Submitted by छाया देसाई on 28 March, 2011 - 04:39
लाऊन ओढ जीवा वळतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
मातीत जन्मलेली मातीत वाढलेली
कोरी तशीच ओली कळतात माणसे ही
स्वप्नाहुनी प्रियेच्या प्रीतीत प्राण असतो
निष्प्राण करत प्रीती पळतात माणसे ही
प्रीतीस निभवण्याच्या वेळा सुमंगलाशा
पण त्याच ऐनवेळी गळतात माणसे ही
माणूस माणसांचा हो मित्र आणि शत्रू
फळतात माणसेही छळतात माणसे ही
कळते गुरू स्मरोनी स्मरताच मायबापा
छाया निवांत देता जळतात माणसे ही
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लाऊन ओढ जीवा वळतात
लाऊन ओढ जीवा वळतात माणसेही
अपुलीच आपल्याला छळतात माणसेही>>> छान!
(काही शेर आशयाच्या दृषीने काहीसे अधिक स्पष्ट असायला हवे होते का असे विचारावेसे वाटले.)
(मक्त्यावरून माझा एक जुना शेर आठवला. 'मी उगीचच तुझा पाहतो चेहरा- सावलीने तुझ्या भाजतो चेहरा)
आपल्या गझल लेखनास शुभेच्छा व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
लाऊन ओढ जीवा वळतात
लाऊन ओढ जीवा वळतात माणसेही
अपुलीच आपल्याला छळतात माणसेही
मातीत जन्मलेली मातीत वाढलेली
कोरी तशीच ओली कळतात माणसेही
व्वा.. चांगले शेर.
मतला आणि दुसरा शेर आवडला!!
मतला आणि दुसरा शेर आवडला!!
छान गजल. आवडली.
छान गजल. आवडली.
मातीत जन्मलेली मातीत
मातीत जन्मलेली मातीत वाढलेली
कोरी तशीच ओली कळतात माणसेही
हा शेर खूप आवडला. गझल सुंदर झाली आहे.
माणूस म्हणवण्याचा ज्या शौक जीवघेणा
कळताच श्वापदे ती पळतात माणसेही
हा शेर नाही समजला मला.
माणूस माणसांचा हो मित्र आणि
माणूस माणसांचा हो मित्र आणि शत्रू
फळतात माणसेही छळतात माणसेही
छान पुनरावृत्ती.. नाट्यमय...
आवडली
आवडली
सर्वांची आभारी आहे .प्राजु
सर्वांची आभारी आहे .प्राजु ,बेफिकीर शेर बदलले आहेत .धन्यवाद.
मस्त छायाताई, गझल
मस्त छायाताई,
गझल आवडली!
विशेषत: --
लाऊन ओढ जीवा वळतात माणसेही
अपुलीच आपल्याला छळतात माणसेही
मातीत जन्मलेली मातीत वाढलेली
कोरी तशीच ओली कळतात माणसेही
पण माणसे ही असे हवे होते ना?
आणि
'निष्प्राण करून प्रीती '
मध्ये १ मात्रा रू ची जास्त आहे