Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 31 January, 2011 - 09:06
पांढर्याशुभ्र गुळगुळीत फरशीवर पडलेलं गाळीव ऊन
डिम लायटिंगवाली चमकदार टॉयलेटं
आडोशातली टेबलं अडवून बसलेली प्रेमी युगुलं
नुक्त्याच उठून गेलेल्या एका कपलच्या टेबलावरचे
स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि सॉसचे शिंतोडे त्याने पुसून घेतले
आणि
उरलेला कपं, प्लेटी आणि पेपर नॅपकिनांचा कचरा तिने आवरून घेतला
टेबलानं त्यांच्या सहजीवनाकडे कृतज्ञता व्यक्त केली...
ते दोघं एकमेकांना पाहून सहजच हसले.
आल्हाद
२.४१ दुपार
३१ जाने ११
स्थळ: मेगा मॉल, ओशिवरा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अजून काही दशके लागतील हे सर्व
अजून काही दशके लागतील हे सर्व रोजच्या जीवनात रुजायला.. अर्थात नुसते सामाजिक वावरातच नाही तर ग्रुह जीवनात देखिल. पण सुरुआत झाली आहे , हे ह्या कवितेतून मात्र जाणविले आणिक बरे वाट्ले. समाज बदला चा हा प्रसंग वेळेत टिपल्या बद्दल खूप अभिनंदन! छान लिहिले आहे दुमत नाहीच.
ह्म्म.. हे वाचून काय वाटले ते
ह्म्म..
हे वाचून काय वाटले ते नेमके नाही मांडू शकत शब्दांत, अर्थात बरेच शेड्स आहेत..
असंच काहीसं.. http://www.maayboli.com/node/16670 ..काहीसं वेगळंही!
आवडली.
आवडली.
छान आवडली.
छान आवडली.
छान आहे
छान आहे
धन्यवाद
धन्यवाद
यातले तो आणि ती वेगळेच आहेत
यातले तो आणि ती वेगळेच आहेत असं वाटलं.
आवडली.
खुप आवडली
खुप आवडली