Submitted by भाऊ नमसकर on 22 April, 2011 - 22:55
आता कोकणात सर्वत्र पूल व्हायला लागलेत; ऐलतीर व पैलतीर याची गंमत तडीपार होतेय. तरीची होडी आता मासेमारी करूं लागलीय. माडांच्या बागेतून मुरडत, बागडत तरीकडे धावणारी पायवाट पूलाकडे जाणार्या डांबरी रस्त्याला बुजून अंगावर गवत पांघरून दडत्येय. आठवडा बाजाराच्या दिवशी डोक्यावर टोपल्या घेऊन तरीची आधीची फेरी पकडायला तुरुतुरु धावणार्या बाजारकरणी आता टायमातली येस्टी पकडायला स्टॉपवर ठाण मारतायत. एक वेळ गावच्या इथ्यंभूत माहितीचा संदर्भग्रंथ असणारी व पिढ्यानपिढ्या दिवसरात्र तत्परतेने सेवा देणारी नदीकांठची तरवाली कुटूंबं आपली ओळखच गमावून बसलीयत. तरपर्व संपतय व त्याला तरणोपाय नाहिय; एकंदरीतच, नदीकांठचा 'रोमान्स'भरा संपर्कबिंदूच आता इतिहासजमा होतोय !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
रैना, श्वेतांबरी, हिरकु,
रैना, श्वेतांबरी, हिरकु, दक्षिणा, इंद्रधनुष्य, बेफिकीर,किरू, सचिन, अश्विनी के- माझ्या"हौशी" चित्रकलेच्या कौतुकाबद्दल आभार.
[ किरु, 'नमस', 'नमस' करून माकां असो चिमटे काढत रवां नको ! थंय जाऊंक गावणा नाय म्हणान आधीच माझो जीव उचमाळताहा !! ]
सुर्रेख! लहानपणी गोरेगाव -
सुर्रेख!
लहानपणी गोरेगाव - धरमतर वरचा पूल व्हायच्या आधी तरीतून जावं लागायच. बोर्ली - दिवेआगरला जाताना. लहानपणात घेऊन गेलात भाऊ मला.
भाऊ, नेहमीप्रमाणे
भाऊ, नेहमीप्रमाणे सुंदर.
एखादी सुंदर फोटोफ्रेम पाहतोय असे वाटले.
सुंदर !
सुंदर !
मस्तच
मस्तच
छानच
छानच
मस्त आहे हे भाऊ.
मस्त आहे हे भाऊ.
तारकर्ली हे नांव कर्लीची तर
तारकर्ली हे नांव कर्लीची तर यांवरुन पडलेय कांय? कारण साखरतर, वाडातर वगैरे जसे आहे.. मग कर्लीतर असं कां नाही??
भाऊनूं, १५ दिवसांपूर्वीच गांवावरसून सागरी रस्त्यान इलंय.. आता सगळीकडे पूल झाले असल्याने 'तर' खूप ठिकाणी बंद झालीये. १२ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग समुद्रकिनार्याने ट्रेक केला होता त्यावेळी आचर्याची तर चांगली लक्षात आहे. आता तिथल्या पुलावरुन जातांना मी अक्षरशः गाडी थांबवून खाडीतली जुवी निरखत थांबून राहिलो. पूल सोडला तर सगळं तसंच आहे. पुढे जानशी पुलावरुन डावीकडे दिसणारा विजयदुर्ग खिळवून ठेवतो.
मला पहिली फेरी बोट लागली ती जयगडला. राई-भातगांवचा पूल झाला असला तरी तो रस्ता खराब, निर्जन असल्याने ही बोट परवडते. सुवर्णदुर्ग शिपिंगने या फेरी बोटी ३ ठिकाणी सुरु केल्या आहेत. १. जयगड ते तवसाळ २. धोपावे ते दाभोळ ३. वेशवी ते बागमांडला. तिनही ठिकाणांहून दर तासाला बोट आहे.
जवळपास ८ ते १० गाड्या एका बोटीत मावतात. १५-२० मिनिटांचा प्रवास.. वेळ व गाडीचा घसाराही वाचतो.
गोव्यात व्यक्तींना पैसे घेत नाहीत पण इथे गाडीचा चालक सोडून इतरांचे पैसे भरावे लागतात.
कुणाला आणखीन काही माहिती हवी असल्यास देईन.
<< मग कर्लीतर असं कां नाही??
<< मग कर्लीतर असं कां नाही?? >> कर्ली नदी/खाडीवरच नेवाळी, कर्ली, कोरजाई [तारकर्ली] ते अगदीं वालावल, नेरूरपारपर्यंत [जिथं आतां पूल आहे] अनेक गांवी तर सर्व्हीस होती, त्यामुळें असेल.
<< राई-भातगांवचा पूल झाला असला तरी तो रस्ता खराब, निर्जन असल्याने ही बोट परवडते.>>खरंय. [ अवांतर : भातगांवचा पूल पहायला एकदां मुद्दाम चिपळूणहून एसटीने गेलो होतों. भातगांवच्या ऐलतीरावरचं गांव लक्ष्मीकांत बेर्डेंचं असं तिथं कळलं. तिथले एक दुकानदारही बेर्डेच होते. परतीच्या एसटीला वेळ होता म्हणून त्यानी प्रेमाने दुकानात बसवून घेऊन चहाही पाजला होता ].
Pages