Submitted by कौतुक शिरोडकर on 14 February, 2011 - 02:38
तू कैफ शांभवीचा, रमतो तुझ्या सवे मी
अन घोट घोट जगणे, जगतो तुझ्या सवे मी...
ये चोरपावलांनी, स्वप्ने कुशीत भोळी
अलवार त्या कळ्यांसम, फुलतो तुझ्या सवे मी...
ते लाघवी उसासे, श्वासात धुंद गाणी
आवेग स्पंदनाचा, झुलतो तुझ्या सवे मी...
नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...
क्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या
तुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम गझल आणि सर्वच्या सर्व
अप्रतिम गझल आणि सर्वच्या सर्व शेर उल्लेखनिय.
आवडत्या १० त
वेळ मिळाला तर राजे आता
वेळ मिळाला तर राजे

आता पुन्हा लिहायला चालु करा
आवडली हे सांगणे नलगे !!!
सुंदर!!
सुंदर!!

अप्रतिम...... वेल कम बॅक.....
अप्रतिम...... वेल कम बॅक.....
अहाहा..! कौतुक विश्वास बसत
अहाहा..! कौतुक विश्वास बसत नाही ही तुझी रचना आहे...व्वाह्...अस्सल मराठी! तुझे करावे तितके कमी कौतुक..!
नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...>>> व्वाह...!
सुंदर, सहज, तरल.आवडली.
सुंदर, सहज, तरल.आवडली.
भलतीच जीवघेणी, ही रीत
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी........... व्वा,जीवघेणा शेर.
कौतुका मस्त !!
कौतुका मस्त !!
खासच!! प्रत्येक शेर सुंदर
खासच!! प्रत्येक शेर सुंदर आहे.
भलतीच जीवघेणी, ही रीत
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...
व्वा!
मस्त!!
रामकुमार
ग्रेट.... भारीच... सगळेच शेर
ग्रेट.... भारीच... सगळेच शेर एकसे एक...
भलतीच जीवघेणी, ही रीत
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...>>> हा आवडला
खूप आवडली गझल.... इतकं सुंदर
खूप आवडली गझल.... इतकं सुंदर कसं काय लिहू शकता तुम्ही लोक?
अहा.. कसली अप्रतिम आहे
अहा.. कसली अप्रतिम आहे गजल..!! सर्वच शेर सुंदर !!
मस्त मस्त मस्तच
मस्त मस्त मस्तच
मस्त
मस्त
नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद
नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...>>>>>>>>> सही !
कौतुका तुझं खुपखुप कौतुक!
कौतुक गझल आवडली. भलतीच
कौतुक गझल आवडली.
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...
क्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या
तुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...>>> सहीयेत.
भलतीच जीवघेणी, ही रीत
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...
मस्त...........
सुंदर.
सुंदर.
कौतुक, अत्यंत तरल आणि सुंदर
कौतुक, अत्यंत तरल आणि सुंदर गजल! आवडली.
मस्त...
मस्त...