तळण्यासाठी :
कडकड्या च्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
मिठ
तेल
लसुण पाकळ्या (ऑप्शनल) ठेचुन
कालवणासाठी
तुकड्या४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
मिठ
चिंचेचा कोळ
वाटण (ऑप्शनल) : पाव वाटी ओल खोबर, आल, लसुण, कोथिंबिर, १-२ मिरच्या सर्व बारीक वाटून.
चेंज म्हणून थोडा कढीपत्ता, पुदीनाही घालु शकता त्यामुळे रोजच्यापेक्षा थोडी वेगळी चव येते रश्याला
तळण्यासाठी :
तेल सोडून तळण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र तुकड्यांना कालवुन घ्या. तवा गॅसवर चांगला गरम करा. तवा जर निट तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. मग तव्यात तेल सोडून हव्या असल्यास लसुण पाकळ्या टाकुन त्या बाजुला सारुन तुकड्या सोडा. हात सांभाळा तेल कधी कधी पटकन तुकडीतल्या पाण्यामुळे सरसर करत उडत. पाच मिनीटांनी तुकड्या उलटून दुसर्या बाजुने तळा. गॅस बंद करुन त्यातली एक तुकडी जेवण्याच्या आधीच मटकवा (तळे राखी तो पाणी चाखे ह्या म्हणीप्रमाणे) ही चव जेवणातल्या तुकडीपेक्षा भारी असते.
कालवण :
भांड गॅसवर ठेउन त्यात तेलावर लसूणाची खमंग फोडणी द्या. आता त्या तेलावर हिंग, हळद, मसाला घालुण वाटण, चिंचेचा कोळ, तुकड्या घाला. मग मिठ घाला. ५-७ मिनीटे उकळू द्या. मग गॅस बंद करा.
कडकड्या च्या नावाप्रमाडे तो काही कडक किंवा कडाकड आवाज करणारा नसतो. साधारण रावस, घोळीच्या जातितलाच हा मासा. ह्याला खवले असतात. नेहमीप्रमाणेच डोके आणि शेपटाकडचा भाग कालवणासाठी वापरावा व मधला भाग तळण्यासाठी.
जर जास्त लोक असतील जेवण्यासाठी तर वाटण वापरल्याने रस्सा जास्त होतो.
स्वाती कॅट्फिश म्हणजे कोणता
स्वाती कॅट्फिश म्हणजे कोणता मासा ?
साधनाला अनुमोदन. प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. मला तळलेला बोंबिल जास्त आवडतो.
जागु, कॅटफिश म्हणजे शिंगाडा.
जागु, कॅटफिश म्हणजे शिंगाडा. आमच्या इथे लेंट मुळे मासे खूप महाग होते. आता इस्टर झाला तेव्हा जरा दर उतरले.
कॅटफिश म्हणजे कोकणात
कॅटफिश म्हणजे कोकणात 'शेंगाळो' किंवा 'शेंगटी' म्हणतात. याला मिश्या असतात म्हणून नांव पडले असावे..
मी कडकड्या हे नांव ऐकले नव्हते.. कोकणा 'दोडकारे' म्हणतात तसा दिसतो हा मासा...
जागू.. लगे रहो..
जागुताई.. एकदम खल्लास.. नेमका
जागुताई.. एकदम खल्लास.. नेमका बुधवारीच पोस्टलास त्यामुळे तोंडाला जरा जास्तच पाणि सुटलेय..
पण अहय दैवा आज जौन फक्त मांदेलीच्या रस्श्यावरच भागवायचे आहे.. 

मी पहिली कष्टमर हॉटेलची..
जागू बर झालजेवायच्या आधी
जागू बर झालजेवायच्या आधी पाहिल ते निदान त्यामूळे तरी दोन घास जास्त जातील.
भारीये (फोटो)
भारीये (फोटो)
स्वाती अच्छा शिंगाडा
स्वाती अच्छा शिंगाडा काय!
परदेसाई, रुपाली, विजय, सिंडरेला धन्यवाद.
जागु आत्ताच तुझे मास्यांवरचे
जागु आत्ताच तुझे मास्यांवरचे सर्व लेख वाचले, तोंपासु
कालच सुरमई खाऊन सुद्धा आता परत मासे खावेसे वाटतात....
आपण एक मासेखाऊ गटग करायला पाहीजे....
जागुतै.. मासे गटग मी भारतात
जागुतै.. मासे गटग मी भारतात आल्याशिवाय करायचा नै बर्का
फोटू गायब.
फोटू गायब.
जागू,हे कुपा मासे आहेत का?
जागू,हे कुपा मासे आहेत का? कोळणीकडे असा मासा पाहिला होता.
मला तळलेला बोंबिल जास्त आवडतो.... +१. शिवाय कोलंबी,पापलेट.
वल्लरी फोटो प्रतिसादात
वल्लरी फोटो प्रतिसादात आहे.
देवकी कुपा टाकेन नंतर तो वेगळा असतो.
Ha maasaa mhanje tuna ka.
Ha maasaa mhanje tuna ka. Nasel tar tuna kasa banvava. Jagu rcp de na
>>सगळ्यांची सरासरी काढली
>>सगळ्यांची सरासरी काढली म्हणजे आपल्याला चविष्ठ मासा कुठला ते कळेल.<<
घरी कर्ली, मांदेली यांची चवीच्या बाबतीत खुप किर्ती ऐकतो, पण त्या दोघांमध्ये भरपुर काटे (मांदेलीत एकच्, पण किती छोटा तो मासा!) अस्ल्याने दोन्हि माझ्या लिस्ट मध्ये नाहित. माझा फेवरेट बांगडा, तो हि तळलेला शेपटीकडचा. खायला सोप्पा आणि चवीला बेस्ट!
वेल मी गुगलवर सर्च केल तर
वेल मी गुगलवर सर्च केल तर टुना माशाची इमेज कुपा माशाची आहे. कुपा मासा इतर नॉर्मल माशांसारखाच करतात. सुरमई बघ. सुरमई सारखाच करतात. कोळणी तर सुरमई सांगुन कुपा देऊन फसवतात कोळणी नवख्यांना.
मी लिहीली होती कुपा ची रेसिपी अस वाटत पण मलाच मिळत नाही आता.
राज मला घोळ जास्त आवडते. विशेषकरून घोळीचे कालवण. तशी तिला फारशी चव नसते तरी पण आवडते. कर्ली खरच चविष्ट असते. पण काटे भरपूर असतात.
Pages