Submitted by झी on 23 March, 2011 - 20:41
मी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का? फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते? आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या माहितीत फक्त लुफ्तांसा
माझ्या माहितीत फक्त लुफ्तांसा च आहे डायरेक्ट पुण्यापर्यंत . पण अजुन एक पर्याय म्हनजे मी यावेळी दिल्ली हुन आले ....सो frankfurt-delhi, delhi-pune.... हा पर्याय पण छान आहे. डायरेक्ट पुण्यापर्यंत येता येते.... उगीच ती मुंबई ची कटकट नाही.... the same is available for Australia.... Australia-delhi, delhi-pune...perfect
उगीच ती मुंबई ची कटकट
उगीच ती मुंबई ची कटकट नाही
>>> एक प्रामाणिक प्रश्न... दिल्लीला कटकट नाही आहे का? मुंबई पेक्षा कमी कटकट आहे का?
सेनापती, दिल्लीहून दुसरी
सेनापती, दिल्लीहून दुसरी फ्लाईट घेऊन पुण्यापर्यंत येता येते म्हणून कटकट नाही असे म्हणायचे असावे. आता मुंबई-पुणे फ्लाईटही असतात पण त्या त्याच वेळेत असतात की नाही माहीत नाही.
दिल्लीहून दुसरी फ्लाईट घेऊन
दिल्लीहून दुसरी फ्लाईट घेऊन पुण्यापर्यंत येता येते म्हणून कटकट नाही असे म्हणायचे असावे...हो हेच म्हणायचे आहे. मुंबई-पुणे फ्लाईट ची वेळ जुळत नव्हती....दिल्लीहून जमत होती.
पुणे एअरपोर्ट वरुन पिंपळे
पुणे एअरपोर्ट वरुन पिंपळे गुरव/सांगवि ला जायला काहि रिलाएबल टॅक्सि / रिक्शा आहेत का? फ्लाईट सकाळि ६ चि आहे आणि परत रात्रि १२:३० ला पोहोचणार आहे. एकटिच बाळाला घेउन प्रवास करणार आहे म्हणुन थोडि भिति वाटते आहे.
पुण्यात पोहोचणार्या
पुण्यात पोहोचणार्या इंटरनॅशनल फ्लाईट्स च्या वेळा साधारण काय आहेत कोणाला माहीत आहे का? कारण रात्री खूप उशीरा पोहोचणार्या असतील तर टॅक्सी करायला नको वाटेल.
ईशा, लुफ्तांसा पहाटे ४.३० ला
ईशा, लुफ्तांसा पहाटे ४.३० ला पोचते पुण्याला.
होय मीपुणेकर. ते ऑप्शनच बरे
होय मीपुणेकर. ते ऑप्शनच बरे वाट्तेय मला. अजून एक फ्लाईट आहे amireates ची . ती सकाळी पोहोचतीये मुंबईला . पण मी कधीच गेले नाहीये त्या फ्लाईट नी आणि येताना पण १२ तासांचा holt आहे म्हणून नको वाट्तेय.
४ ला ? मग कठीणच वाट्तेय मला.
४ ला ? मग कठीणच वाट्तेय मला. Thanku ga !
आम्हि आत्ता मे मधे kk नेच
आम्हि आत्ता मे मधे kk नेच पुने ते mumbai airport गेलो आलो, काहि problem आला नाहि. पुणे पर्यंतच्या प्रवासास ४ ते ५ तास ग्रूहीत धरावेत.
हा धागा मिळाला. आताही केके
हा धागा मिळाला. आताही केके च्या मुंबईहुन बसेसच आहेत की चारचाकी गाड्या? प्रायवेट नको आहे.
के के च्या कार आणी जिप
के के च्या कार आणी जिप आहेत. मस्त आहेत ...सेफ आहेत ...४ जण झाले कि सुटतात . आधी ओन्लाईन बुक करता येते...वाटेत गाडीला जर काही प्रोब्लेम आलाच तर बाकिच्या के के च्या गाड्या ड्राईवर मस्त मदत करतात....
एक अत्यन्त महत्वाचे .... ---- के के च्या ड्राईवार्स ना पुरती झोप मिळालेली नसते असा स्वानुभव आहे . गाडित बसल्या बरोबर ड्राईवर ला विचारावे ..कुठे रहातोस? कधी आलास मुम्बईत ? झोप झालि का? तो "हो" म्हणाला तरी पुर्ण प्रवास भर त्याच्याशी बोलत रहाणे योग्य....
सुनिधी -- के के हे प्रायवेट च आहे . एशियाड / शिवनेरी ई ई बस हव्या असतिल तर सोपा उपाय म्ह्णजे सहार हुन prepaid taxi करुन दादर ला जायचे आणी तिथुन एशियाड / शिवनेरी मिळतिल पण स्जरा त्रास दायक आहे . इतका लम्ब्चा प्रवास करुन याय्चे , समान सभाळणे ई ई
अजुन एक चागला पर्याय --simran travels. आहे . पण आप्ल्या साठी एक खास कार बुक करुन जाउ शकतो . हे पण सेफ आहे . उत्तम अनुभव आहे .
पहा आपल्याला योग्य तो पर्याय निडवावा.
शुभेच्छा ....
वर चमन यांनी सांगितलेला के के
वर चमन यांनी सांगितलेला के के अनुभव एका मित्राला अलिकडे आला! पॅसेंजर स्वॅप करायला थांबणे इत्यादी
नाशिक-मु एयरपोर्ट-नाशिक या प्रवासासाठी नातेवाईक के के ची सेवा वापरतात. त्यांचा अनुभव उत्तम आहे.
चाकणला ड्रॉप देणारी एखादी
चाकणला ड्रॉप देणारी एखादी सर्व्हिस आहे का?
सिमरन ट्रँव्हल्स ला
सिमरन ट्रँव्हल्स ला विचारु शकते पेरु
http://www.mumbaiairportcab.com/
आता मेरूने 'मेरू प्लस' नावाने
आता मेरूने 'मेरू प्लस' नावाने सेवा सुरु केली आहे. मुंबई वरून पुणे-नाशिक जाण्याकरिता ही सेवा वापरली जाउ शकते.
मेरू प्लस' >> कशी आहे ही
मेरू प्लस' >> कशी आहे ही सर्विस? कोणाला अनुभव आहे का?
मला मागच्यावर्षी केके चा अतीशय वैतागवाणा अनुभव आला. सर्वप्रथम ड्रायवर गुटखा खाणारा होता. त्याचा वास पूर्ण गाडीमध्ये. त्यानंतर जवळ पास पुर्णवेळ एक्सप्रेस हायवे वर फोन वर बोलत होता. दोन कॉल्सच्या मधे आडवी तिडवी गाडी काढत होता. अतीशय रॅश ड्रायविंग. त्याला गाडीतल्या माणसांची आदलाबदल करायची होती, त्यावरुन सतत त्याचे कोणाशीतरी बोलणे चालू होते. तू इथे थांब मी इथे थांबतो. शेवटी काही झालेच नाही. त्यानंतर सोडताना त्याने हायवेवर असूनही उलटा फेरा मारुन विश्रांतीनगरला रहाणार्यांना आधी सोडले मग हायवे जवळ रहाणार्यांना. का तर त्याची सोय म्हणून. त्याला त्याच्या गोडाऊनला गाडी सोडायची होती. आम्हाला भर रात्री, फुकट एक ते दीड तास पुण्याचा फेरा मारावा लागला. मी तेव्हाच कंप्लेट केली, तरी केके कडून बघतो बघतो म्हणून काहीही हलचाल नाही.
माझ्यामते तरी मुख्य मुद्द्यांमध्ये ड्रायविंग अज्जीबात सेफ नसणे आणि एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवत असताना फोनवर बोलणे ह्या गोष्टी जास्त त्रासदायक आणि भितीदायक होत्या.
मलाही के.के. चा एकदा वाईट
मलाही के.के. चा एकदा वाईट अनुभव आला!
चालक रॅश चालवणारा..सतत मोबाइलवर बोलणारा...त्याहून हाईट म्हणजे पुणे जवळ आल्यावय ..'मि फक्त वा़कड ला सोडिन..पुढे जानार नाही..!'अशी सरळ धमकीच दिली. वेळ सुमारे पहाटे ३ ची!
के. के ला फोन केल्याचा फार काही उपयोग झाला नाही.
मग मीच आवाज चढवून पोलिसांन्ना कळवतो म्हटल्यावर उर्मटपणे बोलू लागला.
माझ्या सोबत एक वयस्क जोडपे होते! ते तर गांगरूनच गेले.
कसेतरि त्याने मला ठिकणावर सोडले. त्या काका-काकुंन्ना मी माझा फोन नं. दिला व सांगितले कि जर चालकाने काही त्रास दिला तर मला फोन करा.
दुसर्या दिवशी के. के ला फोन केला तेंव्हा त्यानी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर कधी त्या वाटेला गेलो नाही. त्यापेक्षा रात्रौ थांबून दादरहून एशियाड ने येतो.
सध्या लेटेस्ट अनुभव कसाकाय
सध्या लेटेस्ट अनुभव कसाकाय आहे.
केके का सँडीज्
सॅन्डीज घ्या, धोका देत नाही.
सॅन्डीज घ्या, धोका देत नाही. केके एकदम बेकार, वेळेवर अजीबात येत नाही. खरच सान्गते आम्ही फसलोय, तुम्ही रिस्क घेऊ नका.
मी गेली काहि दिवस ई- कॅब
मी गेली काहि दिवस ई- कॅब वापरत आहे, अत्यंत उत्तम सेवा, एकदम निर्व्यसनी चालक आणि वेळ पाळण !
मला उत्तम वाटली ही सेवा
धन्यवाद रश्मी, बेकार तरूणा,
धन्यवाद रश्मी, बेकार तरूणा, त्या ई-कॅबची काही लिंक वगैरे असली तर का देईनास
>>सॅन्डीज घ्या, धोका देत
>>सॅन्डीज घ्या, धोका देत नाही. केके एकदम बेकार, वेळेवर अजीबात येत नाही. खरच सान्गते आम्ही फसलोय, तुम्ही रिस्क घेऊ नका.
+१
सुहास्य धन्यवाद. हा प्रतिसाद
सुहास्य धन्यवाद. हा प्रतिसाद वाचला होता पण गडबडीत पोच राहुन गेली. आता २ वर्षांनी घ्या. .. आणि हो, तेव्हा आम्ही शेवटी घरच्याच गाडीने जाणे पसंत केले. म्हणजे पुण्याहुन घरचे गाडी घेऊन आले व पुण्याला परत घेऊन गेले.
शिवनेरी चे ई-बुकिन्ग आहे का?
शिवनेरी चे ई-बुकिन्ग आहे का? मला वाकड ला जायचे आहे विले पार्ले वरुन.
शिवनेरी बुकिंग एम एस आर टी सी
शिवनेरी बुकिंग एम एस आर टी सी साईट वरुन व्यवस्थित होते.सीट पण निवडता येतात प्लॅन मधून.
वाकड हिंजवडी पुलाजवळ किंवा मग इंदिरा कॉलेज्/जोशी वडेवाले जवळ स्टॉप आहे तिथे चढता किंवा उतरता येते.
https://www.msrtc.gov.in/
शिवनेरी ला +१११ रेलवे चालत
शिवनेरी ला +१११
रेलवे चालत असल्यास दादर ते पुणे बुकिंग करा अन चिंचवड स्टेशन ला उतरा, अपरात्री एकट्या प्रवास करत असल्यास स्त्रियांनी शक्यतो सरकारी परिवहन साधने निवडल्यास उत्तम अन सुरक्षित असे आमचे वैयक्तिक मत आहे
हो, सरकारीला +१०००, कितीही
हो, सरकारीला +१०००, कितीही वाट पहावी लागली तरी प्रायव्हेट ट्रॅव्हल बस नो नो.
thank you mi_anu, सोन्या
thank you mi_anu, सोन्या बापु.
विमानतळाहून शटल सारख्या
विमानतळाहून शटल सारख्या सेवेचा सरकारी पर्याय उपलब्ध झाला तर खूप लोक वापरतील.
दील्ली प्रमाणे एअर पोर्ट हुन
दील्ली प्रमाणे एअर पोर्ट हुन दादर स्टेशन मेट्रो हा खूप चांगला पर्याय.
के के व सँडी दोन्हीचे अनुभव
के के व सँडी दोन्हीचे अनुभव आहेत. सँडीने एकदाच प्रवास केला कारण ड्रायव्हर झोपेत होता व कशीही गाडी चालवत होता. शेवटी नवर्याने ओरडून त्याला गाडी थांबवायला लावली. यापुढे १००- १२० वेगाने गाडी चालवल्यास जिथे असू तिथे उतरू अशी धमकी दिली. माझे वडीलही बरोबर होते. आम्हाला सोडून परत जाताना त्याने वडिलांना रिक्वेस्ट करून पनवेलपाशी गाडी रस्त्याकडेला घेऊन जो झोपला तो सकाळी सात वाजताच उठला. तोपर्यंत माझे वडील व तो दोघेही इतके गाढ झोपेत होते की आपापले सेलफोन्स उचलत नव्हते. घरी आई व विमानतळावर आम्ही (विमान अडीच तास उशिराने सुटले) काही तास फार ताणाखाली घालवले. त्यानंतर ती सर्व्हिस नको म्हणून के के ने प्रवास केला तर दरवेळी त्याने बरी सर्व्हिस दिली. मागील वेळी मात्र जुनी टायर्स असल्याने विमानतळापासून ते घरापर्यंत पाचवेळा वेगवेगळी टायर्स पंक्चर झाली. त्याने शेवटी आता नवी खरेदी करून मगच जायला लागतेय की काय अशी शंका व्यक्त केली. ड्रायव्हर खोटे बोलत नव्हता की मुद्दम काही करत नव्हता. ख्रिसमस ईव्हला पोहोचल्याने व तो ख्रिश्चन असल्याने त्याच्याही घरून सतत फोन चालू होते. फार वैताग आला होता. आता केके, सँडी कोणीच नको वाटतायत.
दील्ली प्रमाणे एअर पोर्ट हुन
दील्ली प्रमाणे एअर पोर्ट हुन दादर स्टेशन मेट्रो हा खूप चांगला पर्याय.
दिल्लीकरांस जागचे वरदान आहे हो! मुंबईत जागेच्या नावानं टोटल बोंब आहे!. Delhiites have luxury of space! While mumbai is vertical !
तशी आईडिया भारी आहे
Maza kk cha anubhav uttam
Maza kk cha anubhav uttam ahe
२९ laa aalo
सध्या कोणते चांगले ऑप्शन्स
सध्या कोणते चांगले ऑप्शन्स आहे मुंबई पुणे प्रवासासाठी? खूप दिवसांनी प्रवास होतो आहे म्हणून विचारते आहे
Kk travels
Kk travels
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय चांगले आहेत, नॉर्मली ४५ मिनीटात गाडी हजर होते.
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय चांगले आहेत, नॉर्मली ४५ मिनीटात गाडी हजर होते.
Submitted by योकु on 12 August, 2018 - 11:05
४५ मिनिटे??? इतका वेळ???
४-५ असेल.
४-५ असेल.
झूम कार
झूम कार
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय
ओला, उबर चे आउट्स्टेशन पर्याय चांगले आहेत, नॉर्मली ४५ मिनीटात गाडी हजर होते.>>>>>> ओला, उबरच्या अॅपवर बाहेरगावासाठी गाडी ४५ मिनिटात येईल असे सांगतात,पण २५-३० मिनिटात येते.
https://oneway.cab/Services
https://oneway.cab/Services.html
हे कोणी वापरले आहे का?
इन्टरनॅशनल फ्लाइटने येत असाल
इन्टरनॅशनल फ्लाइटने येत असाल तर इमिग्रेशनच्या लाइनमध्ये उभे राहिले की ओला-उबेर बूक करा. तिथपासून साधारण बाहेर पडायला ४०-५० मिनिटे लागतातच.
आता ओला उबेर ने मुंबई ते पुणे
आता ओला उबेर ने मुंबई ते पुणे जाता येते हे माहिती नव्हते. पण त्या शेअर्ड मिळतात का? मी ऐकले आहे की रात्री एकटे जाणे चांगले नाही म्हणून..
सँडीजने किंवा के के ने खूप
सँडीजने किंवा के के ने खूप वेळा आलो आहे
शेअर टॅक्सी रू ९०० आणी पूर्ण टॅक्सी रू ३०००/-
बाहेर आल्या आल्या दोहो कंपन्याची माणसे उभी असतातच
त्यांच्याकडेही बूक करता येते किंवा पुण्यातील ऑफिसमधुनही
बाहेर आलात की साधारण ३० मिनिटाने टॅक्सी येते (त्यांनी बुक करताना काही प्रॉमिस केले तरी तेवढा वेळ लागतोच)
एक महिना पुण्यात राहून एका
एक महिना पुण्यात राहून एका आठवड्यापूर्वीच परतलो. मुंबई पुणे-शेअर आणि पुणे मुंबई-चार्टर असा केके ने प्रवास केला.
शेअर-रु.१०५०, चार्टर-रु.३७५०. दोन्ही अनुभव उत्तम !
mala watate o2cab swasta aahe
mala watate o2cab swasta aahe,
https://o2cab.com/pune-to-mumbai-cab
https://www.o2cab.com/Mumbai-To-Pune-cab
https://oneway.cab/outstation
O2 स्वस्त वाटते आहे
मध्यरात्री ओला/उबरने पुणे
मध्यरात्री ओला/उबरने पुणे मुंबई एअरपोर्ट प्रवास करणे बायकांसाठी कितपत सुरक्षित आहे?
You can try Priyadarshini
You can try Priyadarshini Taxi Service (all women drivers), little expensive than others but feel safe especially if you are travelling alone and at night. (sorry new to Maayboli and can not type in Marathi yet)
Pages