई कारनामे
कर जाता है एक अकेला सूर्य....
किरणों ने कुरेद दिए हैं शिखर
बर्फ के बीच से
बिखर कर
आसमान की तलहटी में उतरा आई है बेहिसाब आग.
कवि होता तो कहता -
सोना - स्वर्ण - कंचन - हेम...
और भी न जाने कितने बहुमूल्य धातुई पर्याय
पर क्या करूं -
तुम्हारे एकान्त के
स्वर्ण - सरोवर में सद्यस्नात
मैं आदिम -अकिंचन...निस्पॄह..निश्शब्द..
क्या इसी तरह का
क्या ऐसा ही
रहस्यमय रोशनी का - सा होता है राग !
(रचनाकार: सिद्धेश्वर सिंह)
हिमशिखरांचे पहिले दर्शन
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४पंचशूल शिखर
प्रचि ५ढगांच्या दुलईतुन हळूच डोकावणारे सुर्यदेव
प्रचि ६सुर्याची पहिले किरण त्रिशूल शिखराच्या एका टोकावर
प्रचि ७सुर्यप्रकाशान नाहलेले त्रिशूल शिखर
प्रचि ८
===============================================
===============================================
अनासक्ती आश्रम
१९२९ साली महात्मा गांधी कौसानीला दोन दिवसांकरता आले होते. त्यांना कौसानीच्या निसर्ग सौंदर्याने इतके प्रभावित केले कि त्यांनी २ आठवडे येथे मुक्काम केला. इथले प्राकृतिक सौंदर्य पाहून "आपल्या येथे कौसानी सारखी ठिकाणे असताना लोक युरोपला का जातात?" असे म्हणत कौसानीला त्यांनी भारतातील स्वित्झर्लंड"म्हणुन गौरवले. येथेच राहुन त्यांनी आपल्या "अनासक्ती योग" या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. यानंतर येथे अनासक्ती आश्रमाची स्थापना झाली. या आश्रमात राहण्याची सोयही होते, त्यासाठी आश्रमाचे काहि नियम आहेत त्याचे पालन करावे लागते.
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
===============================================
===============================================
बैजनाथ मंदिर
प्रचि १४
"कत्युर" खोर्यात वसलेले शिवाचे एक मंदिर बागेश्वर जिल्ह्यात आहे. कौसानीहुन साधारण २०किमी अंतरावर हे ठिकाण आहे. बैजनाथहुन हाच रस्ता पुढे कर्णप्रयागला जातो (१००किमी).
कत्युर खोर्यामुळे या ठिकाणाला "कार्तिकेयपूर" असही म्हणतात. गोमती नदिच्या किनारी वसलेले हे मंदिर अकराव्या शतकातील आहे. मोठमोठ्या शिळांनी बांधलेले हे मंदिर एका रात्री बांधले असे म्हणतात. येथील मुख्य गाभार्यात शिवलिंग आणि माता पार्वतीची एक अतिशय सुरेख मूर्ती आहे. सोबत असलेली छोट्या छोट्या मंदिरात मूर्त्या नव्हत्या, विचारणा केली असता त्या चोरीला गेल्याचे सांगितले. :(. गोमती नदिकाठी मंदिर असल्याने काठावर मोठे मोठे मासे आहेत, त्यांना येणारे पर्यटक चणे, कुरमुरे खायला देतात.
प्रचि १५गोमतीनदीवरील पूल
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०चहाचे मळे
प्रचि २१चहाची पाने
प्रचि २२अल्मोडाची प्रसिद्ध "बालमिठाई"
चॉकलेट फज आणि खव्याच्या मिश्रणावर साखरेचे छोटे गोळे असलेली चविष्ठ मिठाई. फ्रिजमध्ये न ठेवताही ७-८ दिवस चांगली राहते.
प्रचि २३
खरंतर कौसानीच्या प्रेमात आम्ही सगळेच पडलो होतो आणि इथला मुक्काम अजुन एक दिवस वाढवावा असा विचार होता. पण थंड/गरम हवामानामुळे आमच्यातील एकाची तब्येत थोडी बिघडली आणि दुसर्या दिवशी परत खटिमा ते दिल्लीचा तो कंटाळवाणा प्रवास करायचा असल्याने, एक दिवस पूर्ण आराम करावा असा विचार कऊन आम्ही कौसानी वरून अल्मोडा मार्गे हलद्वानीला निघालो. अल्मोडा ते हलद्वानी प्रवास अत्यंत बेक्कार आहे आम्ही अक्षरश: किलोमीटर मोजत होतो. :(). अशा तर्हेने नैनिताल, रानीखेत, कौसानी अशी भटकंती करून आम्ही खटिमाला परतलो. दुसरा दिवसा पूर्ण आराम करून रात्रीच्या बसने दिल्लीला रवाना झालो.
(उत्तराखंड कॉलिंग सिरीज "समाप्त")
===============================================
===============================================
वातावरण ढगाळ असल्याने हिमशिखराचे फोटो तितकेसे क्लियर नाही आले. या सर्व प्रचिसाठी फोटोशॉप "Auto Contrast वापरला आहे.
या प्रवासात खुप ठिकाणी भटकलो, तलावापासुन हिमालयापर्यंत असा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग पाहिला, मनसोक्त फिरलो. आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुखद आठवणी घेऊन आलो. जसे पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे या भटकंतीत फोटोग्राफी माझी सेकंड प्रायोरीटी असल्याने फोटो टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत हे मलाही जाणवतंय (काहीवेळा वातावरणामुळेही नीटसे नाही आले) (Offcourse its not an excuse :-)). नोव्हेंबरमध्ये पुन्हा उत्तरांचलला येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. जर जायला जमले तर यापेक्षा नक्कीच चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करेन. :-). या सर्व ठिकांची माहिती माबोकरांना व्हावी म्हणुन हा फोटोफिचर प्रपंच.
===============================================
===============================================
मस्त रे जिप्स्या.. या भागातले
मस्त रे जिप्स्या..
या भागातले फोटो छानच आलेत..
चांगली सफर घडवुन आणलीस आमची...
किती सुंदर फोटो आहेत...
किती सुंदर फोटो आहेत... पहिला फोटो खुप आवडला.
तिथल्या हवेत प्रदुषणाचा पुर्ण अभाव असल्याने फोटो किती स्वच्छ दिसतात ना? अर्थात धुके नसेल तेव्हाच. प्रचि ९ मधले वातावरण किती स्वच्छ दिसतेय. नी ते घर तर इतके सुंदर की उघड्या गेटातुन धावत घरात जावेसे वाटते. व्हरांड्यात एक छोटा झोपाळा असायला हवा होता. गुजराती घरांमध्ये झोपाळा असतोच. बापु जरी राष्ट्रपिता असले तरी मुळ गुजरातीच ना...
फ्रिजमध्ये न ठेवताही ७-८ दिवस चांगली राहते.
माझा वाटा कुरीअर कर...
समाप्त पाहुन जरा वाईट वाटले.....
मस्त रे योगेश . तुझि
मस्त रे योगेश . तुझि उत्तराखंड ची प्रवास मालिका एक नंबर आहे .पुर्न मालीका वाचलि कि आम्हिच फिरुन आल्या सारखं वाट्ल्..ध्यनवाद ...
मस्त मज्जा आली... देवळाचे
मस्त मज्जा आली...
देवळाचे फोटो खास करून आवडले... 
सही फोटोज... तुझ्या
सही फोटोज... तुझ्या फोटोंमार्फत स्थळांची चांगलीच माहिती होते नि लक्षातपण राहते.. मगे ते सुपर्ब असोत की चांगले असोत..
नोव्हेंबरमध्ये पुन्हा उत्तरांचलला येण्याचे आमंत्रण मिळाले आहे >> हम्म्म.. जोड्याने जा हं..
जिप्सी, छान फोटो आणि माहिती
जिप्सी,

छान फोटो आणि माहिती !
धन्यवाद !
सुंदर पण शेवटचा भाग म्हणालास
सुंदर पण शेवटचा भाग म्हणालास म्हणून वाईट वाटले. हिमालयाची बर्फाच्छादीत शिखरे मी अजूनही बघितली नाहीत. (बघितला तो फक्त स्विस आल्प्स )
ते एका रात्रीत मंदिर बांधले या प्रकरणावर कधीतरी लिहिन.
खरोखर अप्रतिम नजारा आहे.
खरोखर अप्रतिम नजारा आहे. योगेश संपुर्ण मालिकेबद्दल धन्यवाद. वृतांताने सगळी कसर भरून काढली मित्रा.
हिमालयाचे सगळे फोटो आवडले.
हिमालयाचे सगळे फोटो आवडले. मस्त झाली सफर
झक्कास योग्या लै भारी..
झक्कास योग्या लै भारी..
पूर्ण मालिका सुरेख. वर्णन आणि
पूर्ण मालिका सुरेख. वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले.
मस्तच रे योगेश.. सर्व
मस्तच रे योगेश.. सर्व मालिकेतील फोटो मस्तच्...इथे जागेवरून बसुन पुर्ण सफरीची मजा घेता आली...
देवळांचे फोटो विशेष वाटले...
एक निरीक्षण - देवळांची रचना जरा वेगळीच वाटली... आपल्या कडील समकालीन देवळांप्रमाणे आधी पाया किंवा जोती आणी वरती मंदिर न बांधता सरळ जमीनी पासुन मंदिर बांधत काढल्यासारखे वाटते. अगदी बेस शिवाय एखादा बॉक्स उभा केल्यासारखे...
नोव्हेंबरमध्ये जायला जमले तर फोटोग्राफिचापण ऊद्देश ठेऊन जा....
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
देवळांची रचना जरा वेगळीच वाटली... आपल्या कडील समकालीन देवळांप्रमाणे आधी पाया किंवा जोती आणी वरती मंदिर न बांधता सरळ जमीनी पासुन मंदिर बांधत काढल्यासारखे वाटते. अगदी बेस शिवाय एखादा बॉक्स उभा केल्यासारखे... >>>>>हो मनोज. माझेहि आता लक्ष गेले. इंटरलॉकिंग सिस्टम त्यावेळी होती का?
नोव्हेंबरमध्ये जायला जमले तर फोटोग्राफिचापण ऊद्देश ठेऊन जा....>>>>नक्कीच
लय भारी.
लय भारी.
जिप्सी, आम्हीही तुझ्याबरोबर
जिप्सी, आम्हीही तुझ्याबरोबर छान भटकंती केली. धन्यवाद.
व्वा.. फारच छान भटकंती..
व्वा.. फारच छान भटकंती.. सुंदर माहिती..
मिठाई यम्मी दिसतीये
तुझा अनुभव वाचून भारतातील स्वितझर्लॅण्ड ला भेट द्यावीशी वाटू लागलीये..
छान लिहिलयस.. वाचता वाचता'सिमटी हुई घडियोंमे हम भी खो गये '
सह्हीच रे जिप्स्या
सह्हीच रे जिप्स्या
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो आणि छान माहिती. जियो!
वरचे सुर्योदयाचे आणि शिखरांचे
वरचे सुर्योदयाचे आणि शिखरांचे फोटो मस्त आहेत.
जागू, मामी, वर्षूदी, लाजो,
जागू, मामी, वर्षूदी, लाजो, सावली प्रतिसादाबद्दल धन्स
योगेश, भारी फोटो, आणि
योगेश, भारी फोटो, आणि वर्णन.(नेहमीप्रमाणेच.) आता फक्त धन्यवाद देते. हा नजराणा आम्हाला दिल्याबद्दल.
द्रुपालबाबा झिंदाबाद!
द्रुपालबाबा झिंदाबाद!
द्रुपाला, जा आता.
द्रुपाला, जा आता.
आशु, या द्रुपालला पण तूच घेऊन
आशु, या द्रुपालला पण तूच घेऊन आलायस का?
ही द्रुपालची कृपा
ही द्रुपालची कृपा
.
.
योगेश,माझ्याकडचे शब्द संपले.
योगेश,माझ्याकडचे शब्द संपले.
धन्स आज्जे द्रुपालबाबा
धन्स आज्जे

द्रुपालबाबा झिंदाबाद!>>>>>
योगेश, अरे बघ ना. एकाचे सात.
योगेश, अरे बघ ना. एकाचे सात. असं पाचशे-हजारच्या नोटांच झाल पाहिजे.
असं पाचशे-हजारच्या नोटांच झाल
असं पाचशे-हजारच्या नोटांच झाल पाहिजे>>>>>>अगदी अगदी,
छे! पण ते काय होणार नाही. खरच
छे! पण ते काय होणार नाही. खरच योगेश काय सुरेख वर्णन करतो रे. लई भारी.
Pages