एका ओळखिच्या व्यक्तिकडून सुरंगिच्या झाडाचा पत्ता लागला. आणि त्याच व्यक्तीची ओळख काढून होळीच्या सकाळीच सुरंगीचे झाड पहाण्याचा मुहुर्त ठरविला. सकाळी ७ वाजताच या नाहीतर सगळ्या कळ्या काढून नेतील ही सुचना मिळाल्याने सुट्टीच्या दिवशीही सकाळी उठुन व नवरोबांची सकाळ लवकर उजाडून आम्ही सुरंगीचे झाड पाहण्यास गेलो आणि जवळ जवळ १ तास त्या झाडाखाली रमलो. झाडावर कळ्या काढण्या साठी दोन माणसे चढलेलीच होती. मिस्टरांच्या ओळखीची असल्याने त्यांनी आमचे झाडावरुनच स्वागत केले. आणि सुरंगीची त्यांना माहीत माहीती दिली.
साधारण चिकु, आंब्या सारखे मोठे असते. हे झाड चिवट असते.
होळी जवळ आली की सुरंगीच्या गजर्यांची आठवण येते. आजकाल खुप दुर्मीळ झालेली सुरंगी ही मार्च महिन्यापासुन दोन बहरांत फुलते. सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात.
सुरंगीच्या कळ्या काढण म्हणजे जोखिमीच काम असत. कळ्या काढण्यासाठी झाडावर चढाव लागत व एक एक झालेली कळी काढावी लागते. ह्या कळ्याच काढाव्या लागतात. जर फुल उमलले तर गजरा करताना त्रास होतो. साधारण १० वाजता म्हणजे सुर्यप्रकाश पुर्ण आल्यावर ह्या कळ्यांचे फुलात रुपांतर होऊन झाड पिवळे दिसु लागते. होळी असल्याने मला १० वाजेपर्यंत थांबणे शक्य नव्हते म्हणून थोडी खंत वाटली.
ह्या झाडावरुन जर पाय सटकुन माणूस पडला तर त्याची खुपच वाईट स्थिती होते असे म्हणतात. फुलांच्या सुगंधामुळे ह्या झाडावर साप येतात असेही म्हणतात. एवढी जोखिम आणि मेहनत घेउन ह्या गजर्यांना जास्त भाव नसतो. १० ते १५ रुपयांत ह्याचा गजरा मिळतो. शिवाय तो संध्याकाळी कोमेजतो. एकीकडे सायलीचा, टिकाऊ गजरा मात्र बाजारात २५ ते ३० रुपयांवर भाव खाउन बसतो.
झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडला होता.
सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमीवासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाची सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगिला कमी असतात.
सुरंगीच्या फुलांचा मंत्रमुग्ध करणारा वास स्त्रियांना आकर्षीत करतो. केसांमध्ये माळलेला गजरा सुकुन काढला तरी पुर्ण दिवस ह्या फुलांचा वास केसांमध्ये राहतो. पुर्वी होळीला ह्या गजर्यांना खुप डिमांड असे. पुर्वी हे गजरे भेट म्हणूनच वाटायचे.
जागू, काय जळवायचा सपाटा
जागू, काय जळवायचा सपाटा लावलाय
मस्त फोटो अन वर्णन. झाड खूप काटेरी असतं असं ऐकलेलं. खरंय का ?
नाही ग. का\टे नाही दिसले.
नाही ग. का\टे नाही दिसले. आणि झाडावर माणस चढुन फुल काढतात. मी गेले ते.न्व्हाही काढतच होती.
गजरे मस्त आहेत. मी कधी ऐकलं
गजरे मस्त आहेत. मी कधी ऐकलं नव्हतं ह्या फुलांविषयी.
सुरंगी! किंचित उग्र वास असतो
सुरंगी! किंचित उग्र वास असतो हिचा. कित्ती दिवसांनी पाहिली!
जागू, तुझे आभार मानावे तितके
जागू, तुझे आभार मानावे तितके थोडेच!
सुरंगी अश्या नावाचे झाड असते
सुरंगी अश्या नावाचे झाड असते आणि त्याच्या फुलांचा गजरा करतात ही नवीनच माहिती कळली. गजरा एकदम मस्त पिवळाधमक दिसतोय. आधी कधी बघीतले नव्हते हे फूल. किनारपट्टीच्या भागात येतात वाटतं ही झाडं.
तुमच्या नवरदेवाला हात जोडून
तुमच्या नवरदेवाला हात जोडून प्रणाम तुम्ही बायकोसाठी एवढ करता सांगितल्या प्रमाणे
गजरा खूप आवडला
गजरा खूप आवडला
मस्त फोटु , आधी वाटलं सुरंगी
मस्त फोटु ,
आधी वाटलं सुरंगी नावाचा मासा आहे की काय ? जागु मासे सोडुन कुठं ह्या फुला बिलांच्या नादात पडलीस .
चैत्राची सुगंधीत चाहुल ......
चैत्राची सुगंधीत चाहुल ......
फोटोतुनच सुगंध श्वासात भरुन घेतला, आता पुर्ण दिवस सुगंधी
त्रिवार धन्यवाद जागू
मला पण हवा एक गजरा
असुदे हा हा बरोब्बर! कोंकणात
असुदे हा हा बरोब्बर! कोंकणात वळेसारच म्हणतात...
मी विचारलेलं मागच्या वेळी साबांना! 
नाकात मिरमिरवणारा वास असतो ना
नाकात मिरमिरवणारा वास असतो ना याला?
आतापर्यंत वाचलं-ऐकलं होतं, इन फॅक्ट पाहिलंही होतं हे फूल पण त्यालाच सुरंगीचे फूल म्हणतात हे मात्र ठौक नव्हतं.
संस्कृतमध्ये 'पुन्नग' म्हणतात याला.
कित्ती सुंदर गजरा... उचलून
कित्ती सुंदर गजरा... उचलून लगेच माळावासा वाटतोय
जागू, तुला आणि तुझ्या मिस्टरांना धन्यवाद, इतकी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.
अतिशय सुंदर फोटोज
अतिशय सुंदर फोटोज
सुरेख...छान माहिती आणि फोटो
सुरेख...छान माहिती आणि फोटो पण झक्कास.
लेखाचं शीर्षक वाचल्यापासून काहीतरी आठवायचा प्रयत्न करतेय. कुठल्यातरी आवडलेल्या कादंबरीत सुरंगीच्या वळेसरांचा खूपदा उल्लेख होता....लेखक ? रणजित देसाई ?....आता आठवल्याशिवाय चैन नाही पडणार.
ड्रिमगर्ल, कोकणात आणि गोंयात
ड्रिमगर्ल, कोकणात आणि गोंयात सुरंगीचे आणि आबोलीचे वळेसार असतात, गजरे कधीच नसतात. तिथल्या बायका डोक्यात फुले कशी घालतात ते पाहिले तर आपल्याला चक्कर येईल. नारळाएवढा मोठा आंबाडा, त्यावर आबोलेचो वळेसार कलाबुत लावलेला , त्यावर सफेद शेवंतीची वेणी, कलाबुत आणि हिरव्या दो-यासकट आणि त्यावर हिरव्या पानांची वेणी.. लग्नात बघावे असले प्रकार.....
दोन वर्षांपुर्वीच्या गुढीपाडव्याला तिन दिवस ट्रेक करत कोल्हापुर्-आंबोली-कुडाळ फिरत होतो. वाटेत सुरंगीचे वळेसार घेऊन एकजण भेटली. १० रु ला १. पाच घेतले, दोन डोक्यात घातले आणि तीन गाडीत टांगले. अख्खी गाडी सुगंधाने घमघमायला लागली.
रुणुझुणु रणजित देसायांच्या कादंब-यात नसणार. जयवंत दळवींच्या कादंब-यात सापडेल. नाहीतर पेंडश्यांच्या
१० रु ला १. पाच घेतले, दोन
१० रु ला १. पाच घेतले, दोन डोक्यात घातले आणि तीन गाडीत टांगले. << एक मी घेतला
http://raanaphule.blogspot.com/2010/04/blog-post_5369.html
साधना, तू वर्णन केलेल्या
साधना, तू वर्णन केलेल्या बायकांच्या डोक्यातल्या सजावटीला आम्ही " फ्लॉवरपॉट " म्हणायचो

दळवी, पेंडसे....श्शा, जाम आठवत नाहीये. म्हातारी झाले.
वॉव्व! सुरंगीचा सुगंध मनात
वॉव्व! सुरंगीचा सुगंध मनात पुन्हा ताजा झाला!
हळूहळू काजळताना सांज ही
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी...
तुझे भास दाटुनी येती असे अंतरंगी...
हे ऐकताना मी सुरंगीची फुलं इमॅजीन केली होती. तशीच वेड लावणारी सांज आणि वेड लावणारी सुरंगीची फुलं...
मस्त फोटो!!

हो हे मात्र खर. महेश साधना
हो हे मात्र खर. महेश
साधना असले प्रकार आमच्याकडेही चालायचे. पण आता खुप बदल झाला आहे. माणसाकडे पैसा वाढतोय तसा त्या.न्च्या राहणीमानात स्वदेशीपणा सोडून विदेशीपणा येत चालाला आहे. लग्नात अजुनही वेणी ही क.न्पलसरी असते. आणि ती पण एक नवर्याकडून आलेली एक माहेरची आणि शिवाय वेणिला ला.न्ब पट्टा. डोक जड होत पुर्ण.
पुन्हा एकदा सगळ्या.न्चे मनापासुन धन्यवाद.
जागू, परत एकदा जुने दिवस
जागू, परत एकदा जुने दिवस आठवून दिल्याबद्द्ल धन्यवाद. आताच मी कोकण ट्रिपला गेले होते, तेव्हा वाटेत सुरंगीचे वळेसर विकत घेतले. एक डोक्यात माळला, एक गाडीत लावला. पण................ त्याला फार वास नव्हता. त्यामुळे मी फार निराश झाले. फोटो नंतर टाकते.

हा बघ फोटो
फार वास नव्हता म्हणजे ते
फार वास नव्हता म्हणजे ते जास्त परागकण असलेली फुल असतील. मी वरती फोटो दिला आहे बघ वासवाल्या फुलाचा आणि कमी वासवाल्या फुलाचा.
ह्यावर खूपच मध माश्या
ह्यावर खूपच मध माश्या असतात... माझ्याकडे नुकतेच एक झाड आणून लावले आहे.. अजून खूपच लहान आहे...
पहिले फुल कधी येईल त्याची वाट बघतोय.. 
>>सुरंगीच्या कळ्या झाडाच्या
>>सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात
अरे सही! हे माहितच नव्हतं.
अहाहा!!! लय भारी. हा वळेसार
अहाहा!!! लय भारी. हा वळेसार ते.. माका होयो
जागु, छान माहिती आणि फोटो.
जागु,
छान माहिती आणि फोटो.
रोहन हे झाड खुपच हळू वाढत.
रोहन हे झाड खुपच हळू वाढत.
स्वप्ना, निलू, अनिल धन्यवाद.
आईकडून खूप ऐकलं होतं या
आईकडून खूप ऐकलं होतं या वळेसरांबद्दल. पण तुझ्यामुळे पाहता आले. थँक्स जागू! फारच मस्त फुलं आहेत. काश फोटोजमधून त्यांचा सुगंध घेता आला असता.
खरच इथे सुगंध पोचला असता तर.
खरच इथे सुगंध पोचला असता तर. मी परवाच आलो गोव्याहून. ही वेणी मला नाही दिसली. इतर दिसल्यात जशा की कमळाच्या फुलांच्या, अबोली, बकुळी, कुंदा, शेवंती.
Pages