प्रिय मायबोलीकर,
पत्रास कारण की मायबोलीकरानी मिळून सुरू केलेल्या एका स्तुत्य कार्याचा शुभारंभ नजीक आला आहे.
काही दिवसांपुर्वी हबा यांनी लिहीलेल्या एचआयव्ही विषयीच्या लेखाच्या अनुशंगाने बरीच चर्चा झाली. त्या लेखाचा हा दुवा...
लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...
तिथे प्रत्येकाने सामाजिक जागृतीचे महत्व, प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा तसेच आप-आपल्या वैयक्तिक पण विविध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल इ. बाबत आपली मते मांडली. या सगळ्या सुसंवादातून एखाद्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेची स्थापना करण्याचा विचार येथे मांडला गेला.
अशी काही विधायक कल्पना समोर येताच 'शुभस्य शिघ्रम' असा विचार करुन या संस्थेसाठी काम करण्याचे आवाहन करताच बर्याच मायबोलीकरांनी उत्स्फुर्तपणे काम करण्याची, मदत करण्याची तयारी दाखवली. त्यात चनस, पंत, विजयजी, हबा, मी स्वतः, कैलासजी, कोमल कुंभार, मी आर्या यांसोबत इतरांचाही सहभाग होता.
आपापसातील चर्चा आणि संवादातून हबाने मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते असा विश्वास वाटला आणि इच्छुक मायबोलीकरांची पहिली मिटींग डॉ. कैलास गायकवाड यांच्या घरी मुंबईला झाली. या मिटींगला जे हजर नव्हते त्याना फोनवरून मिटींगचा हेतू व कार्यकारी मंडळाची निवड याविषयी मते मागण्यात आली.
सर्वांचे एकमत झाल्यावर असे एक कार्यकरी मंडळ तयार झाले. ज्याचे प्राथमिक सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
हबा उर्फ हणमंत शिंदे - अध्य़क्ष
डॉ. कैलासजी गायकवाड - उपाध्यक्ष
विशाल कुलकर्णी - सचिव
पंत उर्फ प्रसाद गोडबोले - खजीनदार
सदस्य -
विजय पाटील
चनस
मी आर्या
चैताली सावंत
दत्ता गायवाड
मनोज यादव
(नियोजित वेळेत कागदपत्रे न आल्यास पदांमधील बदल अपरिहार्य आहेत)
ज्यानी कसलीही अट, अडचण, किंतू परंतू समोर न आणता " चांगल्या कामाला हात घालताय तर विलंब कशाला, चलो शुरू करो यार...! " अशी भुमिका घेतली अशाच लोकांचे कार्यकारी मंडळ व्हावे याची द़क्षता घेण्यात आली. यात काही बदल अपेक्षीत आहेत का ते पाहण्यासाठी पुण्यातही कोथरूडला पुण्यातील सदस्यांची मिटींग झाली.
यानंतर सर्वांकडून संस्थेचे नाव काय असावे याबद्दल पर्याय मागविण्यात आले. त्यावर सर्वांचे खुले मतदान घेण्यात आले आणि सर्वाधिक मते मिळवून पंतानी सुचविलेले "मैत्र जिवांचे" हे नाव नक्की झाले.
आता फक्त नोंदणी व शुभारंभाचा भाग उरला आहे. बर्याच जणांची कागदपत्रे मिळाली आहेत उरलेले लवकरच देतील व मायबोलीकरांच्या समाजकार्याचा नारळ फुटेल. माबोवरच्या सर्व सदस्यांची साथ, मदत, आशिर्वाद आम्हास सर्वतोपरी लाभतील याची खात्री आणि विश्वास आहेच.
संस्थेची ध्येय, धोरणे व कामाच्या रुपरेषेची माहिती आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडणार आहोत. बदल, मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन इ. बाबतीत संबंधीत क्षेत्रातील तज्ञ, जाणकार मंडळींनी स्वतःहून पुढे यावे व सहभागी व्हावे ही विनंती.
हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे आणि ती मिळेलच याची खात्रीही आहे.
प्रिय मायबोलीकर,
एक महत्वाची बातमी देताना विलक्षण आनंद होतो आहे. संस्थेच्या नोंदणीचे काम ९० % झालेले आहे. ९० % एवढ्यासाठी की अजुन आपल्या हातात प्रमाणपत्र पडलेले नाही. येत्या १५-२० दिवसात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्या हातात येइल. त्यानंतर साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुणे किंवा मुंबई इथे एक छोटासा कार्यक्रम करुन "मैत्र जिवांचे" या सामाजिक संस्थेचे जाहीर उद्घाटन करायचा मानस आहे. त्या आधी इथे तशी सुचना दिली जाईलच. काही इच्छुकांची कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने कार्यकारी मंडळात काही बदल करावे लागले आहेत. लवकरच अंतीम कार्यकारी मंडळाचीही घोषणा करुच.
कुणाला सहभागी व्हायची इच्छा असल्यास कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच आपल्या काही सुचना, मार्गदर्शन, अनुभव शेअर करायचे असल्यास देखिल इथे खाली प्रतिसादात किंवा वरील पत्त्यावर कळवू शकता.
धन्यवाद.
कळावे,
आपला,
विशाल कुलकर्णी
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!!!
शुभेच्छा!!!
फार स्तुत्य उपक्रम
फार स्तुत्य उपक्रम आहे.
शुभेच्छा
चांगला उपक्रम! शुभेच्छा!
चांगला उपक्रम! शुभेच्छा!
फार छान. अनेक आशिर्वाद व
फार छान. अनेक आशिर्वाद व शुभेच्छा.
चांगला उपक्रम. उपक्रमाला
चांगला उपक्रम.
उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.
मन:पुर्वक अभिनंदन व शुभेच्छा
मन:पुर्वक अभिनंदन व शुभेच्छा .
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सद्ध्यातरी सर्वच प्राथमिक अवस्थेत आहे. एकदा सर्व गोष्टी, ध्येय धोरणे पक्की झाली की इथे मायबोलीवर प्रसिद्ध करुच.
मदतीसाठी उभे राहीलेले हात बघून खात्री पटलीय की आपण नक्कीच काहीतरी चांगलं काम करतोय.
मनःपूर्वक आभार
उपक्रमाला मनापासून शुभेच्छा
उपक्रमाला मनापासून शुभेच्छा !
नाव खूप छान निवडलंय.
हबा, विपुत लिहिल्याप्रमाणे मला आत्तासुद्धा काही मदत करता येण्यासारखी असेल तर नक्की सांगा. देशात आल्यावर तर जरूर सक्रिय सहभागी होणार .:)
शुभेच्छा !
शुभेच्छा !
"मैत्र जिवांचे" हे नाव
"मैत्र जिवांचे" हे नाव आवडले.
एच. आय.व्ही. हा माझ्या पी.जी.च्या शोधनिबंधाचा विषय असल्याने काही मदत माझ्याकडून होऊ शकत असल्यास कळवावे. खूप लांब रहात असल्याने प्रत्यक्ष मदत करू शकत नाही याबद्दल खेद वाटतो.
साती खुप खुप आभार ! प्रत्यक्ष
साती खुप खुप आभार ! प्रत्यक्ष असायलाच हवे असे नाही. माहीतीच्या रुपात जरी तुम्ही मदत करु शकलात तरी ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.
छान. मनापासुन शुभेच्छा!
छान. मनापासुन शुभेच्छा!
हळुहळु कार्यक्रमाची वाटचाल इथे देत जालच म्हणजे भारतापासुन दुर राहुन काय करता येईल हे आम्हाला लक्षात येऊ लागेल व त्याप्रमाणे पाऊल उचलता येईल.
उपक्रमाला हार्दिक
उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!
मलाही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी मला काय करावे लागेल? कुणाशी आणि कसा संपर्क साधता येईल? मी मुंबईचा आहे.
शुभेच्छा !!
शुभेच्छा !!
कुणाशी आणि कसा संपर्क साधता
कुणाशी आणि कसा संपर्क साधता येईल? >> वर नमुद केलेल्या कोणत्याही सदस्याशी आपण संपर्क साधु शकता !
(अवांतरः "मैत्र जिवांचे" हे नाव आवडले.>>> धन्यवाद !
एच. आय.व्ही. हा माझ्या पी.जी.च्या शोधनिबंधाचा विषय असल्याने काही मदत माझ्याकडून होऊ शकत असल्यास कळवावे. >>>> माझ्याही प्रोजेक्ट वर्कचा विषय " अ सोशिओएकोनॉमिक स्टडी ऑफ एच. आय.व्ही पेशन्ट्स इन सातारा डिस्ट्रीक्ट " असा होता !! ( बघुया यावर अजुन काही काम करायचा विचार आहे !! ))
सर्व कागदपत्रे मिळालेले सदस्य
सर्व कागदपत्रे मिळालेले सदस्य :-
हबा
कैलास गायकवाड
मी आर्या
चनस
पंत
विशाल
विजय पाटील
चैताली सावंत
मनोज यादव
दत्तात्रय गायकवाड
(जनसंपर्क अधिकार्यानी कृपया लवकर संपर्क साधावा.)
मायबोलीवरून आनखी एका सदस्याची आवश्यकता आहे. इच्छुकानी कृपया परिचीत सदस्याशी संपर्क साधावा.
उपक्रमास शुभेच्छा.
उपक्रमास शुभेच्छा.
मलाही या उपक्रमात सहभागी
मलाही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी मला काय करावे लागेल? कुणाशी आणि कसा संपर्क साधता येईल? मी मुंबईचा आहे.
मझयाकडे कुणाचाही कॉंटॅक्ट नंबर नाही आहे. मी कसा संपर्क करू? कृपया कुणी मला माझया नंबर वर संपर्क करील का? नंबर आहे -
राजेश - ९८१९२०८९२७
धन्यवाद!
उद्या सकाळी मी तुम्हाला फोन
उद्या सकाळी मी तुम्हाला फोन करीन मानव. धन्यवाद!
खुपच चांगला
खुपच चांगला उपक्रम....मन:पुर्वक शुभेच्छा.....
मदत करायला आवडेल.........
ह.बा. मी तुमच्या फोनचि वाट
ह.बा. मी तुमच्या फोनचि वाट बघत आहे. धन्यवाद!
खुप खुप शुभेच्छा आणि
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.....
उपक्रमांस शुभेच्छा.
उपक्रमांस शुभेच्छा.
प्रिय मायबोलीकर, एक महत्वाची
प्रिय मायबोलीकर,
एक महत्वाची बातमी देताना विलक्षण आनंद होतो आहे. संस्थेच्या नोंदणीचे काम ९० % झालेले आहे. ९० % एवढ्यासाठी की अजुन आपल्या हातात प्रमाणपत्र पडलेले नाही. येत्या १५-२० दिवसात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्या हातात येइल. त्यानंतर साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुणे किंवा मुंबई इथे एक छोटासा कार्यक्रम करुन "मैत्र जिवांचे" या सामाजिक संस्थेचे जाहीर उद्घाटन करायचा मानस आहे. त्या आधी इथे तशी सुचना दिली जाईलच. काही इच्छुकांची कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने कार्यकारी मंडळात काही बदल करावे लागले आहेत. लवकरच अंतीम कार्यकारी मंडळाचीही घोषणा करुच.
कुणाला सहभागी व्हायची इच्छा असल्यास कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच आपल्या काही सुचना, मार्गदर्शन, अनुभव शेअर करायचे असल्यास देखिल इथे खाली प्रतिसादात किंवा वरील पत्त्यावर कळवू शकता.
धन्यवाद.
कळावे,
विशाल कुलकर्णी
मित्रांनो, आज दि. ७ मार्च
मित्रांनो,
आज दि. ७ मार्च रोजी 'मैत्र जिवांचे सामाजिक संस्थेची' सर्व कागदपत्रे सातारा येथे धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सादर करण्यात आली. सुनावनी साठी २१/३/११ तारीख देण्यात आली आहे. यानंतर स्थानीक वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देऊन संस्थेच्या नोंदणीविषयी कुणाची हरकत नसल्याचे पाहिले जाईल व कार्यालयाकडून दिल्या जाणार्या तारखेस नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. सरकारी काम असल्याने रखडते आहे पण सर्व गोष्टी कायदेशीर व परिपुर्ण व्हाव्यात यासाठी कोणतीही गडबड न करता आण्णासायबांच्या म्हणण्यानुसार सर्व चालले आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा नोंदणी पुर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
- हबा
अशाच एका सामाजिक उपक्रमाबाबत
अशाच एका सामाजिक उपक्रमाबाबत मी अॅडमिनला सविस्तर लिहिले होते. त्याला केराची टोपली दाखवली गेली. असो. विशालशी बोलल्याप्रमाणे मनातल्या एका चांगल्या उपक्रमाची सुरूवात होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आमचा खुप मोठा ग्रुप आहे. आणि नेटवर्क पण चांगले आहे. सहभागी व्हायला आणि मदत करायला आवडेल. नेमके काय करणार आहात आणि कसे करणार आहात हे सोदाहरण स्पष्ट कराल का?
उमेश, तूला फोन करतो रे लवकरच.
उमेश, तूला फोन करतो रे लवकरच. धन्यवाद आस्था दाखवल्याबद्दल
अभिनंदन आणि पुढील कार्यास
अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा...
दि. २१/३/११ ला सातारा
दि. २१/३/११ ला सातारा धर्मादाय आयुक्तांसमोर सर्व कागदपत्रांची छाननी झाली. पुढील तारीख ३/५/११ दिली आहे. ११/५ च्या आधी नोंदणीचे प्रमाणपत्र हाती येईल अशी अपेक्षा.
Pages