नमस्कार मित्रांनो...
काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..
इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...
आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?
*************************************************************************************************************
ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.
त्यापेक्षा अजून एक चांगला
त्यापेक्षा अजून एक चांगला उपाय म्हणजे लिहायचेच नाही... कसे...>>>
भटक्या - हे म्हणजे रोगापेक्षा ईलाज जालिम ..
ललिता-प्रीति - ताबडतोब कारवाई करा.
लले, लोकमतने हे प्रिंट मधे
लले, लोकमतने हे प्रिंट मधे केलेले आहे तर तू त्यावर त्यांना एक रजि एडी पत्र पाठवून दे. निदान उत्तरात किती निर्लज्जपणा करतायत ते तरी कळेल. आणि उत्तरच दिले नाही तर तुझ्या ब्लॉगवर आणि शक्य तिथे दवंडी पिटून घे.
दवंडी मी पिटलीय ऑलरेडी २
दवंडी मी पिटलीय ऑलरेडी २ दिवसांपूर्वी फेसबुकवर...
लोकमतचे कॉन्टॅक्ट डिल्टेल्स मिळत नाहीयेत मला की जिथून काही उत्तराची अपेक्षा करता येईल
थांब मी बघतो लोकमतचे
थांब मी बघतो लोकमतचे कॉन्टॅक्ट डिल्टेल्स
प्रीती, फेसबुकावर श्री. विवेक
प्रीती,
फेसबुकावर श्री. विवेक गिरधारी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार नोंदव. ते लोकमतचे संपादक आहेत, आणि ऑनलाइन आवृत्तीचं कामही सध्या तेच बघतात.
चिन्मय, माहितीबद्दल अनेक
चिन्मय, माहितीबद्दल अनेक आभार.
श्री. गिरधारी यांच्याशी लगेच संपर्क साधते.
एखाद्या लेखाचे वेगळ्या भाषेत
एखाद्या लेखाचे वेगळ्या भाषेत भाषांतर करून ते प्रसिद्ध केले तर चालते का ?
मी माझ्या ब्लॉगवर शंकराचार्यांचे चरित्र मराठीमधे भाषांतरीत केले आहे.
त्यामधे सुरूवातीलाच हे नमुद केले आहे की हे माझे नसुन इंग्रजी वेबसाईटवरून घेऊन
मराठीत भाषांतर केले आहे.
मी त्या वेबसाईटला संपर्कातुन विचारले होते की असे करू का ? पण काहीच उत्तर आले नाही.
मग भाषांतर करून टाकले. अर्थात मी माझ्या ब्लॉगवर कोणत्याही जाहिराती ठेवलेल्या नाहीत की
कोणत्याही प्रकारे आर्थिक उलाढाली करत नाही. तर असे करणे योग्य की अयोग्य ?
(मराठीमधे शंकराचार्य चरित्र जालावर उपलब्ध नव्हते म्हणून हा खटाटोप.)
मला वाटतंय आपण तिथे योग्य ते
मला वाटतंय आपण तिथे योग्य ते संदर्भ आणि मूळ लेखकाला श्रेय दिलेले असेल तर हरकत नसावी. ही चोरी म्हणता येणार नाही..
प.भ. धन्यवाद ! पुढे अजुनही
प.भ. धन्यवाद !
पुढे अजुनही काही चरित्रे मराठीमधे लिहिण्याचा मानस आहे. पाहू कसे जमते.
आत्ताच वर्षा_म कडून कळले
आत्ताच वर्षा_म कडून कळले म्हणून "http://nagarcity.com/pp7.asp"" इथे जाऊन बघितले. इथे माझ्या "छोट्यांच्या दुनियेत" ह्या ब्लॉगवरच्या आणि माबोवरही टाकलेल्या बालकवितांपैकी जवळ जवळ सगळ्याच कविता माझ्या नावाशिवाय दिसल्या
त्याशिवाय स्मिता गद्रेची एक माबोवरची कविता, वर्षा_म च्या दोन कविता ह्या देखील त्यांच्या नावाशिवाय दिसल्या
तिथे संपर्कातून इमेल करतेच आहे, अजून काही करता येऊ शकतं का?
scribd var asha settings
scribd var asha settings dilelya aahet jyamule blog kunalahi copy kinwa download karata yet nahi. matr kunihi to blog itar sitesvar share karu shakato. share hotana blog aapalya mhanje lekhkachya navasah share hoto.
कविता, http://nagarcity.com/r
कविता,
http://nagarcity.com/registration.aspx
इथे रजिस्टर करुन
My comment या सेक्शन मधे कमेंटपण लिही.
मी पण तिथे कमेंट टाकली आहे रेजिस्टर करुन पण ती पब्लिश झाली नाहिये अजुन
धन्स सावली, मी रजिस्टर करुन
धन्स सावली, मी रजिस्टर करुन कमेंट पोस्ट केलेय पण अजून दिसत नाहीये. रजिस्टर करताना sachin@nagarcity.com हा आयडी कळलाय (रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनच्या इमेल मुळे) तिथेही इमेल करतेय.
डॉ. सुनिल तुम्ही scribd बद्दल अधिक माहिती देऊ शकाल का जेणेकरुन त्याचा वापर करुन ह्या गोष्टीला आळा घालता येऊ शकेल थोड्याफार प्रमाणात.
महेश, परवानगीशिवाय भाषांतर
महेश,
परवानगीशिवाय भाषांतर प्रसिद्ध करता येत नाही. पैसे मिळवत आहात किंवा नाही, याला महत्त्व नाही, कारण तुमचा ब्लॉग अभ्यासाशी संबंधित नाही.
हे पण नशिब फोटोंवरचे वॉमा
हे पण
नशिब फोटोंवरचे वॉमा काढले नाहीत
http://kavyanil.blogspot.com/2011/04/blog-post_25.html
सह्याद्रीचा दुर्गभांडार
Written by sureshinde
http://dnyanu.blogspot.com/
योगेश तिथे प्रतिसाद दिलास
योगेश तिथे प्रतिसाद दिलास का?
मी पण देते
प्रतिसाद देण्याचा प्रयत्न
प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय पण तो पब्लिश होत नाहिये.
मी तिन्ही ठिकाणी दिला
मी तिन्ही ठिकाणी दिला आहे.
तुझ्या लेखाची लिंकही दिली आहे
जिप्सी, मी ही दिलाय तिथे
जिप्सी, मी ही दिलाय तिथे प्रतिसाद.
आडो तुझ्या प्रतिसादापुढे माझा
आडो तुझ्या प्रतिसादापुढे माझा एकदम बुळा प्रतिसाद दिसतोय
sureshinde said: June 16,
sureshinde said: June 16, 2011 at 11:08 00 iRate This
हे सगळे लिखाण आणि चित्रे मला विद्युत-पत्रकाद्वारे प्राप्त झाली होती. मला हि कोठे उपलब्ध आहेत हेही माहित न्हवते मी फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे लिखाण येथे प्रसिद्ध केले होते माझा यामध्ये काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही.
तरीही आपल्या विनंतीनुसार हे लिखाण येथून काढून टाकत आहे.https://sureshinde.wordpress.com/wp-admin/edit-comments.php?comment_stat...
धन्यवाद !!!
कळावे आपला,
सुरेश शिंदे.
अगं ह्या लोकांना सरळ शब्दांत
अगं ह्या लोकांना सरळ शब्दांत प्रतिसाद देऊन काहीच उपयोग नाही, शिव्या घालूनही त्यांना फरक पडणार नाहीच म्हणा. पहले तो चोरी.....असंच खाक्या असतो त्यांचा.
सुरेश शिंदे यांनी काढणार असे
सुरेश शिंदे यांनी काढणार असे लिहिले आहे. अजुन काढले नाही.
प्लिज फॉलोअप करा.
सावली, मला पेज दिसत नाहीये
सावली, मला पेज दिसत नाहीये पण.
ओके काढले आहे बहुतेक म्हणजे.
ओके काढले आहे बहुतेक म्हणजे.
बाकी तिसर्याही ब्लॉगरला
बाकी तिसर्याही ब्लॉगरला शिव्या घालून आलेच आहे.
मला एक प्रश्न आहे, योगेश तुझे लिखाण/फोटो या ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहे हे तुला कसं कळलं?
सावली, तुझी आणि माझी कोणाचीच
सावली, तुझी आणि माझी कोणाचीच कमेंट त्या नगर्.कॉम साईट वर प्रसिद्ध झाली नाहीये अजून.
माझ्या इमेलला पण रि नाही आलाय, फोन नंबर जे मिळालेत ते स्विच्ड ऑफ आहेत.
धन्स सावली, आडो पण, माझा
धन्स सावली, आडो
पण, माझा प्रतिसाद का नाही जात आहे.
योगेश तुझे लिखाण/फोटो या ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहे हे तुला कसं कळलं?>>>>आडो, माझ्या मित्राने मला सांगितले कि एकाने सदर साहित्य ब्लॉगवर टाकले आहेत, पण तुझ्या नावासहित. त्याने त्याची लिंकही मला पाठवली.
नंतर मी माझ्याच लिखाणातले काहि शब्द/वाक्ये "गुगल इमेज"वर सर्च (उदा. दुर्गपुष्प, आयुष्यावर बोलु काही इ. ) केले असता हे सगळं मिळालं.
कविता काहीच उपाय नाहीये. वाट
कविता काहीच उपाय नाहीये. वाट बघुयात अजुन.
कवे, इतक्यात रि येणार नाही...
कवे, इतक्यात रि येणार नाही... कमीतकमी ८-१० दिवस तरी धरून चाल. त्यातही तुला २-३दा त्यांना आठवण करून द्यावी लागेलच!
Pages