विना अंड्याचा संत्रा केक

Submitted by भान on 1 February, 2011 - 04:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३ कप मैदा
१चमचा बेकिंग पावडर
१/४ चहाचा चमचा बेकिंग सोडा
चिमुटभर मीठ
२ संत्र्यांचा रस( पाणी न टाकता ,मी किंचित साखर टाकली)
२ कप पिठीसाखर (चवीनुसार कमी जास्त करु शकता)
१/२ कप रीफाईंड तेल (मी सुर्यफुलाचं वापरलं)
४ चमचे भरुन बटर / मार्गरीन
वॅनिला अर्काचे काहि थेंब
दुध लागेल तसे

क्रमवार पाककृती: 

मैदा,बे.पा.,बे.सो.,मीठ एकत्र करुन ३ ते ४ वेळा तरी चाळुन घ्यावे.
एका भांड्यात तेल्,साखर्,बटर घेऊन हाताने नीट हलके होईपर्यंत फेटुन घ्यावे.(जास्तीत जास्त ५ मिनिट लागतात)
त्यात वॅनिला अर्क टाकुन मिक्स करावे.
वरील मिश्रणात मैदा आणि संत्र्याचा रस एकानंतर एक असं थोडं थोडं मिसळत जावं.( कट आणि फोल्ड पद्धतीने).
जर रस संपला तर त्याच्याऐवजी दुध वापरावे.
मिश्रण folds मध्ये पडत असेल तर ते तयार झालय.
ओव्हन १८० C ला आधी गरम करावा,बेकिंग डिशमध्ये तेल किंवा बटरने ग्रीसिंग करुन घ्यावे.
त्यात केकचे मिश्रण घालुन ३५ मिनिटे बेक करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाऊ तसे,किंवा केक कसा बनतो ह्यावर अवलंबुन;)
अधिक टिपा: 

मूळ क्रुतीत १का संत्र्याचा रस दिलेला,मी २ वापरली.
रसाबरोबर संत्र्याच्या फोडी पण टाकु शकतो असा माझा अंदाज.तसं पण छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
ईंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतोय. बिन अंड्याचा म्हणजे मला करता येईल. यात मला वाटते स्वादासाठी ऑरेंज पील चांगली लागेल.

यात मला वाटते स्वादासाठी ऑरेंज पील चांगली लागेल.>>>>>>> हो, पण मी पहिल्यांदाच करत होते आणि तसं पण माझे केक बहुतांशी फसतात म्हणुन मी जास्त प्रयोग केले नाहित Proud
पण हा केक अप्रतिम झालेला. चक्क एका दिवसात संपला. Happy

दोन संत्र्यांच्या रसा एइवजी जर रेडीमेड ऑरेंज ज्यूस ( मीनीट मेड वैगरेचा ) घ्यायचा असेल तर प्रमाण काय घ्यावं?
आणि मग साखरेचं प्रमाण काय बदलावं ?

मधुरा,मी जिथुन क्रुती घेतलीय्,तिथे घरी बनवलेला ज्यूसच सांगितलेला. तोहि पाणी न टाकता बनवलेला.
पण जर तयार ज्यूस घायचा असेल तर १ कप लागेल कदाचित्.जोपर्यंत मिश्रण तयार नाहि होत तोपर्यंत टाकत जायचं.पण तो गोडच असला पाहिजे.आंबट नको.मग साखर अर्धा कप घेऊन बघ. हे माझे अंदाज आहेत हं,मी अजिबात एक्सपर्ट नाहि. Wink

.