करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत. जर काटी मोठी असेल तर एक पुष्कळ होते. हया लांब काटीचे तुकडे तिरके करायचे म्हणजे काटे व्यवस्थित काढता येतात. कारण ह्याचे काटे तिरके पसरलेले असतात.
७-८लसुण पाकळ्या
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे.
मिठ
तेल.
तुकड्यांना पहिला हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या. मग गरम गरम तव्यावर तेल सोडून तुकड्या तव्यात टाका. गॅस मिडीयम ठेवा. ५ मिनीटांची पलटा ५ मिनीटांत गॅस बंद करा आणि तयार व्हा काटे काढून चविष्ट मांस खायला. हाय काय नी नाय काय ? १० मिनीटांचा खेळ.
काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात.
वा..... निकिता, कर्ली नी
वा..... निकिता, कर्ली नी तिस-याबद्दल वाचताना जीव हळहळला. आपल्या नशिबात आहे का कधी तिथली कर्ली नी तिस-या असे वाटुन गेले. नी माणकुराद वाचताना जीभ लाळेत तरंगायला लागली.
I also like karli too much.
I also like karli too much.
जागू फोटो नं दोन एकदम मस्तं
जागू फोटो नं दोन एकदम मस्तं

जुन्या बीबी वर फक्त दोनच फोटो असायचे.. एक कच्च्या माश्यांचा आणि तयार रेसिपीचा. आता स्टेप बाय स्टेप फोटो आहेत.
जागु तै, ते डोके अन शेपुट
जागु तै,
ते डोके अन शेपुट काढायचे अन तिरके कट्स द्यायचे तर लक्षात आले , पण पोट कसे स्वच्छ करावे हे जरा साद्यंत सांगता येईल का?
(मला हीच विधी बाकी प्रकारच्या मासळीला स्वच्छ करताना सुद्धा कामी येईल असे वाटते)
बायडी आमची मासळी शौक़ीन आहे पण ती पडली राजस्थानातली तिला काय हे सगळे जमत नाही, मी ही शिकतो अन तिला पण शिकवतो म्हणे मी.
(अडाणी मत्स्यप्रेमी) बाप्या
सोन्याबापू डोक संपत आणि पोट
सोन्याबापू
डोक संपत आणि पोट चालू होत अशा जागी एका बाजूला पोटाची नरम जागा लागेल पहा हाताला. त्या नरम भागेला चिर द्यायची. मग त्या चिरेतून पोटातील घाण साफ करायची.
ओक्के तै!!! आता करतो जमेल
ओक्के तै!!! आता करतो जमेल तेव्हा मच्छी अन ओरपतो!
(मोबाइल वर माबो हैंडल करत असल्यामुळे फोटो लोड करने जमना तो भाग अलाहिदा)
Pages