Submitted by समु on 25 April, 2011 - 07:17
मे महिन्याच्या सुट्टीत नेपाळला जाण्याचा विचार आहे. भारतातुन नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट लागत नाही हे बरोबर आहे का? रेल्वेने भारतातुन नेपाळ ला जाता येत का? तसेच तीथले हॉटेल्स, प्रवास साधने, खर्च, प्रेक्षणिय स्थळे वगैरे माहिती आणि तिथे गेल्यानंतर मदत हवी आहे. कुणी सांगू शकेल काय?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
yetana shaal gheun yaa...
yetana shaal gheun yaa...
पूर्वी पासपोर्ट लागत नसे..
पूर्वी पासपोर्ट लागत नसे.. सध्या नवीन नियम बघावे लागतील...
रेल्वेची सोय माझ्या माहितीत तरी नाही... वाराणसीहून काठमांडूला विमानानी जाता येते.. किंवा गंगटोकहून बसनेही जाता येते... (साधारण १२ तास लागतात).. अजूनही काही ठिकाणांहून जाता येत असेल..
मी सुमारे १८ वर्षांपूर्वी जाताना गंगटोक - काठमांडू बसने आणि येताना गंगटोक वाराणसी विमानाने असे केले होते..
पोखरा व्हॅली, काठमांडू शहर, पशुपतीनाथ मंदीर, तिथल्या काही मॉनेस्ट्री बघण्यासारख्या आहेत..
दिल्ली काठमांडू विमान सगळ्यात
दिल्ली काठमांडू विमान सगळ्यात सोयीचे राहील.
नाहीतर *तुमच्या गावापासून वाराणसी पर्यंत ट्रेन असेल तर वाराणसीला उतरून तिथून गोरखपूरला बस ने जा. तिथून नेपाळला जाणार्या बसेस, टॅक्सी मिळतात. (गोरखपूर हून साधारण ३-४ तास.) या बसेस, टॅक्सी बहुतेक तरी नेपाळ मधल्या त्यांच्या बॉर्डर वरच्या गावां पर्यंत असतात. तिथून काठमांडूला जायला वेगळी बस घ्यावी लागते.*
पासपोर्ट लागत नाही पण व्होटर्स आयडी कार्ड घेवून जा.
* वाराणसी > गोरखपूर> भैरहवा (नेपाळ बोर्डरवरचे एक गाव) > काठमांडू या प्रवासाची मी वर लिहिलेली माहिती साधारण २३ वर्षांपुर्विची आहे. शाळेच्या ट्रीप बरोबर हा असा प्रवास केलेला तेव्हा. पण अजुनही या रूट ने जाता येते. एक परिचीत असे गेलेले ४-५ वर्षांपूर्वी.
बसने जायचे असल्यास पासपोर्ट
बसने जायचे असल्यास पासपोर्ट लागत नाही पण विमान प्रवास असेल तर पासपोर्ट असने आवश्यक आहे..

तसेच जेवणाची सोय वगैरे आधीच बघुन ठेवा ती लोक फक्त आणी फक्त भात हेच खाद्य खातात
नाश्ता = भात
दुपारचे जेवण = भात
रात्रीचे जेवण = भात
बाकी ट्रीप साठी शुभेछा
बसने जायचे असल्यास पासपोर्ट
बसने जायचे असल्यास पासपोर्ट लागत नाही पण विमान प्रवास असेल तर पासपोर्ट असने आवश्यक आहे.. >> आवळा हे नविन आहे का? विमानासाठी पण पुर्वी नव्हता लागत पासपोर्ट. व्होटर्स कार्ड चालायचे.
वा वा माहिती बद्दल आभार मी
वा वा माहिती बद्दल आभार
मी काही दिवसां/महिन्यां पुर्वी "अगले जनम मोहे बिटीया न किजो" अश्या नावाच्या मालीकेत बघीतलेल, ते दोघ (हिरो, हिरवण) नेपाळला पळुन जातात रेल्वेने लग्न करायला तेव्हा पासुन वाटतय नेपाळला जाव, पासपोर्ट शीवाय जाता येत मग एक दुसरा देश पहाण्याचा आनंद का घेऊ नये.
मला भात आवडतो पण माहिती बद्दल आभार
...
सगळ्यांचे आभार.. माहिती वाचुन हुरुप वाढला जायचा
नेपाळला रेल्वे, बसने
नेपाळला रेल्वे, बसने महाराष्ट्रातुन जायच म्हणजे लई लांबचा पल्ला वाटतोय. आता आधी पुण/मुंबई वरुन गोरखपुरल कस पोहचायच ह्याची डिटेल माहिती जाणकार/अनुभवीं कडुन घ्यावी लागेल
कुणी दिल्यास मदत व्हईल. 
Frequently Asked Questions:
Frequently Asked Questions: Travelling to Nepal
Visa and Immigration
---------------------------------------------
Do I need a visa to enter Nepal?
All foreign nationals, except Indian Citizens, need visas to enter Nepal
(Source: http://www.nepalhomepage.com/travel/faq/FAQvisa.html)
@ HH, व्होटर्स आयडी कार्ड
@ HH,
व्होटर्स आयडी कार्ड घेवून जा>>>> हे नाही माझ्याकडे "ड्रायव्हिंग लायसन्स" चालेल का??????
समु ड्रायविंग लायसन्स बद्दल
समु ड्रायविंग लायसन्स बद्दल एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीशी बोलून हे कन्फर्म करा. मला याबद्दल माहित नाही.
भारतीय रेल्वेची साईट आहे तीथे सर्च करा मुंबई गोरखपूर साठी.
@HH माझे मोठे मामा २ वर्ष
@HH माझे मोठे मामा २ वर्ष नेपाळ मधे होते.. पशुपती बिस्कीट्स मधे कामाला.. मुंबई ला त्यांचे स्वता:चे घर आहे त्यामूळे नेहमी ते प्रवास करत म्हणुन माहीती आहे.. अर्थात ही ५-६ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे तेंव्हा त्यांना भारतीय पासपोर्ट असने आवश्यक होते नेपाळ मधे ईमीग्रेश्न साठी नाही ओळखपत्र म्हनुन की तुम्ही कायद्याने भारतीय नागरिक आहात.. पॅन कार्ड आणी निवडणुक ओळखपत्राद्वारे विमानतळावर समाधान होत नाही असा त्यांचा अनुभव आहे.. ड्रायव्हींग लायसन्स चे माहीत नाही..
@ समु रिस्क घ्यायची असेल तर घ्या .. पण मला वाटते असेल पासपोर्ट तर सोबत ठेवायला हरकत नसावी..
जर अगदीच नको वाटत असेल तर निदान झेरॉक्स तरी सोबत ठेवा..
बादवे कुठे कुठे जाणार आहात ह्याची माहिती आधीच घेऊन ठेवा.. आणी सुरक्षीत अश्याच हॉटेल मधे थांबण्याची सोय बघा..
माझे मामा ची जिकडे कंपनी ने व्यवस्था केली होती तिकडे नेपाळ च्या आतंकवादी लोकांनी येऊन हल्ला वगैरे केला होता.. अर्थात त्यावेळेस परिस्थीती खुप वेगळि होती, तेंव्हा नेपाळ च्या राजघराण्यावरच हल्ला झाला होता..
रच्याकने : तिकडे ऐअर टेल चे पण नेटवर्क चालते
सो तो फोन असेल तर न्या म्हणजे आंतरराष्ट्रीय कॉलींग चे टेंशन नाही.. लिगली अलाऊड नाहीये वापरणे पण काठमांडु आनी परिसरातिल लोक सर्रास वापर करतात..
पण फक्त ऐअर टेल चालते बरका