Submitted by अवल on 26 April, 2011 - 04:12
माझ्याकडे एका जाहिरातीच्या भाषांतराचे काम येउ घातलेय. त्यांनी काय चार्जेस घ्याल असं विचारलय. मला या अशा स्वरुपाच्या कामाचे काय चार्जेस असतात काहिच माहिती नाही . कोणी सांगू शकाल? मला साधारण अंदाज दिला तरी चालेल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
अवल, मी पूर्वी फ्रेंचमधून
अवल,
मी पूर्वी फ्रेंचमधून इंग्रजीत भाषांतर करायचो तेव्हा एका शब्दाचा दीड रुपया घेत असे (तांत्रिक माहितीपत्रकांसाठीचा हा चार वर्षांपूर्वीचा दर आहे). या कशाप्रकारच्या जाहिराती आहेत, भावानुवाद करायचा आहे का, त्यानुसार तुम्हांला दर ठरवता येईल.
परदेशातून असेल तर १ युरो पर
परदेशातून असेल तर १ युरो पर लाइन ऑफ ट्रान्सलेटेड टेक्स्ट. भारतात काम असेल तर व्हॉल्युम वर आहे. किती पानी टेक्स्ट आहे? प्रत्येक ए फोर साइज टेक्स्ट ला ५०० रु. तर कमीत कमी चार्ज करावेत. जास्त सुद्धा.
क्लायंट कोण आहे. टाटा रिलायनस किंवा चांगल्या एजन्सीज बरा पैसा देतात. तो नक्की घ्यावा
If you already done such type
If you already done such type of translations then with rough estimation (man hours) can charge them as below
1. Estimated Hours x Your Hourly Rate = base value
2. Base Value + 10% of base value (marginal estimation variation) + as per your project requirement spetial tool cost
If you are suppose to get one time job then 2 should be proposed
And if its possible to get continous work from the client then 1 should be proposed.
हे सगळ मराठीत लिहीने अवघड होत .....
बरोबर. भावानुवादात जास्त
बरोबर. भावानुवादात जास्त चार्ज करायला स्कोप आहे कारण त्यात तुमच्या क्रिएटिविटीचा संबंध आहे. जर रेग्युलर काम असेल तर महिन्याचे रिटेनर शिप निगोशिएट करावे त्यात जास्त फायदा आहे.
अरे बापरे ! इतके चार्जेस
अरे बापरे ! इतके चार्जेस असतील असं अजिबात इमॅजिन केलं नव्हतं मी !

धन्स चिनुक्स अन अश्विनीमामी.
बरं तर बरं मी "विचार करून सांगते" म्हणाले. नाही तर तसच देणार होते- फुकट...
आता नीट विचारते त्यांना, काय अन किती मजकूर ते...
आहेत इथलेच पुण्यातले एक... अगदी थोडी ओळख आहे,
पण "ओळखीचा चोर..." अशी आपली गत होऊ द्यायची नाही असं वाटलं म्हणून इथे विचारायचं मनात आलं.
मनापासून धन्यावाद
अन हो भावानुवादच अपेक्षित आहे
अन हो भावानुवादच अपेक्षित आहे त्यांना, बघूयात काय होतय ते
धन्यवाद सुशांत !
आरती, मी पण केलय
आरती, मी पण केलय ट्रान्सलेशनचं काम..५- ६ वर्षांपुर्वी! ट्रान्सलेटर्स कॅफेला रजिस्टर्ड पण आहे मी!
इंग्लीश टु मराठी.. एका शब्दाचा दीड रुपया! एज्युकेशनल सीडीज साठी ऑनलाईन ट्रान्सलेशनचं काम होतं!
नाही तर तसच देणार होते-
नाही तर तसच देणार होते- फुकट..>>फुकट? एक शब्द फुकट द्यायचा नाही. सुईच्या अग्रावर बसेल इतके शब्द पण नाही.
फुकट देऊ नकोस कुठलंही काम
फुकट देऊ नकोस कुठलंही काम नाहीतर माझ्यासारखी गत होईल. मोगर्याचा वास फक्त...
धन्स आर्या! अमा, नीधप
धन्स आर्या!
अमा, नीधप
फुकट? एक शब्द फुकट द्यायचा
फुकट? एक शब्द फुकट द्यायचा नाही. सुईच्या अग्रावर बसेल इतके शब्द पण नाही. >> अ. मामी प्रचंSSSSSSSSSSSSSSSड अनुमोदन!
फुकट देऊ नकोस कुठलंही काम नाहीतर माझ्यासारखी गत होईल. मोगर्याचा वास फक्त... >> नीधप
अवल, एकदा फुकट दिलस की या फुकटचंदांना सवय लागते... ओळखीच्या नावाखाली! आणि हे स्वतः आपल्या क्रियेटिविटीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी करणार!!!
मला एक विचारायचं होतं ट्रान्स्लेशन करताना तुम्ही मराठी टाईप करून मेल करता की कागदी हार्ड कॉपी? मी सहा महीन्यांपूर्वी करायचे मुंबईमध्ये... ट्रान्स्लेशन + टायपिंग + प्रूफ रिडींग = १ A4 पानाला १००/- ! २-४ पानं असायची....२ दिवसांत द्यायचं.
मला खूप कमी वाटले, म्हणून मी बंद केलं आता...
नाही तर तसच देणार होते-
नाही तर तसच देणार होते- फुकट.
>>> If you are good at something , never do it for free -- पपु जोकर महाराज
एक भा.प्र. ट्रान्सलेटर
एक भा.प्र. ट्रान्सलेटर होण्यासाठी म्हनजे इंग्लिश टू मराठी साठी काही डिग्री किंवा सेर्टिफिकेट असावे लागते का?
मी पण मागे मराठीतून इंग्रजी
मी पण मागे मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी अशी भाषांतरे केली आहेत आणि करून घेतली पण आहेत. मी माझ्या प्रोजेक्टचा भाग म्हणून भाषांतर केली होती त्यामूळे त्यासाठी वेगळे चार्जेस लावले नव्हते. २ वर्षांपूर्वी साधारणतः २००० रु प्रतिदिन आणि ५ तासांचा एक दिवस ह्या रेटने काम केलं होतं.
३ वर्षांपूर्वी ज्यावेळी मी भाषांतर करून घेतलं होतं त्यावेळी १ रुपया प्रतिशब्द रेट होता इथे. यात भाषांतर, टायपिंग आणि प्रुफ रिडिंग तिन्ही असायचं.
अवल, चुकूनही फुकट काम करू नका. काम झाल्याबरोबर क्लायंटनी बिल द्या असं सांगायची वाट न बघता सरळ बिल पाठवून द्या. नाहीतर आपलं काम झालं की क्लायंट आपल्याला, बिलाला विसरून जातो, स्वतःहून बिल पाठवा असं कोणीही म्हणत नाही. बिल पाठवल्यावर पण काँट्रॅक्टमध्ये दिलेल्या कालावधीत पेमेंट मिळालं नाही तर सारखा फॉलोअप करा. आपल्या मेहनतीचे पैसे मागायला लाज वाटू नये.
हे सगळं तिन वर्ष फ्रिलांसिंग केल्यामूळे शिकलेलं शहाणपण आहे. या वरच्या बिल लगेच न पाठवणे, एकच पेज तर आहे म्हणून फुकटात काम करून देणे, पेमेंटसाठी फॉलोअप न करणे यासारख्या चुका मीसुद्धा सुरवातीला केल्या आहेत.
स्वप्ना, मला नाही वाटत काही वेगळी डिग्री असायची गरज असेल. तुमच्या दोन्ही भाषांवरच्या प्रभुत्वावर अवलंबून असतं हे काम.
स्वप्ना, नाही गं, मी तरी काही
स्वप्ना, नाही गं, मी तरी काही कोर्स वगैरे केला नाहीये. दोन्ही भाषा बर्या येतात असं वाटलं लोकांना की झालं

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो ! आता शहाण्यासारखी वागेन
आर्या, ट्रान्स्लेटर्स कॅफेला
आर्या, ट्रान्स्लेटर्स कॅफेला रेजिस्टर करून काम नक्की मिळतं का? काय प्रोसिजर आहे? काम करून दिल्यास मोबदला मिळण्याची गॅरेंटी असते का? ओळखीतून काम करून दिलं की सहा सहा महीने पैसे देतच नाहीत... खूप फॉलो अप करावं लागतं... ट्रान्सलेशनचं काम मिळण्यासाठी कुठल्या साईटस किंवा काही सोर्स आहे का?
सध्याचा प्रति श्ब्द रेट काय आहे कोणाला काही कल्पना आहे का?
तुम्ही एखाद्या जाहीरात एजन्सी
तुम्ही एखाद्या जाहीरात एजन्सी कडे जा. मी तुम्हाला असं असं काम देणार आहे.. काय चार्जेस घेणार असं विचारा.