मॅट पेंटिंग

Submitted by मुरारी on 19 January, 2011 - 22:46

आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता.
बर्याच इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात

मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता

मी पण एक प्रयत्न केलेला होता
एक झलक पेश करतोय

अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस

मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं

शेवटच्या फोटोत वर घेतलेल्या प्रत्येक इमेज चा वापर झालेला आहे

अश्या इमेज background ला वापरल्या जातात.
बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे

अजून एक उदाहरण

गुलमोहर: 

आत्तापर्यंत animation हे अतिशय दुर्लक्षित क्षेत्र म्हणून गणलं गेलं आहे. >>> हे पटलं नाही....
कारण परदेशातून असलेल्या भारतीय अ‍ॅनिमेटर्सना मागण्या.... काही वर्षांपुर्वी हे दुर्लक्षित क्षेत्र होतं हे मान्य पण आता नाही. बाहेर स्पर्धा अतिशय भयानक आहे, त्यामुळे नेहमीच्या वाटेकडे जाण्यापेक्षा बरीचशी तरुण मुले-मुली या क्षेत्राकडे वळताहेत.
स्वता यश चोप्रा जेव्हा या ईंडस्ट्रीकडे जेव्हा वळला तेव्हाच या क्षेत्रात अगणीत जागा उपलब्ध झाल्या.

त्यामुळेच पुढील काही वर्षात भारतात कित्येक पटिंनी अ‍ॅनिमेटर्सची गरज भासणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही.

अजून एक सांगायचं झालं तर, आणि आपल्याकडे quality शिक्षण नाही देत. त्यामुळे कोणी स्तुदिओ वाले सहजासहजी घेत नाहीत >>>>>> यावर मी तर म्हणेन की मॅक सारखी संस्थासुद्ध्हा पुर्ण प्रशिक्षण देत नाही.. या क्षेत्रात जे शिकू आणि त्यातून आपण जे निर्माण करू शकू त्यतच तुमचं कसब पणाला लागतं.
भारतात Cinema 4D, Bodypaint 3D, Media 100 अशी व अजून अनेक सॉफ्ट्वेअर्स याचची आहेत...किंवा आलेलीही असतील. पण त्यासाठी वाट बघावी लागेल इतकच.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सुतावरून स्वर्ग कसा गाठायचा हे आपल्यालाच शिकावं लागतं.... Happy

बादवे, तुमच्या इमेजेस दिसत नाहीत....

खुपच सुंदर. पडद्यावर दिसणारे खोटे असले, तरी खरे वाटते. पण एकदा हे तंत्रज्ञान आहे असे कळले, कि मग तो सिनेमा बघताना, खोटा वाटायला लागतो. आपल्या कल्पनेच्याही पलिकडे जाणारी, करामत आता अपेक्षित आहे.

Pages