Submitted by शैलजा on 18 April, 2011 - 00:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
४ मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो, लहान सुपारीएवढा गूळ. चवीपुरते मीठ.
वाटणासाठी: एक ते दीड वाटी खोबरे ( आमटी किती जाडसर ठेवायची ह्यावर अवलंबून), ३-४ लाल मिरच्या, १ लहान चमचा धणे, १ लहान चमचा हळद.
फोडणीसाठी : हिंग, मोहरी.
क्रमवार पाककृती:
१. टोमॅटोंचे प्रत्येकी ४ तुकडे करुन ते शिजवून घ्यावेत. साल काढून टाकावी.
२. खोबरे, धणे, मिरच्या हलके भाजून घेऊन हळदीसकट मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. वाटतानाच हळद घालावी.
३. हिंग - मोहरीची फोडणी करुन ह्यात टोमॅटोच्या शिजलेल्या फोडी टाकाव्यात व वरुन वाटण घालावे.
४. आमटी कितपत जाड/ पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालावे.
५. उकळी येताना गूळ व चवीपुरते मीठ टाकून, उकळी येताच गॅस बंद करावा.
वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
१.फोडणी करताना कढीपत्ता घालायला हरकत नाही. कढीपत्ता घालताना तो हाताने चुरडून घालावा, म्हणजे मस्त वास येतो
२. हे टोमॅटोचे सार नव्हे.
माहितीचा स्रोत:
पारंपारिक.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शैलजा, छान रेसिपी... आमटी
शैलजा,
टोमॅटोच्या साराची पाकृ यापेक्षा वेगळी असते का?
छान रेसिपी...
आमटी म्हणालिस म्हणून... आमच्याकडे आम्ही टोमॅटोचे सारंच म्हणतो.
हो, वेगळी असते दक्षिणा.
हो, वेगळी असते दक्षिणा.
आम्ही या आमटीत खूप मऊ
आम्ही या आमटीत खूप मऊ शिजवलेली तूर डाळ पण घालतो.
शैलू आमी सार करतो तीच रेसिपी
शैलू आमी सार करतो तीच रेसिपी फक्त गूळ घालनव नाय. कधी तरी बटाटे घालतो.
सार पण असेच बनवतात ना.....
सार पण असेच बनवतात ना.....
सार करताना जिरे वगैरे घालतत
सार करताना जिरे वगैरे घालतत गो, हेच्यात नाय. ही दाटसर असता. सार जरा पातळ. तेतूर नारळाचा दूध घालतत. खोबर्याचो चव नाय घालणव आम्ही. सार गरम, गरम पिऊक मस्त
आम्ही सारामध्ये खोबरंच घालतो
आम्ही सारामध्ये खोबरंच घालतो पण थोडंसंच घालतो आणि गुळ, धणे, मोहरी नाही घालत. सारापेक्षा थोडी वेगळी लागेल चव या आमटीची. भाताबरोबर किंवा खिचडीबरोबर छान लागेल असं वाटतंय.
मी पण तुरडाळ्/मूगडाळ शिजवून
मी पण तुरडाळ्/मूगडाळ शिजवून त्यातच ही आमटी करते.
हे वेगळं वाटतंय. सारात मी खोबरं नाही घालत. भातावर छान लागेल.
आमटी म्हटल्यावर घाईघाईनी आले
आमटी म्हटल्यावर घाईघाईनी आले इकडे....सोप्पी आहे, लगेच करायला हरकत नाही
शैलजा, ह्म्म ही मालवणसाईडची
शैलजा, ह्म्म ही मालवणसाईडची खास टोमॅटो आमटी! माझ्या साबांची कृती काहीशी अशीच आहे. फक्त खोबरे, मिरच्या, धणे न भाजता वाटतात. कधी कधी कांद्याची फोडणी देतात.
माझ्या माहेरी साराला जिरे कडीपत्त्याची फोडणी देतात. टोमॅटो अख्खे शिजवून पाणी न टाकता धणे, मिरची, मीठ, चिमूटभर साखर सगळं एकत्र वाटून, एक उकळी घेऊन वर जिरे, कडीपत्ता तूपाची फोडणी देतात (नारळाचे दूध वापरले तरी चालते, पण तू म्हटल्याप्रमाणे, जास्त जाड नको म्हणून नाही टाकत.)
माझी टोमॅटो-मिरच्या-तूरडाळीची आमटी असते. तूरडाळीतच मिरच्या टाकून डाळ मऊ होईपर्यंत शिजवते, मग जिरे-मोहरी-हिंग-कडीपत्त्याच्या फोडणीवर डाळ टाकून टोमॅटो, हळद मीठ टाकून मस्त उकळायची. वर हवे असल्यास ओले खोबरे व कोथिंबीर! ही पण आमटी छान लागते, करून बघा. (पण यात साखर/गूळ नाही टाकायचा)
याच्या वाटणात अर्धा काच्चा
याच्या वाटणात अर्धा काच्चा कांदा पण घालतात. टिपीकल मालवणी आमटी.
सोमवारी गुरूवारे मासे नसले कि हिच आमटी.
याच्या वाटणात अर्धा काच्चा
याच्या वाटणात अर्धा काच्चा कांदा पण घालतात.>> हो रिमा!!!
आमी श्रावणात असाच सांबारा
आमी श्रावणात असाच सांबारा करतव टोमेटोचा आणि भातात वतुन खाताना मनातल्या मनात कोलंब्याचा सार खातव असा मानतव.
साधना
साधना
वा, वेगळी रेसिपी. मऊ
वा, वेगळी रेसिपी. मऊ भाताबरोबर छान लागेल ही आमटी.
@dreamgirl - हो, न भाजताही,
@dreamgirl - हो, न भाजताही, तुझ्या साबा करतात, तसंही करतात. तूरडाळीची करुन बघेन तू दिलेल्या पद्धतीने.
@रिमा - कांदा नाही घालत आम्ही, पण एकदा करुन पाहीन.
@अल्पना - हो, सार वेगळे, ते दाट नसते कधी. म्हणजे मी तरी नाही पाहिले.
@ केश्विनी, अकु - भातावर मस्त लागते, आणि पटकन होते हे मुख्य.