लगान एकदा तरी..... (हझल?)

Submitted by अभय आर्वीकर on 1 March, 2011 - 21:32

लगान एकदा तरी..... (हझल?)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

गंगाधर मुटे
..............................................................

गुलमोहर: 

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी.... हाहाहाहा...

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी......हा सुद्धा मस्तच. Happy

मुटेजी,
जबरदस्त !
अशा ओळीमधुन तर तुमचा मुरलेला अनुभव दिसतो !
Happy
हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

विलेक्षनला उभा राहिल्यानंतर नुसती हाक मारा, येताना (माबोवरचा) गठ्ठा मते घेऊनच येतो ..मग बघु एकेकाला !
Lol

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी .............क्या बात है गंगाधरजी...

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी............ व्वाह व्वा ...

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी .............. बहोत खुब ... १ नं.