Submitted by स्वप्ना_राज on 17 January, 2011 - 23:47
ह्या विभागात जमीन/प्लॉटस घेण्याबद्दल लेखनाचा धागा दिसला नाही म्हणून सुरू करत आहे. अशी जमीन महाराष्ट्रात दिशा डायरेक्ट किंवा अन्य कंपनीकडून कोणी घेतली असल्यास त्याबद्दलचे अनुभव कृपया लिहाल का? ह्यात नक्की कराव्यात आणि करू नयेत अश्या काय गोष्टी असतात ह्याबद्दल मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना, तुला प्लॉट कश्यासाठी
स्वप्ना, तुला प्लॉट कश्यासाठी हवा आहे? म्हणजे घर, फार्म हाउस, शेती, फळबाग यापैकी कश्यासाठी?
जनरली, ७-१२ चा उतारा, लॅन्ड डेवलपमेंट अॅग्रीमेंट, जमीन शेती-बिगरशेती कशी आहे?, पुढे जमीनीतुन काही रोड वगैरे जाणार नाही आहे ना?, टायटल क्लीअर आहे ना? हे बघावे लागते. स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जमीन कोणत्या वादात नाही ना ते बघावे. जागा गावाबाहेर असेल तर वीज, पाणी कनेक्शन आहे ना ते बघावे.
हल्ली काही डेव्हलपर शेती जागा ९९ वर्षाच्या लीझने देतात. किंवा फळबाग सोसायटी करुन त्यात हिस्सा देतात. ते नीट बघून घ्यावे लागते. तसेच आपण जी रक्कम देतोय त्यात नक्की काय अंतर्भूत आहेत ते बघावे.
कधी कधी अश्या ठिकाणी सुरवातीची रक्कम कमी सांगितली जाते. पण नंतर वीज, पाणी यागोष्टींसाठी भरमसाठ रक्कम मेंटेनन्सच्या नावाखाली घेतली जाते.
आस, धन्स. मी रियल इस्टेट
आस, धन्स. मी रियल इस्टेट इन्व्हेस्टमेन्ट ह्या दृष्टीने विचारत आहे - साधारण ३-४ वर्षं गुंतवणूक म्हणून ठेवायला. दिशा डायरेक्ट सारख्यांकडूनच विकत घ्यायची आहे. स्वतः संशोधन करुन विकत घेण्याएव्हढा वेळ नाहिये. जर १० वर्षांनंतर विकली नाही तर फार्म हाऊसचा विचार करेन
मला पण घर घ्यायचं
मला पण घर घ्यायचं
वर आस दिलेली माहिती फार
वर आस दिलेली माहिती फार उपयुक्त आहे , जर ९९ वर्षाची लीज असेल तर ७/१२ वर बी-२ असा रिमार्क असेल आणि अशी जागा रिसेल करणे महा कठीण आणि खर्चिक काम आहे.
वर आस दिलेली माहिती फार
वर आस दिलेली माहिती फार उपयुक्त आहे , जर ९९ वर्षाची लीज असेल तर ७/१२ वर बी-२ असा रिमार्क असेल आणि अशी जागा रिसेल करणे महा कठीण आणि खर्चिक काम आहे.
गुंतवणूक म्हणूनच घ्यायचा असेल
गुंतवणूक म्हणूनच घ्यायचा असेल तर ब्येष्ट वे म्हणजे तुमच्या सी ए ला कन्सल्ट करा. माझ्या सी ए ने त्याच्या कुण्या डेव्हलपरचा प्लॉट घ्यायला मला सजेस्ट केले होते. अर्थात माझ्याकडे पैसेच नसल्याने काहीच होउ शकले नाही.
वकिलाच्या सल्ल्याशिवाय हे व्यवहार करणे धोकादायक ठरु शकते.
पुर्ण या क्षेत्रातले खाच्खळगे
पुर्ण या क्षेत्रातले खाच्खळगे माहित असतील तर कुठल्याही डेव्हलपर्सच्या थ्रु न जाता आपली आपण जमीन्न खरेदी करावी..... अर्थात त्याला खूप वेळ द्यावा लागतो..... तलाठी, कलेक्टर आदी ऑफिसात चकरा माराव्या लागतात..... आपण ज्या भागात जागा घेत आहोत तिथल्या एखाद्या विश्वासू माणसाला हेरूउन हे सर्व मॅनेज करावं लागते......
पण फक्त पैसे आहेत, या प्रकारचे ज्ञान किंवा बॅग्राऊंड नाही तरीही इंव्हेस्टमेंट म्हणून करायचय तर मग धोपट मार्गाने जा...... कोणीतरी नावाजलेला डेव्हलपर धरा..... पण यात तुमचा फायदा कमी आणि त्याचाच जास्त हे मात्र लक्षात ठेवा.......
अर्थात स्वतंत्रपणे हे व्यवहार करताना खूप धोकेही असतात... त्यामुळे पूर्ण जाण नसेल या व्यवहारांची तर स्वतंत्रपणे करू नये हा मैत्रीचा सल्ला........ वेळ देऊन पुर्ण जाणून घेऊन केलात तर जस्तीत जास्त्त आणि होणारा सगळा फायदा तुमचाच हेही लक्षात घ्या....... स्वानुभव आहे.
प्लॉट करून विकायची हल्ली टूमच
प्लॉट करून विकायची हल्ली टूमच निघालिये..... आणि असे व्यवहार करायला जाल तेंव्हा एक लक्षात येईल की आज घराघरात एस्टेट एजंट निर्माण झालेत गावागावात.......... एखादा प्लॉट विकायचा हे कळलं की सगळे तलाठी ऑफिसातून त्याच्या सातबाराच्या प्रिंट्स आणतात आणि भेटणार प्रत्येक एजंट मलाच कसे विकायचे राईट्स दिलेत हे सांगू लागतो..... या सगळ्या भाऊगर्दीत "विश्वासू कोण" हे ओळखायची नजर आपल्यालाच असायला हवी..... ते खरं स्किल आहे....... तसा विश्वासू माणूस निवडून पुढची सरकारदरबारीची कामं त्याच्या थ्रु करून घेता आली पाहिजेत.... नुसता पैसा फेकला की हे सर्व नक्कीच मिळणारे नाही.......
अश्या प्लॉट्स्ची निवड करताना लोकेशन ठरवणे हेही महत्वाचे आहे........ ३ - ४ वर्षापुर्वी कर्जत, नेरळ, भिमाशंकर हे योग्य स्पॉट्स होते इन्व्हेस्टमेंट्स्ला.... आता तिथल्या जागांचे भाव तिप्पाट चौपट झालेत आणि बहुतांन्शी जागा विकल्या गेल्यात........ सध्या मुरबाड, महाड, पाली (रोहा), भिमाशंकर अश्या ठिकाणी इंव्हेस्ट करणे सोयीचे आहे. रेट्स कमी आणि २ ते ३ वर्षात रिटर्न्स जास्त.........
श्री, असुदे, भुंगा सगळ्यांना
श्री, असुदे, भुंगा सगळ्यांना धन्स! हा धागा बंद करायची विनंती अॅडमिनना करायला आले होते. काही प्रतिसाद आलेत हे पाहून बरं वाटलं.
मला इन्व्हेस्टमेन्ट म्हणून असा प्लॉट घ्यायचा आहे हे खरं आहे पण तो विकेनच असंही काही नाही. आणि स्वतः संशोधन करून घेण्याएव्ह्ढा वेळ नक्कीच नाहिये माझ्याकडे. म्हणूनच दिशा डायरेक्ट सारख्या कंपनीमार्फत घ्यायचा विचार करत आहे. ह्या कंपनीबद्दल काही बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का? दुसर्या कुठल्या अश्या कंपनीचे चांगले अनुभव? प्लीज कळवा.
एक शेतकरीच शेती विकत घेवु
एक शेतकरीच शेती विकत घेवु शकतो ( म्हणजे ज्याच्या नावावर थोडीतरी का होइना शेती आहे असा ) असे मी ऐकले आहे , हे खरे आहे का ?
जर दुसरयाला घ्यायची असेल तर काय करायचे...
पुण्यातले भाव ज्या पद्धतीने
पुण्यातले भाव ज्या पद्धतीने वाढले आहेत ते पाहता इन्व्हेस्टमेंत म्हणून फ्लॅट घेणं धोक्याचं ठरेल. प्लॉटचे भाव पुणे आणि परिसरात गगनाला भिडलेले आहेत. मी आणखी एका धाग्यावर लिहील्याप्रमाणे आम्ही ब-याच जणांनी एकत्र येऊन रेट पाडून मागितले जी चाल चांगलीच यशस्वी झाली. यात बिल्डरचाही फायदा झाला आणि आमचाही. त्याचा नफा जरी कमी झाला तरी एकत्र एव्हढं बुकिंग मिळाल्यानं त्याची बरीचशी रिस्क कमी झाली.
प्लॉट घेताना पुण्याच्या थोडासा दूर घेतला तर रेटमधे सवलत मिळेल. काही दिवसातच पुण्याची उपनगरं पण अपुरी पडतील आणि आज घेतलेल्या थोड्या दूरच्या प्लॉतलाही भाव येईल. विकसकाकडून घेतल्यास तुमचे कष्ट वाचतील. त्याचे चार्जेस तो तुमच्याकडून वसूल करणारच आहे त्याबद्दल निश्चिंत रहा. तुम्हाला परवडत असेल तर घ्या.
त्याच्याकडून तुम्हाला एक फाईलच मिळेल जी वकिलाकडे द्या. बाकिचं तो पाहून घेईल. वकिलाची फी म्हणजे नालासाठी घोडा या प्रकारातील आहे. आत्ता वाचवायला गेलं तर भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. शक्यतो अशा कामासाठी एजंटाची मदत घेऊ नका. त्यांना स्वतःलाच कामचलाऊ ज्ञान असत आणि ते काहीही सांगतात.
फार्महाऊस, डोंगरावर विकसित होणारी खाजगी हिलस्टेशन्स यात केलेली गुंतवणूक चांगली आहे. दर सतत वाढत जातात. शेतजमिनीत बंगलो प्लॉटस असतील तर सावध रहा. शेतजमिनीत बंगलो प्लॉटस पाडायला परवानगी नाही. त्यासाठी ती जमीन अकृषिक केलेली असावी लागते जे बरेच जण करत नाहीत. पुढे गुंठेवारीत नियमित होईल असं सांगतात. ते एनए करायची जबाबदारी (लिखित) घेणार नसतील तर सगळा नशिबावरच हवाला आहे.
वकील आणि आर्किटेक्ट यांचा सल्ला खूप महत्वाचा ठरेल असं सांगावस वाटत.
एक खाजगी हिलस्टेशन इथं (उदाहरणादाखल ) देतोय
http://mysticvalley.co.in/
एक शेतकरीच शेती विकत घेवु
एक शेतकरीच शेती विकत घेवु शकतो ( म्हणजे ज्याच्या नावावर थोडीतरी का होइना शेती आहे असा ) असे मी ऐकले>>>>>
हो खरे आहे. BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT, 1948 चे कलम ६३ अन्वये फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीसच शेतजमिन घेता येते.
पण हा नियम बहुदा
पण हा नियम बहुदा महाराष्ट्रातच आहे. गुजराथ वा राजस्थान मधे शेतकरी नसलेली व्यक्ति शेतजमिन खरेदी करु शकते. पण १दा खात्री करुन घेणे.
भारताचे नागरिक नसलेले(पी आय ओ
भारताचे नागरिक नसलेले(पी आय ओ आणि ओ सी आय धारकही) शेतजमीन विकत घेउ शकत नाहीत.
हो खरे आहे. BOMBAY TENANCY
हो खरे आहे. BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT, 1948 चे कलम ६३ अन्वये फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीसच शेतजमिन घेता येते. >> तुमचे पुर्वज जर शेतकरी असतील आणी तुम्ही जुने सात बारा उतारे सापडवुन तिथल्या तलाठ्याकडून प्रमाणपत्र आणू शकलात तर तुम्हालाही शेतकरी दाखला मिळु शकतो. त्याबद्दलचे सगळे नियम माहीत नाहीत.
माझ्या माहिती नुसार भारताचे
माझ्या माहिती नुसार
भारताचे नागरिक नसलेले(पी आय ओ आणि ओ सी आय धारकही) शेतजमीन विकत घेउ शकत नाहीत.
-- Law only says non residents can not buy, law does not clearly mention citizenship (not yet, may be modified later). So, resident in India can buy agriculture land (subject to bombay tenancy act) except tree plantation land RBI Permission is needed check http://www.rbi.org.in/scripts/Fema.aspx
हो खरे आहे. BOMBAY TENANCY
हो खरे आहे. BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT, 1948 चे कलम ६३ अन्वये फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीसच शेतजमिन घेता येते. >> तुमचे पुर्वज जर शेतकरी असतील आणी तुम्ही जुने सात बारा उतारे सापडवुन तिथल्या तलाठ्याकडून प्रमाणपत्र आणू शकलात तर तुम्हालाही शेतकरी दाखला मिळु शकतो. त्याबद्दलचे सगळे नियम माहीत नाहीत.>>>
पण आताच्या कायद्याप्रमाणे, जुनी जमिन चालत नाही. तुमच्या / नातेवाईकाच्या नावावर (अर्थात तुम्ही वारस म्हणुन त्या जमिनीवर हक्क सांगु शकत असाल तर) आत्ता शेती असणे आवश्यक आहे. आणि विकली असल्यास काही मुदतीच्या आत तुम्ही दुसरी जमिन विकत घ्यायला हवी. अन्यथा तुम्ही शेतकरी असल्याचे पुरावे / दाखला ग्राह्य होत नाहीत. (पळवाटा आहेत पण ............)
कोकणभागात जागा घेताना
कोकणभागात जागा घेताना (इनव्हेस्टमेंट म्हणून नाही) स्वतः राहण्यासाठी काय काय खबरदारी घ्यावी लागते? मला असे समजले की सरकारने ठरवलेली किंमत एक गुंठ्यासाठी किमान रु. २५,०००/- आहे, हे खरे आहे का ?
मला कोकणात शेत जमिन विकत घेउन
मला कोकणात शेत जमिन विकत घेउन शेळी पालन करायचे आहे......
माझ्या कडे व कुटुंबात कोणा कडे शेतकरी असल्याचा दाखला नाही
तर मि काय करु
क्रुपया मार्ग सांगावा
कोकण भागात जागा इनव्हेस्टमेंट
कोकण भागात जागा इनव्हेस्टमेंट म्हणुन घेण्याची ईच्छा आहे. माबो वरील छो.जा वरुन एक प्रपोझल आलंय. खाली देतेय , पाहुन मत द्या.
1 - मंडणगड येथील विक्रीस असलेले Proposed NA developed plots हे sea backwater facing आहेत. (२.३० लाखांपासून पुढे.)
2 - Instalment facility १२, २४, १८ व ३६ महिन्यांकरिता उपलब्ध आहे. (interest free).
3 - पहिल्या ५० ग्राहकांसाठी Stamp duty & reg, charges फ्री आहेत.
वैशिष्ठ्ये -
1 - २४ तास सुरक्षा
2 - Children park
3 - Fencing around the plot.
अजुन एक सन्केत स्थळ. मी ही
अजुन एक सन्केत स्थळ. मी ही जागा पाहून आलो होतो, view फार छान वाटला... http://emeraldvalley.co.in/
>>माझ्या कडे व कुटुंबात कणा
>>माझ्या कडे व कुटुंबात कणा कडे शेतकरी असल्याचा दाखला नाही
दोन पर्याय
१. मध्यप्रदेशात कोणत्या तरी खेड्यात कमी पैशात काही गुनठे जागा घ्यायची तिथ्ला सात बारा इथे जोडायचा.
२. ज्याच्या कडून जागा घ्यायची आहे, तो चान्गल्या परिचयाचा असेल तर non-revocable power of attorney करून घ्यायची.
किन्वा...
चिरीमिरी बक्शीस, मिठाईचे पुडे, इत्यदि इत्यादि
तुमचे पुर्वज जर शेतकरी असतील
तुमचे पुर्वज जर शेतकरी असतील आणी तुम्ही जुने सात बारा उतारे सापडवुन तिथल्या तलाठ्याकडून प्रमाणपत्र आणू शकलात तर तुम्हालाही शेतकरी दाखला मिळु शकतो. त्याबद्दलचे सगळे नियम माहीत नाहीत. >>
रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठ्याने दिलेल्या सल्ला नुसार सेतू सुविधे मार्फत शेतकरी दाखला मिळवण्यासाठी रितसर अर्ज दाखल करता येतो. त्या साठी खालिल बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१. ७/१२ वर वडिल किंवा आईचे नाव असणे आवश्यक आहे.
२. तो ७/१२ शेतजमिनीचा असणे आवश्यक आहे.
३. वडिल किंवा आईचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
४. जर वरिल दोन बाबींची पुर्तता होत असेल तर Online सेतू (http://collectorratnagiri.in/home/citizenApp) सुविधे मार्फत आपण अर्ज सादर करु शकता.
शेतीउत्पन्न खरोखरच करमुक्त असते का?
http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20120310/4839285100559176572.htm
शेती / जमिन विषयक कायद्याची माहिती देणारी वेबसाईट
http://www.satbara.co.in/InnerPages/ShetiVishyakMahiti_14.html
सकाळच्या वास्तु प्रदर्शनात
सकाळच्या वास्तु प्रदर्शनात घरची मंडळी जाऊन आली. त्यात लॅण्ड्सन नावाच्या कंपनीचे प्रोजेक्ट दिसले. रिहे (पुण्यजवळ वाकडपासून पुढे दहाबारा किमीवर) गावात डोंगर फोडून, रस्त्याच्या बाजूने प्लॉट असणार आहेत. साडेतीनशे रेट आहे. २/४/८/१०/१२ गुण्ठ्याचे प्लॉट आहेत.
http://www.landson.in/landson-pune-project-rihe-valley.php
लॅण्ड्सन कंपनी चा कुणाला अनुभव आहे का? या स्कीमबद्दल काय मत?
प्लॉट चांगला वाटतो..ग्रुप
प्लॉट चांगला वाटतो..ग्रुप बुकिंग आहे का? वेबसाईटवर तर जागा रेडी आहे.. कागदपत्रे बघा आणी घ्या..
I am interested to sell my
I am interested to sell my bunglow plot at Pirangut. Clear title and within bunglow plot colony. 7/12 is available and collector sanctioned NA plot. FSI is 1:1 available. Contact me if interested.
प्लॉट घेण्यासाठी कर्ज कुठे
प्लॉट घेण्यासाठी कर्ज कुठे मिळेल ?
मला माहिती असलेल्या सर्व बॅकस फक्त फ्लॅट साठी कर्ज देतात.
जागेची आणि कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्र आहेत.
कृपया कोणास माहिती असेल तर मार्ग दर्शन करा.
धन्यवाद
प्लॉट घेण्याला काही ब्यान्का,
प्लॉट घेण्याला काही ब्यान्का, पतसंस्था , कर्ज देतात.
अॅग्रीकल्चर प्लॉट बायकोच्या नावे घेतला ( कारण तिचे वडील शेतकरी) तर तो नंतर नवर्याच्या नावे ट्रान्स्फर कसा करायचा ? किती खर्च येतो ? अन्यथा राजस्तान मध्य प्रदेशची दहा गुंटे जमीन घेऊन नवरा शेतकरी बनून प्लॉट डायरेक्ट विकत घेऊ शकतो. पण त्याला ६५००० खर्च येतो... दोन्हीतील सोपे व कमी खर्चिक काय आहे?
बायकोच्याच नावे प्लॉट ठेऊन नवरा त्यावर घर बांधू शकतो का? मग त्या घराची मालकी कुणाची ? बायको की नवरा की जॉइंट ? नवर्याला करात सवलत मिळते का?