Submitted by शैलजा on 14 February, 2011 - 22:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी चण्याची डाळ
३ ते ४ वाट्या नारळाचा रस वा दूध
अर्धा वाटी बारीक चिरुन गूळ
वेलची
काजू
नारळाच्या खोबर्याचे बारीक काप
चवीला किंचित मीठ
क्रमवार पाककृती:
१. चण्याची डाळ कूकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी.
२. शिजल्यावर चांगली घोटावी व त्यात गूळ घालून थोडा वेळ पुन्हा गॅसवर शिजू द्यावी. शिजताना गूळ व डाळ एकत्र होण्यासाठी ढवळावी.
३. एकत्र झाल्यावर गॅस बंद करुन त्यात नारळाचे दूध घालावे.
४. ओल्या खोबर्याचे काप, काजू घालावे. स्वादासाठी वेलची पूड घालावी.
५. चवीपुरते किंचित मीठ घालावे.
मनगणं तयार. देवीच्या नैवैद्यात मनगणं हवंच.
वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
नारळाच्या दूधाऐवजी नेहमीचे दूध घालता येईल. तसे घतल्यास दूध घालूनही शिजवता/ उकळता येईल. नारळाचे दूध घालून मात्र उकळू नये.
माहितीचा स्रोत:
पारंपारीक. आई, आजी.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे पा कृ.
छान आहे पा कृ.
हे तर पुरण सारखेच आहे फक्त
हे तर पुरण सारखेच आहे फक्त दुध सोडले तर.
धन्यवाद शैलजा आमच्याकडे
धन्यवाद शैलजा
आमच्याकडे (कानडी लोकांमधे) देवाला नैवेद्य करताना हा प्रकार केला जातो पण नाव वेगळ थोड्या फार फरकानी पुरणाची खीरच
>>हे तर पुरण सारखेच आहे फक्त
>>हे तर पुरण सारखेच आहे फक्त दुध सोडले तर. >> पुरण कोरडे असते आणि ही खीर, हा मोठा फरक आहे.
ओ ... म्हणजे हे स्विट डिश
ओ ... म्हणजे हे स्विट डिश म्हणुन वापरावे असेच ना?
हे मनगणं एका मैत्रिणीच्या
हे मनगणं एका मैत्रिणीच्या डब्यातलं चाखलं होतं. पण तिने बराच सुकामेवा घातला होता. त्यामुळे ते चांगलंच दाट झालं होतं.
शैलजा, ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे की सुक्या खोबऱ्याचे?
मंजू, ओल्या खोबर्याचे बारीक
मंजू, ओल्या खोबर्याचे बारीक काप.
>तिने बराच सुकामेवा घातला होता >> आपण करु ती व्हेरिएशन्स गं. मूळ पाकृ मधे खूप सुका मेवा नाही घालत.
राजेश्वर, गोडाचा पदार्थ आहे तो.
आई बरेचदा करते.. खुप छान
आई बरेचदा करते.. खुप छान लागत..
लहानपणि आम्ही त्याला जनगणमन म्हणायचो..
चण्याच्या डाळी ऐवजी कोणती डाळ
चण्याच्या डाळी ऐवजी कोणती डाळ वापरू शकतो?
शैलजा, माझी आज्जी बनवते
शैलजा, माझी आज्जी बनवते शुक्रवारी देवीच्या नैवेद्याला ही खीर. अशीच साधी.
मी अमि, मुगाची डाळ घालून पण छान होते ही खीर. इथे रेसिपी पहा - http://www.maayboli.com/node/6293
जनगणमन मिनोती, हो, मुगाच्या
जनगणमन
मिनोती, हो, मुगाच्या डाळीची खीरही मस्त लागते ही देखील होते आमच्याकडे बरेचदा.
अमि, मिनोतीने उत्तर दिलेय बघ.
मी खूपदा खाल्लाय हा प्रकार
मी खूपदा खाल्लाय हा प्रकार 'प्रसाद' म्हणून! जेव्हा तो प्रसाद म्हणून खातो तेव्हा त्याला येणारा सूक्ष्मसा कापराचा, अगरबत्तीचा वास, कधी त्याबरोबर येणारे तुळशीचे पान यांची सर्वांची चव मनगणं मध्ये इतकी बेमालूमपणे मिसळलेली असते!! मस्त आठवण करून दिलीस.
मी नाही खाल्ली अजुन ?? कधी
मी नाही खाल्ली अजुन ?? कधी येऊ
LOL स्मिता, कधीही ये
LOL स्मिता, कधीही ये
छान..सोपी पाकृ आहे करायला
छान..सोपी पाकृ आहे करायला
छान
छान
जनगणमन म्हणायचो..
जनगणमन म्हणायचो..
मस्त. खल्लिये ही प्रसादाची
मस्त. खल्लिये ही प्रसादाची खीर
करुन बघुया
करुन बघुया
मस्त. पुरण करताना हा अजुन एक
मस्त. पुरण करताना हा अजुन एक प्रकार करता येईल.
फोटू का नाही टाकला? गोड
फोटू का नाही टाकला?
गोड पदार्थ आहे ना हा? रंग वगैरे घालतात का, या पदार्थाला स्वत:चा असा रंग असतो?
बाकी पाकृ तशी सोप्पी आहे.
(पण माझा करायचा आनंद आहे त्याचं काय?)
रंग वगैरे नाही घालायचा. गोडच
रंग वगैरे नाही घालायचा. गोडच आहे. गूळ घालतोय ना?
चण्याची डाळ, गूळ आणि दूध ह्या पदार्थांचा रंग - पिवळसर असा येतो. ह्यासाठी चांगला पिवळ्या रंगाचा गूळ घ्यायचा, छान रंग येतो. नारळाच्या दुधाने दाट होते खीर.
ह्याहूनही दाट हवी असेल, तर थोड्या पाण्यात वा दुधात (अर्धीवाटी वगैरे) जोंधळ्याचे पीठ कालवून खीर शिजताना त्यात घालायचे व ढवळून एकजीव करावे.