ग्रॅनोला बार बद्दल

Submitted by पराग on 12 May, 2011 - 10:45

लोकहो, ग्रॅनोला बार बद्दल माहिती हवी आहे. कुठले चांगले असतात ? (ब्रँड, फ्लेवर इ.)
ब्रेकफास्टला पर्याय होऊ शकतो का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेकफास्टला पर्याय होऊ शकतो का ?>>पर्याय मानणे न मानणे तुझ्यावर आहे. मी ब्रेकफास्टपेक्षा नून स्नॅक्स म्हणून खातो. एखाद्या विशिष्ट brand चा मला फार लवकर कंटाळा येतो त्यामूळे मी सतत बदलत राहतो. पण त्यातल्या त्यात मला Whole Food मधे मिळणारे वेगळे वाटले आहेत. (वेगळे म्हणजे flavors बद्दल म्हणतोय.) मी शक्यतोवर 0 sat fat वाले आणत असल्यामूळे मला कमी options मिळतात. Target मधे surprisingly खूप variety मिळाली.

स्वाती२ ला अनुमोदन. ब्रेकफास्ट नाही पण स्नॅक्स म्हणून खाण्यासाठीच हे बार बरे.
मी बरेच प्रकार ट्राय केले, मला पण नेचर वॅलीच जास्त आवडले .

ब्रेकफास्ट ला त्याच्याबरोबर आणि काहीतरी खाव लागेल.
मला Kashi Brand चे आणि Archer Farm ग्रॅनोला बार आवडतात.
त्याच्याखालोखाल quaker चे. Nature Valley चे नाही आवडले.
पण मला ग्रनोला बार पेक्षा soft baked Cereal Bar जास्त आवडतात. Kashi आणि quaker दोन्हीचे चांगले आहेत.
तसच Archer Farm (Target चा ब्रँड) fruit bar पण स्नॅक म्हणुन आवडतात. त्यांचा Tropical Bar मस्त आहे.

काशी (Kashi) बेस्ट .. मला ब्रेकफास्ट काय कुठल्याही वेळी खायला आवडतात त्यांचे ग्रनोला बार ..

हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप नसलेले शक्यतो खावेत ..

नेचर व्हॅली हनी ओटस हा माझा आवडता प्रकार होता.. भारतात आणि आता बेल्जियम मध्ये बरंच शोधूनपण कुठे मिळालं नाही अजून.
ब्रेकफास्ट पेक्षा स्नॅक म्हणून जास्त चांगला.. ब्रेकफास्टला अजून काहीतरी हेवी खावं Happy

पराग आणि इतर सगळ्यां साठी ,
( ही पोस्ट या पोल बीबी वर अयोग्य वाटली तर डिलिट करीन पण हे सांगावसं वाटलं.)
ग्रॅनोला बार / सिरिअल बार हे ब्रेकफास्ट ला पर्याय म्हणून अजिबात वापरु नये , ट्रेकिंग ला जाताना न्यायचे स्नॅक म्हणून कधी तरी ठिक आहे.
नुकत्याच वाचलेल्या ऋजुता दिवेकरच्या ' विमेन अ‍ॅन्ड वेटलॉस तमाशा' मधे सिरिअल्स किंवा त्या प्रकारातल्या खाण्याची पारंपारीक भारतीय पदार्थांची न्युट्रिशन व्हॅल्यु बद्दल जी तुलना केलीये , जी माहिती दिलिये तो चॅप्टर आवश्य वाचण्या सारखा आहे.
सगळी माहिती इथे लिहित नाही पण पुस्तकातून जी माहिती मिळाली त्या प्रमाणे 'न्युट्रिशन' चा विचार करत असाल तर सिरिअल बार/ ग्रॅनोला बार / सिरिअल्स या गोष्टी जितक्या टाळता येतील तेवढ् चांगलं.
कारणं:
१) यात मोठ्या प्रमाणात साखर असते ( शिवाय सिंपल शुगर-काँप्लेक्स शुगर प्रमाण ही योग्य नसते), अर्टिफिशिअल कलर्स , प्रिझर्वेटिव्ह्ज असतात , या शिवाय बाहेरून घातलेले फायबर्स, विटॅमिन्स असल्यामुळे पोषणाद्रव्यांचय अभिसरणात अडचण येते.
२ . या शिवाय यात प्रोटिन्स आणि कार्ब्स चा रेशो योग्य नसतो त्यामुळॅ विटॅमिन्स आणि मिनेरल्स च्या शोषणावरही परिणाम होतो.
३. नुसताच एक सिरिअल बार, १ ग्रॅनोला बार किंवा 3/4 th वाटी सिरिअल with skim milk एवढ्या पोरशन नी पोटभर खाण्याचं समाधानही होत नाही .
या उलट पारंपारीक भारतीय ब्रेकफास्ट मधल्या (घरगुती गरमा गरम बनवलेल्या) पदार्थांमधे कृत्रिम रंग, कृत्रिम फ्लेवर्स , पुन्हा पुन्हा वापरलेल तेल आणि प्रिझर्वेटिव्ह्स नसल्यामुळे न्युट्रिशन्स सहज शोषली जातात , मेटॅबोलिझम सुधारते , खाण्याचं समाधान मिळातं आणि ब्लड शुगर स्थिर रहाते ज्यामुळे सारखं गोड खायचं टेम्प्टेशन होत नाही.

DJ शी सहमत! ग्रॅनोला बार हे ताजे फळ वगैरे खाणे शक्यच नसेल तेव्हा पर्याय म्हणुन ठीक. प्रोसेस्ड सिरिअलही टाळावे. देशी पद्धतीची गरम न्याहारी शक्य नसेल तर ओट्स आणि स्किम मिल्क वापरुन ओटमिल मावेत ५ मिनिटात होते.त्यातच आलटुन पालटून बेरीज, नट्स वगैरे घालायचे.

सगळ्यांना धन्यवाद माहितीसाठी.. Happy
ग्रानोला बार एकदा मॅराथॉन रनमध्ये खाल्ला होता.. नंतर नाहीच. त्यामुळे सकाळी खाण्याच्या दृष्टीने माहिती हवी होती... डिजेची पोस्ट वाचून शोधाशोध करायला लागेल आणखीन.

नेचर व्हॅलीच्या बर्‍याच बार मध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सीरप बार जास्ती दिवस टिकावा म्हणुन घालतात अस ऐकलय. त्यांचे "रोस्टेड अलमंड" व "हनी ओट" चांगले असतात. त्यात नाहीये हाय फ्रुक्टोज...

तसंच क्लिफ बार नावाचे बार मस्त आहेत, पण जरा महाग आहेत...त्याचे इन्ग्रेडीयंट बाकी बारपेक्षा खुपच पौष्टीक आणि नॅचरल वाटले. प्रोटीन, फायबर कंटेंटपण जास्त आहेत तसच शुगरही बर्‍यापैकी आहे त्यात.
http://www.clifbar.com/

थोडक्यात बार खाण्यापेक्षा शक्य झाल्यास एखाद पीच / हिरव सफरचंद खाव हे वैयक्तिक मत!

सगळे ग्रॅनोला बार, स्नॅक्स बार, प्रोटीन बार 'बंडल आणि बेकार' असतात अशी माझी पाचकतज्ञ डॉक्टर (जी बोलताना खूपच फटकळ आहे) तीने सांगितले. हे उत्तर 'ब्रेकफास्टला पर्याय होवु शकतो का' प्रश्णाचे आहे असे समजा. Happy

(बंडल व बेकार ठिकाणी हिंदी शब्द घाला(डॉक्टरीण हिंदी भाषिक होती) तुमच्या आवडीचा जो फटकळ शब्द असे तुम्हाला वाटतो तो. मी मराठीत माझ्या मते मायबोलीवरील नवीन कायद्यानुसार जे शब्द योग्य वाटले ते घातले वरती ज्याने कुणाच्या भावना सहजासहजी दुखणार नाहीत.). Proud

डीजे ल अनुमोदन. मी पण इथे तेच लिहायला आले होते. मी तुम्च्याजागी अस्ते तर सिरियल बार मध्ये कॉर्न सिरप आहे का?, साखर किती ग्रॅम आहे, फायबर किती आहे असा सर्व विचार करेन. तुका म्हणे त्यात्ल्या त्यात, कॉस्टको मध्ये कधितरी मिळतात ते मी आणते(नेमकं नाव आठवत नाहिये, बहुदा वंडर बार असावं, लोकली मेड इन डॅलस). त्यात नो अ‍ॅडेड शुगर, नो कलर, नो प्रिसर्वेटीव, नो हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप असं नक्की लिहिलेलं असतं.

३. नुसताच एक सिरिअल बार, १ ग्रॅनोला बार किंवा 3/4 th वाटी सिरिअल with skim milk एवढ्या पोरशन नी पोटभर खाण्याचं समाधानही होत नाही >>>>> अगदी खरं.. माझं पण अज्जिब्बात पोट भरत नाही काही नाश्ता केलाय असं वाटतंच नाही. याउलट पोहे, उपमा, दुध्-साखर पोहे, खिचडी कसं दमदमीत होतं
सिरीअल अजून कशाबरोबर खावे का? म्हणजे अ‍ॅडीशनल ब्राऊन ब्रेड वगैरे मगच पोट भरेल Happy

कधी कधी खायला म्हणून बरा वाटतो. बर्‍याच बार्स मध्ये साखर खुप असते त्यामुळे मी टाळतो खायचं सहसा. ब्रेकफास्ट म्हणून एक पुरणार नाही आणि एक पेक्षा जास्त खाऊ शकणार नाही किंवा खाऊ नये.

ग्रेनोला बार घरी बनवले -हनी,व्हीटजर्म्,ड्रायफ्रुट्,सगळे पौष्टीक पदार्थ..नेट वरुन रेसिपी घेतली होती..बेक केले..चवीला खुप छान झाले..पण साखर कमी घातली..[मध घातला होता ना] तर वडी जमली नाही..शेवटी लाडु-पेढा सारखे वळले..गोडपणा आतपर्यन्त मुरत नाही..कस्पटासारखे लागले..शेवटी निर्णय हा कि आपला नाश्ता उत्तम..

Dज्जे शी सहमत.
इतकी शुगर खपवायची तर किती माईल्स पळावं लागेल त्यापेक्षा कधीतरी खाल्लेलं बरं.
इथे चांगली माहीती दिली आहे. http://www.paddling.net/guidelines/showArticle.html?226