द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - १

Submitted by बेफ़िकीर on 25 January, 2011 - 02:47

य्ये .. जवळ ये लाजू नक्को

आगं य्ये... जवळ य्ये लाजू नको

इसापचा डान्स पाहून स्टाफही अवाक झाला होता. त्याच्याबरोबर नाचणारे जानू आणि पवार चक्क नाचायचे थांबलेच!

तरीही इसाप नाचतच होता. लांब स्टेजवर चाललेला ऑर्केस्ट्रा पाहण्याऐवजी इसापच्या जवळपासचे लोक आता इसापकडेच पाहू लागले होते. त्यांचेही पाय उडत होतेच, पण इसापसारखे आपल्याला नाचता येणार नाही हे आठवून ते नुसतेच जागच्याजागी थडथडत होते. दुपारी साडेचारच्या भर उन्हात इसाप घामाघूम होऊन नाचत होता. त्याच्यासाठी सगळे विश्व म्हणजे 'ते गाणे आणि त्याचे नृत्य' इतकेच राहिलेले होते.

गाणे संपल्यावर वाजलेल्या टाळ्यांपैकी निदान पन्नास टक्के टाळ्या तरी इसापसाठी होत्या.

आणि ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर ऑर्केस्ट्रामधील दोन गायिकांना शेवटचे डोळे भरभरून पाहात सगळे आपल्या नेहमीच्या जागेकडे वळले.

"स्साली नीचे आयेंगी तो जनमभर छोडेंगाच नही मै"

बाबूचे ते वाक्य ऐकून सगळ्यांनीच मनातल्या कॉमेंट्स पास केल्या. दोन गायिकांपैकी एक फारच गोरीपान आणि गाण्यावर स्वतःच ठेका धरत नाचणारी होती. तिच्या त्या अदाकारीला पब्लिक भुललेले होते.

तेवढ्यात लालू म्हणाला..

"बाबू... नया लौंडा आयेला है..."

"किधर??" चमकून बाबूने विचारले. त्याच्या चेहर्‍यावर भयानक कुतुहल होते.

"अब्बीच आयेला है... ऑफीसमे है.."

बाबूने रस्ता बदलला आणि तो ऑफीसकडे जायला लागला तसे सगळेच हासले.

हासणारे आपापल्या बरॅककडे निघाले आणि बाबू डेप्युटी इन चार्ज ऑफ द जेलरकडे!

येरवडा कारागृह!

आज सगळ्या कैद्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला होता. तो संपल्यानंतर झालेल्या चर्चेत बाबूला जी उपयुक्त माहिती मिळाली तिचा फायदा करून घेण्यासाठी तो आता नवलेसाहेबांकडे चाललेला होता. नवलेसाहेब जेलरसाहेबांचे नेक्स्ट होते. निवासी अधिकारी होते.

बाबूचा अवाढव्य देह, मस्तवाल वृत्ती आणि त्याची बायको मिनी कारागृहातील स्टाफला पुरवत असलेला पैसा गृहीत धरल्यामुळे बाबूला कुठेही प्रवेश होता, फक्त मुख्य प्रवेशद्वार सोडून!

आणि मिनीचा सर्वात मोठा हप्ता नवलेसाहेबांनाच जात असल्यामुळे बाबूकडे कायम देशी दारू, विड्या, तंबाखू आणि काही ना काही या सर्वांचा मोठा साठा असायचा.

बाबू ऑफीसच्या दारात येताच हवालदार पिंगळेने नाक हातात दाबले आणि बाबूकडे बघत तो दूर झाला. बाबूने हासत हासत थट्टेच्या सुरात विचारले.

बाबू - बदबू आती है क्या?

पिंगळे - ** मरवानी है क्या?

बाबू - मारनेकी है..

तसाच बेदरकार हासत बाबू ऑफीसमध्ये आला आणि बघतच बसला...

नवलेसाहेबांच्या पुढ्यात असलेली व्यक्ती हा एक कोवळ्या वयाचा तरुण होता. आणि तो रडत होता ओक्साबोक्शी! त्याला बहुतेक जेलचा अनुभव कधीच नसावा. नवले साहेब मात्र बाबूकडे नेहमीप्रमाणेच बटाट्यासारखे डोळे करत बघत होते.

नवले - क्या बे??

बाबू - ४२३ मे एक जन की जगा खाली है साहब...

त्या तरुणाकडे बघत बाबू म्हणाला.

नवले - अबे हट?? स्साला.. मा **उंगा.. चल भाग??

बाबू - साहब.. मिनी आयी थी क्या इन दिनो??

मिनीच्या उल्लेखाने नवले काहीसा विचलीत झाला.

नवले - स्साली आयीच नै काफी दिनसे..

आपण समोरच्या माणसाच्या बायकोबद्दल बोलतोय याची काहीही काळजी नवलेला नव्हती.

बाबू - फोन दो ना साहब.. मै ब्बात करता उससे...

नवलेंनी आपला मोबाईल पुढे सरकवला. बाबू मोबाईल घ्यायला पुढे झाला तसा त्या तरुणानेही नाकाला हात लावला.

नवले - कित्ते दिनसे न्हाया नै रे तू??

बाबू - हप्ता होगयेला रहेंगा..

तेवढ्यात फोन लागला.

बाबू - ए मिनी.. किधर भटकरहेली है?? आ?? इधर नवलेसाहब याद कररहे...

मिनी - वो हरामी की याद मत दिला बाबू...

बाबू - ऐसा कैसा??

मिनी - लास्ट टायम मै आयी तो बोला बाबूकोभी ऐसाच सुलायेंगा मै एक दिन..

बाबूने फोन चालू ठेवूनच नवलेकडे खुन्नसने पाहिले. नवलेचे लक्षच नव्हते.

बाबू - वो छोड... आके जा आज इधर..

मिनी - कितना??

बाबू - दो...

अचानक नवले ओरडला...

नवले - चाSSSर.. दो नही.. चार

बाबू - मिनी... चार..

बाबूने फोन ठेवला. मिनी आज चार हजार घेऊन येणार आणि वर स्वतःला आपल्याकडे सोपवणार या कल्पनेने हुरळलेल्या नवलेने बाबूकडे अत्यादराने पाहिले.

बाबू - साहब... ४२३...

बाबूने त्या तरुणाकडे बोट दाखवत सांगीतले तसा नवले म्हणाला..

नवले - वो मै देखता... तू इधर शानपत्ती नय करनेका.. समझा क्या... लकडी डालुंगा जलती..

बाबू लाचार हासल्यासारखे दाखवत तिथून निघाला तेव्हा त्याला माहीत झालेले होते. आज हा तरुण आपल्याच बरॅकमध्ये येणार!

आणि ते खरे झाले. तीनच तासांनी तो तरुण लांबून तीन पोलिसांच्या घोळक्यातून येताना दिसल्यावरच कैद्यांच्या आरोळ्यांनी जेल दुमदुमले. तो तरुण अभद्र रडत होता. आपल्याला नेमकी कशाची भीती वाटायला पाहिजे हेही त्याला समजत नव्हते. पण समोरून प्रत्येक कोठडीच्या गजांमधून आपल्याला पाहून अतीउत्साही आरोळ्या देणारे कैदी पाहून त्याला इतकेच समजत होते की आपल्याशी हे लोक अत्यंत भयानक वर्तन करणार! पोलिसांच्या हातापाया पडून तो रिकामी बरॅक द्या असे म्हणत होता. पोलिस हासत हासत त्याला बाबूच्या बरॅककडे ओढत आणत होते.

अनेक कैद्यांच्या मनावर मगाचच्या ऑर्केस्ट्राचाच प्रभाव अजूनही होताच. त्यातच समोरून नवीन कैदी येताना दिसल्यावर तर ते उत्सुकतेमुळे अधिकच बेभान झालेले होते.

वरात बाबूच्या बरॅकपाशी थांबली आणि भीतीमुळे गाळण उडालेला तो तरुण रडणेही विसरून गेला. कुलूप काढून त्याला पोलिसांनी आत ढकलले आणि एक पोलिस आत आला.

बाबूच्या बरॅकमध्ये आणखीन तिघे होते. नसीम, मुल्ला आणि वाघ!

त्यातला नसीम हा जरासा नवीन होता. जेल म्हणजे काय आणि बाबूची बरॅक म्हणजे काय हे व्यवस्थित समजल्याला त्याला आता सहा महिने झालेले होते. मुल्ला आणि वाघ मात्र जुनेच होते. वाघ तर बाबूच्याही आधी जेलमध्ये आलेला होता.

एका पोलिसाने नसीमच्या पोटात जोरदार बुक्का मारला. अतीव वेदनांनी कळवळत नसीमने त्या पोलिसाला आईवरून शिवी हासडली तसे तीनही पोलिसांनी नसीमला पालथे पाडून त्याच्यावर लाथा बुक्यांचा वर्षाव केला. हे बाबू, मुल्ला आणि वाघ अत्यंत शांतपणे बघत होते. दोन तीन मिनिटांनी मारून मारून दमलेल्या पोलिसांपैकी एकाने नसीमला शिव्या देत वाक्य ऐकवले..

"आज रातको तेरेकोच खिलायेगा मै मेरा..."

वेदनांमुळे ओरडणेही शक्य नसलेल्या नसीमने केवळ अगतिकपणे त्या पोलिसाकडे पाहिले. ते पाहणेही दुराभिमानातून आल्यासारखे वाटल्यामुळे त्या पोलिसाने आपल्या बुटाची एक लाथ खण्णकन नसीमच्या छाताडावर मारली. त्यासरशी नसीमचे मुटकुळे जवळपास हलेनासेच झाले.

पोलिस निघून गेल्यानंतर मात्र तो नवीन आलेला तरुण भीतीने कर्कश्श ओरडायला लागला. त्याच्याकडे बाकीचे तिघे नुसते बघत होते आणि नसीमची तर त्याच्याकडे बघण्याचीही हिम्मत नव्हती.

वाघ - नाम क्या है रानी तेरा????

वाघच्या त्या निर्लज्जपणे हासून विचारलेल्या प्रश्नावर घाबरगुंडी उडाल्यामुळे तो तरुण नुसतेच बघत राहिला.

वाघ - रानी मुखर्जी??? काजोल?? आ???

त्या तरुणाने अत्यंत घाबरत घाबरत नाव सांगीतले.

"आकाश"

बाबू - आकाश... अच्छा नाम है... तेरेको आकाश दिखायेंगेच आज...

इतका दर्जेदार विनोद यापुर्वी त्या बरॅकमध्ये बहुधा झडलेला नसावा. पडलेला नसीमसुद्धा खळखळून हासला त्यावर!

आकाश - ये आदमीको... क्युं मारा??

वाघ - घबरागया?? रोज मार खाना पडता है इधर...

आकाश - ... क्युं??

वाघ - ये जेल है बेटा... मार खाना और चूप रहना.. इसका नाम जेल है.. तू सोच मत..

आकाश - इनको लगा होगा बहुत...

नसीम - तेरेको और ज्यादा लगेगा..

जखमी नसीमने उच्चारलेले ते वाक्य ऐकून पुन्हा सगळे हसायला लागले.

आकाश - लेकिन... क्युं मारा इनको??

वाघ - इसने आज पुलिसके मुंहपे अपनी संडास फेकी.....

ते वाक्य ऐकूनच आकाशला मळमळायला लागले. चार घाणेरड्या राक्षसांच्या समोर आपण आहोत ही भावना आकाशला हरणासारखे अधिकाधिक भित्रट बनवत होती.

आपण अत्यंत चुकीच्या जागी आणि नरकात आलेलो आहोत हे आकाशला समजले.

नसीम भिंतीच्या आधाराने कसाबसा उभा राहिला. एका घाणेरड्या मडक्यातले पाणी एका टमरेलात भरून प्यायला. चुळा थुंकतानाच त्याच्या तोंडातून पोलिसांच्या नावाने शिव्याही बाहेर पडत होत्या.

मुल्ला - बाबू... ये लौंडा इधरच कैसे क्या आया?

बाबूला या प्रश्नाचे उत्तर द्यायची इच्छा नव्हती. आकाश आपल्या बरॅकमध्ये आला इतकेच त्याच्यासाठी पुरेसे होते. पण मुल्लाला नको तिथे नाक खुपसायची सवयच! बाबूने उत्तर दिले नाही तसा वाघ कुत्सित हासून म्हणाला..

वाघ - बिवीको सुलाया रहेगा नवले के नीचे...

"मादर**"

ताडकन उठलेल्या बाबूने वाघला धरून जीवघेणे फटके मारायला सुरुवात केली तरी वाघ फटके खात खात हासतच होता आणि वर मधेअधे एखादा फटका स्वत:ही बाबूला लगावत होता.

पाच एक मिनिटांनी दोघे शांत झाले आणि ...

.... बाबू स्वतःही हसायला लागला....

आपल्या बायकोला नवलेकडे सोपवणे यात त्याला अपमान वगैरे वाटत नव्हता. ती त्यानेच योजलेली क्लृप्ती होती. जेलमधून बाहेर पडल्यावर तो मिनीला सोडून देणार होता. 'चारित्र्यहीन' असण्याच्या खात्रीवरून! आणि नवा 'आयटेम' आणणार होता घरात!

आणि हे 'नवीनच आलेला आकाश' सोडला तर जेलमधील बहुतेकांना माहीत होते.

आकाश मात्र आत्ताच झालेली मारामारी पाहून अवाक झालेला होता. मार खातानाही हे लोक हासतात कसे काय हे त्याला समजत नव्हते. तो घाबरून एका कोपर्‍यात सरकलेला होता. आत आल्यापासूनच त्याला अनेक प्रकारचे दुर्गंध सहन करावे लागत होते. मात्र या कोपर्‍यापाशी आल्यावर एक दुर्गंध अधिकच तीव्र झाल्यासारखा वाटला त्याला! नीट त्या कोपर्‍यात पाहून तो पटकन दुसरीकडे सरकला. तेथे बहुधा यांच्यापैकी कुणीतरी नियमीतपणे लघ्वी करत असावे. किंवा सगळेच!

ऑर्केस्ट्रावर चर्चा चालू झाली. त्या दोन पोरींवर मनसोक्त चर्चा झाल्यानंतर मग गाण्यांवर चर्चा चालू झाली. मुल्ला तीच गाणी पुन्हा गाऊ लागला. बाबू, वाघ आणि नसीम नाचू लागले. वेदनांनी तळमळत असतानाही नसीम कसा काय नाचत असेल हे आकाशला समजत नव्हते.

अचानक वाघ आकाशसमोर येऊन बीभत्स हातवारे करत नाचू लागला. आकाश मनातून भयंकर चिडलेला असूनही घाबरून गप्प होता.

बराच वेळ नाचगाणे चाललेले होते. लांबून दूरवर असणार्‍या बरॅक्समधून कसले कसले चीत्कारांसारखे आवाज येत होते. बहुधा या बरॅकमध्ये सगळे नाचत आहेत हे त्यांना दिसत असावे. आकाशला त्या इतर बरॅक्समधून फक्त बाहेर आलेले काही हात आणि एखाददुसरा चेहराच दिसत होता.

अंधार पडू लागला होता. केव्हाचे पाणी हवे होते आकाशला! बाकीचे चौघे जसे जरासे खाली टेकले तसा आकाश सगळ्यांकडे पाहात हळूच उठला आणि पाण्याच्या माठाकडे गेला.

"ए... ए.. क्या कररहा???"

मुल्लाने दरडावून विचारलेला तो प्रश्न ऐकून आकाश मागे वळून घाबरत म्हणाला..

"पाणी हवंय..."

"पानी नही मिलेंगा..

"का?"

"पानी देते नही ज्यादा... दिनमे सिर्फ दो बार पानी पीनेका"

"असं कसं?"

"जब खाना खानेके लिये या कामके लिये बाहर निकलेगा तब भरपूर पीके लेनेका.. "

"पण ... आत्ता ... हवंय ना??"

बाबूने स्वतःच्या पायजम्याची नाडी सैल केली आणि म्हणाला..

"ये... घे... पाहिजे तेवढं पाणी आहे...घे"

खदाखदा हासत मुल्लाने वाघला टाळी दिली. आकाशने घाबरलेला असूनही नसल्याचा अभिनय करत बिनदिक्कत पाण्याचे टमरेल माठात बुडवल्याबरोबर नसीमने पडल्यापडल्याच त्याच्या नडगीवर लाथ घातली.

"क्या बोला तेरेको मुल्ला?? आ?? क्या बोला?? ***** तेरे बापका है क्या पानी?? आ??"

नडगीवर लाथ बसली की किती कळवळायला होते हे आकाशला चांगले समजलेले होते. तो कळवळतच पण तोंडातून आवाजही न काढता जमीनीवर बसला आणि दोन्ही हातांनी नडगी गच्च दाबून धरली. आत्ता या क्षणी मात्र त्याला खरोखरच पाण्याची गरज भासत होती. आणि तितकेच हेही पक्के समजलेले होते की पाणी असे वाट्टेल तेव्हा प्यायचे नसते.

पाणी प्यायला म्हणून गजांपाशी गेलेला आकाश अनेक कैद्यांना दिसला तश्या अचानक अनेक आरोळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या, पण आकाशचे सगळे लक्ष पायाच्या वेदनेवर एकवटलेले होते.

कसाबसा तो पुन्हा उठून उभा राहिला.

त्याचे लक्ष गेले. बाहेरून एक पोलिस राउंड मारताना दिसला त्याला...

एकमेव आशेचा किरण...!!

आकाशने अक्षरशः त्याचा धावा केला धावा!

तो जाडजूड पोलिस डुलत डुलत गजांपाशी आला आणि त्याने भुवईनेच उर्मटपणे 'काय' म्हणून विचारले.

आकाश - मेरेको निकालो... यहांसे निकालो.. वो साहबको बोलके मेरेको निकालो.. मेरेको अकेलेको रख्खो.. यहां मत रख्खो..

पोलिस - का??

पोलिसाला मराठी येते आहे हे पाहून आकाशला जरा त्यातल्यात्यात बरे वाटले.

आकाश - हे मारतात... आत्ता मारलं... प्लीज मला इथून बाहेर काढा...

पोलिस - काय मारतात??

आकाश - आत्ता पायावर मारलं..

पोलिस - एवढंच ना? मग थांब जरा... रात्री तुझा आवाजही निघणार नाही..

आतले चौघेही खदाखदा हासत असतानाच पोलिसही हासत हासत निघून गेला आणि आकाशला ती भयावह जाणीव झाली.

आत्ताच आपण यांच्याविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारीला दाद तर मिळालीच नाही, उलट आपल्याला यांच्याच तावडीत सोडून तो पोलिस निघून गेलेला आहे.

याचाच अर्थ आता आपली धडगत नाही.

आकाशने हताश होऊन मागे पाहिले तर पाठीशीच वाघ उभा होता.

इतक्या जवळ त्याला पाहून आकाश भयानक घाबरला. वाघने त्याला उजव्या हाताने गजांवर दाबले.

वाघ - बेटा... पैला दिन है तेरा इधर... इसलिये छोडता हू मै.. दुबारा कंप्लेन किया तो.. तेरी ******** वो हवालदारकी अभी दुसरी राउंड थी ये... तिसरी रातके बारा बजे होती है.. अब तू है... और हमलोग है.. आजा.. आजा इधर..

वाघच्या त्या अवाढव्य देहाच्या रेट्याने आणि शिवीगाळीने आकाश मृतवत चेहर्‍याने खाली बघत होता, पण वाघने त्याला आपल्या बाजूला ओढले. तसा मात्र तो किंचाळू लागला. अचानक इतर बरॅक्समधून जोरदार किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.

काही कळायच्या आत मुल्लाने मागून आकाशचा पायजमा हिसडून खाली सरकवला. हे काय चाललेले आहे हे समजायच्या आत आकाशला वाघने चाईट घालून जमीनीवर पालथे पाडले.

"आजा बाबू... ओपनिंग कर चल्ल.."

बाबू आपला पायजमा काढून पहिल्यांदा गजांपाशी गेला आणि बाहेरच्या संधीप्रकाशात अंधूक दिसणार्‍या इतर बरॅक्सकडे बघून ओरडला..

"बिवी बडी शर्मीली है रे... "

पुन्हा इतरांच्या किंकाळ्या दुमदुमल्या.

तोवर नसीमने पडल्या पडल्याच वाघ आणि मुल्लाच्या दाबाखाली असहाय्यपणे पडलेल्या आकाशला नग्न केले.

दोन्ही हात दोघांनी मागे खेचलेले आणि त्यांचे पाय पाठीवर जोरात दाबलेले! आकाशला तो दाब सहन होत नव्हता. तो घुसमटत असतानाच तो दाब चौपट वाढल्याचे त्याला जाणवले. मळमळून ओकारी येईल असा दुर्गंध असलेले बाबूचे तोंड त्याच्या कानापाशी आले. बाबू आकाशच्या देहावर व्यापलेला होता.

"आजसे तेरी ** बाबूके नामकी..."

श्वासही घेता येईना अशी घुसमट झाली आकाशची पुढच्याच क्षणी! मागून हासण्याचे आणि रानटी विजयी किंकाळ्यांचे आवाज कानात शिरत होते. अंधारलेल्या बरॅकच्या थंडगार जमीनीवर आकाशचे तोंड रेटले जात होते. क्षणाक्षणाला वाढत्या वेगाने असह्य वेदना होत असूनही आवाज फुटत नव्हता. डोळ्यात जीव गोळा झाला होता. अस्तित्वाचा, पुरुषार्थाचा सर्व अभिमान क्षणाक्षणाला नष्ट होत चालला होता. मरंणप्राय वेदना आणि मनाचे मरण या दोन्ही गोष्टी एकाचवेळेस भोगत होता आकाश!

अनेक मिनिटे बाबू अत्याचार करत होता. बाबू आकाशच्या शरीरावरून दूर झाला तसा एकदाच आकाश खच्चून ओरडला, पण पुढच्याच क्षणी त्याचे तोंड वाघने दाबून धरले.

आकाशने डोळे ताणून वर पाहिले. मगाशी मागे असणारा बाबू आता पुढे आलेला होता आणि आकाशकडे पाहात बेदरकारपणे हासत पायजमा घालत होता. ते दृष्य समजेपर्यंतच आकाशला मुल्लाने पकडीत घेतले होते.

एक तास! तो एक तास आकाशच्या जीवनातील सर्वात कुरूप, सर्वात अभद्र व सर्वात घृणास्पद एक तास होता. एखादी बलात्कारीत स्त्री मृतवत पडून राहावी तसा कितीतरी वेळ तो पडूनच राहिलेला होता. आजूबाजूने अनेक आवाज कानात पोचत असले तरी त्याला आत्ता ते निरर्थक वाटत होते. त्याचा उपभोग घेण्यामधून मिळालेल्या आनंदावर सगळ्यांची चर्चा चाललेली असावी.

बर्‍याच वेळाने जीवात जीव आल्यावर आकाश उठला आणि त्याने कपडे घातले. बरॅकमध्ये तर पूर्ण अंधार होता. बाहेरच एक दिवा असल्यामुळे काहीसा उजेड येत होता. कुणाकडेही न बघता आकाश लंगडत्या चालीने पाण्याच्या माठापाशी आला. तो गजांपाशी दिसल्यावर लगेच इतर बरॅक्समधून आरोळ्या ऐकू आल्या. आत्ता आकाशला पाणी प्यायला कुणीही नकार दिला नाही. आकाशने दोन टमरेले भरून पाणी घटाघटा प्यायले.

परत कसासा चालत तो मगाचच्या कोपर्‍यात येऊन बसला आणि गुडघ्यांमध्ये डोके खुपसून हमसू लागला. बरॅकमध्ये बिडीचा दर्प पसरल्यावर त्याने क्षणभर मान उचलून वर पाहिले. चौघेही बिड्या ओढत होते.

मुल्ला - नाम क्या बे तेरा

आकाशला अर्थातच एक अक्षरही बोलणे शक्यही नव्हते आणि बोलावेसे वाटतही नव्हते. मात्र त्याने तीव्रपणे मुल्लाकडे पाहून एक जोरदार शिवी तेवढी हासडली. यावेळेस मात्र त्याला शिवी दिल्याबद्दल मारहाण झाली नाही, उलट चौघेही हसायलाच लागले.

अचानक कुठेतरी घंटा वाजली. बरॅक्स उघडण्यात आल्या. रांगेने कैदी एका दिशेला जाऊ लागल्याचे आकाशला दिसले. त्याला स्वत:च्या दौर्बल्याची इतकी शरम वाटत होती की बरॅक उघडलेली असूनही तो उठतही नव्हता. पोलिसानेच त्याला काठीने हटकून उठायला भाग पाडले. आकाशचे वाकडे चालणे पाहून पोलिसाने काहीतरी अश्लील रिमार्कही पास केला. काय झाले असेल हे त्याला समजलेले होते.

कसाबसा चालत आकाश रांगेत उभा राहिला. नेमका तो इसापच्या पुढे आलेला होता.

इसाप - होगया क्या हनीमून??

आकाशने घृणास्पद नजरेने मागे वळून पाहिले. मात्र का कुणास ठाऊक इसापचा चेहरा त्याला काहीसा माणूसकीवाला वाटला.

इसाप - तेरे पैले मैही था उस बरॅकमे.. तीन महिनेके लिये..

आकाशला या माहितीशी आत्ता काहीही घेणेदेणे नव्हते. सगळे कुठे चालले असावेत इतकीच उत्सुकता होती त्याला!

जेवण! खाना!

ही रांग खान्यासाठी आहे हे रांगेचे पहिले आणि एकमेव वळण पार केल्यावर त्याला समजले. एका मोठ्या शेडमध्ये भली मोठी पातेली ठेवलेली होती. एकेक कैदी स्वतःसाथी एक थाळा उचलून एकेक पदार्थ वाढून घेत होता.

आकाशची टर्न आली तेव्हा त्याला ते दिसले!

जाड रोट, दाल नावाचे पाणी, एक पालेभाजी आणि एका पातेल्यात भात! एकीकडे नुसतेच मीठ आणि दुसर्‍या परातीत सुके खोबरे ठेवलेले!

न जाणो पुन्हा कधी जेवायला मिळणार असा विचार करून आकाशने तीन रोट घेताच स्टाफने त्याच्या हातावर फटका मारला आणि एक रोट काढून पातेल्यात ठेवला!

"बापकी जागीर है क्या?? आ??"

दोनच रोट घेण्याचा नियम असावा हे आकाशला फारच 'मृदू' पद्धतीने समजलेले होते.

जेवणाच्या लाकडी टेबलपाशी मात्र इसाप त्याच्याजवळ स्वतःहून बसला. आकाशला शेजारी आणि समोर कोण आहे याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते. कैदी मोठमोठ्या आवाजात ओरडत एकमेकांशी बोलत होते, शिव्या देत होते, हासत होते. आवाजच इतका होता की त्यात आकाशची नि:शब्दता सहज लपू शकत होती. एक प्रकारे हेच बरे असेही वाटले आकाशला!

पण त्याने पहिला घास खाल्ला आणि त्याला अतीव दु:ख झाले. पालेभाजीला काहीही चव नव्हतीच! नुसताच चोथा! आमटीसुद्धा पाण्यासारखी! मग त्यात भरपूर मीठ घालून आकाशने जेवायला सुरुवात केली आणि त्याचवेळेस शेजारी बसलेल्या इसापने बडबडीला!

ही बडबड फक्त आकाशलाच ऐकू जाऊ शकत होती कारण बाकीच्यांचे लक्षच नव्हते.

"वाघला जनमठेप झालेलीय.. बायकोचा गळा आवळलान.. सहा वर्षांपासून कुजतोय इथं.. माणूस मात्र स्वभावाने चांगलाय.. पण जाम तापट.. तो म्हणतो चुकून मर्डर झाला म्हणे.. असा कुठे चुकून मर्डर होतो का?? .. पण हल्ली हल्ली मलाही वाटायला लागलंय.. वाघचं वागणं पाहून.. की चुकूनच झालं असेल ते.. है ना?? "

आकाश ढिम्मच होता.

"तुमची बरॅक सगळ्यात भारीय... कारण तिथे बाबू आहे... बाबूकडे बिड्या, कधीकधी एखादी क्वार्टर, खेळायला पत्ते आणि साबण वगैरेपण मिळू शकते.. पैसा... बाकी काय?? नै का? पैसा चारल्यावर काय साली जेलमध्ये हिरॉईनसुद्धा येईल... पण... मुल्ला मात्र हाडाचा दरोडेखोर आहे.. सव्वीस दरोडे घातले ***ने.. सव्वीस.. थट्टाय का सव्वीस म्हणजे??? गेल्या दोन वर्षापासून आहे इथे.. आणखीन सहा वर्षे असेल बहुतेक.. चार बस पण लुटल्या आहेत त्याने.. मुल्ला फार डेंजर माणूस वाटतो मला.. "

आकाशचे आपल्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष आहे पण तरीही तो काहीही बोलत नाही आहे हे पाहून इसाप म्हणाला..

"मी इसाप.. मला उगाचच इसाप म्हणतात.. खरं नाव उदय.. उदय सोनार... करप्शनच्या आरोपात आहे... तीन महिने झाले... अजून सव्वा दोनच वर्षे.. वेळ कसा जातो कळतच नाही... तू कशामुळे आलास??"

आकाशने फक्त शुन्यात पाहतात तसे एकदा इसापकडे पाहिले आणि पुन्हा जेवू लागला.

त्याचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे आणि आल्याआल्याच त्याला अमानवी प्रकारांचे बळी व्हायला लागल्यामुळे तो आज बोलणे शक्यच नाही हे इसापलाही माहीत होते. त्याचा स्वतःचा पहिला दिवसही असाच गेलेला होता. बाबूच्याच बरॅकमध्ये!

इसाप पुढे बोलू लागला. त्याची इच्छा एवढीच होती की आकाशला निदान इतके तरी वाटावे की त्याच्याशी बोलणारा एखादा तरी माणूस जेलमध्ये आहे. कारण इसाप जेव्हा आला तेव्हा बरॅकमधील अत्याचार आणि इतर कैद्यांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे त्याच्या मानसिकतेवरच परिणाम झालेला होता.

"बाबू तर काय? राजा माणूस! साला हैवान आहे... पण.. तुला आत्ता खरे वाटणार नाही.. वेळ पडली तर जानही देईल असा माणूस आहे तो... अर्थात.. तुझा आजचा अनुभव इतका वाईट असेल की मी बोलतोय त्यावर विश्वास बसणेच शक्य नाही... पण.. या बाबूने एकदा स्वतःवर आळ घेऊन दुसर्‍या कैद्याला वाचवले होते... त्याचा मित्र होता तो.. बाबू स्वतः चेंबरमध्ये गेला... एकदम बिनधास्त.. "

"चेंबर... चेंबर म्हणजे माहीत आहे ना तुला?? की नाहीच?? नसेल म्हणा.. आजच आलायस.. सलग चार दिवस त्या खोलीत ठेवतात... आणि नुसते हाल हाल करतात.. हाल हाल.. चेंबरमध्ये जावे लागू नये म्हणून कैदी अक्षरशः भीक मागतात भीक.. शॉक देतात.. चटके देतात.. फटके लावतात.. चिमटा लावतात.. टांगतात... काय वाट्टेल ते करतात... काहीही झाले तरी चेंबरमध्ये जाण्यापासून स्वतःला वाचव तू.. हां.. तर बाबू... बाबू एका मारवाड्याची गॅन्ग सांभाळायचा... बाबू म्हणजे त्या मारवाड्याचा एक नंबरचा किलर.. आत्तापर्यंत त्याने सात तरी मर्डर केलेले असतील.. सुरा खूपसून.. मारवाडीच त्याला वाचवायचा कायद्यापासून... बाबू स्टेशन विभागात राहतो म्हणे.. आणि तो मारवाडी मोठा बिल्डर आहे.. तो राहतो ढोले पाटील रोडवर... मोठा बंगला आहे.. पण त्याच्या म्हणण्याखातर इतके सगळे केले तरी शेवटी मारवाड्याने त्याला अडकवलेच... गरीब लोकांच्या जागा बळकावून त्यावर स्कीम बांधतो तो मारवाडी.. "

इतका वेळ नि:शब्दपणे जेवत असलेल्या आकाशने या माहितीवर मात्र कान टवकारले आणि इसापचे बोलून होताच खट्टकन मान इसापकडे वळवली.

बघतच राहिला इसाप! याला अचानक काय झाले?????

इसाप - काय झालं??

आकाश - नाव... काय आहे त्या मारवाड्याचं??

इसाप - का????... निर्मल जैन

अत्यंत तीव्र नजरेने आकाश इसापकडे पाहात होता.

इसाप - काय झालं??

आकाश - ......

इसाप - काय झालं काय??

आकाश - ........काही नाही..

आकाश पुन्हा जेवू लागला. काही क्षण त्याच्याकडे विस्मयाने बघत इसाप पुन्हा स्वतःच्या ताटाकडे वळला आणि म्हणाला..

"बाकीचं काही सांगण्यासारखं नाही इथे.. दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक नाश्ता, भरपूर मजूरीकाम, शिव्या, मारहाण, रोगराई, व्यसने आणि सुटका होण्याची वाट बघणे.. धिस इज ऑल अबाउट धिस ब्लडी जेल"

इसापला चक्क इंग्लीशही येतं हे पाहून आकाश काहीसा चकीत झाला होता, पण ते त्याने चेहर्‍यावर दाखवले नाही. नंतरची जेवणे काहीच न बोलता पार पडली.

सगळे उठून रांगेने पुन्हा आपापल्या बरॅकमध्ये निघाले. एकदा आकाशला वाटले की अधिकार्‍यांना 'आपला कसा छळ झाला' ते सांगून पाहावे. पण पुन्हा मनात विचार आला की त्यांनी काहीच दाद दिली नाही तर हे चौघे आपल्याला गुरासारखे मारतीलही! आणि... दाद दिली तरी वेळ मिळेल तेव्हा मारतीलच! सूज्ञपणे वावरणे इतकेच आपल्या हातात आहे.

रांगेत उभा राहून आणि कैद्यांच्या कल्लोळातून आपल्या बरॅककडे जाताना आकाशला एकच शंका छळत होती...

'इसापने....... नसीमबाबत काहीच का सांगीतले नसावे??????'

झोपायला एक सुतडा आणि एक कांबळे प्रत्येकी होते. अर्थातच आकाशला तो 'लघ्वीवाला' कोपरा देण्यात आला. आकाशला झोप येणे शक्यच नव्हते. पार्श्वभागाची आग आग होत होती. प्रातर्विधीच्या वेळेस काय होईल ही भीती आत्ताच मनाला डसत होती.

पण चौघेही एकमेकांशी बोलायला लागले.

वाघ - भाभी आयी क्या रे जेलमे??

बाबू - पता नही.. आयेली रहेंगी..

मुल्ला - तेरेको ऐसा नही लगता कभी बाबू?? के नवलेसे इन्तकाम लेना चाहिये..??

बाबू - खल्लास करनेवाला है मै उसको... एक बार बाहर तो जाने दे...

नसीम - ए.. तुने क्या किया रे?? जेलमे कैसे आया??

हा प्रश्न आपल्याला आहे हे आकाशला समजले. पण त्याला बोलायचेच नव्हते.

'बोल ना, बोल ना' असा आग्रह धरेपर्यंतच बाहेरच्या दिव्याने जो प्रकाश आत पडत होता तो झाकणारी एक अजस्त्र सावली गजांपाशी आली.

करकरत कुलूप निघत असताना मात्र .....

..... नसीमने बेंबीच्या देठापासून बोंब मारली..

आत आलेल्या साडे सहा फुटी अक्राळविक्राळ हवालदाराच्या पायांवर डोके घासत आणि भेसूर आक्रोशत तो माफी मागू लागला... त्या हवालदाराने त्या किंकाळ्यांकडे ढुंकूनही न बघता नसीमचे बखोट धरले आणित्याला तसाच फरफटत बाहेर नेला.

खूप वेळ... बहुधा कुठले तरी दार बंद होईपर्यंत... नसीमच्या किंकाळ्या येरवडा जेलच्या दगडी भिंतींनाही पाझर फोडत होत्या... आकाश तर चिमणीसारखा कांबळे लपेटून कोपर्‍यात भिंतीला अगदी लगडून बसलेला होता...

अनेक मिनिटांनी बाबूने शांततेचा भंग केला..

बाबू - अब मरेगा स्साला... पंगा लेनाच नही मंगता था ना??

वाघ - और वो भी ऐसा पंगा?? स्साला मै देखरहा था की ये कर क्या रहा है टॉयलेटसे बाहर आकर... तो यकायक स्सालेने फेकके मारा अपना गंदगी पुलीसके उपर...

मुल्ला - ये ठीक नही है.. ये ठीक नही है.. कुछ भी हो.. मगर ऐसा पंगा नही लेना चाहिये उसने...

अभद्र कळा पसरलेल्या त्या बरॅकमधील ते भीतीदायक वातावरण आकाशला सहन झाले नाही. जीव घ्शात गोळा करून त्याने आपले कुतुहल व्यक्त केले.

आकाश - कुठे नेले त्याला??

हा माणूस बोलेल अशी कुणाला अपेक्षाच नव्हती त्यामुळे तिघेही दचकले.

वाघने सावरल्यावर उत्तर दिले.

वाघ - चेंबर... अब चार दिनके बाद आयेंगा..

एक भीतीयुक्त लहर पाठीच्या मणक्यांमधून वरपासून खालपर्यंत गेली आकाशच्या!

मुल्ला - वैसे... दो हप्तेके बाद तो यहा रहेगाही नही वो..

मुल्लाच्या या विधानावर आणखीनच सुतकी कळा आल्यासारखे वाटले आकाशला!

आकाश - ... क्युं??

मुल्ला - अलग बरॅक होते है इन लोगोंके..

आकाश - .....

मुल्ला - .....

आकाश - .. इन... इन लोगोंके मतलब???

मुल्ला - फासी का कैदी है वो.. दो महिने बाद फासी है...

ते वाक्य ऐकून आकाशला आजवर वाटली नसेल इतकी भीती वाटली. आत्ता इथे जो माणूस होता तो जिवंत आहे कारण तो जिवंत आहे??? आणि हे त्यालाही माहीत आहे की तो केव्हा मरणार आहे?? कशी जगतात कशी ही माणसे?? हा ताण तर आपल्यालाही सहन होऊ शकत नाही.. म्हणजे.. 'दुसरा फाशी जाणार' हा ताण.. आपल्यावर ही वेळ आली असती तर??

मूक, अबोल, नि:शब्द झालेल्या आकाशच्या मनात कोणते भावनिक वादळ घोंघावत असेल याची उरलेल्या तिघांनाही कल्पना होती.

सगळेच नि:शब्द झालेले होते. पण आकाशला मात्र शेवटी हुंदका फुटला.

आणि हुंदक्याचे रुपांतर पाहता पाहता भेसूर रडण्यात झाले. मुल्ला आणि वाघ या दोघांना नेमके काय वाटत असावे याचा आकाशला अंदाज येत नव्हता कारण फारच अस्पष्ट प्रकाश होता. पण...

... पण बाबूला मात्र ते सहन झाले नाही..

त्याने उठून आकाशच्या कंबरेत सणसणीत लाथ घातली.. त्या धक्याने तर आकाश अधिकच ओरडायला लागला. आणि बाबू म्हणाला..

"स्साला... स्साला मौतसे डरता है?? मैने.. ऐसे.. ऐसे... देख?? अबे देख??? ये ऐसे... ऐसे छुरा हाथमे लेके पेट फाडेला है सात लोगोंका.. आखोंके सामने उन लोगोंकी वो खौफनाक मौत देखी है मैने.. और वो मौतभी मैनेही दी है उनको... स्साला.. मौतसे डरता है... अबे ऐसे जेलकी जिंदगीसे तो मौत अच्छी मादर**... तेरेको बताता मै वाघ... तेरेको बताता... अगर एक दिन के लियेभी मेरेको रिहा किया ना... तो स्साला उसके सामने खडा रहेंगा मै जाकर... और दोनो हाथोंमे छुरिया लेकर पेट फाडदेंगा उस हरामीका... और उसके पुरे खानदानका भी.. "

बाबूच्या त्या उत्स्फुर्तपणे केलेल्या आततायी बोलण्यानंतर पुन्हा एक सुनसान शांतता पसरली. हताश झालेला बाबू शेवटी पुन्हा जागेवर जाऊन बसला आणि त्याने बिडी पेटवली.

मात्र ....

.... त्या शांततेचा भंग केला... आजच तेथे आलेल्या आकाशने...

आकाश - उसको तो... मै भी मारना चाहता हूं....

आधी त्या वाक्याचा अर्थच कुणाला समजला नाही. आकाश चक्रम असावा असेही वाटून गेले तिघांना! पण तो अगदी आत्मविश्वासाने बाबूकडे पाहात होता..

बाबू - ....... किसको बे???

आकाश - ........

बाबू - ...... आ????

आकाश - निर्मल जैन

ती संपूर्ण रात्र आकाशची कहाणी ऐकण्यातच गेली...

.... आणि ... पहाट झाली तेव्हा..

बाबू आणि आकाश हे येरवडा जेलमधील सर्वात चांगले मित्र झालेले होते.

गुलमोहर: 

बेफिकीर,
तुमच्या इतर कादंबर्‍या व त्या वरिल प्रतिक्रिया वाचल्या.
अप्रतिम लिखान आहे.

तुमच्या मातोश्री गेल्याच वाचलं.

त्यामुळे तुमची चिडचिड होत असावी असा अंदाज आहे.

काही दिवस आराम करा.

मन स्थिरावल्यावर लिहायला सुरुवात करा.

शुभेच्छा.

चैत्रगंधाला अनुमोदन.

बेफिकिरजी, तुमच्या लिखाणाचे वाचक अनेक आहेत आणि व्यक्ती तेवढ्या प्रक्रुती ह्या नियमाप्रमणे कोणाला तुमचे लिखाण आवडत तर कोणाला नाही. साधारण जनमताप्रमाणे आणी तुम्ही योग्य ते ठरवालच. पण माझ्यासारखे वाचक तुमच्या गोष्टी मनोरंजनासाठी वाचतात. मग कादंबरीमधला एखादा भाग नाही चांगला जमला तरी चालतं. अर्धवट राहिलेल्या कथांमुळे मात्र भ्रमनीरास होतो. क्रुपया तसं करु नका.

जाता जाता एक विचारावसं वाटतय..

>> मी स्वतःसाठी इथे का लिहू?

मी इथे जे प्रकाशित करतो ते इतरांनी वाचावे म्हणूनच करतो. स्वान्त सुखाय जे असते ते मी प्रकाशित करत नाही. >>

लेखकाला जेव्हा स्वत:च्या लिखाणातुन आनंद / समाधान मिळतं तेव्हा वाचकाना उत्तम लिखाण वाचायला मिळत असं म्हणतात. तेव्हा वाचकांना आवडत म्हणुन लिहिण्यापेक्षा स्वतःला भावतं म्हणुन लिहिलत तर आम्हाला सुद्धा चांगली कादंबरी आपोआप वाचायला मिळेल असं वाटत नाही का?

घर चांगली चालली होती...
मी नेहमी वाचत असले तरी नियमीत प्रतिसाद देते असे नाही.. ते शक्यही होत नाही..
माझ्यासारखे अनेक जण असतीलच...त्यामुळे केवळ प्रतिसादांवरून कादंबरी थांबविणे योग्य वाटत नाही..
बाकी निर्णय तुमचा..>>>> i agree

बेफीकीर, माबो ची नियमीत वाचक मी तुमच्यामुळे झाली आहे. Well almost. सध्या बरिच वादावादी चालु आहे तुमची सगळ्या बरोबर. एरवि मी वाचुन प्रतिसाद दिला नाहि कधिच. आज मात्र आवर्जुन सांगते आहे. Plz. continue with your writing despite of all the good or bad comments. I am still practicing typing in marathi, please excuse me for this mix language.

तुमची जी एनर्जी तुम्हि चांगल्या लिखाणात खर्च करु शकता ती दुसरीकडे का व्यर्थ दवडत आहात. कधितरी मूक रहाण्यात सर्व साधते. सल्ला म्हणुन नाहि सांगत आहे. एका चांगल्या लेखकाचि फरपट बघवत नाहि म्हणुन लिहीण्याचा खटाटोप केला.

बाकि तुम्हि समंजस आहातच.

बेफिकीरजी, तुमची मी पुर्ण वाचलेली कादंबरी म्हणजे गुडमॉर्निंग मॅडम, ती खुप हटके होती, interesting होती . त्यानंतर आलेली घर मला तितकी interesting वाटली नाही, may be because it was more of a family drama / daily soap like .
मला वाट्ते की माबोवरील प्रत्येक वाचकाच्या तुमच्याकडुन वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, तुम्ही सगळ्यांच्या अपेक्षांना पुरे पडु शकत नाहीत, that's but natural. so , please cntinue writing at your pace n as per your liking.

नवीन कादंबरी. पहिला भाग छान आहे फक्त भारतात काराग्रुहात इतकी मारहाण अत्याचार होतात हे माहित नव्हते. फक्त खालिल दोन गोष्टीत contrast आहे त्यामुळे मिनी नवलेंची भानगड बाबुपासुन लपवते असे वाटत नाही.

मिनी - वो हरामी की याद मत दिला बाबू...
बाबू - ऐसा कैसा??
मिनी - लास्ट टायम मै आयी तो बोला बाबूकोभी ऐसाच सुलायेंगा मै एक दिन..

फक्त मिनीलाच असे वाटत होते की 'नवलेसाहेब तिला वापरतातही' हे बाबूला माहीतच नसावे.

घर चांगली चालली होती...
मी नेहमी वाचत असले तरी नियमीत प्रतिसाद देते असे नाही.. ते शक्यही होत नाही..
माझ्यासारखे अनेक जण असतीलच...त्यामुळे केवळ प्रतिसादांवरून कादंबरी थांबविणे योग्य वाटत नाही..
बाकी निर्णय तुमचा..>>>>
एकदम बरोबर आहे
ऊगीच बंद केली कादंबरी..
बोकाचे पण भाग तुम्ही नियमीत पणे लिहीत नाहीत..
माबोवर सर्वात आधी तुमची कादंबरी शोधायचो.. पण आता आपल्या लिखानामधे आलेल्या
अनियमीत पणा मुळे कधीतरीच कुठलीतरी कादंबरी वाचायला मिळते आणी ती पण अर्धवट..
आता .. घर ह्या कादंबरीची लिंक लागते ना लागते तोच आपण ती बंद करुन टाकली..
धीस ईज नॉट फेअर Sad

कुणा एकाच्या सान्गण्यावरुन घर बन्द नका करु..छान सुरु होती ती कादम्बरी सुद्धा.. Please keep it going too..Don't do this every time.. you are going to lose your fans..Either don't start it or if you start then finish it..Please consider this as a request from your huge fan..

आवळा | 25 January, 2011 - 09:10
माबोवर सर्वात आधी तुमची कादंबरी शोधायचो.. पण आता आपल्या लिखानामधे आलेल्या
अनियमीत पणा मुळे कधीतरीच कुठलीतरी कादंबरी वाचायला मिळते आणी ती पण अर्धवट..
आता .. घर ह्या कादंबरीची लिंक लागते ना लागते तोच आपण ती बंद करुन टाकली..
धीस ईज नॉट फेअर

>> याला म्हणतात आवळा देउन कोहळा मागणे Happy
दिवे घ्या.. घर पण छान वळणावर आली होती. पण ही पण छान वाटते Shwashank redemption, papilon स्टाइल्ची एखादी मराठी कादंबरी आपल्या तुरुंगांबद्दल वाचली नव्हती. (किरण बेदींचे आत्म्चरित्र अपवाद)

पुढील भाग कधी येणार ? मायबोली ची रोजची सवय तुमच्या कथा वाचुन च लागली आहे.
खुप आवडते तुमचे लि़खाण. कोणि काही का म्ह्णेना , तुम्ही लिहित रहा.

एक रसिक वाचक.

घर चांगली चालली होती...
मी नेहमी वाचत असले तरी नियमीत प्रतिसाद देते असे नाही.. ते शक्यही होत नाही..
माझ्यासारखे अनेक जण असतीलच...त्यामुळे केवळ प्रतिसादांवरून कादंबरी थांबविणे योग्य वाटत नाही..
बाकी निर्णय तुमचा ............agree

सुरूवात आवडली.
"हा.रा.दा.मा. आणि गुड मॉ.मॅ." सारखिछी सुद्धा इंटरेस्टिंग होईल असे वाटते. पु.ले.शु.

ती "घर" पूर्ण लिहायची नसेल तर टि.व्ही. सिरीयलसारखे एक दोन मेगा एपिसोड काढून कथा तरी सांगा ना राव.

कालची माझी प्रतीक्रीया कोनीतरी delete केलेली दिसतेय.. मी नवीनच सदस्य झालेय.. पण वाचक जुनी आहे.. बेफीकीरजी तुमच्या सर्व कादम्बर्या वाचल्यात.. अप्रतीम लीखाण आहे.. But please conitinue Ghar kadambari too.. You know there are many people who don't give response but they are also involved in these novels.. I really wait for every day morning to read another episode of your novel.. Please try to post atleast one chapter daily for each novel..It makes our day too.. You can become a really famous writer.. All the Best for your writing..
And don't get involved in comments of your fans.. they all love you so get upset when they don't see your new post..

वरील प्रतिक्रियांशी सहमत. घर चांगली चालली होती. मी पण तुमच्या मुळे मायबोली ची नियमित वाचक झाले. रोज वाट बघायची पुढचा भाग आला का आणि १ दिवस समजते की तुम्ही ती कादंबरी पूर्ण करणार नाही आहात. घर पुढे वाचायला मिळाली तर उत्तम...
शेवटी निर्णय तुमचाच.....!!!

बेफिकीरजी,

तुम्ही अत्यंत चांगले लिखाण करता. क्रुपया कोणत्याही वादामध्ये न पडता लिखाण चालु ठेवा. चांगल्या वाईट प्रतिक्रिया येतच राहणार.

क्रुपया कादंबरी कशी वाटली याबद्द्ल लेखकाला चांगल्या वाईट प्रतिक्रिया द्याव्यात पण विनाकारण वाद घालुन लेखकाचा हिरमोड करु नये.

बेफिकीरजी, पु.ले.शु.

-आनंद

बेफिकीर,
इत्के सगळे लोक घर घर अशी घरघर करत आहेत ते पण नवीन कादंबरीच्या प्रतिक्रियेत. यावरुनच काय ते समजुन घ्या. घर भाग ६ उद्या येउदे.

'द वर्ल्ड ऑफ डिफरन्स'चा पहिला भाग प्रकाशित झाल्यानंतर अनेकांना 'घर' आवडते हे लक्षात आले.

मी जेव्हा दिड तास टाईप करून एक भाग प्रकाशित करतो तेव्हा तो आवडला / नाही आवडला / गलिच्छ, हिडीस, चवन्नीछाप होता/ पुढचे भाग लिहिण्याच्या पात्रतेचा होता, हे त्याच वेळेस सांगण्याचे कष्ट का घेतले जात नसावेत समजत नाही.

चला, आता 'घरात' डोके घालायला हवे!

-'बेफिकीर'!

मला पॅपिलॉन जास्त आवडली... सॉरी... ही कादंबरी फार ग्रेट आहे असं वाटत नाही.>>>

ठमेश्वरी,

१. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

२. हीकादंबरी व पॅपिलॉनमध्ये कथानकाचाच फरक आहे. तेव्हा ती तुलना कदाचित योग्य नसेल असा अंदाज आहे. तरी कृपया लक्ष ठेवून असावेत.

-'बेफिकीर'!

अहो तुम्ही विंदांशी स्वतःशी तुलना करता तेव्हा पॅपिलॉनशी केली तर काय हरकत आहे? एवढं लावून घेण्यात काही अर्थ नाही... बाकी नो कॉमेंट्स... मला जे वाटलं ते सांगितलं...

आणखीन एक असंबद्ध प्रतिसाद!

मी विंद्दांशी माझी तुलना केली आहे हा एक मोठ्ठा गैरसमज गेले काही दिवस आपल्या मनातून जात नाही असे दिसते. त्या लेखातही मी तसे एक वाक्यही म्हणालेलो नाही. आणि अशा असंबद्ध आणि अज्ञानी प्रतिसादांमुळेच मीही बहकत गेलो असे स्पष्टीकरण येथे देण्यात अर्थ नाही.

परत वाचा - हे कथानक व पॅपिलॉन यांच्यात केवळ तुरुंग इतकेच साम्य आहे. मुळात कथाच वेगळ्या आहेत. म्हणून म्हणालो की इतक्या दिग्गज पुस्तकाशी या लेखनाची तुलना नको. आपल्या प्रतिसादासंदर्भात या धाग्यावरील माझा हा शेवटचा प्रतिसाद!

=======================

मुग्धानंद,

पाहिले मी ते! मी ते आपल्याला उद्देशून म्हणालो नाही. कालच माझी एका नवीन मित्राशी चर्चा झाली त्यात मी असे म्हणालो होति मित्र मायबोलीवरीलच आहे) की लोकांनी अधिकाधिक प्रतिसाद कोणत्याही लेखनाला) द्यायला हवेत, इतकेच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अहो बेफि, तुम्ही जरी नाही म्हणालात तसं तरी ते दिसतच होतं तुमच्या लेखात...

पॅपिलॉनमध्ये तुरुंग असला तरी ते वाचताना कुठेही किळसवाणं वाटलं नाही, उत्कंठावर्धक वाटलं... हाच फरक आहे या दोन्हींत...

अशा असंबद्ध आणि अज्ञानी प्रतिसादांमुळेच >>> हे म्हणायचा हक्क तुम्हाला नाही... आम्हाला किती आणि काय ज्ञान आहे हे आमचं आम्ही पाहून घेऊ... तुम्ही तुमचं पाहा...

बाकी तुमच्याशी वाद घालायची हौस आहे कुणाला इथे?

Pages