एक चिऊताई रुसली
झाडावर जाऊन बसली,
तिकडुन आली खारुताई
म्हणाली चल खेळू काही,
चिऊताईने फिरवली मान,
खारूताईचा केला अपमान,
मग आले ससोबाभाऊ
चिऊला म्हणे खातेस का खाऊ?
हातात पाहुन गाजर मुळा
चिऊ म्हणाली "चल वेडाखुळा",
येऊन म्हणाली कोकिळराणी
गाऊ का गीत, माझि गोड वाणी,
नाक फेंदारून चिऊताई म्हणे
मला नाय आवडत रागदारी गाणी,
राघुदादा मैनाताई घारूताई आले
सगळे येऊन रुसवा काढुन गेले,
चिऊताई तरी ढीम्मच राहिली
गाल मात्र तिचे जास्तच फुगले,
झाडावर होती एक मनीमाऊ
चिऊला म्हणाली ताई मी येऊ?
मनीमाऊला पाहून घाबरली चिऊ
म्हणाली," माऊ आता घरीच जाऊ".
छान
छान
धन्यवाद.जुनी कविता वर आली.
धन्यवाद.जुनी कविता वर आली.
सही माझ्या पोरीला आजच वाचून
सही
माझ्या पोरीला आजच वाचून दाखवतो.
मस्ताय
मस्ताय
म्हणाली माऊ आता घरीच जाऊ ही
म्हणाली माऊ आता घरीच जाऊ
ही शेवटची ओळ "म्हणाली चिऊ आता घरीच जाऊ"
अशी हवी होती का ?
महेश चिऊ माऊला पाहून घाबरली
महेश चिऊ माऊला पाहून घाबरली आणि म्हणाली,"माऊ आता तू येऊ नको, आपण घरीच जाऊ."
म्हणजे मला असं म्हणायच आहे. मी सुधारणा केली आहे तरी पुन्हा काही असल्यास सांगणे.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
ओह सॉरी, आत्ता कळाले, धन्यवाद
ओह सॉरी, आत्ता कळाले, धन्यवाद
मी नाही ह घाबरले... माउ तर
मी नाही ह घाबरले... माउ तर माझी मैत्रीण आहे..
अरे वाह छान है...मस्त!!!
अरे वाह छान है...मस्त!!!
सुरेखा, कविता खुपच आवडली.
सुरेखा, कविता खुपच आवडली.
झाडावर होती एक मनीमाऊ चिऊला
झाडावर होती एक मनीमाऊ
चिऊला म्हणाली ताई मी येऊ?
मनीमाऊला पाहून घाबरली चिऊ
म्हणाली," माऊ आता घरीच जाऊ".>>>>>
झाडावर होती एक मनीमाऊ
चिऊला म्हणाली ताई मी येऊ?
मनीमाऊला पाहून म्हणाली चिऊ
नको ग बाई,तू जा इथून पाहू.
विभाग्रज तुमच्या ओळी छान
विभाग्रज तुमच्या ओळी छान आहेत. पण माझी चिऊताई रुसली आहे. तिची सगळ्यानी समजूत
घातली तरी ती घरात जायला तयार नाही. पण मनीमाऊला पाहून ती पार घाबरली आहे. म्हणून ती
घाईघाईने म्हणते आहे. नको मनीमाऊ आता आपण आपले घरीच जाऊ.
सुहासिनी सत्यजीत मनःपूर्वक
सुहासिनी सत्यजीत मनःपूर्वक आभार.