चिमणुलिबाय, ओ चिमणुलिबाय

Submitted by एम.कर्णिक on 31 January, 2011 - 14:24

चिमणुलिबाय, ओ चिमणुलिबाय,
सायलीच्या वेलीवर करताय काय?

घरासाठि जागा शोधताय का?
अहो, बंटीची मदत मं घेताय का?

बंटीकडे घर आहे छप्परदार
चौकोनी भिंती नि गोलगोल दार

Ghar-1.jpg

चिंचेच्या झाडावर बांधलंय बघा
बघा नि सांगा, आवडलं का ?

बरं राहू द्या, मं ते वेलीवरलं घ्या
“भाड्याचं काय?” तुम्ही काय पण द्या

Ghar-2.jpg

काटक्याकुटक्यानी बांधलंय खरं
पण पानांच्या आडोशाला लपलंय बरं

कालच चिमणा एक गेला बघून
चिमणीला दाखवतो एवढंच म्हणून

तुमचाच जोडिदार होता का तो?
व्वा ! मग प्रश्नच काय उरतो ?

आजच करुन घ्या घरभरणी
बंटीबाबा देतील दाणापाणी

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणेच, चोsssss च्वीटssss Happy

कालच चिमणा एक गेला बघून
चिमणीला दाखवतो एवढंच म्हणून

तुमचाच जोडिदार होता का तो?
व्वा ! मग प्रश्नच काय उरतो ?>>>>>>> Happy Happy

कालच चिमणा एक गेला बघून
चिमणीला दाखवतो एवढंच म्हणून

तुमचाच जोडिदार होता का तो?
व्वा ! मग प्रश्नच काय उरतो ?>> अय्यो कित्ती गोड!!!

अवांतरः चिमणुलीबायसाठी खर्‍याखुर्‍या घरटयांची व्यवस्था करण्यात आलेय http://sparrowshelter.org/

Happy