का ग अशी अळीमिळी, काय झालंय ते सांग तरी!
"आत्ता माझा मूड नैये, सांगीन मी मग केव्हातरी!"
अग्गो बाई, हो का म्हणे? कुणीतरी भांडलं वाटतं!
खडीसाखरेचं हसू बागेमध्येच सांडलं वाटतं!
अशी कशी खेळ सोडून राणी एकटीच आली घरी?
"आत्ता माझा मूड नैये, सांगीन मी मग केव्हातरी!"
इवलासा नाकाचा शेंडा, राग मात्र एवढा मोठा
गालावरच्या फुग्यामधला खळीचा सागरगोटा!
काय तरी दिसतंय ध्यान, आरशात जरा पहा तरी!
"आत्ता माझा मूड नैये, पाहीन मी मग केव्हातरी!"
काय करू बाई आता, असला कसला हा फणकारा?
आज माझ्या चिमखडीचा मूड दिसतोय भलताच न्यारा!
टॊम, जेरी, नॊडी, हिला हसवा रे जरा कोणीतरी!
"आत्ता माझा मूड नैये, हसेन मी मग केव्हातरी!"
नको करू या का उद्या हिच्या बर्थडेची पार्टी?
केक, चॊकलेट, पिझ्झा नको, नको बार्बी, नको स्मार्टी
रुसूबाईची कसली पार्टी? गोष्ट आहे ना ही खरी?
आत्ता हिचा मूड नैये, करीन मी मग केव्हातरी!
मनात म्हणते राणी, "हिला थोडं लोणी लावावं का?
बदललाय मूड माझा, आईला हे सांगावं का?
लाडीगोडी लावावी का थोडी पार्टीसाठी तरी?"
गोड हसून बिलगुन मला म्हणते कशी सोनपरी,
"आई ग, पहा ना जरा, खोटं खोटं रुसलेय मी!
तुला आवडतं अगदी तस्सं खुदुखुदू हसलेय मी
आता नाही रुसायची तुझी राणी, तुझी परी
उद्याच करू या ना पार्टी, नको पुन्हा केव्हातरी!"
व्वा...सुरेख..!
व्वा...सुरेख..!
फारच गोड लिहिलंय !!!!!!!!!!
फारच गोड लिहिलंय !!!!!!!!!!
चोरी पकडी गयी... बिच्चारी...
चोरी पकडी गयी... बिच्चारी...
ग्गो...ड आहे अगदी...
ग्गो...ड आहे अगदी...
मस्त
मस्त
क्यूट........
क्यूट........
गोSS ड आहे
गोSS ड आहे
मस्त मस्त.... छान
मस्त मस्त....
छान फुलवलीत...
veryyyyy Cute...
फारच गोड लिहिलंय
फारच गोड लिहिलंय
खूप खूप गोड.
खूप खूप गोड.