Submitted by सशल on 10 July, 2008 - 16:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
१ वाटी दुध,
१ वाटी साखर,
अर्धी वाटी तुप,
चवीला मीठ
मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या
तळायला तेल/तूप
क्रमवार पाककृती:
१ वाटी दुध, १ वाटी साखर आणी अर्धी वाटी तुप, चवीला मीठ उकळल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या मावतो पीठ सैलसर मळून गार झाल्यावर एक तास ठेवायचं आणी मग शंकरपाळी करायची आणी महत्वाचे म्हणजे मंद आचेवर तळायची अगदी खुसखुशीत आणी कुरकुरीत होतात साखरेचे प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करावे तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते पण तेल वापरले तर एक वाटी घ्यावे
वाढणी/प्रमाण:
भरपूर होतात :)
अधिक टिपा:
वेळ बराच लागतो .. लाटणं, कातणं आणि तळणं वेळखाऊ काम आहे ..
माहितीचा स्रोत:
सासुबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही एक झाली.
ही एक झाली. बाकीच्या १४ कधी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मा. स्वाती
मा. स्वाती ताई, :p ..
तुम्ही स्वैपाकातल्या जाणकार दिसत नाही .. ऑम्लेट आणि शंकरपाळी कन्फ्युज करू नका .. जातपात पोलीस येऊन दम भरतील तुम्हाला .. :p
हे काहितरी
हे काहितरी अजबच काम दिसतंय .. मी पोस्ट केलं तर मला prompt आला की 'प्रतिसाद' field required .. नव्या मायबोलीत पोस्ट डिलीट कसं करायचंय हेही ठाऊक नाही ..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अजून एक पद्धतः १ वाटी साखर, १
अजून एक पद्धतः १ वाटी साखर, १ वाटी पाणी, १ वाटी साजूक तूप एकत्र करून एक उकळी आणावी. हे गार झाले की मैदा घालावा. यामधे बरोब्बर अर्धा किलो मैदा मावतो. जी consistency येते पीठाला ती परफेक्ट असते. त्याचे खुसखुशीत शंकरपाळे होतात. अजिबात चुकण्याचा चान्स नाही. तळायची पद्धत वर दिल्याप्रमाणेच. मी रिफाईंड तेलात तळते.
* वजनी प्रमाण ज्यांना हवे आहे त्यांच्यासाठी- १२५ ग्रॅम साखर, १२५ ग्रॅम तूप आणि पाणी १७५ मिली.
मैदा ५०० ग्रॅम.
तिखट
तिखट मीठाचे शंकरपाळे लिहा ना कोणीतरी.... मी मेथीचे शंकरपाळे पण खाल्ले होते...खुप छान लागतात ते पण
अजुन एक
अजुन एक पध्द्त १ वाटि मैदा १ वाटि गव्हाच पिठ पाउण वाटि तुप घ्यावे १ वाटि दुध गरम करुन त्यात १ वाटि साखर घालावि गार झाल्यावर सगळ एकत्र करुन पिठ माळावे बाकि आधि प्रमाणे
लग्नानंतर
लग्नानंतरची पहिली दिवाळी होती. मी हौसेने शंकरपाळी करायची ठरवली.
मैद्याएवजी रवा घेतला. शंकरपाळी तेलात विरघळून जायला लागली.
काय करावं सुचेना. तेवढ्यात नवरा घरी आला. मग त्याने युक्ती काढली.
पिठाचे छोटे चपटे गोळे केले आणि समोरच्या बेकरीतून भाजून आणले.
या पदार्थाचे नामकरण 'शंकरस्किटस' असे केले.
जिरे आणि
जिरे आणि ओवा भरड वाटुन घ्यावा, मैद्यात कड्कडित तेलाचे मोहन आणि भरड घालुन घट्ट मळावे..पोळि लाटुन शंकरपाळि कापावि..तेलात तळावि..
बेसन आणि
बेसन आणि गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे मी असे करतो -
१ वाटी बेसन
२ वाट्या पिठ
पोळपाटावर रंगळलेला भाजलेला ओवा
चवीपुरते मीठ
चवीपुरते पण खूप नाही असे लाल तिखट
मोहन करुन त्यात तीळ, ओवा, हिंग, सोडा आणि मीठ घालावे. हे मोहन बेसन आणि गव्ह्याच्या एकजीव केलेल्या पिठात नीट समांतर मिसळेल याची काळजी घ्यावी. मग अर्धे दुध आणि अर्धे कोमट पाणी यांनी पिठ मळून, ओल्या कापडात हा उंडा ठेवून द्यावा. अर्धा तास झाला की त्याचे शकरपाळे करावे. हे शंकरपाळे तेल पित नाहीत ये उत्तम.
शंकरपाळे
शंकरपाळे वेगळा प्रकार
लागणारे जिन्नस:
दुध, साखर, तुप प्रत्येकी १ वाटी,
पिकलेली केळी मध्यम आकारची ३-४
चवीला मीठ
मैदा अर्धा किलो
तळायला तेल
क्रमवार पाककृती:
१ वाटी दुध, १ वाटी साखर आणी १ वाटी तुप, पिकलेली केळी कुसकरून, चवीला मीठ घालून केळी ट्रान्सपरंट होई पर्यंत शिजवून/ उकळून घ्यावे. थोडं कोमट झाल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा घालून पीठ मळून घ्यावे. साधारण अर्धा एक तास तसेच ठेऊन शंकरपाळी लाटून मंद आचेवर तळावी.
अधिक टिपा:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोहन म्हणून तूप घेतल्यास तळण्यासाठी तेल घ्यायचे. विचित्र वाटले तरी ..
खूप खुट्खुटीत्...आणी पारी असलेली ( लेयर्ड) शंकरपाळी होतात.
तेल तूप दोन्ही वापरल्या मुळे जरा तेलकट होतात पण दोन तिन पेपर नॅपकिन्स ने काम सोप्प होत.
पूजा... प्रसादाची केळी खूप उरली असतिल तर संपवायला चांगला प्रकार आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमी पेक्षा वेगळे म्हणून मी .. कॉईनसारखे गोल गोल कापून बनवते. पिल्लु खुष... यो बनाना कुकीज ...
डॅफोडील,
डॅफोडील, आम्ही ह्याला खजुर्या म्हणतो.
अच्छा
अच्छा आमच्याकडे रामनवमीला खजुर्या करतात पण त्या अश्या नाही... त्यात केळं न घालता गुळाच्या शंकरपाळ्या लाटुन त्यावर खसखस लाऊन तळतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमकीन शंकरपाळ्यात मीठ्,जीरे
नमकीन शंकरपाळ्यात मीठ्,जीरे पावडर अणि मीरेपावडर घालूनही छान होतात.
आज संध्याकाळि शंकरपाळ्यांचा
आज संध्याकाळि शंकरपाळ्यांचा नंबर आहे. सगळ्यात सोप्पी, बिनकटकटीची कृती सौ.पौर्णिमा यांची आढळल्याने तिचा वापर करण्यात येईल..
आज अर्धा किलो, उद्या अर्धा किलो.
माझी पारंपारीक (म्हणजे अन्नपुर्णामधली) साधारण अशीच आहे पण तिच्यात मैदा किती मावेल ते कळत नाही आणि मग त्या ढिगभर पिठाच्या शंकरपाळ्या रात्र जागुन तळायला कंटाळा येतो.
तिखट पण करणार आहे.
हे मोहन बेसन आणि गव्ह्याच्या एकजीव केलेल्या पिठात नीट समांतर मिसळेल याची काळजी घ्यावी
हे नक्की कसे करावे हे पाककृती भाषेत सांगणार का???
ते मोहन सगळ्या पीठाला एकसारखं
ते मोहन सगळ्या पीठाला एकसारखं लागलं पाहिजे.
मोहन या प्रकाराबद्दल माझ्या
मोहन या प्रकाराबद्दल माझ्या मनात खुप शंका आहेत.... मोहन घालण्याचे प्रमाण प्रत्येक पदार्थासाठी सारखेच असते का? एक वाटी पीठाला किती मोहन घ्यावे? उकळते तेल पिठात मिक्स करताना काय काळजी घ्यावी? पीठात मिक्स केल्यावर लगेच पुढची प्रोसेस सुरू करावी का?
पाव किलोच्याच शंकरपाळ्या
पाव किलोच्याच शंकरपाळ्या करायच्यात. पहिल्यांदाच करतेय.. बिघडल्या तर या भितीने![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
वर लिहीलंय त्याच्या एक्झॅट निम्मं प्रमाण का?
पिठीसाखर करुन वापरायची का?
हो चिंगी, वरच्या प्रमाणाच्या
हो चिंगी, वरच्या प्रमाणाच्या निम्म्याने पाणी-तूप घे. ते कमी घेतलंस की मैदा पण कमी मावेल त्यात. आणि पिठीसाखर नाही, आपली नेहमीची साखर घ्यायची.
मन्जूचं बरोबर आहे. पाव किलोला
मन्जूचं बरोबर आहे. पाव किलोला सगळं प्रमाण निम्मं. साधी साखर पाण्यात विरघळवून घ्यायची.
अमि, एका वाटीला चार टेबलस्पून असे साधारण प्रमाण आहे मोहनाचे, थोडे कमी-जास्त पदार्थावर अवलंबून. मोहन जास्त झालं तर पदार्थ विरघळतो, कमी झालं तर खुसखुशीत होत नाही. चुकतमाकत का होईना, करत राहिलं, की अंदाज येतोच
उकळतं तेल पीठात ओतल्यावर थोडं थांबायचं, ते गार होईस्तोवर, नाहीतर मळताना चटके बसतील ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना, जरूर. फराळात गोड प्रकारात सर्वात सोपे शंकरपाळे आणि बेसनाचे लाडू. नक्की कर आणि सांग. चिंगी, कर बिन्धास्त अर्धा किलोचे. प्रमाण पर्फेक्ट घे, म्हणजे अजिबात बिघडणार नाहीत. ऑल द बेस्ट. सगळ्यांनी फोटो टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टीपः पारंपारिक पदार्थ पहिल्यांदाच करताना कधीही त्यात आपले स्वतःचे प्रयोग करू नयेत. एकदा हात बसला, अंदाज आला की मग प्रयोगांना सुरूवात करावी(, असे माझे मत)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या आईची पध्दत (आजी कडून
माझ्या आईची पध्दत (आजी कडून आलेली) :
१ वाटी साखर, १ वाटी पाणी, १ वाटी साजूक तूप, मावेल तेव्हढा मैदा, चिमुटभर मीठ
परात / ताटात साखर घ्यायची त्यावर गरम पाणी आणि गरम तुप घालायचं मीठ घालायचं, चमच्याने थोड ढवळायचं गरम पाणी आणि गरम तुप यामुळे साखर आपोआप विरघळते, थोड थंड झाल्यावर त्यात बसेल तेव्हढा मैदा घालुन पिठं मळायचं (पौर्णिमा म्हणाल्या त्याप्रमाणे साधारण १/२ किलो मैदा मावतो). थोडावेळ झाकुन ठेवल की मैदा चांगला मुरतो. मग नेहमी प्रमाणे शंकरपाळे करायचे. सोप्पं आहे. (१००% खुसखुशीत होतात)
टीपः पारंपारिक पदार्थ
टीपः पारंपारिक पदार्थ पहिल्यांदाच करताना कधीही त्यात आपले स्वतःचे प्रयोग करू नयेत. एकदा हात बसला, अंदाज आला की मग प्रयोगांना सुरूवात करावी(, असे माझे मत) अनुमोदन..........
बरं, पौर्णिमाने दिलेल्या
बरं, पौर्णिमाने दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरेच्या ऐवजी एक वाटी कसूरी मेथी आणि चवीनुसार तिखट-मीठ-ओवा घातला तर शंकरपाळे होतील का?
भा.प्र. आहे, हसू नका मला...
धन्स गं मुलींनो. पौर्णिमा,
धन्स गं मुलींनो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पौर्णिमा, मला असाच सल्ला मिळालाय.. सोपे पदार्थ म्हणजे शंकरपाळी आणि बेसनाचे लाडु. तरीपण अवघड आहे माझ्यासाठी.
(बायांनो म्हटलं की वय झाल्यासारखं वाटतं ना!)
माझे काल बेसनाचे लाडु झाले,
माझे काल बेसनाचे लाडु झाले, सकाळी मक्याचा चिवडा झाला. आता गेल्यागेल्या शंकरपाळ्याचे पिठ भिजवणार....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ता शंकरपाळे झाले. एकदम
आत्ता शंकरपाळे झाले. एकदम मस्त खुसखुशित. फक्त साखर गोडीला कमी होती, काल लाडु करताना लाडवांची चव घेत घेत अॅडजस्ट करत गेले त्यामुळे लक्षात आले नाही. शंकरपाळ्यात एकदा पिठ भिजवल्यावर नंतर काही अॅडजस्ट करायचे म्हणजे डोकेदुखी. अर्थात अर्धा किलोचे शंकरपाळे काही पुरणार नाही, उद्या परत करावे लागतीलच. तेव्हा साखर बरोबर करेन अॅडजस्ट.
नवशिक्यांसाठी एक टिप - वर लिहिल्याप्रमाणे तळताना आच जरा कमीच ठेवावी, आपण चपातीला ठेवतो त्यापेक्षा थोडी कमी. शंकरपाळे तळत असताना, गुलाबी रंगावर आले की कढईतुन काढुन घ्यायला सुरवात करायची. आपल्याला हवा तो रंग येईपर्यंत कढईतच तळत ठेवले तर बाहेर काढुन घेईपर्यंत बरेच काळे पडतात. रंग बदलण्याची प्रोसेस बाहेर काढुन ताटात ठेवल्यावरही जरा वेळ चालुच असते. त्यामुळे हे सगळे लक्षात ठेऊन उगाच जास्त गडद रंग येईपर्यंत तळत बसु नका....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण पौर्णिमा प्रमाणेच करते
मी पण पौर्णिमा प्रमाणेच करते पण पाण्याच्या एवजी दुध घेते. एकदम खुसखुशीत होतात.
आणी ह्यात मैदा आणी गव्हाचे पिठ समप्रमाणात भिजवते. आजीबात चुकत नाहीत.
मला नुसत्या मैदयाच्या आवडत नाहीत म्हणुन गव्हाचे पिठ पण पौर्णिमाने दिल्याप्रमाणे मैदयाच्या पण खुप छान लागतात.
वर उल्लेख केलेल्या विविध
वर उल्लेख केलेल्या विविध पाकृं मधे, तुप वितळ्वून मग १ वाटि घ्यायचे ना.
मी पण पहील्यांदाच करणार आहे म्हणून विचारते.
मेथी घालून करायचे असेल तर कसुरी मेथी चालेल का ?? त्याचं पण प्रमाण द्या ना कोणी तरी.
वर उल्लेख केलेल्या विविध
वर उल्लेख केलेल्या विविध पाकृं मधे, तुप वितळ्वून मग १ वाटि घ्यायचे ना.
असे आणि तसे कसेही चालते...
जरा वितळवले की मोजायला बरे पडते.
anujay, मी पण पाण्याच्या जागी दुध वापरते.
मला नुसत्या मैदयाच्या आवडत नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसत्या मैद्याच्या 'मैदा खायला आवडत नाही' म्हणुन आवडत नाहीत का चवीतला फरक आवडत नाही म्हणुन? मी गव्हाच्या केल्या नाहीत कधी. वातड होतील अशी भिती वाटते.
मी पिठ भिजवताना वेलचीपण दळुन टाकते. मस्त वास येतो खाताना.
अग मैदा खायला नाही आवडत. उलट
अग मैदा खायला नाही आवडत.
उलट गव्हाचे पिठ घालुन जास्ती खुसखुशीत होतात असा माझा अनुभव आहे.
अनुजय, प्रमाण टाका ना!!
अनुजय,
प्रमाण टाका ना!! म्हणजे पुर्ण गव्हाचे पिठ की अर्ध अर्ध??
Pages