झेन कथा 8 प्रेम खुलेपणाने करा...

Submitted by ठमादेवी on 21 March, 2011 - 06:17

एशुन आणि तिच्यासोबतचे अकरा धर्मगुरू त्यांच्या प्रमुख गुरूकडे ध्यानस्थ होण्याचे धडे घेत होते... एशुन इतकी देखणी होती की, तिचे वपन केलेले केस आणि साधे कपडे त्या सौंदर्याला बाधा आणत नव्हते... त्यामुळे अनेक धर्मगुरू तिच्यावर चोरून प्रेम करत होते...

त्यातल्या एका धर्मगुरूने तिला पत्र लिहून खासगी भेटीची विनंती केली... तिने काहीही उत्तर दिलं नाही...

दुसर्‍या दिवशी प्रमुख गुरूचं व्याख्यान संपल्यावर ती उठून उभी राहिली आणि स्पष्ट केलं... ज्याने कुणी पत्र लिहिलं आहे त्याची हिंमत असेल तर त्याने मला आत्ता समोर येऊन ते सांगावं....

सगळे चिडीचूप झाले... ती पुढे म्हणाली, तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते खुलेपणाने सांगता आलं पाहिजे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा मनापासून आवडली हे मी खुलेपणाने सांगतोय. Wink

रच्याकने, अ‍ॅटीट्युड काय तो असतो ना? तो निदान असा सकारात्मक तरी असावा एवढं शिकलो.

नाद्या, हे बाकी खरं.. सकारात्मक अ‍ॅटिट्यूड असला की माणूस बरंच काही सहन करायला शिकतो...

मो... प्यार हो या दुश्मनी दोनों जी जान से... Happy

त्यामुळे अनेक धर्मगुरू तिच्यावर चोरून प्रेम करत होते...>>>

प्रेम चोरून करताच येत नाही असे मला वाटते. चोरून जे केले जाते ते वासनेचे व्यक्तीकरण असते.

त्यातल्या एका धर्मगुरूने तिला पत्र लिहून खासगी भेटीची विनंती केली... >>> खासगी भेटीची विनंती हीसुद्धा बहुतांशी स्वस्त प्रेमातून (?) येते असे मला वाटते. प्रेम असलेला माणुस बिनदिक्कत प्रेम व्यक्त तरी करेल अथवा प्रेम सुचित तरी करेल. (वागण्यातून). तसेच, तो वागण्यातूनच 'खरे प्रेम हवे आहे' हेही सुचित करेल. पत्र लिहून खासगी भेट मागणे हा भ्याडपणा वाटतो. (हे कथेतील खालील विधानावरून स्पष्ट व्हावे)

एशुन इतकी देखणी होती की, तिचे वपन केलेले केस आणि साधे कपडे त्या सौंदर्याला बाधा आणत नव्हते.>>> या विधानातून केवळ तिचे सौदर्यच लक्षात घेतले जात होते असे कथाकाराला म्हणायचे आहे अस वाटते.

तिने काहीही उत्तर दिलं नाही...>>> तिला तो कोण आहे हे माहीत होते असे सुचित करायचे आहे का मूळ कथालेखकाला? तसे असल्यास तिनेही 'तो कोण आहे' हे स्पष्टपणे जाहीर न करून काय साधले? आणि तिला 'तो कोण आहे' हे माहीत नसल्यास ती उत्तर कुणाला देणार?

मला असे वाटते की विशुद्ध प्रेमाचा उल्लेखच कथेत झालेला नाही.

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

प्रेम करणे आणि एखाद्या स्त्रिच्या सौंदर्यावर भाळणे यात बरीच तफावत आहे.
मुळात ते धर्मगुरु तीच्या सैंदर्यावर भाळले होते, त्यांचे तिच्यावर प्रेम होतच हे काही स्पष्ट होत नाही.

जसे विश्वामित्र भाळले होते कुण्या चंद्रिकेवर तसे आहे ते ठमे

जिइ, आपल्या इसापनीती मध्येही अशाच छोट्या छोट्या प्रसंगी उथळ वाटणार्‍या कथा होत्या. आता मोठं झाल्यावर त्या तशा वाटतात, पण लहानपणीतर इसापनीती, अकबर बिरबलची पारायणं केलीत.

मोहिनी, अश्विनी देअर यू आर!!! इथे मला ती चार आंधळे आणि हत्तीची कथा आठवली... एकाच कथेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात... Happy

ESHUN AND THE MONKS
Twenty monks and one nun, who was named Eshun, were practicing meditation with a certain Zen master.

Eshun was very pretty even though her head was shaved and her dress plain. Several monks secretly fell in love with her. One of them wrote her a love letter, insisting upon a private meeting.

Eshun did not reply. The following day the master gave a lecture to the group, and when it was over, Eshun arose. Addressing the one who had written to her, she said: "If you really love me so much, come and embrace me now."

भाषांतर जसे च्या तसे झाले नाहीये असे वाटते....

नावं बदलून तेच तेच प्रतिसाद देण्याचाच उथळपणा इथे जास्त दिसतोय. असोत, दुर्दैवाने मला हे लहानपणी वाचता आलं नाही किंवा कोणी सांगितलही नाही. Uhoh निदान आत्ता वाचून मी कोणाला तरी यातलं चांगलं काय ते नक्कीच पुढच्याला सांगू शकेल एवढं मला वाटतं.

आता माझ्या वरच्या विधानावरही अर्थाचे अनर्थ करणारे सुद्धा जमतीलचं उथळ पाण्यात तरंगून.

माफ करा, पण प्रत्येकाच्या समजून घेण्याच्या कुवतीवर अवलंबून असते हे विधान फारच 'एस्केप स्टाईल'चे वाटले.

चार आंधळे आणि एक हत्ती हेही तसेच वाटले.

विरोधी प्रतिसाद आले तर 'चार आंधळे एक हत्ती' असे म्हणणे कितपत योग्य आहे?

मुळात हा अनुवादच चुकलेला आहे असे माझे म्हणणे आहे. खाली मूळ ओळ पहावीत.

following day the master gave a lecture to the group, and when it was over, Eshun arose. Addressing the one who had written to her, she said: "If you really love me so much, come and embrace me now.">>>

याचा अर्थ असा आहे की तिला हे माहीत होते की पत्र लिहिणारा होण आहे. ती त्याला सर्वांसमोर तेथे येऊन तिला आलिंगनात घेण्यास सांगत होती.

मात्र याचा अनुवाद येथे असा करण्यात आलेला आहे.

दुसर्‍या दिवशी प्रमुख गुरूचं व्याख्यान संपल्यावर ती उठून उभी राहिली आणि स्पष्ट केलं... ज्याने कुणी पत्र लिहिलं आहे त्याची हिंमत असेल तर त्याने मला आत्ता समोर येऊन ते सांगावं....>>>

यातील 'ज्याने कुणी' हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. 'अ‍ॅड्रेसिंग द वन हू हॅड रिटन टू हर' चा अर्थच तिला तो माहीत होता.

त्यामुळे अनुवाद पूर्णपणे चुकलेला आहे व त्याबाबत तरी चार आंधळे व एक हत्ती हा नियम अजिबात लागू होऊ शकत नाही. येथे प्रतिसाद देणार्‍यांबद्दल मला काही म्हणायचेच नाही. पण हा अनुवाद चुकलेला आहे व त्यामुळे मूळ बोधच बदलत आहे.

कृपया, अनुवाद तरी योग्य व्हावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

नावं बदलून तेच तेच प्रतिसाद देण्याचाच उथळपणा इथे जास्त दिसतोय. असोत, दुर्दैवाने मला हे लहानपणी वाचता आलं नाही किंवा कोणी सांगितलही नाही. निदान आत्ता वाचून मी कोणाला तरी यातलं चांगलं काय ते नक्कीच पुढच्याला सांगू शकेल एवढं मला वाटतं.

आता माझ्या वरच्या विधानावरही अर्थाचे अनर्थ करणारे सुद्धा जमतीलचं उथळ पाण्यात तरंगून.>>>

नादखुळा,

अ‍ॅडमीनला जर माझ्या या धाग्यावरील प्रतिसादांची दखल घ्यायची असली तर जरूर घेऊदेत पण मी शेवटपर्यंत बोलायचे ठरवले आहे. हे वरील विधान आपण कुणालाही उद्देशून केलेले असोत. पण निगेटिव्ह प्रतिसाद देणारे कायम ड्यु आय डी च असतात हा शोध कसा काय लावलात? आपले खरे नाव काय हे आपण कधीच का सांगत नाही? निगेटिव्ह प्रतिसाद देणारे उथळच बोलतात कशावरून?

हा अ‍ॅटिट्युड कसा काय झाला??

नादखुळ्या, नेहमीचेच प्रकार सुरु आहेत रे Happy

एस्केप स्टाईल वगैरे शब्द ठीक आहेत. स्वतःच्या उथळ टिप्पण्यांवर अजून विद्वान प्रतिसाद येतील या भ्रमात राहू नये माणसाने.

हे भाषांतर आहे की रुपांतर आहे ठमादेवी ?

मोहिनी, भाषांतर काय रूपांतर काय... शब्दशः करू नये असा पहिला धडा दहावीच्या आधीच शिकवला जातो... अर्थबोध व्हायला हवा आणि कथेचा गाभा यायला हवा... आता इथे मुद्दाम येऊन काड्या टाकाय्चे प्रकार सुरू झालेत...

तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते खुलेपणाने सांगता आलं पाहिजे...>> हे वाक्य आवडले कोमुतै. कथाही छान आहे.

आणि

प्रेम असलेला माणुस बिनदिक्कत प्रेम व्यक्त तरी करेल अथवा प्रेम सुचित तरी करेल. (वागण्यातून). >> हे ही वाक्य पटले तसेच विशुध्द स्पष्टीकरणही आवड्ले 'भुषणराव'.

विशुध्द 'प्रेम' हे संवेदनशिल असते.
यात भौतिक रुप ग्रुहीत धरले जात नाही कारण भौतिकता ही कालानुरु बदलत राहते वे नष्ट होते.
शारीरीक सुंदरतेवर केलेले प्रेम (वासना) हे हळुहळु शरिरावरील सुरकुत्यांबरोबर घ्रुणेतच रुपांतर होते.
तर विशुध्द 'प्रेम' अनंत 'काला' स लांघुन आणखी 'बहरत' राहते.
'विशुध्द प्रेमात' स्वसमर्पितपणा स्पष्ट होतो.
शरिर नष्ट झाले तरी 'विशुध्द प्रेमा'च्या संवेदना सनातन कालासाठी जिवंत राहतात.
कदाचीत या संवेदनांच्या अस्तित्त्वामुळेच आज कुठेतरी जगात जिवंतपणाची जाणीव होत राहते.

आवांतर बोलल्याबद्द्ल क्षमस्वः.

मोहिनी, भाषांतर काय रूपांतर काय... शब्दशः करू नये असा पहिला धडा दहावीच्या आधीच शिकवला जातो... अर्थबोध व्हायला हवा आणि कथेचा गाभा यायला हवा... आता इथे मुद्दाम येऊन काड्या टाकाय्चे प्रकार सुरू झालेत...>>>

हा आपला दृष्टिकोन मला तरी चुकीचा वाटतो. हे काड्या टाकायचे प्रकार नाहीत अस माझे मत आहे. मी हे सिद्ध करतो.

१. भाषातर असेल तर शब्दशः नसले तरी आशय अचूक असतो. रुपांतरात त्या त्या संस्कृतीला समजू शकेल असे बदल शक्य असतात पण तरी आशय अचूकच असतो. आपला आशय चुकलेला आहे.

२. तिला तो माहीतच नसता तर - तिने सर्वांसमक्ष ते विचारलेच नसते कारण तो उठून उभा राहणारच नाही हे तिला समजले असते. यात बोध असा झाला असता की तो जो कोण आहे तो स्वस्त वागणारा आहे.

३. तिला माहीत असल्यामुळे ती असे म्हणू शकली की 'तू समोर ये आणि प्रेम व्यक्त कर'. हे आणि मुद्दा २ पूर्ण वेगळे आहेत.

बघा, पटतंय का!

बेफि तुम्ही मला काही पटवून द्यायचा प्रयत्न करू नका... ते जे काही आहे ते मी जाणीवपूर्वक तसं लिहिलेलं आहे... तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला फरक पडत नाही... तुमच्या कथांवर जे ड्यु आय देतात ना प्रतिक्रिया त्यातच खुश राहा आणि त्याच जगात रमा... या विषयावरचे हेमाशेपो/...

Pages