दोन ते अडीच पाउंड मटण
वाटण क्रमांक १
-६-७ पाकळ्या ( अमेरिकेत मिळणार्या , जाड्या पाकळ्या ) लसूण + इंचभर आले एकत्र वाटून
-३ टेबलस्पून दही
-अर्धा टी स्पून हळद
-२ टीस्पून मीठ
वाटण २
-१५-१६ सुक्या मिरच्या -मी ब्याडगी मिरच्या वापरते - या फारशा तिखट नसतात
-८ काळे मिरे , ८ लवंगा
-अर्धा मध्यम कांदा
-६-७ पाकळ्या लसूण
-१ इंच आले
-१टेबलस्पून खसखस
-१ छोटा तुकडा दगडफूल
-चिमूटभर शहाजिरे
-एक टेबलस्पून धणे
-एक टीस्पून जिरे
-चण्या एवढा जायफळाचा तुकडा
-१ तेजपान
-२ इंचाचा दालचिनिचा तुकडा
-६ हिरव्या वेलची
-असल्यास ४-६ तुकडे जावित्री.
चार मध्यम कांदे बारीक चिरून
२-३ प्लम टॉमेटो बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरुन अर्धा कप ( किंवा एक वाटी )
तीन मध्यम कांदे उभे पातळ चिरून.
पुदिन्याची पाने - जुलिएन करून अर्धा कप
दहा बारा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, बिया काढून परत एकदम बारीक जुलिएन्स करून
आल्याचे दीड इंचाचे दोन तकडे, साले काढून , जुलिएन करुन
तेल्,बटर , तूप
दोन -तीन चिमटी केशर मावे मधून १० सेकंद गरम करुन चुरडून मग दोन टेस्पून दुधात भिजवून
अर्धा वाटी काजू तुपात तळून
भातासाठी
तासभर आधी ६ कप बासमती तांदूळ धुवून निथळून ठेवलेला
बटर १-२ टेबलस्पून
मीठ
६ वेलची , ६ लवंगा, दोन -तीन दालचिनीचे तुकडे - इंचभराचे, ६ मिरे, दोन तेजपानं
मटणाचे तुकडे स्वच्छ धूउन, त्याला वाटण क्रमांक १ लावून फ्रिज बाहेर तासभर किंवा फ्रीजमधे १०-१२ तास पर्यंत ठेवावे ( बिर्याणी करते वेळी बाकी तयारी सुरु करताना फ्रीजमधून काढून ठेवावे. परतून घ्यायच्यावेळेस मटण रुम टेम्प ला असावे शक्यतो. )
वाटण क्रमांक दोन मधले पदार्थ एकत्र बारीक वाटावे. थोडे थोडेच पाणी घालावे. अगदी पातळ वाटण होऊ नये.
सहा कप तांदळात ९ कप पाणी घालून राइस कूकरमधे भात केल्यास पूर्ण शिजायच्या दोन डिग्री अलिकडेच राइस कूकर बंद होतो. राइस कूकर नसल्यास तुमच्या आवडत्या पद्धतीने भात ७५-८०% शिजवून घ्या . शिजतानाच साबुत गरम मसाला, बटर व मीठ घाला. शिजलेला भात एका पसरट भांड्यात / परातीत मोकळा करून ठेवा.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा प्रेशर पॅन मधे (सढळ हाताने घातलेले ) तेल गरम करुन त्यात एक तेजपान, २-३ लवंगा, एक तुकडा दालचिनी घालून बारीक चिरलेले तीन कांदे घालून परतून घ्या . कांदा गुलाबी झाला की त्यावर मॅरिनेट केलेल्या मटणातले तुकडे घालून प्रखर आचेवर परतून घ्या.( सगळे मॅरिनेड भर्र्कन ओतू नका. तुकडे नीट सगळीकडून ब्राउन झाले पाहिजेत. मॅरिनेड घातले तर तुकडे ब्राउन होणार नाहीत. दह्याचे पाणी पाणी सुटते त्यात ते तुकडे उकळले जातील )
तुकडे नीट ब्राउन झाले की वाटण क्रमांक दोनचा मसाला घालून ४-५ मिनिटे परता. मग उरलेले मॅरिनेड घालून मिनिटभर परता. मग वाटी भर गरम पाणी घालून प्रेशर पॅन च्या तीन शिट्या व अजून ५ मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या. जाड बुडाचे पातेले असेल तर झाकण ठेवून मध्यम आचेवर ४० एक मिनिटे लागतिल. मधून मधून लागेल तसे गरम पाणी घालत रहा.
मटण शिजले ( किंवा पॅनचे प्रेशर उतरले ) की त्यात बारीक चिरलेले टॉमेटो, अर्धी कोथिंबीर घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
कढईत तेल + तूप गरम करुन त्यात ३ बारीक उभे चिरलेले कांदे डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या . तेलात अर्धा चमचा साखर घातल्यास सुरेख कॅरमेल रंग येतो .
आता ओव्हन २०० -२५० डिग्री प्रीहीट करत ठेवा.
फॉइल ट्रे किंवा ओव्हन सेफ भांड्यामधे तळाला थोडे बटरचे तुकडे घाला.
त्यावर तळलेला कांदा घाला, त्यावर मटणाचे तुकडे व रस्सा पसरून घाला. त्यावर परत थोडा तळलेला कांदा, आलं, मिरची, पुदिनाचे जुलिएन पसरून घ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यावर एक भाताचा थर घाला. थोडे बटरचे तुकडे घाला. परत थोडा कांदा, उरलेले मटण, पुदिना-मिरची-आले- कोथिंबीर घाला . उरलेला भात घाला. शेवटी तळलेला कांदा घाला . ( पाहिजे असल्यास तुपात त़ळलेले काजू घाला ) . केशराचे दूध सगळीकडे व्यवस्थित शिंपडा.
फॉईलने घट्ट झाकून ओव्हन मधे ६०-७० मिनिटे, २०० डिग्रीवर शिजवल्यावर बिर्याणी तयार!
भरपूर वेळखाऊ रेसिपी आहे.
लसूण पाकळ्या इथे जाडजूड असतात. भारतातल्या पाकळ्या बहुतेक एकास तीन लागतील.
मी इथले लाल कांदे वापरते -ते पण बर्यापैकी मोठे असतात .
जुन्या मायबोलीत इंग्रजीत टाकलेली. तीच थोडी सुधारुन इथे आणलीये.
ओव्हनची क्षमता वेगवेगळी असू शकते त्यानुसार टेम्परेचर अन वेळ अॅडजस्ट करावी. ६०-७० मिनिटांनतर फॉइल अलगद उचलून चेक करू शकता.
मेधा तै तुमची रेस्पी एकदम
मेधा तै तुमची रेस्पी एकदम झ्याक बघा , पर ५ तास म्हंजी लई व्हत्यात जरा कन्सेशन दयाकी .
>>>>अनेक ठिकाणी खाऊन अनेकांना
>>>>अनेक ठिकाणी खाऊन अनेकांना विचारुन, अनेक प्रयोग करून शेवटी मनासारखी जमलेली रेसिपी<<<<
चला, जरातरी दुसर्यांना श्रेय देताय बघून आनंद वाटला.;) गंमत करतेय हो.. पुन्हा चिडाल.
पाच तास राबून एकच पदार्थ? किचन मध्ये पाच तास घालवायचे मानसिक बळ(म्हणजेच मराठीत पेशन्स) नाही आमच्याकडे. त्यापेक्षा हाटलातील बिर्यानी खावून पडदे ओढून, मंद आवाजात रेडिओ लावून, पांघरूण घेवून ४ तास झोप घेवू(पक्षी:चिकोल्या). १ तास बिर्यानी खाण्याचा धरून असे पाच तास सुशेगात घालवू.. कायं समजलात?(हे नाकात म्हणून बघा)
रेसीपी चांगली दिसतेय पण कैच्याकै जिन्नस आहेत, एका माणसाला एवढे जिन्नस आणून करण्यासारखी रेसीपी नाही.
- मुलगी असून 'सुद्धा' स्वयंपाकाचा तिटकारा असलेली गायित्रीची लेक
बर, ते पुदिनाचे जुलियन काय
बर, ते पुदिनाचे जुलियन काय प्रकार असतो?
तुम्ही जुन्या माबोवर टाकली
तुम्ही जुन्या माबोवर टाकली होती तेव्हा करुन बघितली होती. पहिल्याच प्रयत्नात मस्त जमली होती. अजून माझ्या फाईलला आहे.
. ही बिर्याणी करताना आदल्या दिवशी नवरा मदतीला असला की तयारी झटपट होते. दुसर्या दिवशी फक्त भात आणि मटण शिजवून सगळे असेंबल करायचे. आजकाल डायट मुळे तुमची झटपट चिकन बिर्याणी आमच्याकडे पॉप्युलर आहे. ती लेकालाही करता येते. 
डुप आयडीने दिलेल्या
डुप आयडीने दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याइतके तरी महत्व का द्यावे ? म्हणून इथली पोस्ट संपादित केली आहे.
तुम्ही आणखी चिडायला नको
तुम्ही आणखी चिडायला नको म्हणून नाहि देत संदर्भ. बरे तुमचे बिंग कशाला फोडा बाहेर कुठली रेसीपी घेतली म्हणून... श्रेय वगैरे देण्याच्या गोष्टी इतरांसाठी असतात आपण फक्त भाषणे द्यायची बरोबर ना?
बाकी हेच म्हणणे आहे आमचे सुद्धा, बाहेर इतक्या डझनवार रेसीप्या असल्यावर कोणी असे कसे म्हणू शकतो इकडची उचलली, तिकडची उचलली. किंवा श्रेय दिले नाही. हा तुमचाच मुद्दा तुम्हाला कळला तर शेवटी. तुम्ही अगदी एका पोस्टवर श्रेय द्यायच्या गोष्टी करत होतात ना म्हणून हि खटपट.
बरे मी गूगलून रेसीपी दाखवायचे काम केले नाहि तरी अजुन आहेत ना मायबोलीवर आयडी अश्या खोड्या करण्यात पटाईत, आता त्यांनाच करु दे ते काम.
तुम्ही इतक्या वैतागू नका हो... दुसर्यांना फुकटात उपदेश देणे पण स्वतः पाळणे तसे कठिणच असते नै का?

बरे, तुम्ही मटण बिर्यानी केलीय का आज पाच तास राबून? त्याने चिडचिड झाली असेल तर हि गंमत म्हणून घ्या.
ध्वनी, 'एका माणसाला एवढे
ध्वनी, 'एका माणसाला एवढे जिन्न्स आणून करण्यासारखी रेसिपी नाही' असं म्हणताय ना वर. मग जाऊ देत हो. तुम्ही 'तिकडे' या बरं. आपण माकडचेष्टा करत झाडावर बसू
च्च! http://www.maayboli.com/
च्च!
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93149.html?1156019676 येथे मेधा म्हणजे पूर्वीच्या शोनु यांची मटण बिर्याणी जुन्या माबोवर आहे. तेव्हा नेटवर देवनागरीत लिहिले जात नव्हते. तारीख आहे ९ नोव्हे. २००१. मला वाटते एवढा खुलासा पुरेसा आहे.
सॉलिडच आहे रेसिपी. हात बसला
सॉलिडच आहे रेसिपी. हात बसला की मग करायला थोडी सोपी वाटेल असं वाटलं
मेधा, इथे रेसेपी टाकल्या
मेधा, इथे रेसेपी टाकल्या बद्दल धन्यवाद. मटण बिर्याणी अजूनपर्यंत कधी करून बघीतली नाही. पण यापध्दतीने एकदा करून बघेन. तब्येतीत केलेला पदार्थ म्हणजे चव मस्तच असणार
.
.
>>> डुप आयडीने दिलेल्या
>>> डुप आयडीने दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याइतके तरी महत्व का द्यावे ? म्हणून इथली पोस्ट संपादित केली आहे.<<
गायलात ना पुन्हा तेच रडगाणं.. खरे आयडी व डुप आयडी.
तुम्हाला मुद्द्यावर बोलायचे नसेल तर हा प्रश्ण उभा करायचा. आणि खरे आयडी व डूप आयडी म्हणजे काय?
आणि खर्या आयडीने लिहिले असते तर तुम्ही काय सुधारला असतात का?
फुकटची भाषणे द्यायची इतरांना की हे बरोबर नाहि, ते चूक, तसे करु नका व स्वत: तेच करायचे.
हेच ना नाहितर डूप आयडी म्हणून रडायचे. चालू द्या...
मी बुवा याबाबतीत ध्वनीतैंशी
मी बुवा याबाबतीत ध्वनीतैंशी सहमत आहे.
<<<रेसीपी चांगली दिसतेय पण कैच्याकै जिन्नस आहेत, एका माणसाला एवढे जिन्नस आणून करण्यासारखी रेसीपी नाही.
पाच तास राबून एकच पदार्थ? किचन मध्ये पाच तास घालवायचे मानसिक बळ(म्हणजेच मराठीत पेशन्स) नाही आमच्याकडे. त्यापेक्षा हाटलातील बिर्यानी खावून पडदे ओढून, मंद आवाजात रेडिओ लावून, पांघरूण घेवून ४ तास झोप घेवू(पक्षी:चिकोल्या). १ तास बिर्यानी खाण्याचा धरून असे पाच तास सुशेगात घालवू.. कायं समजलात?(हे नाकात म्हणून बघा) >>>>
छे छे, ध्वनीतै. असं नाही हो. त्यापेक्षा हाटलातील बिर्यानी खावून पडदे ओढून, मंद आवाजात रेडिओ लावून, पांघरूण घेवून ४ तास मायबोलीवर हातात छडी घेऊन उगाच या आणि त्या बीबीवर जाऊन नाक खुपसून खवचट पोष्टी टाकेन. आपला दिवस तरी सार्थकी लागेल. काय समजलात?(हे नाकात म्हणून बघा) १ तास बिर्यानी खाण्याचा धरून असे पाच तास सुशेगात घालवू.. झोप तरी छान लागेल (म्हणजे रोजच्यासारखीच हो).