रुबायत (चर्चा)

Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 03:46

माझ्या रुबाईयतच्या धाग्यावर काही मायबोलीकरांनी ज्या शंका विचारल्या त्यावरुन रुबाई या प्रकाराविषयी अधिक जाणुन घ्यायला ते उत्सुक असल्याचे जाणवले. त्या अनुषंगाने अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही चांगल्या साइट्स पण मिळाल्या. त्या सर्वांची एकत्रित माहिती इथे द्यायचा हा प्रयत्न. जाणकारांनी व रसिकांनी यात सहभाग घ्यावा, चर्चा करावी ही अपेक्षा..

माझ्या माहितीनुसार सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रुबाई म्हणजे चार ओळींची गझल. पण त्या चारही ओळी एकाच विषयावरच्या असतात. चारही ओळी एकाच वृत्तात. पण तिसर्‍या ओळीत यमक नसते. रुबाईचे अनेकवचन रुबायत.. आंतरजालावर अधिक माहिती शोधत असताना पुढील व्याख्या मिळाली.

रुबाई म्हणजे काय ?

रुबाईत पहिल्या ओळीत एक वक्तव्य / विधान. नंतरच्या दोन ओळीत त्याच्या समर्थनार्थ तर्कनिष्ट विवरण ( विस्तार ) आणि चवथ्या चरणात मंत्रमुग्ध करणारा आकर्षक समारोप असतो . एकूण ४ ओळी.

http://www.sardesaikavya.com/rubai.php

या लिंकवर चांगली माहिती आहे पण अजून पुर्ण संकलन झालेलं नाहीये.

कणखरजींकडून समजले की रूबाई ही प्रचलित असलेल्या ५४ वृत्तातच लिहावी असे म्हणतात. याविषयी कोणाला काही अधिक माहिती असल्यास सांगावी.

माधव ज्युलियन आणि वा. न. सरदेसाई ही मराठी रुबायत मधली प्रसिद्ध नावे.

हिंदीमध्ये हरिवंशराय बच्चन यांचे मधुशाला हे रुबायत चे उत्तम उदाहरण आहे तर उर्दुमध्ये खय्याम हे प्रसिद्ध नाव आहे.

जाणकारांनी प्रतिसादात प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती. वाटल्यास नंतर सर्व योग्य माहितीचे एकत्रित संकलनदेखिल करता येईल (अर्थातच माहिती देणार्‍याच्या नावाने)

धन्यवाद!

गुलमोहर: 

पण तिसर्‍या ओळीत यमक नसते.>>> नसतेच असे नाही पण तिसर्‍या ओळीत यमक नसलेला प्रकार सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे असे म्हणतात. तसे रूबाईचे तीन प्रकार आहेत असे वाचले आहे. जसजसा वेळ मिळेल आणि शक्य होईल तसे ह्यावर आधिक लिहीत राहीन

मुक्ता, धागा काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!

चांगली माहिती. Happy

रुबाईचे अनेकवचन रुबाइयात असावे.

माझ्या माहितीनुसार 'तिसर्‍या ओळीत यमक नसणे' हा एक प्रकार झाला. इथे AABA आणि AAAA हे प्रकार दिले आहेत. मला वाटते AABB देखील वापरला जातो. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

तसेच मराठीत रॉय किणिकरांनी रुबाइयात लिहिल्या आहेत.

डॉ. राम पंडीतांच्या मते, रॉय किणीकरांनी केलेल्या रचना छंदशास्त्राच्या दृष्टीने 'कतआत' आहेत.

असे त्यांनी श्री. वा. न. सरदेसाई यांच्या "अंगाई ते गझल, रूबाई - समग्र वा. न. सरदेसाई" ह्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे

सर्वांचे आभार!

गझलेच्या वृत्तात लिहिलेल्या रुबाईला मुक्तक म्हणतात.

स्वातीताई, हो, बरोबर आहे. मलाही AABB विषयी माहिती नाही.

मिलिंदजी,

धन्यवाद, आपण दिलेल्या लिंक समजुन घ्यायचा प्रयत्न करतेय. बहुतेक माहिती ही उर्दु रुबाईविषयी आहे. तरी मराठीसाठी वा. न. सरदेसाई ज्यांनी वाचलय त्यांची मदत होवु शकते असं वाटतय..

मराठीत समग्र छंदांत रुबाई सर्वप्रथम वा न सरदेसाई ह्यांनीच लिहिली . . .डॉ. श्री राम पंडित
https://youtu.be/DDdSfYGvVPo
-------------------------------------------------------------------------------------------------------
गझल आणि रुबाई : फरक
https://youtu.be/ilnTzmb_pZE