सालबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पण मायबोलीचा लोगो असलेले टी-शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहोत.. यंदा टी-शर्ट बरोबरच टोपी ही विक्रीसाठी आहे..
यंदा टी-शर्टस् एकाच प्रकारात उपलब्ध आहेत..
-- Round Neck
पण दोन रंगात उपलब्ध आहेत..
-- Black
-- Peach
खालील चित्रात दाखविलेले रंग उपलब्ध आहेत.. टी-शर्टवर पुढे डाव्याबाजूस मायबोलीचा लोगो, पाठीमागे www.maayboli.com व उजव्या बाहीवर www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल
सर्वात महत्त्वाचे : पीच रंगाच्या टी-शर्टसाठी कमीत कमी २५ टी-शर्टस् ची ऑर्डर असणे गरजेचे आहे.. जर २५ पेक्षा कमी टी-शर्टस् ची ऑर्डर असेल तर पीच रंगाच्या ऐवजी पांढरा किंवा काळा ह्या पैकी एका रंगाचा टी-शर्ट निवडावा लागेल.
टी शर्ट खालील साईझेस मध्ये उपलब्ध आहेत:
-- Extra Small (XS) 13 36"
-- Small (S) - 38"
-- Medium (M) - 40"
-- Large (L) - 42"
-- Extra Large (XL) - 44"
-- Extra Extra Large (XXL) - More than 44"
टोपी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे उपलब्ध आहे..
टोपीचा रंग Neavy Blue असुन त्यावर पुढे मायबोलीचा लोगो व बाजुला www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल...
कृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर mb_tshirts@yahoo.co.in ह्या mail id वर दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहावे.
ऑर्डर खालील format मध्ये द्यावी:
१. नाव
२. मायबोली id
३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक
४. टी- शर्ट चा साईझ
५. टी- शर्टची संख्या
६. टी- शर्टचा रंग
७. टोप्यांची संख्या
८. पैसे कसे भरणार - On-line की प्रत्यक्ष
(एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.)
आपापली order दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही.
Order निश्चित करणे व रहीत करणे या दोन्ही साठी ३ जुलै २००८ ही तारीख बंधनकारक असेल.
तसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसार, टी-शर्टच्या व टोपीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम कुठल्याही एखाद्या चॅरिटी ट्रस्टला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमती खालील प्रमाणे.
टी-शर्ट - १७०+५०(charity) = रु. २२०/-
टोपी - ८०+३०(charity) = रु. ११०/-
ही किंमत व. वि. ला उपस्थित असणारे मायबोलीकर तसेच पुणे आणि मुंबई मधील मायबोलीकरांसाठी आहे.
पुणे, मुंबई व्यतिरिक्त भारतातल्या इतर शहरातील मायबोलीकरांना टी-शर्ट हवे असतील तर त्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी वेगळा packaging आणि postage चा खर्च येईल व तो ऑर्डरनुसार कळविण्यात येईल.
ह्या वर्षीची चॅरिटीची रक्कम "वनवासी कल्याण आश्रम" ह्या संस्थेस देण्याचे ठरविले आहे.
अधिक माहिती साठी ही लिंक पहा http://www.vanvasikalyanparishad.org/home.htm.
टी-शर्ट तसेच टोपीचे पैसे On-line भरणार असल्यास त्यानुसार अकाऊंट डिटेल्स कळविण्यत येतील. तसेच प्रत्यक्ष पैसे भरण्याची तारीख व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.
ऑर्डर निश्चित करण्यासाठी पूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे.
तेव्हा त्वरा करा आणि आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच द्या!
देशाबाहेरील लोकांसाठी - ज्यांना टी-शर्ट हवा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर email करावी. देशाबाहेरून किमान २० orders आल्या तरच टी शर्ट पाठविण्याची सोय केली जाईल. वर दिलेली किंमत ही फक्त टी शर्टची मूळ किंमत आहे. Shipping आणि Packaging charges देशानुसार वेगळे असतील व ते नंतर कळविण्यात येतील
धन्यवाद. !!!
टोपीचा
टोपीचा समोरचा भाग (वायजर) जरा अजून वर वळलेला असावा का? जास्त फ्लॅट वाटतोय. आणि टोपी पण पीच रंगात असणार आहे का? (शर्टाला मॅचिंग! ) टोपीत पण साइझेस आहे का?
आर्डर
आर्डर पाठिवलिया ... पोच द्या.
परागकण
मृ, टोपी
मृ, टोपी दोन साईझेस मध्ये मिळू शकते. regular आणि kid साईझ.
टोपी एकाच रंगात उपलब्ध आहे Neavy blue..
आणि टोपीचा वायझर तुम्हाला पाहिजे तसा वळवून घेऊ शकता.. त्याला स्टिचिंग आहे त्यामुळे सुरवातीला दिलेला आकार शक्यतो तसाच राहिल.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
मला हे
मला हे टि-शर्ट प्रत्यक्ष बघायला कुठे मिळतील? मी सध्या पुण्यनगरीत रहातोय...
सुमित, जसे
सुमित, जसे टि-शर्ट वरील चित्रात दिसत आहेत तसेच असतील.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
मी पण पीच
मी पण पीच कलरच्या चहा-सदर्याची ऑर्डर दिली आहे.
मेल पोहोचला असेल तर रिप्लाय करा...
सुधाकर..
सुधाकर,तुम
सुधाकर,तुमची मेल मिळाली.. तुम्हाला पोचपावती पाठवली आहे.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
ऑर्डर
ऑर्डर पाठवली आताच .. पोच मिळणार का?
धन्यवाद
सदरा समिती
सदरा समिती मी ऑर्डर केली आहे... पोचपावती द्या...
इंद्रा
इंद्रा ऑर्डर मिळाली नाही अजुन...
==================
डिंग डाँग डिंग
धन्यवाद,
धन्यवाद, चहा सदर्याच्या ऑर्डरची पोचपावती मिळाली.
--
धन्यवाद,
kadamcd@gmail.com
सदरा
सदरा समिती... ऑर्डर केली आहे, पोचपावती द्या.
सदरा
सदरा समिती... ऑर्डर केली आहे.
समिती,
समिती, बाहेरगावी गेल्यामुळे ऑर्डर द्यायची राहिली होती. कृपया घेउ शकाल का? आताच मेल केली आहे.
नविन
नविन टी-शर्टच्या ऑर्डर्स घेणे बंद केलेले आहे
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
आह, late
आह, late current.
.
पुढच्या वेळेस Formal T-Shirts ठेवन्याचा विचार करावा. कॉलर वाले.
नमस्कार! मी
नमस्कार!
मी दोन टी शर्टस ची मागणी नोंदविली आहे. पण मला पुण्यात कलेक्ट करायला यायला जमणार नाही. माझे शर्टस झकासराव कलेक्ट करेल माझ्यासाठी. झकासशी बोलणे झाले अहे आधीच.
यासाठी मला कुणाला मेल पाठवावी लागेल का? की इथे लिहिने पुरेसे आहे?
श्रवण,
श्रवण, कृपया याहू अकाऊंटला एक मेल पाठवाल का?
याहू अकाऊंटवर सर्व डेटा आहे, त्यामुळे तिथेच ही मेलही असेल तर बरे पडेल.
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
टी-शर्ट
टी-शर्ट समिती, तुमची online पैसे भरण्याची मेल मिळाली....... packaging आणि postage चा खर्च किती येईल?
टी शर्ट
टी शर्ट समिती, झकासने माझे टी-शर्ट कलेक्ट करावेत यासाठी मेल पाठवली आहे.
मिळाली का?
ज्या
ज्या मायबोलीकरांनी पुण्याहून टीशर्ट ऑर्डर केले आहेत, त्यांनी १९/२० जुलै ही तारीख 'लाल' करून ठेवली आहे ना? बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकिटखिडकीशेजारील कट्ट्यावर तुमचे टीशर्ट आणि टोपी मिळणार आहे. या दोन्ही दिवशी संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळात मायबोली टीशर्ट आणि टोपीचे वितरण होईल.
'वर्षाविहाराचे' पैसे ही याच दोन दिवसात घेण्यात येणार आहेत. तेव्हा ज्यांनी वर्षाविहार आणि/ किंवा टीशर्ट-टोपी यांची नोंदणी केली आहे त्यांनी १९/२० जुलैला बालगंधर्वला येण्याचे करावे.
मुंबईकरांचे वर्षाविहारापूर्वीचे सम्मेलन २० जुलैलाच आहे. त्याच दिवशी त्यांचेही टीशर्ट-टोपी द्यायची व्यवस्था होईल का याची चाचपणी करत आहोत. तसे झाले तर मुंबईकरांनाही त्यांचे टीशर्ट-टोपी २० जुलैलाच मिळेल आणि वविला त्यांना ते घालून येता येईल. मात्र २० जुलैला टीशर्ट देता आले नाहीत, तर त्यांना त्यांचे टीशर्ट-टोपी वर्षाविहारच्या दिवशी, अर्थात २७ जुलैला मिळतील.
भेटू,
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
खुप उशीरा
खुप उशीरा झाला पण मला ते टी-शर्ट हवे आहे.
क्रुपा करुन कोणी मदत करेल काय.
जर कोणाकडे एक्ट्रा टी-शर्ट असेल तर क्रुपा करुन संवाद साधा pramodrbhosale007@gmail.com
---धंन्यवाद---
---प्रविण----
टी शर्ट
टी शर्ट समिति,
मी अमेरिकेत ब्लूमिन्ग्टन येथे स्थित आहे. ब्लूमिन्ग्टन ला बरेच मराठी लोक आहेत. तेव्हा इथे टी शर्ट विक्रीला नक्किच चान्गला प्रतिसाद मिलेल. काहि कारणास्तव मला तुम्च्य्यशि सम्पर्क करायला उशिर झाला त्यबद्दल क्षमस्व.
क्रुपया जर टी शर्ट अजुनही उपलब्ध असतील तर मला जरूर कळवा हि विनन्ति. आपल्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे.
आमित मनोहर
टी शर्ट
टी शर्ट मिळाला... छान आहे...... घारुअण्णा, दत्तराज भेटून आनन्द वाटला....
Pages