महारोग सेवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १५ ते २२ मे २०११ या दरम्यान सोमनाथ प्रकल्पावर श्रमसंस्कार छावनी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मध्यभारतातील स्वयंसेवी संस्था म्हणून महारोगी सेवा समितीची स्थापना १९४९ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केली. कुष्टरोग्यांचे आणि अपंगाचे मानसिक , सामाजिक व आर्थिक असे सर्वागीण पुनर्वसन करून त्यांना आत्मनिर्भर करणे समितीचे मुख्य ध्येय आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना रचनात्मक कामात सहभागी करून तसेच त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करून, त्यांनी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
महारोगी सेवा समितीचे पाच मुख्य प्रकल्प महाराष्ट्राच्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्य़ात सुरू आहेत. या सर्व प्रकल्पात ३५०० बांधवाना आसरा दिलेला असून त्यामध्ये कुष्ठरोग, अंध, अपंग, मूक बधीर, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आदींचा समावेश आहे. या प्रकल्पापैकी एक प्रकल्प म्हणजे सोमनाथचा प्रकल्प. १९६७ मध्ये सोमनाथची स्थापना झाल्यानंतर हा प्रकल्प मनुष्यबळ प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भर उन्हाळ्यात मे महिन्यात देशभरातून हजारो युवक युवती श्रमसंस्कार छावनी शिबिरात सहभागी होतात. या श्रमसंस्कार छावनीत श्रमाचे महत्त्व पटवून देताना रोज चार तासाचे श्रमदान करून अन्यवेळी विविध तज्ज्ञांद्वारे विविध विषयांची माहिती दिली जाणार आहे. श्रमसंस्कार छावनीच्या माध्यमातून युवकांना सकात्मक कार्यसंस्कृतीची ओळख होते. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, पर्यावण संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढील लागण्यास मदत होते. श्रमसंस्कार छावनीत सहभागी झालेल्या अनेक युवकांनी प्रेरणा घेऊन विविध ठिकाणी विधायक कामे केली आहेत. ज्यांना या श्रमसंस्कार छावनी शिबिरात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी कौस्तुभ आमटे, सहायक सचिव, महारोगी सेवा समिती वरोरा, आनंदनवन, मोबाईल क्रमांक ९६८९८८८३८२, ९६५७८३१५५४ , ९०११०९४६१२ या ठिकाणी संपर्क साधावा. किंवा \ somnathcamp@gmail.com या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
तरि सर्व माबोकरांनि याचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंति
२०१० मधे हे शिबिर हेमलकसा येथे संपन्न झाले.
१५ ते २२ मे सोमनाथ प्रकल्पावर श्रमसंस्कार छावनी शिबीर
Submitted by सारन्ग on 15 April, 2011 - 13:29
गुलमोहर:
शेअर करा