खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...

Submitted by shailesh vasant... on 5 February, 2011 - 11:09

खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
SHIVTHAR RASTA1.JPGसमर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
DASNAVAMI SATKAR1.JPG
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.

समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.

सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.

छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

RAMNAGAR PETH1.jpg

समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
JAMBHALICHA MAAL1.JPG
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. KALYANSWAMI- SAMARTH1.JPG
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
RAMDAS PATHAR.jpg
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकरDASNAVAMI SATKAR1.JPGSHIVTHAR RASTA1.JPG

गुलमोहर: 

दोन गटांमधली सुंदोपसुंदी कमी होती म्हणून की काय हा अजून एक गट निर्माण झालेला दिसतो आहे.
रामदास स्वामींनी जे कार्य केले त्याची थोडी जरी चाड असेल, तरी तुम्ही व इतर सर्व संबधितांनी ही सगळी सार्वजनिक साठमारी थांबवा.

समर्थांचे वास्तव्य असलेल्या अनेक घळी माहीत आहेत. त्यात एकाची भर पडली तर आनंदच आहे. बाकी खर्‍या सामान्य समर्थप्रेमींना कुठे जास्त संख्येने भक्त जमतात आणि कुठे जास्त दक्षिणा गोळा होते आणि कुठल्या शोधक सदगुरूंचे महात्म्य अधिक वाढते यात अजिबात रस नाही. उलट समर्थकार्याची ही विटंबना पाहून मन उद्विग्नच होत आहे. तरी कृपया हे थांबवा.

रामदासांना वादग्रस्त करण्याचे महत्कार्य ब्रिगेडने योजिले आहेच, त्याला किमान त्यांचे भक्त म्हणवणार्‍यांनी तरी हातभार लावू नये अशी अपेक्षा आहे.

हे सर्व फक्त तुमच्या गटाला नाही तर तिन्ही गटांना उद्देशून आहे, पण असे वाद आपापसात सोडवण्याऐवजी तुम्ही इथे चव्हाट्यावर आणत आहात म्हणून तुम्हाला विशेष विनंती करत आहे.

जी एस यांना अनुमोदन. हा वाद ( खरे तर हा वाद असायचेही कारण नाही ) आपापसात सामंजस्याने सोडविता येणार नाही का ? चॅनेल वाल्यांकडे जाऊन नक्की काय साध्य होणार आहे ?

अरेरे ! इथेपण राजकारण / परस्पर हेवेदावे का ? किमान रामदासस्वामींना तरी सोडा अशा राजकारणातुन.

मी ऐतिहासिक पुरावे तपासलेले नाहीत. पण पावसाळ्यात दोनदा शिवथळला जाण्याचा योग आला होता; रामदासस्वामीनी जर त्या स्थळीं वास्तव्य केले होते असेल, तर त्यांच्या निवडीला मात्र दाद द्यायलाच हवी ! सह्याद्रीच्या कुशीत इतकी निसर्गसुंदर, चिंतनासाठी निवांत, गुप्ततेसाठी आदर्श व घाटावरून संपर्कासाठी तशी सोईचीही दुसरी जागा क्वचितच असेल !

रामदासस्वामींनी ज्या घळीत वास्तव्य केले तिथे जाऊन पर्यावरणाचा -हास करण्यापेक्षा आपण आहोत तिथेच राहुन स्वामींचे विचार अंगात आणि आजुबाजुच्या इतरांच्याच बाणवण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य नाही का???

समस्त दास परिवाराच्या भावना तीव्र झाल्या आहेत यात शंकाच नाही. पण जे खरे आहे ते खरे मानायचेच नाही काय? येथे आधी दोन गट होते ते तीन झाले असे म्हणताना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे. यातही तथ्य नाही काय? सद गुरु अरविंद नाथ महाराज काय म्हण तात आणि मी काय लिहितोय यात चव्हाटा नसून समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' अशी आज्ञा आहे. ती समर्थ परिवाराने शीरसावंज्ञ मानावी. एवढेच सांगणे आहे. या साठी अवश्य वाचा
http://www.maayboli.com/node/23327
http://realshivtharghal.blogspot.com/2010/12/real-swayanbhu-shivthar-gha...

रामदासस्वामींनी ज्या घळीत वास्तव्य केले तिथे जाऊन पर्यावरणाचा -हास करण्यापेक्षा आपण आहोत तिथेच राहुन स्वामींचे विचार अंगात आणि आजुबाजुच्या इतरांच्याच बाणवण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य नाही का??? >>>>
अनुमोदन

ह्यात आपली सर्व उर्जा वाया घालवण्यापेक्षा, आजची सामाजीक स्थिती सुधारायचा प्रयत्न केला तर बरे.

>>>दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे.
>>>सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे. यातही तथ्य नाही काय?
>>समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' अशी आज्ञा आहे..

समर्थशब्दांचा असा विपर्यास्त अर्थ लावत असाल तर तुमच्यापासून आणि तुमच्या स्वयंघोषित सदगुरूंपासून
समर्थांचे रक्षण तो प्रभू श्रीरामच करू जाणे.

बाकी चॅनल्स, लेख, अजून काही वाद याद्वारे प्रसिद्धी मिळवून अधिकाधिक लोक 'तिकडे' येवोत व तुमच्या सदगुरूंचे खिसे भरोत ही मनःपूर्वक शुभेच्छा. नाहीतरी 'जोडोनिया धन उत्तम, व्यवहारे !!' अशी समर्थाज्ञा आहेच, तिचे पालन करणे एवढेच तुमच्या हातात आहे ना. (आता या ओळीचा अर्थ वेगळा आहे, त्यात स्वल्पविराम नाही आणि ती तुकोबांची आहे हे खरे), पण त्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही असे दिसते.

समर्थांनी लिहिलेले विचार महत्वाचे आहेत की ते कुठे बसून लिहिले हे ठिकाण ? मला तर हा सारा प्रकार आपली प्रसिद्धी वाढविण्याचा आणी खिसे भरायचाच दिसतो.

Sir: Thanks a lot for your reply. I'll like to inform you that I'm journalist & also writting these articles confirming all the proofs of this discovery. Sadguru Arvindnath Maharaj is not only belonging to the holly ways but he is retired from Pune University. He has Studied from 25 years on this subject. First he confirm the Shivthar Ghal discovered by Shankar Shrikrushna Dev was under doubt. Then on 11 April 2009 he found the cave & It indicates all the discribtion made by Ramdas Swami which you can read on the Blogs. I have studied all the litreture of Ramdas Swami for the confirmation. & I also come to conclusion that the newly discovered cave is Real Shivthar Ghal. But Those who are economcally intersts in the cave discovered by Shankar Shrikrushna Dev are provoking the local people so it's true that if we are tring to get in limelight using such issues
we will lose all the public support and faith. but If not Ramdas Swami's Real Shivthar Ghal become in limelight. So, You are welcome to Real Shivthar Ghal.
Shailesh Palkar.
9226849185
9890320127

क्षमस्व माझ्या प्रिय मराठी भाषिक वाचकांनो,
सदगुरु अरविंदनाथ महाराज यांनी गेल्या २५ वर्षांच्या अभ्यासाद्वारे एक बाब निश्चित मानली जी शंकर श्रीकृष्ण देव यांनाही शिवथर घळ शोधल्यानंतर ती खरी आहे अथवा कसे याबाबत शंका आहे. या काळात ११ एप्रिल २००९ रोजी त्याना एक अशी गुहा आढळून आली. जिच्यामध्ये खनाळ म्हणजेच भिंती होत्या. समर्थांनी याचे वर्णन `खनाळा मध्ये जावून राहे, तेथे कोणीच ना पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे, सर्व काळ,' असे केले आहे. या आणि अश्या सर्व पुराव्यांची खातरजमा करून मी अनेकदा त्या घळीचे अवलोकन केले आहे. माझ्या लिंक वरील लेखनात आपण याविषयी सविस्तर वाचू शकाल. येथे रामगंगा आहे, गुप्तगंगा आहे, सन्निध राम वरदायिनी आहे, हि वर्णने केवळ याच घळी मध्ये अनुभवता आली आहेत. समर्थानी १० संवत्सरापर्यंत शिवथरघळीमध्ये राहून सर्वग्रंथ लेखन केले. हि क्रिया शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या घळीत केवळ अशक्य आहे. तेथे १० संवत्सरात १० पावसाळे गृहीत धरल्यास त्यातील पहिल्या पावसातच आपणा सारख्या समर्थ प्रेमींचे कपडेही ओले चिंब होतील तर समर्थ तेथे लेखन करू शकले असते काय? लेखन केलेच असते तर ते भिजून गेले नसते काय? तसे झाले असते तर आपण ते कसे वाचू शकलो असतो सांगा. म्हणजेच समर्थांचे विचार जेवढे महत्वाचे तेवढे ते ठिकाण सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळेच इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम हि समर्थांची आज्ञा महत्वाची आहे. आता विषय घेवू प्रसिद्धी आणि खिसे भरण्याचा जी जागा शिवथर घळ आहे अथवा कसे हा प्रश्न ती घळ शोधणाऱ्या शंकर श्रीकृष्ण देव यांना पडला होता त्या घळीवर विश्वास ठेवून आपण ज्या श्रद्धेने तेथे जात असू ते ठिकाण आपणच भरभराटीला आणले आहे. अपूर्ण संशोधनास आपण खिसे रिते करून सहकार्य करतो पण पूर्ण संशोधनाबाबत अविश्वास दाखवितो. त्याची प्रसिद्धी होवू लागताच रामदास पठार नावातील रामदास नावावरच काळा रंग फासतो. हि रामदास स्वाम्मीवरची श्रद्धा आहे काय? कडाडून विरोध करणारे जीएस सारखे लेखक दुसऱया नव्या स्वयंभू शिवथर घळीत जाण्या पूर्वीच आपली जहाल मते व्यक्त करतात. आम्ही दोन्ही ठिकाणे आभ्यासली आहेत. आभ्यासुनी प्रकटावे, न परी प्रकोटुणी नासावे हे बरे नव्हे.
जय जय रघुवीर समर्थ

माघ चतुर्थी महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस
FIRST GANESHOTSAV.jpgभाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या आजच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.

'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला. यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.

जीएस हे सुध्दा खिसे भरण्यासाठीच आहे की प्रसिद्धी मिळविण्यासाठी? प्रेमाने सांगतो, स्वयंभू शिवथर घळीचा उल्लेख समर्थांनी `महिमा तो वर्णवेना, विशेष बहुतां परी, विद्यापीठ ते आहे, आनंद वन भुवनी' असा केला आहे. या विद्यापिठात आपण आल्यास स्वागत करू अज्ञान दूर करू. गणू म्हणतात त्याप्रमाणे स्वामींचे विचार अंगात आणि आजुबाजुच्या इतरांच्याच बाणवण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य वाटते म्हणूनच ते विचार समर्थांच्याच भाषेत लिहावेसे वाटते. त्यांना राजकीय झालर देवून आम्हाला आढळलेल्या भटाचा माळ आणि मठाचा माळ असे दोन सात बाराचे उतारे पुन्हा करावयाचे नाहीत. महाराष्ट्राला केवळ समर्थांच्याच विचारांची गरज आहे. सामाजिक परिस्थिती बदलण्याची क्षमता त्यातच आहे. कोण शैलेश पालकर? आणि कोण अरविंदनाथ महाराज? हे महत्वाचे नाही. ध चा मा करण्याची वृत्ती सोडून द्या आणि करा जयघोष जर खरेच तुम्ही समर्थांवर श्रद्धा बाळगीत असाल तर `जय जय रघुवीर समर्थ'. लोकमान्यांना जे मान्य होते ते समर्थांचे खरे पण आपण लोकमान्याच्याच नावे करून शिवकाळातील पहिला पाच महिने झालेला सार्वजनिक गणेशोत्साव विसरतो आणि कोणी स्मरण करून देत असेल तर आपले उथळ ज्ञान त्यावर डागून बुद्धीभेद करू पाहातो. याचा राग नाही पण कीव नक्कीच येते. `विद्यापीठ ते आहे, आनंद वन भुवनी' जीएस आपले खरेच स्वागत आहे. आपल्या जहाल टीकेमुळे मला माझे समर्थान बाबतचे त्रोटक ज्ञान मांडण्याची संधी दिलीत. जे जे आपणासी ठावे........शहाणे करुनी सोडावे सकाळ जन.

चानेलवाल्यांकडे अरविंदनाथ महाराज गेले नाहीत. पुणे येथील जनरेशन नेक्स्ट सिटी चानेलचे पत्रकार स्वयंभू शिवथर घळीत आले. कधी तरी ते चुकत असतील पण अनेकदा ते बरोबर असतात. त्यांच्या बध्दल कोणी पूर्वग्रहदुषित असू नये. खरे तर कोणाबध्दलहि तसे असू नये. ते पत्रकार आहेत ते आपण घरी बसून पाहाल यासाठी आपणासमोर सत्य बाजू आणण्याचा प्रयत्न स्वत: स्वयंभू शिवथर घळीत येवून करतात. तो महाराजांचा आणि माझा नाही तर समर्थाच्या विचारांच्या प्रसिद्धीचा भाग आहे. येथे माझे लेखनही याच हेतूने आहे पण... आपणा सारखे या प्रयत्नांनमागील मेहनत-अभ्यास झटक्यात टीकेचे लक्ष्य करतात. मी पत्रकार आहे. हे लिहिल्यावर आणखी दुषित पूर्वग्रह ओकले जातील. पण तरीही सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे.
जय जय रघुवीर समर्थ

कालच मित्राशी बोलत होतो...
आता समर्थांना भेटायचेच असेल, तर ते दासबोध, आत्माराम यातूनच.
आता ते गडावरही (सज्जनगडावर) नाहीत आणि कुठ्ल्या घळीत बिळीत तर मुळीच नाहीत.
श्या...

उद्विग्न Sad

आता समर्थांना भेटायचेच असेल, तर ते दासबोध, आत्माराम यातूनच.
आता ते गडावरही (सज्जनगडावर) नाहीत आणि कुठ्ल्या घळीत बिळीत तर मुळीच नाहीत.

>>>
अनुमोदन!!!
हे आता सर्वच श्रद्धास्थानांच्या बाबतीत खरं आहे...

ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी,
--- विद्वान परिषदे साठी विद्वान आणायचे कोठुन? त्यामुळे मला सत्यता पडताळून पहाण्यात काहीही स्वारस्य नाही आहे :स्मित:.

स्वयंभू शिवथर घळ एक नवी घळ जेथे समर्थ रामदास स्वामींनी सर्वग्रंथ लेखन केले.

Full Ghalai1.jpg
'सकळ देवांचिये साक्षी।गुप्त उदंड भूवने।
सौख्यासि पावणे जाणे। आनंदवनभुवनी॥'
समर्थ रामदास स्वामींची असंख्य गुप्त भुवने असताना त्यांनी श्रीसमर्थ दासबोधादी ग्रंथांची निर्मिती केली ती शिवथरप्रांतातील घळ सध्या अस्तित्वात असलेली आहे अथवा कोणती? याबाबत संशोधन करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी
'वेदशास्त्र धर्मचर्चा। पुराणे माहात्मे किती।
कवित्व नूतने जीर्णे। आनंदवनभुवनी॥'
या समर्थ रामदासस्वामी लिखित 'आनंदवनभुवनी' कवनामध्ये दिलेल्या वर्णनांनुसार दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे ठिकाण शोधून काढले असून महाड-भोर रस्त्यापासून जवळच रामदासपठारजवळ सुंदरमठ आणि वरंध कुंभारकोंड येथे स्वयंभू शिवथर घळ शोधून काढली आहे. हे दोन्ही शोध दि.०१/०१/२०११ रोजी आध्यात्मिक जगतातील तमाम रामदासींसाठी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी नववर्षभेट असल्याचे सांगितले आहे.
स्वयंभू शिवथरघळ
तब्बल शंभर वर्षांपूर्वी सन १९१० मध्ये समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्यामते सध्या अस्तित्वात व सर्वशृत असलेली शिवथर घळ शोधून काढण्यात आली. मात्र, दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे हेच ते ठिकाण अथवा अन्य कोणते याबाबत शंकर देव यांच्या लिखाणामध्ये साशंकता वेळोवेळी दिसून येत असल्याने त्यांच्या शिवथरघळशोध समर्थसाहित्यासह समर्थ रामदास स्वामींच्याही साहित्याचे पारायण करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना ११ एप्रिल २००९ रोजी रामदासपठार येथील समर्थमठामागील बाजूस असलेल्या वरंध कुंभारकोंड गावाच्या हद्दीतील उभ्या डोंगरामध्ये एक घळ असल्याचे आढळून आले. भर वैशाख वणवा असलेल्या हवामानातही या घळीच्या डाव्या बाजूला असलेला धबधबा सहा इंच धारेने वाहत असल्याचे दिसून आले. मात्र, या धबधब्याचे पाणी त्या कातळाबाहेर पसरत नसल्याचेही आश्चर्य वाटत होते. घळीच्या प्रवेशद्वाराची भिंत मोजून दोन हात रूंदीची आणि प्रवेशद्वार तीन हात रूंदीचे असल्याने स्थापत्यशैलीचा प्रत्यय येत आहे. या भिंतीच्या बाहेर दोन खण असून दोन खिडक्यांसदृश्य हवा खेळती राहण्यासाठी पोकळयाही आहेत. घळीमध्ये प्रवेश केल्यावर समोरच समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा दिसून येते. या बैठकीवर आसनस्थ झाल्यावर समोर साधारणत: अर्ध्या कि.मी. अंतरावर गोविंदमाची दिसते. तेथून बोलणा-याचे बोलणे थेट घळीमध्ये ऐकू येते. घळीच्या आतमध्ये सव्वासहा फूटापर्यंत तासलेली धनुष्याकृती गुहा आहे. किमान ५० ते ६० माणसे येथे बसू शकतात. या गुहेच्या आतील भागात एक खूपच दूर अशी शेवटाकडे निमूळती होत जाणारी पोकळी आहे. घळीच्या तासलेल्या वरच्या पाषाणाच्या भागात प्रकाशाचे परिवर्तन होऊ शकेल, असे तासलेले दिसून येते. त्यामुळे जशी ही गुहा हवेशीर वाटते तशी पुरेशा प्रकाशानेही परिपूर्ण आहे. घळीच्या आतील भागात असलेली भिंत एक हात रूंदीची असून त्यामागील बाजूला देवघर असावे असा उंचवटा दिसून येतो. तेथे भिंतीमध्ये काही खणही दिसून येतात. आतील हवामान प्रसन्न आहे. समोर पारमाची आणि गोविंदमाचीचे पठार देवगिरी टेकडी, तीन प्रवाह मिळतात असे गुप्तगंगेचे ठिकाण, घळीच्या समोरच संपणारी भटाच्या माळाची हद्द आणि सुरू होणारी मठाच्या माळाची जमीन असे वर्णन महसूल विभागाच्या सातबारा उता-यामध्येही वरंध सजेच्या हद्दीतील कुंभारकोंड गावामध्ये दिसून येते. येथे असलेल्या गुप्तगंगेचा उल्लेखही
'ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा माहानदी।
जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥'
समर्थकृत आनंदवनभुवनी कवनामध्ये दिसून येते. समर्थांनी उल्लेखिलेले आनंदवनभुवनी हे स्थान सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना आढळून आलेले स्वयंभू शिवथरघळ असल्याचा दावा करताना प्रचलित आणि सर्वश्रृत शिवथरघळच आहे आणि येथेच समर्थांनी श्रीदासबोधाची व अन्य ग्रंथ व काव्यांची रचना केली असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी असंख्य पुरावेदेखील प्रस्तुत प्रतिनिधीकडे सादर केले. या दाखले अन् पुराव्यांचे सार्थपण ज्या परिसरात हे आनंदवनभुवन आहे, तेथे चपखल बसत असल्याचे प्रत्यक्ष परिसरामध्ये प्रतिनिधीसोबत जाऊन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी दाखविले असल्याने आता या रामदासी सांप्रदायाला केवळ श्रीधरस्वामींना झालेल्या साक्षात्काराऐवजी प्रत्यक्षात समर्थांनी वर्णिलेल्या या आनंदवनभुवनाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 'आनंदवनभुवनी' या कवनामध्ये समर्थांनी
'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी।
तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी॥'
या कवनानुसार समस्त रामदासी परिवाराने आणि समर्थ वाङमयाच्या वाचकांनी या 'तीर्थासी तुळणा नाही।' अशा स्वयंभू शिवथरघळीचे दर्शन घेण्याची आवश्यकता आहे. समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनाच्या ५९ व्या कडव्यानंतर सांगता करताना 'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥' असे लिहिले असल्याने सर्व समर्थ अनुग्रहींना या स्वयंभू शिवथरघळीला सर्वप्रथम नाव आणि मान देण्याची आज्ञाच जणू झाली आहे.आतापर्यंत ज्ञात असलेल्या शिवथर घळीबाबत केवळ श्रीधर स्वामींना झालेला दृष्टांत हाच फक्त विश्वसनिय मानण्यापेक्षा असंख्य पुराव्यांसह सदगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी नव वर्षाची भेट दिलेल्या स्वयंभू शिवथरघळीचे जगभरातील समस्त रामदासी परिवाराने दर्शन घेवून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ती `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' या समर्थांच्याच आज्ञेसह अनुभवावी अशीच आहे.
सुंदरमठ
IMG_9640.JPG
रामदासपठार या गावामध्ये ही जागा साधारणत: तीन गुंठे आकाराच्या पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटीश काळापासून 'टॅक्स फ्री' स्वरूप आहे म्हणजेच कायमस्वरूपी धारामाफी देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सातबारा उता-यात मठाचा माळ उल्लेख असलेला हा सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असून येथे 'सिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर संतोषरूप बसले होते' म्हणजेच एका जांभळीच्या झाडाखालील चौथ-यावर समर्थ रामदास स्वामी बसले असताना कल्याणस्वामी शिवछत्रपतींचा निरोप घेऊन आल्याचा समर्थ हृदय ग्रंथाच्या ५०३ पानावर उल्लेख आहे. सप्तकाण्डात्मक श्रीदासायन ग्रंथाच्या पृष्ठ क्र. २०५ ते २०७ वरील उल्लेख पाहता 'सुंदरमठ म्हणजेच शिवथरची घळ हे श्री.सां.का.ले.२६ वरून निश्चित;कारण त्यात दुसरे दिवशी सुंदरमठी (शिवसमर्थांची) भेटी जाली' असे स्पष्ट म्हटले आहे. याप्रमाणे आपणास आतापर्यंत माहित असलेल्या शिवथरघळीच्या परिसरात सुंदरमठ दिसून येतो तो गेल्या अर्धशतकात बांधलेला आहे. कारण या शिवथरघळीचा शोधच मुळी १९१० साली समर्थ वाङमयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहासतज्ज्ञ सेतू माधव पगडी यांच्यासह सामूहीक प्रयत्नांतून लागला आहे. या सर्वश्रृत शिवथरघळीची जागा धबधब्यालगत असली तरी तो धबधबा जेथे कोसळतो त्यालगत आहे. म्हणजे या जागेचे वर्णन रामदासस्वामींना अभिप्रेत 'स्वर्गाहून सुंदर' म्हणायला ती घळ तेवढया उंचीवर नाही. येथे असलेल्या सुंदरमठाचे बांधकाम हे ऐतिहासिक जागेत नाही. मात्र, सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असलेल्या या जागेत सुंदरमठाचा इतिहास हा महाराष्ट्रातील समर्थ भक्तजनांना ख-या दासबोधादी ग्रंथांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. कारण सर्वशृत शिवथरघळीपासून सुंदरमठापर्यंत दररोज ये-जा करणे समर्थांना केवळ अशक्य असल्याचे वारकरी संप्रदायाच्या चालण्याच्या वेगाचा ताळमेळ घालता दिसून येते. त्यावरून या सुंदरमठाजवळच हे दासबोधाचे जन्मस्थान असावे, या निष्कर्षाप्रत आल्यावर आढळून आलेल्या स्वयंभू आनंदवनभुवनी शिवथरघळीचे महत्व समर्थ रामदासस्वामींसाठी 'आनंदवनभुवनी॥' या उल्लेखाच्या सार्थ भावाप्रत असल्याचे आढळून येते. अफझलखानाने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आनी भाद्रपदमासी,
'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला।
सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥'
हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. यंदा या सुंदरमठात शनिवारी, ११ सप्टेंबर २०१० रोजी ३६५ वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रामदासपठार गावातील १० गणेशमूर्ती आणि अकरावा सुंदरमठातील गणपती असे दिसून आले. यामुळे समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनात लिहिलेल्या १७ व्या कडव्यातील
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचि ना।
गुप्त ते, गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥'
या विचित्रयोगाचा महिमा समर्थांप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधीसदेखील चक्रावणारा आहे. कारण ज्या दिवशी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना स्वयंभू शिवथरघळ आढळून आली ती दिनांक ११/०३/२००९ म्हणजे २ + ९ =११ आणि समर्थांचे आनंदवनभुवन आणि सुंदरमठ सर्वसमर्थप्रेमींना नववर्षाची भेट म्हणून जाहिर करावयाचे आहे, तो दिवसही शनिवार अन् दिनांक आहे 0१/0१/११ म्हणजे हे अकरा अकराच आहे.
शैलेश पालकर
पोलादपूर-रायगड
९२२६८४९१८५ / ९८९०३२०१२७

चैतन्य साहेब आपण म्हणता आता समर्थांना भेटायचेच असेल, तर ते दासबोध, आत्माराम यातूनच. पण दास असुनी बोध घेत नाही आत्मा असुनी राम नाही तर समर्थ भेटतील कसे?
आता ते गडावरही (सज्जनगडावर) नाहीत आणि कुठ्ल्या घळीत बिळीत तर मुळीच नाहीत. तुम्ही जेथे गेलात तेथे ते नसतीलही या आता इकडे आनंद वन भुवनात घ्या अनुभव

उदय म्हणतात, विद्वान परिषदे साठी विद्वान आणायचे कोठुन? त्यामुळे मला सत्यता पडताळून पहाण्यात काहीही स्वारस्य नाही आहे . तुमची गाठ पडली ठकांशी त्यामुळे भ्रम निरास झाला आहे. आमचाही झाला होता पण आम्ही समर्थ साहित्याचा आभ्यास केला. असे अभ्यासक विद्वान नसतील असे तुम्ही ठरवू शकता?

वाचकाना नम्र विनंती
आपण जर खरे आणि खोटे समजू शकत नसाल आणि तशी इच्छा देखील नसेल तर उगाचच कोणाची री ओढू नये. आम्ही आमच्या मतांशी सहमत होण्याचा आग्रह केला नाही. तर आपण आपल्या विखारी पूर्व ग्रह दुषित मतांचा उल्लेख येथे करून अज्ञान प्रदर्शन करू नये. येथे औत्सुक्य निवारण होईल, कोणाचे गर्वहरण करणे आमचा हेतू नाही. समर्थांच्या बाबतचे संशोधन करणारे नेहमीच स्वागतार्ह आहेत.

> पण दास असुनी बोध घेत नाही आत्मा असुनी राम नाही तर समर्थ भेटतील कसे?

हे तुम्ही व्यक्तिश: माझ्याबद्दल लिहिले असेल, तर माझी सपशेल माघार.
पण इथे बरीच जाणकार, अभ्यासू आणि साधक मंडळी असतील,
त्यांच्याबद्दल (त्यांच्या ज्ञान, अभ्यास, साधना इ. बद्दल) काहीच माहिती नसताना असे विधान करणे शोभत नाही.

>आम्ही आमच्या मतांशी सहमत होण्याचा आग्रह केला नाही.
असे एकीकडे म्हणता,
आणि दुसरीकडे,
> तुम्ही जेथे गेलात तेथे ते नसतीलही या आता इकडे आनंद वन भुवनात घ्या अनुभव
म्हणजे, दुसरे ते चूक आणि तुम्ही ते बरोबर असाच काहीसा तुमचा प्रयत्न दिसतोय.
असो...

नि:स्पृहता धरो नये, धरली तर सोडो नये |
सोडली तर हिंडू नये- वोळखीमधे || श्रीराम ||

बहुतची करीता हट,
तेथे येउन पडले तट,
कोणी येकाचा सेवट
जाला पाहिजे.
किंवा
घोकोनिया काय वेंगी अर्थ राहे?
अर्थरूप पाहे होवोनिया

It's 1st reply.......
I have read your articles and will definitely visit the new ghal found by your guru.
However, I can only condemn your and your guru's attempts to make the whole issue controversial thus undermining the whole sanctity related to the concept.

Don't DO that. Your Guru will lose all the public support and faith if he tries to get in limelight using such issues...

Regards,� GS-------------------------------------------------------------Let noble thoughts come to us from all directions. - Rig Veda-------------------------------------------------------------

Pages