भाग १:
देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)
http://www.maayboli.com/node/25900
भाग २:
उत्तराखंड कॉलिंग — झील के उसपार "नैनिताल"
http://www.maayboli.com/node/25944
===============================================
===============================================
भीमताल
नैनितालची भटकंती करून आम्ही निघालो ते भीमताल या कुमाँऊ प्रदेशातील सर्वात मोठ्या तलावाकडे. नैनितालहुन साधारण २२ किमी अंतरावर भीमताल आहे. जसे आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे हलद्वानीहुन एक रस्ता भवालीमार्गे नैनितालला जातो त्याच रस्त्यावर भीमताल आहे. येथुन हलद्वानी साधारण ४०-४५ मिनिटावर आहे. समुद्रतळापासुन १३७०मी उंचीवर हे तळं आहे. काहि लोकं म्हणतात कि वनवासाच्या दरम्यान भीम येथे थांबला होता आणि त्यानेच आपल्या गदेच्या प्रहाराने या तलावाची उत्पत्ती केली. तर काहिंच म्हणणे "भीमकाय" आकार असल्याने या तलावाचे नाव "भीमताल" पडले आहे. :-). येथुनच "गोला" नदीचा उगम होतो जी पुढे काठगोदामला "रामगंगा" नदीला जाऊन मिळते. येथे एक छोटेसे धरणही बांधले आहे जे जवळपासच्या गावच्या शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. मुंबई-पुण्यात शोधत असलेलो "नीलमोहर" (जॅकरांदा) येथे मात्र डोळेभरून पाहता आला. भीमतालात पडलेली जॅकरांदाची फुले मन मोहुन घेत होती. भीमताल, नौकुचियाताल, सातताल आणि हनुमानगढीची सफर करताना आभाळ भरून आले होते आणि शेवटी पावसाने आम्हाला गाठलेच. त्यामुळे मनासारखे फोटो काढता आले नाही.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
===============================================
===============================================
सात ताल
नैनितालहुन सात ताल २२ किमी अंतरावर आहे तर भीमतालपासुन अवघ्या ४ किमी अंतरावर. हा तलाव सात "ताल" मिळुन बनलेला असल्याने याचे नाव "सात ताल". येथे भरपूर हॉटेल्स आहेत आणि तलावाच्या किनारी बसुन थंड हवेत तुम्ही आरामात जेवण करू शकतात. आम्हीही येथेच आमचे दुपारचे जेवण उरकले. येथे निवांत बसण्यासाठी पायर्या आणि फिरण्यासाठी एक छोटासा पूलही आहे. बरेच पर्यटक येथे कुमॉऊ पद्धतीचे पेहराव घालुन फोटो काढत होते. (रच्याकने तो "कुमाँऊ" पेहराव, "काश्मिरी" जास्त वाटतं होता. ;-).
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
===============================================
===============================================
नौकुचियाताल
नैनितालपासुन साधारण २८ किमी अंतरावर असलेले एक सुंदर ठिकाण.नऊ किनारे असलेला तलाव म्हणुन नौकुचियाताल आणि याचे नऊ किनारे म्हणजे नवग्रहांचे वास्तव्य. असं म्हणतात कि ज्या कुणाला या तलावाचे नऊ किनारे दिसेल त्याला मोक्षप्राप्ती होते. शोधुन काढुन मला ६ कोने दिसले, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी अजुन ३ कोने दूरच. नैनितालच्या गर्दीपासुन दूर निवांत अशी हि जागा. नैनीलेकमध्ये असलेली गर्दी टाळुन आम्ही येथेच नौकाविहाराचा आनंद घेतला.
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
===============================================
===============================================
हनुमानगढी
नौकुचियाताल आणि भीमतालच्या वाटेवर असलेले हे हनुमानची भव्य मूर्ती असलेले ठिकाण. येथे वैष्णोदेवीच्या मंदिराची सुंदर प्रतिकृती आहे.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येतया आभाल
===============================================
===============================================
अशा तर्हेने आमची नैनिताल भटकंती पूर्ण झाली. या नैनितालच्या भटकंतीसोबतच सुट्टी नसल्याकारणाने आमच्या दोन मित्रांनी (अमित & प्रीत) यांनी पुढिल भटकंतीपासुन रजा घेतली व मुंबईला परतले. उरलेलो आम्ही चौघे (मी, मेहर, प्रशांत आणि किशोर) राणीखेतच्या दिशेने निघालो.
तळटीप: नैनिताल हि सरोवर नगरी असल्याने वेगवेगळ्या तलावाचे फोटो पाहुन कदाचित तोचतोचपणा (रीपीटेशन) वाटेल, पण प्रत्येक तलावाची कहाणी आणि सौंदर्य वेगवेगळे असल्याने इथे ते फोटो प्रदर्शित करत आहे.
(पुढिल भागात : राणीखेत :-))
===============================================
===============================================
योगेश , सुंदर वर्णन आणि
योगेश , सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटो. जांभळ्या पायर्यांचे फोटो जबरदस्तच. होड्याचे फोटो सुद्धा मस्त.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
प्रचि १ आणि १३ मस्त !
प्रचि १ आणि १३ मस्त !
Pages