नमस्कार मंडळी!
एक वर्ष कसं निघुन गेलं कळलच नाही आणि पुन्हा एकदा आपल्या प्रिय वर्षाविहाराची वेळ जवळ येऊ लागली . यंदा वर्षाविहाराचे सहावे वर्ष. गेली पाच वर्षे मायबोलीकर ज्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले तसेच यावर्षीदेखील होतील याची आम्हा संयोजकांना खात्री आहे... :). गेल्या वर्षभरात मायबोलीवर नविन आलेल्या मायबोलीकरांनाही या वविचे खास आमंत्रण आहे. त्यांनी यानिमित्ताने त्यांनाही मायबोलीपरिवारातील काही सदस्यांना प्रत्यक्षात भेटता येईल. नविन मित्र जोडता येतील.
यंदाच्या ववि संबंधी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :
तारीख: २७ जुलै, २००८ (रविवार)
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५
स्थळ: Aayurlife International (डॉ. हेगडेज् हॉलिडे व्हिलेज, कर्जत)
या वर्षाविहारात registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व मुले) यांनाच भाग घेता येईल.
आपण varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर मेल करुन आपले नाव नोंदवायचे आहे.
नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक आहे.
१. नाव
२. मायबोलीचा User ID
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.)
५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID
६. सहभागी होणार्या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (३ ते १२ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतीम तारीख १७ जुलै आहे.
डॉ. हेगडेज् रिसॉर्टचे प्रवेश शुल्क प्रत्येकी २६०.०० रुपये आहे. ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी वर्गणी शुल्कात ५०% सूट (१३०.०० रुपये शुल्क) आहे.
एकुण इच्छुक सभासदसंख्येनुसार बसभाडे ठरविण्यास मदत होते. याकरता लवकरात लवकर नावनोंदणी केल्यास उत्तम!
पुणेकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.
मुंबईकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.
तीन वर्षावरील सर्व व्यक्तीना हे बसभाडे लागू होईल.
इतर माहिती जाणुन घेण्याकरता आपण इथे मेसेज टाकु शकता अथवा varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
वर्षाविहार २००८ चे संयोजक मंडळ:
पुण्यातील संयोजक:
मयूरेश Kmayuresh2002(०९९२२४०१७७८)
हिमांशु himscool (०९८२२०१८७९५)
अतुल Atlya
बिपिन Yashwardhan
मुंबईतील संयोजक:
दत्तराज Indradhanushya(०९८३३९५३८८७)
आनंद Anandsuju(०९८२०००९८२२)
संदीप Gharuanna
निलेश Neel_ved
सांस्कृतिक समिती:
श्रद्धा Shraddhak
नंदिनी nandini2911
मीनाक्षी meenu
मंडळी, पैसे जमा करण्यासाठी माहिती देत आहोत.
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: १९ जुलै (शनिवार) आणि २० जुलै,२००८ (रविवार)
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा.
वेळ: सं. ५.३० ते ८.००
वर्गणी:
प्रौढांकरता रु. ५०० (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. २६० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)
मुलांकरता (३ ते १० वयोगटातील) रु. ३७० (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. १३० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: २० जुलै,२००८ (रविवार)
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
वर्गणी:
प्रौढांकरता: रु. ५०० प्रत्येकी (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. २६० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)
मुलांकरता (३ ते १२ वयोगटातील) रु. ३७० प्रत्येकी (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. १३० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)
इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्या खर्चाचा अंतर्भाव आहे.
मह्त्वाचे: आपण नाव नोंदवले असल्यास, परंतु २० जुलै पर्यंत पैसे जमा न केल्यास नावनोंदणी रद्दबातल ठरविण्यात येईल.
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे २०० rs वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याचे सर्व डीटेल्स ईमेलने कळविले जातील.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणाला वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
इथे रेसॉर्टचा पत्ता आणि नकाशा देत आहोत.
रेसॉर्टचे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी नं. अनुक्रमे पुढीलप्रमाणे: ९५२१४८-२२१६९०/ ९८२४००७६९
आपल्याला काही शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा.
धन्यवाद!
वविसंयोजक
नमस्कार
नमस्कार वर्षाविहार संयोजक
registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व मुले) यांनाच >>> पती/पत्नी व मुले नसल्यास काय?(करायच??)
कुटुंबाची व्याख्या कंसातच मर्यादीत आहे का?
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
नमस्कार हो
नमस्कार हो संयोजक मंडळी
जरा याचा खुलासा करा की
१. नाव: नावात काय हाय?
२. मायबोलीचा User ID: ओरीजीनल पाहीजे का?
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम): तुमचा फोन द्या मीच संपर्क करतो
४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.): तसा मी कोल्हापुरचा आहे, तिकडुन न्यायची व्यवस्था हाय का?
५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID: भरपुर आहेत, तरीपण तुमाला कोणता चालेल ते सांगा.
६. सहभागी होणार्या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले): आता वविला, एकुण प्रौढ माणसं / मुलं कीती येणार हे मला कसे माहीत असणार?
७. लहान मुले (३ ते १२ वयोगट) असल्यास त्यांचे वय: असलं काय नाय बा, तशी पोरं हायेत पण त्यांची उसाभर कोण करणार?
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?: मी एकटा कधीच काही करत नाही (बसने येणार)
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?: बरेच दिवस झाले भेटुन (प्रत्यक्षच भरतो की)
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या मग ठरवु
राम राम
rajya
माझ्या
माझ्या प्रश्नाच काय??
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
कुल्दीपक फ
कुल्दीपक
फारच दिवे लावलेत राव आपण चला उत्तर देउन टाकतो सगळी एकेक करुन
कर नही त्याला डर कशाला हो खरी माणसच कमी आहेत तीथे आय डी कोण तपासतय
खरच हे अभिनन्दन कारण आजकाल सोताचा एसटीडी असणरेही इत्की तसदी घेत नाहीत हो
जरुर करु की फक्त आगाउ रक्कम याच मंहीन्यात पाठवा. एसटी त हल्ली पारसल बुकीन्ग ची सोय चन्गली आहे अस एकतोय
जो आयडी तुमच्या पीसीवर नीत उघडतो तो दया काय
बास का राव तुमचा पसारा कीती असणार ते सांगा हो
पोरांची काळजी नको संयोजकाना चिन्ता ( देवाला काळजी च्या सुरात वाचावे)
बर म्हणजे सर्व उत्तर मिळाली अस समजतो
बाकी भेटल्यावर बोलुच
घारुआण्णा
अण्णा,अहो
अण्णा,अहो किती ती घाई.. उत्तर देताना नाव घेतलं एकाचं आणि उत्तरं दुसर्याच्याच प्रश्नांना...
चालायचं रे
चालायचं रे मया, संयोजक म्हटलं की चालतं सगळं
घारुअण्णा
घारुअण्णा फक्त मोबाईलवर संगतवार, ज्याचे प्रश्न त्यालाच उत्तर असं करतात. पोस्ट टायपायची त्यांना सवय नाहीये ना....
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
दोन्ही
दोन्ही कानांना दोन मोबाईल, दोन्ही मोबाईलवर मिळून ४ जण कॉल वेटींगवर आणि २ जण प्रत्यक्ष बोलणारे आणि उत्तर देणारे एक घारूअण्णा.. तरी सुद्धा ते ज्याची त्यालाच संगतवार उत्तरं देतात! क्या बात है!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
अण्णा मला
अण्णा मला चावा (आय मीन वाचवा असच वाचा:) )
फारच दिवे लावलेत >>> ते म. रा. वि. महा. मं. चे काम आहे!! मी साधी मेणबत्ती सु द्धा लावीत नाही! म्हणून पितामह बोंबलतात!
कर नही त्याला डर >> कर नाहीच भरत मी! पण I.T. returns मात्र भरतो! हां आता डर म्हणता तर डरना मना आहे ना??
खरी माणसच कमी आहेत >> हे मात्र सो टक्का सच है की पर्सेंटाइल म्हणू मी?
कुटुंबाची व्याख्या कंसातच ना?? म्हणजे मी भावी कुटुंबास आणीत नाही!
मेरा प्रश्न कोराच रह गया (कसही वाचा... वाचाल तर.. )
[I hereby declare that: शेवटच वाक्य सोडून बाकी सार खरच आहे! :)]
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
कुलदिप्,भा
कुलदिप्,भावी कुटंबाला आणण्यास हरकत नाही.. मैत्रिणीला त्या कंसात घालु नका म्हणजे झाले
संयोजक,
संयोजक, नोंदणी केलेल्यांचा ताजा स्कोअर प्रकाशित करा पाहू.......
मंजू तिकडे
मंजू तिकडे व. वि. सां. का. च्या बीबी वर केला आहे बघ स्कोअर प्रकाशित..
==================
डिंग डाँग डिंग
हो रे
हो रे हिम्या, आत्ताच पाहिलं.....
.
आता हा बीबी नविन सभासदांसाठी खुला करायला काय हरकत आहे? कारण त्यामुळे 'अजुन वाचायचंय' मध्ये इथल्या घडामोडी समजत नाहीत.
ते म. रा. वि.
ते म. रा. वि. महा. मं. चे काम आहे!! >>>>>>> नाही, नाही. दिवे घालवणे हे म. रा. वि. मं. चं काम आहे ............
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
अरूण, तुमी
अरूण, तुमी लोक पयशे नसाल भरत वेळेवर मग दिवे जाणारच
मी ९०% तरी
मी ९०% तरी येतेय. नाव दिलंय.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
नील,
नील, दत्तराज
या वर्षी यायला जमेल अस वाटत नाही
सगळे मजा करा आणि जमल्यास फोटो आणि वृत्तांत टाका
एक
एक सांगायचं राहिलंच- वविला जे येणार आहेत त्यांना जर आपली मायबोलीकरीण जयवि ची 'सारे तुझ्यात आहे' ची सीडी हवी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझ्याकडे आहेत त्या सीडीज्. मी वविला आणू शकेन.
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
वहिनी
वहिनी जास्त जाहिरात करु नकोस नाहीतर ........................
मंड्ळी,
मंड्ळी,
जागे व्हा.. ववि रजिस्ट्रेशनचे दोनच दिवस उरलेत... तेव्हा लगेच रजिस्ट्रेशनची मेल करा वर दिलेल्या मेल आयडीवर मागितलेल्या माहितीसकट.. एकदा अंतीम तारीख निघुन गेली की मग वविला यायची संधीही निघुन जाईल. तेव्हा त्वरा करा..
वविसंयोजक
हे इन्द्रा
हे इन्द्रा तुजे फिक्स आसेल तर माजे पन नाव देउ टाकेन्....पन पाउसाचि जबाब् दारी तुम्हची..पाउस पाहीजे.
काही शंका
काही शंका असल्यास >> १च आहे. मी मेल पाठवली आहे. पोच पावती कधी मिळेल??
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
मला पण
मला पण यायचय! प्लीज पोच पावती पोचवा!
कुलदीप,तुम
कुलदीप,तुमची मेल मिळाली आहे. तुम्हाला पोचपावती पाठवली आहे.
१०
१० टक्क्यांनी घात केला.
मी येउ शकत नाहीये. २४ ला मी नॉर्थ लखिमपूर, आसाम इथे चालले १० दिवसांसाठी. ५ तारखेला परत येणार तेव्हा वविला जमणे नाही हे आलंच ओघानं. (काहींचा हुश्श! ऐकू आला का? )
तुम्ही मजा करा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आमच्या
आमच्या शुभेच्छा , मजा करा , वृतांत लिव्हा जमल्यास फोटुबिटु टाका
शेठ,काय हे
शेठ,काय हे ..तुम्ही फक्त लांबुनच शुभेच्छा देणार का?
((((Submitted by nandini2911
((((Submitted by nandini2911 on 2 July, 2008 - 23:28.
पूनम, मी कुठलेही प्राणी पाळत नाही. मला बिचार्या प्राण्याची दया येते.))))
मी बदल केला, क्रुपया राग मानू नये.
}}}पूनम, मी कुठलेही प्राणी पाळत नाही. कारण मला बिचार्या एका (पती) प्राण्याची फार दया येते.
मजा करा रे
मजा करा रे सगळे. वृत्तांत, फोटो झोकात येउ देत.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ओ संयोजक...
ओ संयोजक... यायची (ववीला) व्यवस्था काय आहे म्हटल?? आणी पैका लागल का?(एक्स्ट्रा)
दीपक
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
Pages