Submitted by मी अभिजीत on 9 June, 2008 - 08:11
संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
आत लाव्हा घुसळतो
वरुन सारे ठीक ना !
फावले त्यांचे कसे ?
भेकडांचे पीक ना !
काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !
भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !
कान का किटले असे ?
तेच ते बौद्धीक ना !
रांग नाही दर्शना,
हरपला लौकीक ना !
जिंकल्या दैवासही
दाद द्याया शीक ना !
जीवना माझ्यापरी,
हो जरा "सोशीक" ना !
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान अभिजीत.
ते 'वीक', 'शीक' जरा खटकले, पण बौद्धीक, लौकीकचा वापर आवडला.
मक्ता पूर्ण गझलेला शोभेलसा! आवडले.
छानय
छानय अभिजीत... छोट्या बहरची गजल... मला लिहिताच येत नाही. तो 'ना' वेगवेगळ्या अर्थांनी वापरणं... झकास.
अगतिक सारखा र्हस्व-दीर्घाचा गोंधळ सोडल्यास... मला आवडली.
बर्याच
बर्याच दिवसांनी तुझं लिखाण वाचतेय. मला एवढं सखोल समजत नाही पण वाचताना चांगलं वाटलं
व्वा मस्तच
व्वा
मस्तच
वरुन सारे ठीक ना !
बौद्धीक ,
दाद द्याया शीक ना,
हो जरा "सोशीक" ना !
हे शेर छानच
सुधीर
मस्त गझल.
मस्त गझल. वेदनेला वीक ना! च्या ऐवजी
वेदनेशी हवी जवळीक ना! किंवा असच काही वापरता येइल का?
चु.भु.दे.घे.
नरेन्द्र