ऐ ग़जल

Submitted by कमलाकर देसले on 17 May, 2011 - 04:16

मी तुला वाचून घडलो ऐ गझल ;
मी तुझ्या प्रेमात पडलो ऐ गझल..

छिद्र का तू भावनेला पाडले ?
केवढा मी आज रडलो ऐ गझल..

मी तसा भित्राच होतो.आज पण-
तू सवे येताच लढलो ऐ गझल..

बोललो मी सत्य जेव्हाही इथे ;
बघ व्यवस्थेलाच नडलो ऐ गझल..

स्वच्छ झाला ,स्पष्ट झाला बोध अन ;
मी कुठे नाहीच अडलो ऐ गझल..

मी रसीकांच्या मनातिल बोललो ;
नम्रतेने उंच चढलो ऐ गझल..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तसा भित्राच होतो.आज पण-
तू सवे येताच लढलो ऐ गझल..

बोललो मी सत्य जेव्हाही इथे ;
बघ व्यवस्थेलाच नडलो ऐ गझल..
>> हे शेर आवडले.

मी तसा भित्राच होतो.आज पण-
तू सवे येताच लढलो ऐ गझल..>>> हा शेर ठीकठाक!

'ऐ' की 'ए' ?

(अवांतर - गझलेला संबोधताना ए गझले असे संबोधावे जावे का? म्हणजे मराठीपुरते म्हणत आहे.)

शुभेच्छा!

बेफिकीरजी, 'ऐ' की 'ए' ? पैकी मराठी साठी 'ए' च योग्य आहे . उत्स्फुर्‍त व सहज आला. इतकेच आभार .

बेफिकीरजी, 'ऐ' की 'ए' ? पैकी मराठी साठी 'ए' च योग्य आहे . उत्स्फुर्‍त व सहज आला. इतकेच. आभार .

'ऐ' की 'ए' ? पैकी मराठी साठी 'ए' च योग्य आहे .

पण 'ऐ गझल' म्हणताना जी घंटी वाजतेय ना ती 'ए गझल' म्हणताना नाही वाजत Happy

गझल सुंदर आहे.. प्रश्नचं नाही.

पण इतकी सुंदर असुनही...'ऐ' ...मुळे खटकते...

मराठीत तरी असं नाही म्हणत्,..(माझं मत)

शामजी, तुम्ही म्हनता ते मान्यच.बेफिकीरजीही तेच म्हनताय. विशाल कुलकर्नी यान्चे मत हेच माझे मत आहे.
नियम पाळून प्रयोग करायला काय हरकत/? 'ऐ' मधे जी मजा आहे ती 'ए' मधे येत नाहि. बघा कस वाट्ते.

वेगळ, नवीन आणि आवश्यक मला नक्की आवडेल .( - आपला गझल तन्त्रावरचा प्रदीर्घ ले़ख वाचला .खुप आवडला. मार्गदर्शक आहे. माझ्याकडे तो सन्ग्रहि आहे. असो )