Submitted by mansmi18 on 18 April, 2011 - 11:13
नमस्कार,
पुण्याहुन (बाणेर-बालेवाडी) शनिवार, रविवार, सोमवार (अर्धा दिवस) अशा तीन दिवसात अष्टविनायक करणे शक्य आहे का?
संपुर्ण अंतर किती आहे?
५ जणासाठी स्वतःच्या गाडीने (आय १०) जाणे ठीक का जरा मोठी भाड्याची गाडी (टवेरा इ.) करावी?
बरोबर २ लहान मुले आहेत..तेव्हा आताचा एप्रिल. मे सीझन पेक्षा थंडीच्या दिवसात जाणे बरे होइल का?
मी गाड्यांची इ. चौकशी करणार आहेच पण त्यांच्याशी बोलण्याआधी माहिती असावी म्हणुन म्हटले इथे विचारावे.
आपले अनुभव/मते कृपया शेअर कराल का?
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी तीन दिवसात एसटीने
पूर्वी तीन दिवसात एसटीने अष्टविनायक करायच्या खूप जाहिराती मराठी पेपर्स च्या "यात्रा/सहली" भागात दिसत. तू कोणत्या कंपन्यांना विचारलेस का?
तीन दिवसात होउ शकायला पाहिजे - मोरगाव पासून सुरूवात (आणि सांगता ही) करतात असे ऐकले आहे ते गृहित धरून मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर, मग रांजणगाव, लेण्याद्रि, ओझर, आणि मग पाली, महड असे तीन दिवसांत करता यायला पाहिजे. बहुधा प्रत्येक दिवशी रात्री पुण्यात परत येउन सुद्धा जमेल, कारण प्रत्येक दिवशी तुम्ही वेगळ्या रस्त्याने जाल.
दिवसाला ४ गणपती, अशा तर्हेने
दिवसाला ४ गणपती, अशा तर्हेने २ दिवसांत ही यात्रा तुम्ही करु शकता.
मनस्मी, तुम्ही प्रसन्न
मनस्मी,
तुम्ही प्रसन्न ट्रॅव्हल्सशी संपर्क साधा. ते अष्टविनायक दर्शनासाठी गाड्या उपलब्ध करून देतात. दोन किंवा तीन दिवसांचं त्यांचं पॅकेज असतं. दोन दिवसांत प्रवास करणं मात्र दगदगीचं होतं.
फारेंड तु सांगितलेस ते ठीक
फारेंड तु सांगितलेस ते ठीक पडेल बहुतेक. मी इथल्या संध्याकाळी (US EST सकाळी) प्रमाणे काम करतो.
पाली महड जवळ पडतील. मला ३/४ पर्यंत परत येता येइल.
शैलजा, दोन दिवसात झाले तर चांगले आहे पण बरोबर पोरे असल्याने चिनुक्स च्या म्हणण्याप्रमाणे दगदग होउ शकेल कदाचित.
चिनुक्स, विचारुन पाहतो. सकाळ मधे मिळेल बहुतेक नंबर.
प्रतिसादाबद्द्ल सगळ्यांचे आभार.
मनस्मी, हे बघा -
मनस्मी,
हे बघा - http://jahirati.maayboli.com/node/111
प्रसन्नचा नंबर त्यांच्या संकेतस्थळावर आहे.
फारएण्डनी सांगितलेल्या
फारएण्डनी सांगितलेल्या क्रमानी केल्यास आरामात होईल..
http://www.swayambhushreeganesh.com/swayambhu/avmap.htm - इथे अंतरे दिलेली आहेत.
http://jaimaharashtratourism.blogspot.com/2010/06/ashtavinayaka-temples-... - हा नकाशा चांगला वाटतोय..
हे पण बघा.. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100202064447AA1ucI0
हो नक्कि होते. मी माझी लेक ५
हो नक्कि होते. मी माझी लेक ५ महिन्यांची असताना केले होते. तवेरा बुक करायची आम्ही ५ मोठे लोक्स आणि लेक असे जावुन आलोत.
१ दिवस ४ मग मुक्काम. दुसर्या दिवशी ३. मुक्कामाला पुण्यात.
गाडी मात्र कमी लोक असले तरी मोठी ( आणि भाड्याची म्हणजे दगदग होत नाही).केली त्यामुळे निवांत बसता येते. आणि एखाद्याला झोपताही येते
शुभयात्रा गं.
३ दिवसात अगदी निवांत होईल.
३ दिवसात अगदी निवांत होईल.
सुचना :- १) पाणि भरपुर घरुन घ्या .२) लेण्यांद्री येथे माकडांपासुन बच्चेकंपनी जपुनचं ३) तवेरा वा इनोवा पण एसी चं आणि रेंट चीचं घरची आय १० जागा कमी आन रस्ते खराब त्यामुळ दगदग होणार नक्की. ४) रांजणगांव नंतर परत चाकण आणि नंतर एक्स्प्रेस ने पाली माळ्शेज ने वेळ जास्त जाणार पण निसर्ग झाक्क.
गाडी मात्र कमी लोक असले तरी मोठी>>>>१००%
ऊन्हाळा सहन करण्याची तयारी हवी. शुभेछा ****