Submitted by के अंजली on 22 February, 2011 - 04:20
वर्षाराणी मुग्ध बालिका
सृष्टीची ती गोडच कलिका..
छोटे ढगुले सखे सौंगडी
अन वादळवारे खेळगडी..
वीज असे ही मोठी ताई
दंगा करता फटके देई..
झरझर आसू डोळा झरता
सूर्य हासरा वाकून बघता..
इंद्राचे ते धनु कमानी
पाहून हासे वर्षाराणी..
रंगीत मोती असे उधळीता
वर्षाराणी रडे विसरता..
हसरी किरणें नभात भरती
लटिके आसू पानांवरती...!
गुलमोहर:
शेअर करा
गोSSSड
गोSSSड
छानच आहे बालकविता
छानच आहे बालकविता
छोटे ढगुले >>>> मस्तच
छोटे ढगुले >>>> मस्तच आहे........
अंजू तो ढगुले शब्द इतुका गोड
अंजू
तो ढगुले शब्द इतुका गोड आलाय, त्याचा शब्दाचा गालगुच्चा घ्यावा वाटला अगदी
सुंदर, गोड आहे कविता
सुंदर, गोड आहे कविता
मजा आली.....आजोबाला सुद्धा
मजा आली.....आजोबाला सुद्धा